व्हिडिओ पाहण्यासाठी

आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी सूचना

आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी सूचना

अनुक्रमणिका

१. आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेत भाग असलेल्या सर्वांना खाली दिलेल्या सूचनांचा फायदा होईल. ज्यांचा भाग आहे, त्यांनी तो सादर करण्याआधी ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका यात त्यांच्या भागासाठी दिलेल्या मार्गदर्शनाचा आणि इथे दिलेल्या मुद्द्‌यांचा अभ्यास करावा. विद्यार्थी भाग सादर करण्यासाठी सर्व प्रचारकांना प्रोत्साहन द्या. यासोबतच जे लोक नेहमी सभांना उपस्थित राहतात आणि जे बायबलच्या शिकवणींना मानतात व आपलं जीवन बायबल तत्त्वांनुसार जगतात तेसुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतात. प्रचारक नसलेला एखादा व्यक्‍ति जेव्हा भाग सादर करण्याची इच्छा दाखवतो तेव्हा जीवन आणि सेवाकार्य सभेच्या पर्यवेक्षकाने ते करण्यासाठी पात्र बनण्याच्या ज्या आवश्‍यकता आहेत, त्यावर, इच्छा दाखवलेल्या व्यक्‍तिसोबत चर्चा केली पाहिजे. त्यानंतर ते त्या व्यक्‍तीला सांगू शकतात की ते पात्र आहेत की नाहीत. हे त्याच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍याच्या उपस्थितीत (किंवा विश्‍वासात असलेल्या पालकांच्या उपस्थितीत) केलं पाहिजे. एखाद्या व्यक्‍तीने बाप्तिस्मारहित प्रचारक होण्‌यासाठी ज्या आवश्‍यकता असतात त्याच इथेसुद्धा लागू होतात.—संघटित अध्याय ८ परि. ८.

 सुरुवातीचे शब्द

२. १ मिनिट. सुरुवातीचं गीत व प्रार्थना झाल्यानंतर दर आठवडी ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष पुढील कार्यक्रमाबद्दल श्रोत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करतील. तसंच, सभेच्या अध्यक्षांनी मंडळीला फायदा होईल अशा मुद्द्‌यांवर जोर द्यावा.

 देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  ३. भाषण: १० मिनिटं. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका यामध्ये या भागाचा विषय आणि दोन ते तीन मुख्य मुद्द्‌यांची रूपरेषा देण्यात आली आहे. हा भाग एखाद्या वडीलाला किंवा योग्यताप्राप्त साहाय्यक सेवकाला देण्यात यावा. आठवड्याच्या बायबल वाचनासाठी जेव्हा एका नवीन पुस्तकाची सुरुवात होते, तेव्हा त्याच्या प्रस्तावनेचा व्हिडिओ दाखवला जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्‍या माहितीचा संबंध विषयाशी कसा आहे हे वक्त्याने सांगावं. पण त्यासोबतच, कार्यपुस्तिकेतल्या रूपरेषेत असलेल्या मुद्द्‌यांचा समावेश, त्याने आपल्या भाषणामध्ये नक्की करावा. विषय आणखी स्पष्ट करण्यासाठी सोबतच्या चित्रांची आणि शास्त्रवचनातल्या मुद्यांची विचारपूर्वक रचना करण्यात आली आहे. वेळ असेल तर वक्त्याने या माहितीचा चांगला वापर केला पाहिजे. जर एखादी माहीती रुपरेषेतल्या मुद्द्‌यांना धरून असेल तर वक्‍ता त्याचासुद्धा वापर आपल्या भाषणात करू शकतो..

 ४. आध्यात्मिक रत्नं शोधा: १० मिनिटं. हा प्रश्‍न-उत्तरांचा भाग आहे. यात प्रस्तावना किंवा समाप्ती नसावी. हा भाग वडीलाने किंवा एका योग्यता प्राप्त सहाय्यक सेवकाने हाताळावा. त्याने श्रोत्यांना दोन्ही प्रश्‍न विचारले पाहिजेत. या प्रश्‍नांमधली वचनं वाचायची की नाही हे तो ठरवू शकतो. ज्यांना उत्तरं विचारली जातील, त्यांनी ३० सेकंदात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत उत्तरं द्यावीत..

 ५. बायबल वाचन: ४ मिनिटं. हा विद्यार्थी भाग एका पुरुष विद्यार्थ्याने हाताळला पाहिजे. या भागासाठी प्रस्तावना किंवा समाप्ती करण्याची गरज नाही. विद्यार्थ्याने फक्‍त दिलेल्या भागाचं वाचन करावं. सभेच्या अध्यक्षाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की भाग सादर करणारा विद्यार्थी अर्थ समजून, अचूकपणे व न अडखळता वाचत आहे का? तो योग्य ठिकाणी जोर देत, आवाजात योग्य चढ-उतार करत, योग्य ठिकाणी थांबून सहजपणे वाचत आहे का? आणि याबाबतीत प्रगती करण्यासाठी ते विद्यार्थ्याला मदत करतील. बायबल वाचनासाठी दिलेले काही उतारे छोटे असतात तर काही मोठे. त्यामुळे हा भाग देताना जीवन आणि सेवाकार्य सभेच्या पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन भाग नेमावेत.

 सेवाकार्यासाठी तयार व्हा

६. १५ मिनिटं. सभेचा हा भाग सर्वांना सेवाकार्याचा सराव करता यावा, यासाठी बनवण्यात आला आहे. तसंच, त्यांचं संभाषण व प्रचार करण्याचं आणि शिकवण्याचं कौशल्य सुधारण्यासाठी, या भागामुळे त्यांना मदत व्हावी, हा सुद्धा या भागाचा उद्देश आहे. आवश्‍यकतेनुसार, वडीलांना विद्यार्थी भाग मिळू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याने ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका यामध्ये दिलेल्या त्यांच्या भागापुढे कंसात दिलेल्या शिकवणे किंवा लोकांवर प्रेम करा माहितीपत्रकातून अभ्यासाच्या मुद्द्‌यावर काम केलं पाहिजे. काही वेळा हा भाग चर्चेच्या स्वरूपात सादर करण्यासाठी नियुक्‍त केला जाईल. असा भाग वडील किंवा पात्र असलेल्या सहाय्यक सेवकाने हाताळावा.—चर्चेचे भाग कसे हाताळायचे ते समजून घेण्यासाठी  परिच्छेद १५ पहा.

 ७. संभाषण सुरू करण्यासाठी: हा विद्यार्थी भाग एखादा बांधव किंवा बहिण हाताळू शकते. सहाय्यक म्हणून विरुद्धलिंगी व्यक्‍तीला नेमताना ती विद्यार्थ्यांच्या कुटुंबातलीच सदस्य असावी. विद्यार्थी आणि सहाय्यक बसू शकतात किंवा उभे राहू शकतात.—भागासाठी दिलेली माहिती आणि सेटिंगबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी  परिच्छेद १२ आणि  १३ पहा.

 ८. पुन्हा भेटण्यासाठी: हा विद्यार्थी भाग एखादा बांधव किंवा बहिण हाताळू शकते. त्याचा सहाय्यक त्याच्याच लिंगाचा असावा. (आमची राज्य सेवा ५/९७ पृ. २) विद्यार्थी आणि सहाय्यक बसू शकतात किंवा उभे राहू शकतात. पुनर्भेटीच्या वेळी आधीची चर्चा कशी पुढे न्यावी हे दाखवून दिलं पाहिजे. भागासाठी दिलेलं साहित्य आणि सेटिंगबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी  परिच्छेद १२ आणि  १३ पहा.

 ९. शिष्य बनवण्यासाठी: हा विद्यार्थी भाग एखादा बांधव किंवा बहिण हाताळू शकते. त्याचा सहाय्यक त्याच्याच लिंगाचा असावा. (आमची राज्य सेवा ५/९७ पृ. २) विद्यार्थी आणि सहाय्यक बसू शकतात किंवा उभे राहू शकतात. या भागामध्ये असं दाखवावं की बायबल अभ्यास आधीच सुरू आहे आणि पुढील भागावर चर्चा केली जात आहे. चर्चेत अभ्यासाची सुरुवात किंवा समाप्ती दाखवण्याची गरज नाही, परंतु जर विद्यार्थी वरीलपैकी एखाद्या अभ्यासाच्या मुद्द्‌यावर (सुरुवात किंवा समाप्ती यावर) काम करत असेल, तर तो तसं करू शकतो. दिलेल्या भागासाठी असलेलं सर्व साहित्य मोठ्याने वाचणं आवश्‍यक नाही. पण तसं करण्यास मनाईही नाही.

 १०. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं: हा भाग भाषण म्हणून नियुक्‍त केल्यावर एका बांधवाने हाताळला पाहिजे. पण प्रात्यक्षिक म्हणून नियुक्‍त केल्यावर हा विद्यार्थी भाग एखादा बांधव किंवा बहिण हाताळू शकते. साहाय्यक म्हणून विरुद्धलिंगी व्यक्‍तीला नेमताना ती विद्यार्थ्यांच्या कुटुंबातलीच सदस्य असावी. संदर्भात दिलेल्या माहितीचा वापर करून विद्यार्थाने विषयाला लागू होणाऱ्‍या प्रश्‍नाचं अचूक आणि पटण्यासारखं उत्तंर दिलं पाहिजे. विद्यार्थी त्याच्या भागात, संदर्भात दिलेल्या प्रकाशनाचा वापर करावा की नाही हे ठरवू शकतो.

 ११. भाषण: हा विद्यार्थी भाग, एखादा बांधव हाताळेल व तो ते भाषणाच्या स्वरुपात सादर करेल. जेव्हा लोकांवर प्रेम करा महितीपत्रकाच्या आणखी माहिती-क मधील एखाद्या मुद्यावर भाषण आधारित असेल, तेव्हा विद्यार्थ्याने, ते वचन किंवा ती वचनं सेवाकार्यात कशी लागू करता येतील यावर जोर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, एखादं वचन कधी वापरलं जावं, वचनाचा अर्थ आणि त्यावर लोकांशी चर्चा कशी करायची, हे तो स्पष्ट करू शकतो. जर लोकांवर प्रेम करा माहितीपत्रकाच्या एखाद्या धड्यातल्या एका मुद्यावर भाषण आधारित असेल तर विद्यार्थ्याने तो मुद्दा सेवाकार्यात कसा लागू करायचा यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तो धड्यातल्या पहिल्या मुद्द्‌यामध्ये दिलेल्या उदाहरणावर जोर देऊ शकतो किंवा भाग चांगल्या प्रकारे करण्यासाठी, पाठातल्या अशा इतर वचनांवर जोर देऊ शकतो ज्या वचनांमुळे मदत होईल.

   १२. साहित्य: या आणि यानंतरच्या परिच्छेदातली माहिती “संभाषण सुरू करण्यासाठी” आणि “पुन्हा भेटण्यासाठी” या भागांसाठी आहे. एखादा विशिष्ट उद्देश दिलेला नसेल, तर विद्यार्थ्याने एकच ध्येय लक्षात ठेवावं ते म्हणजे तो बोलत असलेल्या व्यक्‍तीला उपयोगी पडेल असं एक साधं बायबल सत्य सांगणं आणि पुढच्या संभाषणासाठी पाया घालणं. विद्यार्थ्याने असा विषय निवडला पाहिजे जो तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठरेल आणि ज्याची लोकांना गरज असेल. आपल्या शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन किंवा व्हिडिओ सादर करायचा की नाही हे तो ठरवू शकतो. एखादं तोंडपाठ सादरीकरण देण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी, त्यांचं संभाषण करण्याचं कौशल्य वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी ते काही गोष्टी करू शकतात. जसं की, वैयक्‍तिक आवड दाखवणं आणि चर्चेत स्वाभाविकता आणणं.

   १३. सेटिंग: विद्यार्थ्याने, भागासाठी दिलेल्या मुख्य सेटिंगला स्थानिक परिस्थितीनुसार लागू करावं. उदाहरणार्थ:

(१) घरोघरचं साक्षकार्य: या सेटिंगमध्ये घरोघरी प्रचार करण्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा समावेश होतो. मग ते वैयक्‍तिकरित्या असो, फोनद्वारे किंवा पत्राद्वारे. तसंच या भागात घरोघरच्या सेवेत भेटलेल्या व्यक्‍तीला पुन्हा भेटण्याचाही समावेश होतो.

(२) अनौपचारिक साक्षकार्य: या सेटिंगमधून हे दिसून येईल की आपण साधे संभाषण सुरू असताना, साक्ष देण्याची संधी कशी शोधू शकतो. यामध्ये तुम्ही कामावर, शाळेत, तुमच्या शेजारच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना किंवा तुमची रोजची कामं करत असताना भेटणाऱ्‍यांना, एखादा बायबलवर आधारित विचार सांगणं समाविष्ट आहे.

(३) सार्वजनिक साक्षकार्य: या सेटिंगमध्ये ट्रॉलीवर साक्षकार्य करणं, व्यवसायाच्या ठिकाणातल्या लोकांना कॉल करणं, रस्त्यावर किंवा बागेत साक्ष देणं, पार्किंगच्या ठिकाणी किंवा जिथे कुठे लोक भेटतील तिथे साक्ष देण्याचा समावेश असू शकतो.

 १४. व्हिडिओ आणि साहित्याचा वापर: परिस्थितीनुसार, एखादा विद्यार्थी व्हिडिओ दाखवण्याचा किंवा साहित्य देण्याचा निर्णय घेऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या भागात व्हिडिओ असेल किंवा त्याने एखाद्या व्हिडिओचा वापर करण्याचं ठरवलं असेल तर, त्याने व्हिडिओबद्दल सांगून त्यावर चर्चा करावी. पण व्हिडिओ दाखवू नये.

  ख्रिस्ती जीवन

१५. गीतानंतर होणाऱ्‍या या १५ मिनिटांच्या भागात एक किंवा दोन भाग सादर केले जातील. श्रोत्यांना देवाचं वचन लागू करण्यासाठी मदत व्हावी, हा या भागाचा उद्देश आहे. विशिष्ट सूचना दिलेली नसेल तर हा भाग एका वडिलाला किंवा पात्र असलेल्या साहाय्यक सेवकाला दिला जावा. पण ‘मंडळीच्या गरजा’ हा भाग एका वडीलानेच हाताळावा. जेव्हा एखादा भाग चर्चा म्हणून नियुक्‍त केला जातो, तेव्हा वक्‍ता संपूर्ण चर्चेदरम्यान प्रश्‍न विचारू शकतो. यासाठी तो दिलेल्या प्रश्‍नांशिवाय इतरही प्रश्‍नांचा उपयोग करू शकतो. मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यासाठी आणि श्रोत्यांना सहभागासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून त्याने आपली प्रस्तावना संक्षिप्त ठेवावी. जर एखादी मुलाखत घेतली जाणार असेल तर, ज्याची मुलाखत आहे त्या व्यक्‍तीने शक्य असेल तर आपल्या जागेवर बसून बोलण्याऐवजी मंचावरून मुलाखत दिली पाहिजे.

  १६. मंडळीचा बायबल अभ्यास: ३० मिनिटं. हा भाग योग्य पात्रता असणाऱ्‍या वडीलांनी हाताळावा. (मंडळीत वडील कमी असतील तर योग्य पात्रता असणाऱ्‍या साहाय्यक सेवकांना हा भाग दिला जाऊ शकतो.) मंडळीचा बायबल अभ्यास चालवण्यासाठी कोण योग्य आहेत हे वडीलवर्गानं ठरवावं. अभ्यास चालवणाऱ्‍या बांधवांनी हा भाग अशा प्रकारे हाताळावा ज्यामुळे अभ्यास वेळेवर संपवता येईल आणि मुख्य वचनांवर जोर देता येईल. तसंच त्यांनी चर्चा केलेली माहिती व्यावहारिक रीत्या कशी लागू करता येईल हे समजून घ्यायला सर्वांना मदत करावी. अभ्यास चालवणाऱ्‍या बांधवांना प्रश्‍न-उत्तरांचा भाग कसा घ्यावा याबद्दल प्रकाशित केलेल्या मार्गदर्शनांची उजळणी केल्यामुळे फायदा होईल. (टेहळणी बुरूज २३.०४, पृ. २४, चौकट) आठवड्यासाठी जितका भाग दिला आहे, त्याच्या सगळ्या मुद्द्‌यांवर चर्चा झाली असेल, तर चर्चा विनाकारण वाढवण्याची गरज नाही. जिथे शक्य असेल तिथे दर आठवड्यासाठी वेगवेगळ्या संचालकांचा व वाचकांचा वापर करावा. अध्यक्षांनी जर अभ्यास कमी वेळेत संपवण्याची सूचना दिली असेल तर बायबल अभ्यास संचालित करणारा बांधव अभ्यास कमी वेळात संपवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तो काही परिच्छेद न वाचण्याचा निर्णयसुद्धा घेऊ शकतो.

  समाप्तीचे शब्द

१७. ३ मिनिटं. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष सभेमध्ये शिकलेल्या काही विशिष्ट मुद्द्‌यांची उजळणी करतील आणि येणाऱ्‍या आठवड्यात जी माहिती दिली जाईल तिची झलक देतील. वेळ असेल तर ते पुढच्या सभेतल्या विद्यार्थ्यांची नावं सांगून त्यांना त्यांच्या भागांची आठवण करून देऊ शकतात. समाप्तीचे शब्द बोलताना अध्यक्ष आवश्‍यक घोषणा किंवा मंडळीसाठी आवश्‍यक पत्रं असतील तर ती वाचू शकतात. नेहमीची घोषणा, जसं की क्षेत्र सेवेबद्दलच्या घोषणा आणि साफसफाईचं वेळापत्रक, स्टेजवरून घोषित केलं जाऊ नये. तर या गोष्टी माहिती-फलकावर लावाव्यात. समाप्तीच्या वेळी अध्यक्षांकडे घोषणा करण्यासाठी किंवा पत्रं वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर ते ख्रिस्ती जीवन या भागातल्या नेमणुका हाताळणाऱ्‍या बांधवांना त्यांचे भाग आवश्‍यकतेनुसार लवकर संपवायला सांगू शकतात. ( परिच्छेद १६ आणि  १९ पहा.) गीत व प्रार्थनेने सभेची समाप्ती केली जावी.

  प्रशंसा आणि सल्ला

१८. प्रत्येक विद्यार्थी भागानंतर ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेच्या अध्यक्षांकडे, नेमून दिलेल्या मुद्द्‌याच्या आधारावर विद्यार्थ्याची प्रशंसा करण्यासाठी आणि त्याला सल्ला देण्यासाठी जवळजवळ एक मिनिट आहे. भाग सादर करण्याआधी विद्यार्थी कोणत्या मुद्द्‌यावर काम करत आहे, याची घोषणा अध्यक्ष करणार नाहीत. पण, विद्यार्थ्याने आपला भाग सादर केल्यावर आणि त्याची प्रशंसा केल्यानंतर, ते विद्यार्थी काम करत असलेला मुद्दा सांगू शकतात. विद्यार्थ्याने दिलेला मुद्दा चांगल्या प्रकारे कसा लागू केला किंवा त्या मुद्द्‌यावर त्याने आणखी लक्ष का आणि कसं दिलं पाहिजे, हे अध्यक्ष प्रेमळपणे समजावून सांगतील. तसंच विद्यार्थ्याला किंवा श्रोत्यांना उपयोगी पडतील अशा इतर मुद्द्‌यांबद्दलही अध्यक्ष सांगू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, अध्यक्ष सभा संपल्यावर किंवा इतर वेळी, विद्यार्थ्याला व्यक्‍तिगतपणे अतिरिक्‍त प्रोत्साहनदायक सल्ला देऊ शकतात. त्यासाठी ते लव पीपल ब्रोशर, शिकवणे माहितीपत्रकाचा किंवा सेवा स्कूल पुस्तकाचा वापर करू शकतात. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेच्या अध्यक्षाच्या व साहाय्यक सल्लागाराच्या भूमिकेबद्दल अधिक माहितीसाठी,  परिच्छेद १९,  २४, आणि  २५ पहा.

     वेळ

१९. कोणत्याही भागासाठी किंवा अध्यक्षांच्या टिप्पण्यांसाठी, दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला जाऊ नये. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेच्या कार्यपुस्तिका यात प्रत्येक भागाला अमुक वेळ नेमून दिली आहे. जर भागातल्या सगळ्या मुद्द्‌यांवर चर्चा झाली असेल तर दिलेला वेळ संपवण्यासाठी विनाकारण माहिती देऊ नये. जर भाग नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण झाले नाहीत तर जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष किंवा साहाय्यक सल्लागाराने व्यक्‍तिगत सल्ला द्यावा. ( परिच्छेद २४ आणि  २५ पहा.) गीत आणि प्रार्थनेसोबत संपूर्ण सभा, १ तास ४५ मिनिटांत संपली पाहिजे

 विभागीय पर्यवेक्षकांची भेट

२०. जेव्हा मंडळीमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तेव्हा संपूर्ण कार्यक्रम ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेच्या कार्यपुस्तिका यानुसार चालवला जावा. फक्‍त पुढे दिलेले बदल केले जावेत: ख्रिस्ती जीवन या भागात ३० मिनिटांच्या बायबल अभ्यासाऐवजी विभागीय पर्यवक्षकांचं सेवा भाषण असेल. सेवा भाषणाआधी सभेचे अध्यक्ष सभेची उजळणी करतील, पुढच्या सभेची झलक देतील, आवश्‍यक घोषणा करतील आणि काही पत्रं असल्यास ती वाचतील. त्यानंतर ते विभागीय पर्यवेक्षकांना स्टेजवर आमंत्रित करतील. सेवा भाषणानंतर विभागीय पर्यवेक्षक सभेची समाप्ती त्यांनी निवडलेल्या गीताने करतील. ते कदाचित दुसऱ्‍या एखाद्या बांधवाला शेवटची प्रार्थना करायला सांगतील. मंडळीच्या भाषेमध्ये चालवले जाणारे अतिरिक्‍त वर्ग विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान चालवले जाणार नाहीत. पण दुसऱ्‍या भाषेचा गट विभागीय पर्यवेक्षकाच्या भेटीदरम्यानही आपल्या सभा नेहमीप्रमाणे संचालित करू शकतो. फक्‍त विभागीय पर्यवेक्षकांच्या सेवा भाषणासाठी या गटाने मंडळीसोबत एकत्र आलं पाहिजे.

 संमेलन किंवा अधिवेशनाचा आठवडा

२१. संमेलन किंवा अधिवेशनाच्या आठवड्यात मंडळीची कोणतीही सभा होत नाही. या आठवड्यांच्या कार्यक्रमाचा अभ्यास प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत किंवा वैयक्‍तिकरीत्या करण्यासाठी मंडळीला आठवण करून द्यावी.

 स्मारकविधीचा आठवडा

२२. स्मारकविधी जर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये असेल, तर त्या आठवड्यात ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभा घेऊ नये.

 जीवन आणि सेवाकार्य सभेचे पर्यवेक्षक

२३. वडीलवर्गाने निवडलेले एक वडील जीवन आणि सेवाकार्य सभेचे पर्यवेक्षक म्हणून काम करतील. सभा सुव्यवस्थेने आणि दिलेल्या सूचनांनुसार चालवली जात आहे, याची खातरी करून घेण्याची जबाबदारी त्यांची असेल. त्यांनी साहाय्यक सल्लागारासोबत वेळोवेळी आवश्‍यक गोष्टींबद्दल मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्यावर लगेच, सभेच्या पर्यवेक्षकांनी दोन महिन्यांसाठी असणारे सर्व भाग नेमून द्यावेत. यामध्ये विद्यार्थी भाग आणि इतर सर्व भाग नेमून द्यावेत, तसंच वडीलवर्गाने ठरवलेल्या वडीलांमधून सभेचा अध्यक्ष कोण असेल हेही नेमून द्यावं. ( परिच्छेद ३-१६ आणि  २४ पाहा.) विद्यार्थ्यांना भाग नेमून देताना त्यांचं वय, अनुभव आणि दिलेल्या विषयावर मोकळेपणाने बोलता येणे या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. सभेचे इतर भाग नेमून देताना सुद्धा या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक भाग कमीत कमी तीन आठवड्यांआधी नेमून देण्यात यावेत. विद्यार्थी भाग नेमून देण्यासाठी हमारी मसीही ज़िंदगी और सेवा सभा में विद्यार्थियों के भाग (S-89) या फॉर्मचा वापर करावा. सभेचा संपूर्ण आराखडा माहिती फलकावर लावला जाईल याची खातरी जीवन आणि सेवाकार्य सभेच्या पर्यवेक्षकाने करावी. सभेच्या पर्यवेक्षकाला मदत करण्यासाठी वडीलवर्ग आणखी एका वडीलाला किंवा एका साहाय्यक सेवकाला सांगू शकतात. पण विद्यार्थी भाग सोडून इतर सर्व भाग फक्‍त वडीलांनीच नेमून दिले पाहिजेत.

    जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष

२४. प्रत्येक आठवड्यासाठी एक वडील, ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष असतील. (जिथे वडीलांची संख्या कमी आहे तिथे गरज असल्यास योग्य पात्रता असलेल्या साहाय्यक सेवकाची नेमणूक केली जाऊ शकते.) सुरुवातीचे आणि समाप्तीचे शब्द तयार करण्याची जबाबदारी अध्यक्षांची असेल. ते सर्व भागांचा परिचय करून देतील आणि वडीलवर्गातल्या वडीलांच्या संख्येनुसार, कधीकधी आवश्‍यक असल्यास सभेत इतर भागसुद्धा हाताळतील. ज्या भागांत फक्‍त व्हिडिओ दाखवण्यासाठी सांगण्यात आलं आहे, पण त्यावर चर्चा नाही असे भाग अध्यक्षांनीच हाताळावेत. दोन भागांच्या मध्ये दिल्या जाणाऱ्‍या टिप्पण्या अगदी थोडक्यात असाव्यात. कोणकोणते वडील या भूमिकेसाठी योग्य आहेत हे वडीलवर्ग ठरवेल. योग्य पात्रता असलेल्या वडीलांना सभेचे अध्यक्ष होण्याची जबाबदारी वेळोवेळी दिली जाईल. मंडळीच्या परिस्थितीनुसार जीवन आणि सेवाकार्य सभेच्या पर्यवेक्षकाला, इतर योग्यताप्राप्त वडीलांपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष म्हणून वापरलं जाऊ शकतं. एखादे वडील बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी पात्र असतील, तर ते सभेचे अध्यक्ष बनण्यासाठीही पात्र असतील. पण, कृपया हे लक्षात असू द्या, की अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्‍या वडीलांनी गरज असल्यास विद्यार्थ्यांना मदत होईल अशा प्रकारे त्यांची प्रशंसा करावी आणि त्यांना प्रेमळपणे सल्ला द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. यासोबतच, सभा वेळेवर संपवण्याची जबाबदारीही अध्यक्षांची आहे. ( परिच्छेद १७ आणि  १९ पाहा.) जर अध्यक्षांची इच्छा असेल आणि स्टेजवर पुरेशी जागा असेल, तर अध्यक्षांसाठी एक स्टँडींग माईक स्टेजवर ठेवला जाऊ शकतो. यामुळे, अध्यक्ष पुढच्या भागाची ओळख करून देत असतानाच, भाग सादर करणारा बांधव स्टेजवर वक्त्यासाठी असलेल्या माईकजवळ येऊन उभा राहू शकेल. तसंच बायबल वाचनाच्या वेळी आणि ‘सेवाकार्यासाठी तयार व्हा’ या भागादरम्यान हवं असल्यास अध्यक्ष स्टेजवरच एका खुर्चीवर बसू शकतात. यामुळे वेळ वाचेल.

   साहाय्यक सल्लागार

२५. जिथे शक्य असेल तिथे या जबाबदारीसाठी एका अशा वडीलांची नियुक्‍ती केली जावी जे अनुभवी वक्‍ता आहेत. साहाय्यक सल्लागार हा वडील आणि साहाय्यक सेवक हाताळत असलेल्या कोणत्याही भागासाठी गरज असते, तेव्हा वैयक्‍तिक सल्ला देऊ शकतो. मग हा भाग जीवन आणि सेवाकार्य सभेमधला असो, जाहीर भाषण असो, टेहळणी बुरूज अभ्यास किंवा मंडळीचा बायबल अभ्यास संचालित करणं असो किंवा त्याचं वाचन करणं असो. ( परिच्छेद १९ पाहा.) जर मंडळीमध्ये बरेच वडील कुशल वक्‍ता आणि शिक्षक असतील तर, दर वर्षी वेगवेगळ्या वडीलांना सहाय्यक सल्लागार होण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. सहाय्यक सल्लागाराने प्रत्येक भागानंतर सल्ला देणं गरजेचं नाही.

 अतिरिक्‍त वर्ग

२६. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन मंडळी विद्यार्थी भागांसाठी अतिरिक्‍त वर्ग आयोजित करू शकते. प्रत्येक अतिरिक्‍त वर्गात एक योग्यताप्राप्त सल्लागार, शक्यतो एक वडील असणं गरजेचं आहे. गरज असल्यास एका निपुण साहाय्यक सेवकाला वापरलं जाऊ शकतं. या जबाबदारीसाठी कोण योग्य आहे आणि वेळोवेळी यात फेरबदल करत राहण्याची गरज आहे का, हे वडीलवर्ग ठरवेल. या सल्लागाराने  परिच्छेद १८ मध्ये दिलेल्या सूचनांचं पालन करावं. ज्या मंडळीत अतिरिक्‍त वर्ग चालवला जातो, तिथे आध्यात्मिक रत्नं शोधा हा भाग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्‍त वर्गात जाण्याची विनंती केली जावी. विद्यार्थी भाग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मंडळीसोबत परत एकत्र यावं.

 व्हिडिओ

२७. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेमध्ये काही भागांशी संबंधीत ठरावीक व्हिडिओ दाखवले जातील. हे व्हिडिओ JW Library® ॲपमध्ये उपलब्ध असतील. ते वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमाने पाहिले जाऊ शकतात.

© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

S-38-MR 11/23