व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन

२ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन

बायबल म्हणतं: “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.”​—रोमकर १५:४.

याचा काय अर्थ होतो?

बायबलमधल्या सांत्वनदायक शब्दांमुळे आपल्याला बळ मिळतं. तसंच, आपली सहनशक्‍ती वाढते आणि यामुळे आपल्याला नकारात्मक विचारांवर मात करणं शक्य होतं. इतकंच काय तर, बायबल आपल्याला एक आशासुद्धा देतं. त्यात सांगितलंय की लवकरच एक अशी वेळ येईल जेव्हा मनाला वेदना देणाऱ्‍या भावना पुन्हा कधीही आपल्याला सतावणार नाहीत.

यामुळे कशी मदत होऊ शकते?

आपल्या प्रत्येकालाच अधूनमधून नकारात्मक भावनांना तोंड द्यावं लागतं. पण डिप्रेशन किंवा अँग्झायटीची समस्या असलेल्यांना अशा त्रासदायक भावनांशी दररोज झगडावं लागतं. अशा वेळी बायबल कशी मदत करू शकतं?

  • बायबलमध्ये बरेच सकारात्मक विचार दिले आहेत. आणि यामुळे आपल्याला नकारात्मक विचार काढून टाकायला मदत होऊ शकते. (फिलिप्पैकर ४:८) यातले शब्द वाचल्यामुळे त्रास देणाऱ्‍या विचारांऐवजी मनाला दिलासा आणि शांती देणाऱ्‍या गोष्टींवर विचार करत राहायला मदत होते.​—स्तोत्र ९४:१८, १९.

  • आपली काहीच किंमत नाही हा विचार मनातून काढून टाकायला बायबल आपल्याला मदत करू शकतं.​—लूक १२:६, ७.

  • बायबलमध्ये असे बरेचसे वृत्तान्त दिले आहेत ज्यांमुळे आपल्याला याची खात्री पटते की आपण एकटे नाही, आणि आपला सृष्टिकर्ता देव आपल्या भावना पूर्णपणे समजू शकतो.​—स्तोत्र ३४:१८; १ योहान ३:१९, २०.

  • बायबल आपल्याला असं वचन देतं, की देव आपल्या त्रासदायक आठवणीही नेहमीसाठी काढून टाकेल. (यशया ६५:१७; प्रकटीकरण २१:४) ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला हार न मानता नकारात्मक विचारांशी आणि भावनांशी लढत राहायला मदत होऊ शकते.