व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सन्मान प्राप्त करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू नये

सन्मान प्राप्त करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू नये

“ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.”—नीति. २९:२३.

१, २. (क) “सन्मान” असे भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ काय आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

 तुम्ही जेव्हा “सन्मान” हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येते? बायबलमध्ये “सन्मान” असे भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू शब्दातून वजनदारपणा हा अर्थ सूचित होतो. प्राचीन काळात, जेव्हा पैसे मौल्यवान धातूंपासून बनलेले असायचे, तेव्हा नाणी जितकी जास्त वजनदार असायची तितकीच त्यांची किंमत जास्त असायची. म्हणून, “सन्मान” असे भाषांतर केलेल्या शब्दातून, ज्याची किंमत जास्त आहे किंवा जे भव्य आहे किंवा जे प्रभावशाली आहे असा अर्थदेखील सूचित होऊ शकतो.

इतरांजवळ असलेला अधिकार, त्यांचे पद, किंवा प्रतिष्ठा पाहून आपण जरी प्रभावित होत असलो, तरी देव मानवांमध्ये कोणत्या गोष्टी पाहतो? खरेतर बायबलमध्ये अशा सन्मानाविषयी सांगितले आहे जो देव मानवांना देतो. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे २२:४ म्हणते: “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.” आणि शिष्य याकोबाने असे लिहिले: “प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.” (याको. ४:१०) तर मग, यहोवा मानवांना जो सन्मान देतो तो काय आहे? हा सन्मान प्राप्त करण्यापासून आपल्याला काय रोखू शकते? आणि तो प्राप्त करण्यास आपण इतरांना कशा प्रकारे मदत करू शकतो?

३-५. यहोवा आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी सन्मानित करतो?

यहोवा आपला उजवा हात धरून आपल्याला खरा सन्मान देईल असा भरवसा एका स्तोत्रकर्त्याने बाळगला. (स्तोत्र ७३:२३, २४ वाचा.) यहोवा हे कसे करतो? आपल्या नम्र सेवकांना यहोवा अनेक मार्गांनी सन्मानित करतो. यहोवा त्यांना त्याची इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा आशीर्वाद देतो. (१ करिंथ. २:७) जे लोक त्याच्या वचनाकडे कान देतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासोबत तो घनिष्ठ वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्याद्वारे त्यांना सन्मानित करतो.—याको. ४:८.

यहोवा आपल्या सेवकांवर मौल्यवान ख्रिस्ती सेवाकार्यदेखील सोपवतो. (२ करिंथ. ४:१, ७) आणि या सेवाकार्याद्वारे तो आपल्याला सन्मानित करतो. सेवेच्या या विशेषाधिकाराद्वारे जे यहोवाची स्तुती करतात आणि इतरांना फायदा पोहचवतात त्यांना तो हे अभिवचन देतो: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन.” (१ शमु. २:३०) यहोवा अशा लोकांना एक चांगले नाव म्हणजेच आपली स्वीकृती देण्याद्वारे सन्मानित करतो. तसेच, देवाच्या इतर सेवकांसमोरही त्यांचे चांगले नाव असते.—नीति. ११:१६; २२:१.

पण, जे यहोवाची “प्रतीक्षा” करतात व “त्याच्या मार्गाचे अवलंबन” करतात त्यांच्या भविष्याबद्दल काय म्हणता येईल? त्यांना यहोवा हे अभिवचन देतो: “तो [परमेश्‍वर] तुझी उन्‍नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” (स्तो. ३७:३४) त्यांना भविष्यात सार्वकालिक जीवन मिळणार आहे. यहोवाकडून मिळणाऱ्‍या या अतुलनीय सन्मानाची ते आतुरतेने वाट पाहतात.—स्तो. ३७:२९.

“मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही”

६, ७. पुष्कळ जण येशूवर विश्‍वास ठेवण्यास का तयार नव्हते?

यहोवा आपल्याला जो सन्मान देऊ इच्छितो तो प्राप्त करण्यापासून कोणत्या गोष्टी आपल्याला रोखू शकतात? एक गोष्ट म्हणजे देवासोबत ज्यांचा चांगला नातेसंबंध नाही अशा लोकांच्या मतांना खूप जास्त महत्त्व देणे. येशूच्या काळात अधिकाराच्या पदावर असलेल्या काही जणांविषयी प्रेषित योहानाने काय लिहिले त्याकडे लक्ष द्या: “अधिकाऱ्‍यांतून देखील पुष्कळ जणांनी [येशूवर] विश्‍वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्‍यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते; कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले.” (योहा. १२:४२, ४३) त्या अधिकाऱ्‍यांनी परूश्‍यांच्या मतांना इतके जास्त महत्त्व दिले नसते, तर किती बरे झाले असते!

येशूने त्याच्या सेवाकार्याच्या सुरुवातीला स्पष्टपणे सांगितले होते, की पुष्कळ लोक त्याचा का स्वीकार करणार नाहीत आणि त्याच्यावर का विश्‍वास ठेवणार नाहीत. (योहान ५:३९-४४ वाचा.) इस्राएल राष्ट्र कितीतरी शतकांपासून मशीहाच्या येण्याची वाट पाहत होते. येशूने लोकांना शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी दानीएलाच्या भविष्यवाणीवरून हे ओळखले असावे, की ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची नेमलेली वेळ जवळ आली आहे. याच्या काही महिन्यांआधी, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने प्रचार कार्य सुरू केले, तेव्हा अनेक जण असे म्हणत होते: “हाच ख्रिस्त असेल काय?” (लूक ३:१५) लोक ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहत होते तो मशीहा आता त्यांच्या मध्ये होता. पण, ज्यांना नियमशास्त्राचे ज्ञान होते त्यांनी मशीहाचा स्वीकार केला नाही. याच्या कारणाकडे लक्ष वेधून येशूने त्यांना विचारले: “जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हाला विश्‍वास ठेवता येणे कसे शक्य आहे?”

८, ९. देवाकडून मिळणाऱ्‍या सन्मानापेक्षा मानवांकडून मिळणारा सन्मान कशा प्रकारे आपल्याला जास्त महत्त्वाचा वाटू शकतो हे प्रकाशाचे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

देवाकडून प्राप्त होणाऱ्‍या सन्मानापेक्षा मानवांकडून मिळणारा सन्मान कशा प्रकारे आपल्याला जास्त महत्त्वाचा वाटू शकतो, हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सन्मानाची तुलना प्रकाशाशी करू या. आपले संपूर्ण विश्‍व अतिशय तेजोमय आहे. कधी रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात पाहिल्याचे तुम्हाला आठवते का? तुम्हाला आकाशात सगळीकडे तारेच तारे दिसले असतील. “ताऱ्‍यांचे तेज” पाहून तुम्ही प्रभावित झाला असाल. (१ करिंथ. १५:४०, ४१) पण, सगळीकडे झगमगाट असलेल्या एखाद्या शहरातून तेच आकाश कसे दिसते? शहरातील दिव्यांमुळे कितीतरी दूर असलेल्या ताऱ्‍यांपासून निघणारा प्रकाश पाहणे शक्य होत नाही. रस्त्यांवरील, स्टेडियम्समधील आणि इमारतींमधील दिव्यांपासून निघणारा प्रकाश ताऱ्‍यांच्या प्रकाशापेक्षा जास्त प्रखर असल्यामुळे असे घडते का? नाही! असे घडण्यामागचे कारण हे आहे, की शहरातील दिवे आपल्या खूप जवळ असतात आणि त्यांच्या प्रकाशामुळे ताऱ्‍यांपासून निघणारा प्रकाश आपण पाहू शकत नाही. तेव्हा, रात्रीच्या आकाशात चकाकणारे सुंदर तारे पाहण्यासाठी, आपण आपल्या आसपासच्या कृत्रिम प्रकाशापासून दूर गेले पाहिजे.

त्याच प्रकारे, आपण जर मानवांकडून मिळणाऱ्‍या सन्मानाची इच्छा बाळगत असू, तर यहोवाकडून मिळणारा सन्मान आपल्याला मौल्यवान वाटणार नाही. पुष्कळ लोक राज्याचा संदेश स्वीकारत नाहीत, कारण त्यांचे मित्र, कुटुंबीय, ओळखीपाळखीचे लोक काय विचार करतील अशी त्यांना भीती वाटते. पण, मानवांकडून सन्मान मिळवण्याच्या इच्छेचा देवाच्या समर्पित सेवकांवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे का? समजा, एका तरुणाला अशा भागात प्रचार करण्यास सांगितले जाते जेथे त्याला सर्व लोक ओळखतात, पण तो एक यहोवाचा साक्षीदार आहे हे तेथील कोणालाही माहीत नाही. त्याने भीतीने माघार घेतली पाहिजे का? किंवा देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांत भाग घेतल्यामुळे एखाद्याची टिंगल केली जाते तेव्हा काय? ज्यांना आध्यात्मिक गोष्टींची स्पष्ट समज नाही अशा लोकांच्या बोलण्याचा तो आपल्या निवडींवर परिणाम होऊ देईल का? किंवा समजा, एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने गंभीर पाप केले आहे. अशा वेळी, ती व्यक्‍ती मंडळीत आपले नाव खराब होईल या भीतीने किंवा प्रियजनांचे मन दुखावेल या भीतीने आपला अपराध लपवेल का? या शेवटच्या बाबतीत पाहिल्यास, यहोवासोबत बिघडलेला नातेसंबंध पुन्हा जोडणे हेच तिच्या मनात वरच्या स्थानी असेल, तर ती “मंडळीच्या वडिलांना” बोलावेल आणि त्यांची मदत घेईल.—याकोब ५:१४-१६ वाचा.

१०. (क) इतर जण आपल्याविषयी काय विचार करतील याविषयी अवाजवी चिंता केल्यास काय घडू शकते? (ख) नम्रता दाखवल्यास आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

१० कदाचित असे होऊ शकते, की आपण ख्रिस्ती प्रौढत्वाकडे प्रगती करत असताना एखादा सहविश्‍वासू बांधव आपली सुधारणूक करण्यासाठी आपल्याला सल्ला देतो. गर्वामुळे, स्वतःच्या नावाच्या चिंतेमुळे, किंवा स्वतःचे समर्थन करण्याच्या मोहामुळे आपण बचावात्मक पवित्रा न घेतल्यास, आपल्याला मदत करण्याच्या त्या बांधवाच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपल्याला फायदा होईल. किंवा समजा, एखाद्या बांधवासोबत तुम्ही एका प्रकल्पावर काम करत आहात. तुमच्या चांगल्या सूचनांचे आणि तुमच्या मेहनतीचे श्रेय कोणाला मिळेल याचीच तुम्हाला जास्त चिंता असली पाहिजे का? यांपैकी कोणत्याही एका परिस्थितीत तुम्ही असाल, तर आठवणीत ठेवा की “ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.”—नीति. २९:२३.

११. आपली प्रशंसा करण्यात आल्यास आपल्या भावना काय असल्या पाहिजेत, आणि का?

११ अशाच प्रकारे, पर्यवेक्षकांनी आणि या जबाबदारीच्या पदाची आकांक्षा बाळगणाऱ्‍यांनी मानवांची प्रशंसा मिळवण्यापासून सावध असले पाहिजे. (१ तीम. ३:१; १ थेस्सलनी. २:६) एखादे काम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल एखाद्या बांधवाची मनस्वी प्रशंसा केली जाते तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असली पाहिजे? अर्थातच, शौल राजाप्रमाणे तो आपल्याकरता एक स्मारक उभारणार नाही. (१ शमु. १५:१२) पण, तो बांधव याची जाणीव बाळगतो का, की त्याने जे काही साध्य केले आहे ते केवळ यहोवाच्या अगाध कृपेमुळे त्याला शक्य झाले आहे आणि भविष्यात तो जे काही करेल त्याचे यशदेखील देवाच्या आशीर्वादावर व मदतीवरच अवलंबून आहे? (१ पेत्र ४:११) इतर जण आपली प्रशंसा करतात तेव्हा आपल्या मनात ज्या भावना येतात त्यांवरून दिसून येईल की आपण कोणत्या प्रकारच्या सन्मानाची इच्छा बाळगतो.—नीति. २७:२१.

तुम्ही “तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता”

१२. येशूचा संदेश ऐकण्यापासून काही यहुद्यांना कोणत्या गोष्टीने रोखले?

१२ देवाकडून सन्मान प्राप्त करण्याच्या आड येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा. चुकीच्या इच्छा मुळात आपल्याला सत्याविषयी ऐकण्यापासून रोखू शकतात. (योहान ८:४३-४७ वाचा.) काही यहुद्यांनी येशूचा संदेश ऐकला नाही, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, की ते त्यांचा बाप सैतान याच्या वासनांप्रमाणे करू इच्छितात.

१३, १४. (क) आपल्या मेंदूच्या ऐकण्याच्या क्षमतेविषयी संशोधकांचे काय म्हणणे आहे? (ख) आपण कोणाचे ऐकणार हे कशावर अवलंबून असते?

१३ आपण कधीकधी तेच ऐकतो जे ऐकण्याची आपल्याला इच्छा असते. (२ पेत्र ३:५) यहोवाने आपल्याला अशा अद्‌भुत क्षमतेसह निर्माण केले आहे की आपल्याला नको असलेले आवाज न ऐकण्याचे आपण ठरवू शकतो. क्षणभर थांबा आणि लक्ष एकाग्र करून ऐका की या क्षणी तुम्ही किती वेगवेगळे आवाज ओळखू शकता. काही क्षणांआधी या आवाजांपैकी बहुतेकांकडे कदाचित तुमचे लक्षच नव्हते. आपल्या मेंदूत विभिन्‍न आवाज ऐकण्याची क्षमता असूनही, तो आपल्याला केवळ एकाच आवाजावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत होता. पण, संशोधकांना असे आढळून आले आहे, की मानवी आवाज ऐकण्याच्या बाबतीत पाहिल्यास एकाच वेळी अनेकांच्या बोलण्यावर लक्ष एकाग्र करणे खूप कठीण आहे. याचा अर्थ, तुम्ही जेव्हा एकाच वेळी दोन व्यक्‍तींचे बोलणे ऐकता, तेव्हा कोणाच्या बोलण्यावर लक्ष एकाग्र करायचे हे तुम्हाला ठरवावे लागेल. तुम्ही कोणाचे बोलणे ऐकू इच्छिता यावर हे अवलंबून असेल. जे यहुदी त्यांचा बाप, म्हणजे सैतान याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छित होते त्यांनी येशूचा संदेश ऐकला नाही.

१४ बायबल म्हणते की ‘ज्ञानाचे’ व ‘मूर्खपणाचे’ बोल निरंतर आपल्या कानावर पडत असतात. (नीति. ९:१-५, १३-१७) त्यामुळे, आपण कोणाचे ऐकणार हे ठरवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आपण काय निवडणार? याचे उत्तर आपण कोणाच्या इच्छेप्रमाणे करणार यावर अवलंबून असेल. येशूची मेंढरे त्याचा आवाज ऐकतात आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतात. (योहा. १०:१६, २७) ती सत्याच्या पक्षाची आहेत. (योहा. १८:३७) “ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.” (योहा. १०:५) जे लोक नम्रपणे येशूचे अनुकरण करतात त्यांना देवाकडून सन्मान प्राप्त होईल.—नीति. ३:१३, १६; ८:१, १८.

“ते तुम्हास भूषणावह आहेत”

१५. पौलाचे क्लेश इतरांसाठी कशा प्रकारे “भूषणावह” होते?

१५ आपण चिकाटीने व धीराने यहोवाच्या इच्छेप्रमाणे केल्यास इतरांना त्याच्याकडून सन्मान प्राप्त करण्यास मदत मिळते. इफिसमधील मंडळीला पौलाने असे लिहिले: “मी विनंती करितो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्‍या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हास भूषणावह आहेत.” (इफिस. ३:१३) पौलाचे क्लेश कोणत्या अर्थी इफिसकरांकरता “भूषणावह” किंवा सन्मानाचे होते? संकटांचा सामना करत असतानाही इफिसकरांची सेवा करत राहण्याच्या पौलाच्या तयारीवरून त्यांना हे दिसून आले, की ख्रिस्ती या नात्याने त्यांना मिळालेले विशेषाधिकार महत्त्वाचे आणि खूप मौल्यवान आहेत. पौलाने जर संकटांचा सामना करताना हार मानली असती, तर त्यांना असे वाटले नसते का, की यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध, त्यांचे सेवाकार्य आणि त्यांची आशा यांना काहीच मोल नाही? पौलाने त्याच्या धीराने त्यांना दाखवून दिले की ख्रिस्ती असण्याच्या सन्मानापुढे आपले त्याग काहीच नाहीत.

१६. लुस्त्रामध्ये पौलाने कोणत्या संकटाचा सामना केला?

१६ पौलाच्या आवेशामुळे आणि धीरामुळे कोणते परिणाम मिळाले त्याचा विचार करा. प्रेषितांची कृत्ये १४:१९, २० मध्ये असे सांगितले आहे: “अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहुदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला [लुस्त्रा] नगराबाहेर ओढून टाकून दिले; पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसऱ्‍या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला.” कल्पना करा, पौलाला इतके मारण्यात आले होते की तो जवळजवळ मेलाच होता; पण, दुसऱ्‍याच दिवशी तो पायीच १०० किलोमीटरच्या प्रवासाला निघाला!

१७, १८. (क) पौलाच्या क्लेशांविषयी तीमथ्याला कसे माहीत झाले असावे? (ख) पौलाच्या धीराचा तीमथ्यावर कसा प्रभाव पडला?

१७ पौलाच्या मदतीस धावून जाणाऱ्‍या शिष्यांमध्ये तीमथ्यदेखील असावा का? प्रेषितांची कृत्ये पुस्तकाच्या अहवालात असे स्पष्टपणे सांगितलेले नसले, तरी ते शक्य आहे. पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात काय म्हटले त्याकडे लक्ष द्या: “तू माझे शिक्षण, आचार, . . . ही ओळखून आहेस; मला अंत्युखियात [शहराच्या बाहेर घालवण्यात आले], इकुन्यात [दगडमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला] व लुस्त्रात [दगडमार करण्यात आला] जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडविले.”—२ तीम. ३:१०, ११; प्रे. कृत्ये १३:५०; १४:५, १९.

१८ तीमथ्याला या घटनांविषयी माहिती होती आणि पौलाच्या धीराचीही त्याला जाणीव होती. याचा तीमथ्याच्या मनावर खोल ठसा उमटला. पौल लुस्त्राला आला, तेव्हा त्याने पाहिले की तीमथ्य एक अनुकरणीय ख्रिस्ती बनला होता. “त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते.” (प्रे. कृत्ये १६:१, २) कालांतराने, तीमथ्य आणखी मोठ्या जबाबदाऱ्‍या स्वीकारण्यास पात्र बनला.—फिलिप्पै. २:१९, २०; १ तीम. १:३.

१९. आपल्या धीराचा इतरांवर कोणता प्रभाव पडू शकतो?

१९ आपण धीराने व चिकाटीने देवाच्या इच्छेप्रमाणे करत राहिलो, तर आपल्याही उदाहरणाचा इतरांवर चांगला प्रभाव पडू शकतो—खासकरून तरुणांवर, ज्यांच्यापैकी अनेक जण भविष्यात देवाचे अतिशय मौल्यवान सेवक बनतील. देवाचे तरुण सेवक आपले निरीक्षण करतात. आपण सेवाकार्यात लोकांशी कशा प्रकारे बोलतो यापासून ते शिकतात. इतकेच नाही, तर जीवनातील संकटांना आपण कशा प्रकारे तोंड देतो यांपासूनही त्यांना फायदा होतो. विश्‍वासात टिकून राहणाऱ्‍या सर्वांनाच “युगानयुगाच्या गौरवासह” तारण प्राप्त व्हावे म्हणून पौलाने “सर्व काही धीराने” सोसले.—२ तीम. २:१०.

देवाचे तरुण सेवक, वयस्कर ख्रिश्‍चनांच्या धीराची कदर करतात

२०. आपण देवाकडून प्राप्त होणारा सन्मान मिळवण्याचा सतत प्रयत्न का केला पाहिजे?

२० तर मग, आपण “जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट” करू नये का? (योहा. ५:४४; ७:१८) नक्कीच! (रोमकर २:६, ७ वाचा.) जे कोणी “सन्मान . . . मिळविण्याचा प्रयत्न करितात, त्यांना [देव] सार्वकालिक जीवन देईलच.” शिवाय, आपण “धीराने सत्कर्मे करीत” राहिल्यास इतरांनाही धीर धरण्याचे उत्तेजन मिळेल. आणि त्यामुळे त्यांना सार्वकालिक फायदे प्राप्त होतील. म्हणून, देव जो सन्मान देतो तो प्राप्त करण्यापासून कोणत्याही गोष्टीला आड येऊ देऊ नका.