जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?
जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?
देव—असे एका शब्दात पुष्कळ लोक वरील प्रश्नाचे उत्तर देतील. पण खरे पाहता, येशू ख्रिस्त अथवा त्याचा पिता यातील कोणीही या जगाचा अधिकारी आहे असे पवित्र शास्त्र कोठेही सांगत नाही. याच्या अगदी उलट, येशू म्हणतोः “ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.” आणि तो पुढे म्हणतोः “जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.”—योहान १२:३१; १४:३०; १६:११.
याचा अर्थ या जगाचा अधिकारी येशूच्या विरोधात आहे. तो कोण असू शकेल?
जगाच्या परिस्थितीपासून एक सुगावा
सदिच्छा बाळगणाऱ्या मानवांच्या प्रयत्नानंतरही जगाची स्थिती संपूर्ण इतिहासात भयंकर बनली आहे. ह्याच कारणास्तव विचारवंत लोक विस्मय करीत आहेत, जसे संपादकीय लेखक डेव्हीड लॉरेन्स यांना वाटले होते: “पृथ्वीवर शांती—जवळजवळ सर्वच त्याची अपेक्षा बाळगतात. ‘माणसांच्यासाठी सदिच्छा’—हीच भावना एकमेकांबाबत जगातील सर्व लोक अपेक्षितात. पण चुकले काय? लोकांच्या सहज नैसर्गिक इच्छेविरुद्ध आज युद्ध का भडकत आहेत?”
हे विरोधाभास युक्त विधान वाटते, नाही का? लोकांची शांतीने राहण्याची नैसर्गिक इच्छा असतानाही, सर्वसाधारण असे पाहण्यात येते की ते एकमेकांचा द्वेष करतात व एकमेकांची हत्या करतात—आणि ती देखील इतक्या त्वेषाने. राक्षसी क्रुरतेमध्ये निर्दयीपणाचा अतिरेक याचा जरा विचार करा. मानवाने इतरांची अगदी निर्दयीपणे छळणूक व कत्तल करण्यास विषारी वायूच्या खोलीचा, छळग्रस्त बंद्यांच्या छावणीचा, ज्वाला फेकणाऱ्या यंत्राचा व ज्वालाग्राही बॉम्ब आणि अशा इतर भयंकर मार्गांचा उपयोग केला आहे.
तर मग जे लोक शांती व आनंदाची इच्छा बाळगतात, तेच स्वतः दुसऱ्याविरुद्ध असभ्यरितीने दुष्टाई करतात हे योग्य आहे या वर तुम्ही विश्वास ठेवता का? कोणत्या शक्ती लोकांना अशी किळसवाणी कृत्ये करण्यास लावतात, किंवा त्यांना
अशा स्थितीत घालतात, जेथे त्यांना रानटी कृत्ये करावयास भाग पाडल्यासारखे वाटते? अशाप्रकारचे गुन्हे करण्यास कोणीतरी दुष्ट, अदृश्य शक्ती लोकांवर दबाव आणत आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?जगाच्या अधिपतींची ओळख पटली
या विषयावर तर्क करण्याची आवश्यकता नाही, कारण पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की एक हुशार, अदृश्य व्यक्ती मानवांवर व राष्ट्रांवर ताबा ठेवून आहे. ते म्हणतेः “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” त्याची ओळख करुन देताना पवित्र शास्त्र म्हणतेः “सर्व जगाला ठकविणारा. . .जो ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला आहे तो.”—१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९.
“सैतानाकरवी येशूची परिक्षा” झाली तेव्हा, येशूनेही जगाचा अधिपती सैतान याच्या भुमिकेविषयी प्रश्न केला नाही. तेव्हा काय झाले याचे पवित्र शास्त्र स्पष्टीकरण देते: “सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले, आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो.”—मत्तय ४:१, ८-१०.
याचा जरा विचार करा. “जगातील सर्व राज्ये” देण्याचे सांगून सैतानाने येशूची परिक्षा पाहिली. तथापि, जर सैतान खरेच या जगाचा अधिपती नसता तर ही परिक्षा खरी ठरली असती का? नाही. ती तशी ठरली नसती. आणि हे ध्यानात घ्या, की ती सर्व जागतिक सरकारे सैतानाची होती हे येशूने अमान्य केले नाही, जर त्यावर सैतानाचा अधिकार नसता तर त्याने तसे केले असते. तर, यास्तव, दियाबल सैतान हा खरोखरच या जगाचा अदृश्य अधिकारी आहे! वस्तुतः पवित्र शास्त्र त्याला “युगाचे दैवत” म्हणते. (२ करिंथकरांस ४:४) मग, असा हा दुष्ट व्यक्ती इतक्या अधिकारपदावर कसा पोहचला?
सैतान बनलेली ती व्यक्ती, देवाने निर्मिलेला एक देवदूत होता, पण त्याने देवाच्या स्थानाबद्दल मत्सर राखला. त्याने देवाच्या अधिकारपदाच्या खऱ्या हक्काला आव्हान दिले. आणि यासाठी त्याने त्याच्यावतीने प्रवक्ता म्हणून सर्पाचा वापर करून पहिली स्त्री हव्वा, हिला फसविले, आणि अशाप्रकारे तिला व तिचा पती, आदाम याला देवाच्या आज्ञेऐवजी स्वतःचा हुकूम मानण्यास लावले. (उत्पत्ती ३:१-६; २ करिंथकरांस ११:३) आदाम हव्वेच्या न जन्मलेल्या संततीलाही देवापासून दूर नेण्याचा दावा त्याने केला. म्हणून देवाने त्याच्या या दाव्याला शाबीत करण्यास वेळ दिला, पण सैतान त्यात यशस्वी झाला नाही.—ईयोब १:६-१२; २:१-१०.
खरे पाहता, जगाच्या अधिपत्यामध्ये सैतान हा एकटाच नाही. देवाविरुद्ध बंड करण्यास त्याने इतर देवदूतांचेही मन वळविण्यात यश मिळवले. हेच दुरात्मे पुढे, त्याच्या गुन्ह्यातील साथीदार बनले. ख्रिश्चनांना आर्जवितांना पवित्र शास्त्र त्यांच्याबद्दल सांगतेः “सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून; कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर. . .सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”—इफिसकरांस ६:११, १२.
दुरात्म्यांचा प्रतिकार करणे
ह्या अदृश्य, दुष्ट अधिपतींनी मानवजातीला देवाच्या भक्तीपासून दूर नेण्याचा व मार्गभ्रष्ट करण्याचा निश्चय केला आहे. देवाचे वचन हे स्पष्ट सांगते की मृतांना काहीहि कळत नाही तरीही मरणानंतर बचाव असतो ही कल्पना वाढीस लावणे, हा दुरात्म्यांचा एक मार्ग आहे. (उत्पत्ती २:१७; ३:१९; यहेज्केल १८:४; स्तोत्रसंहिता १४६:३, ४; उपदेशक ९:५, १०) याप्रमाणे, आत्मिक माध्यमातून अथवा अदृश्य क्षेत्राच्या “आवाजा” मार्फत हे दुरात्मे मृतांच्या आवाजाचे अनुकरण करतात, व मृताच्या नातेवाईकासोबत अथवा मित्रासोबत ते बोलतात. तो “आवाज” जरी गेलेल्या व्यक्तीच्या आवाजाचे ढोंग असले तरी अक्षरश: मात्र ते दुरात्मे असतात!
जर तुम्ही कधी असा “आवाज” ऐकाल तर फसू नका. ते जे काही म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका, व “सैताना, चालता हो!” या येशूच्या शब्दांची पुनरुक्ती करा. (मत्तय ४:१०; याकोब ४:७) आत्मिक क्षेत्राबद्दल जिज्ञासा बाळगू नका नाही तर दुरात्म्यांमध्ये तुम्हीहि गुंतले जाल. अशा सहभागाला भूताटकी असे म्हणतात आणि देवाने त्याच्या उपासकास अशा सर्व प्रकारापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. पवित्र शास्त्रात “चेटूक करणारा. . .छांछूं करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा” अशांचा निषेध केला आहे.—अनुवाद १८:१०-१२; गलतीकरांस ५:१९-२१; प्रकटीकरण २१:८.
भूताकटीचा प्रकार हा त्या व्यक्तीला दुरात्म्यांच्या प्रभावाखाली आणतो. म्हणून त्यामध्ये कितीही मजा असली किंवा चेतविणारे असले तरी त्याचा प्रतिकार करा. अशा कृतींमध्ये काचेच्या गोळ्यात भविष्य पाहणे, मृतात्म्यांना संदेश देणाऱ्या फळीचा वापर करणे, हस्तरेषा पाहून भविष्य सांगणे व फलज्योतिष या प्रकारांचा समावेश होतो. दुरात्मे ज्या घरास त्यांचे क्षेत्र बनवितात तेथे आवाज व इतर शारिरीक ज्ञानेद्रिंयांचा उपयोग करतात.
यासोबतच, मानवाचा पापी अवस्थेकडे असणारा कल याचे भांडवल करून दुरात्मे अनैतिक व अनैसर्गिक लैंगिकतेचा समावेश असलेले साहित्य, चित्रपट तसेच दूरदर्शनचे कार्यक्रम याची पुरवणूक करतात. दुरात्म्यांना हे चांगले ठाऊक आहे की जर मनातून वाईट विचार घालवून दिले नाही तर त्याच्या प्रभावाने मनुष्य उत्पत्ती ६:१, २; १ थेस्सलनीकाकरांस ४:३-८; यहुदा ६.
दुष्टात्म्यांसारखेच—अनैतिकतेने वागतात.—ह्या जगावर दुरात्मे अधिपत्य गाजवितात या कल्पनेवर पुष्कळजन हसतात. पण त्यांचा अविश्वासू भाव हा काही आश्चर्य करण्याजोगा नाही, कारण पवित्र शास्त्र सांगते: “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो.” (२ करिंथकरास ११:१४) तो आणि त्याचे दुरात्मे हे खरेच अस्तित्वात आहेत या वस्तुस्थितीबाबत लोकांना आंधळे बनविणे ही त्याची अत्यंत सराईत फसवणूक आहे. पण तुम्ही फसू नका! दियाबल व त्याचे दुरात्मे हे खरे आहेत, व तुम्ही त्यांचा नेहमी विरोध करावयास हवा.—१ पेत्र ५:८, ९.
आनंदाची गोष्ट म्हणजे, ती वेळ फार जवळ आली आहे जेव्हा सैतान व त्याचे सैन्य हे राहणार नाहीत! पवित्र शास्त्र याची खात्री पुरवितेः “हे जग [दुरात्मिक अधिपत्यासह] नाहीसे होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) सैतानी परिणामांना काढून टाकल्यामुळे किती आराम असेल! त्या कारणामुळे जे देवाच्या इच्छेप्रमाणे करतात अशांमध्ये आम्ही असू व देवाच्या नवीन नीतिमान जगात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटू.—स्तोत्र ३७:९-११, २९; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४.
अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.
[४ पानांवरील चित्रे]
जगाचे सर्व सरकार त्याचे नसते तर सैतानाने ते येशूला सादर केले असते का?