जीवन इतक्या समस्यांनी ग्रस्त का आहे?
राज्य वार्ता क्र. ३४
जीवन इतक्या समस्यांनी ग्रस्त का आहे?
त्रास-मुक्त नंदनवन शक्य आहे का?
गंभीर समस्या अधिक बिकट होतात—का?
लोकांना नेहमीच समस्या असतात. आधुनिक तंत्रज्ञान त्यांना सोडवू शकेल असे पुष्कळांना वाटले असले, तरी गंभीर समस्या अधिक बिकट होत चालल्या आहेत.
गुन्हेगारी: रस्त्यांवरून चालत असताना किंवा स्वतःच्या घरात देखील असताना फारच कमी लोकांना सुरक्षितता वाटते. एका युरोपियन राष्ट्रात, अलीकडील वर्षात, जवळजवळ ३ पैकी १ व्यक्ती गुन्हेगारीला बळी ठरली होती.
पर्यावरण: चोहोकडे हवा, जमीन आणि पाण्याचे प्रादूषण अधिकाधिक वाढत आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये, एक चतुर्थ्यांश लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही.
गरिबी: पूर्वी कधीही नव्हते इतके गरीब आणि भुकेलेले लोक आता आहेत. काही देशांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक गरिबीत दिवस काढतात; जगातील ३० टक्के कामगार वर्ग, म्हणजे सुमारे ८० कोटी जण, बेरोजगार आहेत किंवा त्यांना चांगली नोकरी नाही—आणि ही संख्या वाढतच आहे.
भूक: तुमच्या स्वतःकरता खावयास पुरेसे अन्ना असले, तरी वाढत्या लाखो लोकांजवळ ते नाही. अविकसनशील राष्ट्रांमध्ये, प्रात्येक वर्षी किमान १.३ कोटी लोक, बहुतेक मुलेच भुकेमुळे मरतात.
युद्ध: अलीकडील जातीय हिंसेत लाखोंना ठार मारण्यात आले आहे. तसेच विसाव्या शतकात, युद्धांमुळे दहा कोटी पेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत.
इतर समस्या: वरील समस्यांमध्ये, कुटुंबांचा बिकट होत चाललेला विस्कळीतपणा, अधिक अविवाहित माता, वाढती गृहहीनता, मादक औषधांचा सार्वत्रिक दुरुपयोग, माजलेली अनैतिकता यांची भर घाला. अमेरिकेच्या मंत्रिमंडळाचे भूतपूर्व सदस्य उचितपणे म्हणाले: “सुसंस्कृती पूर्णपणे भ्रष्ट झाल्याची . . . पुष्कळ चिन्हे आहेत.” अलीकडील ३० वर्षांच्या काळात अमेरिकेची लोकसंख्या ४१ टक्क्यांनी वाढली, परंतु हिंसक गुन्हे ५६० टक्के, अनौरस संतती ४०० टक्के, घटस्फोट ३०० टक्के, किशोरवयीनांच्या आत्महत्येचे प्रामाण २०० पेक्षा अधिक टक्क्यांनी वाढले आहे. हीच परिस्थिती इतर देशांमध्येही आहे.
समस्या बिकट का झाल्या आहेत?
आपला निर्माणकर्ता याचे उत्तर पुरवतो. या समस्यांनी भरलेल्या समयाला, त्याचे वचन ‘शेवटला काळ’ असे संबोधते. तो असा समय आहे जेव्हा “कठीण दिवस” येतील. (२ तीमथ्य ३:१) कशाचा शेवटला काळ? तर, बायबल “जगाच्या समाप्तीबद्दल” बोलते.—मत्तय २४:३, किंग जेम्स व्हर्शन.
आजच्या वाढत्या समस्या स्पष्ट पुरावा देतात की, या युगाची समाप्ती तसेच दुष्टाईचा व त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांचा अंत जवळ आहे. (मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५; प्राकटीकरण १२:७-१२) लवकरच, देव स्वतः हस्तक्षेप करील आणि सर्व समस्या पूर्णपणे सोडवल्या जातील याकडे जातीने लक्ष पुरवील.—यिर्मया २५:३१-३३; प्राकटीकरण १९:११-२१.
या जगाचे धर्म अपयशी ठरले आहेत
आजच्या समस्या सोडवण्याऐवजी, या जगाच्या धार्मिक व्यवस्था त्यात अधिकच भर घालतात. युद्धामध्ये, कॅथलिक लोक कॅथलिकांना ठार मारतात, प्रोटेस्टंट प्रोटेस्टंट लोकांना ठार मारतात—तेही लाखोंच्या संख्येत. अलीकडेच, र्वांडामध्ये, जेथे बहुतेक जण कॅथलिक आहेत, तेथे लाखो लोकांनी एकमेकांना ठार मारले! (डाव्या बाजूकडील चित्र पाहा.)
येशू, बंदूक किंवा सुरा घेऊन केवळ आपल्या शिष्यांचे राष्ट्रीयत्व भिन्ना होते म्हणून त्यांना ठार मारण्यासाठी युद्धाला जाईल का? निश्चितच नाही! बायबल म्हणते, “जो देवावर प्रीति करितो त्याने आपल्या बंधूवरहि प्रीति करावी.” (१ योहान ४:२०, २१) या जगाचे धर्म तसे करण्यात अपयशी ठरले आहेत. “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारितात.”—तीत १:१६.
शिवाय, नैतिकतेविषयी बायबलच्या दर्जांना खरोखर उंचावून न धरता, या जगाचे धर्म सबंध जगभरात होणाऱ्या धक्कादायक नैतिक ऱ्हासाला हातभार लावत आहेत.
येशूने सांगितले की, खऱ्या धर्मापासून खोट्या धर्माला त्याच्या “फळांवरून”—त्याच्या सदस्यांच्या कृतींवरून तुम्ही ओळखू शकता. त्याने असेही म्हटले: “ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रात्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.” (मत्तय ७:१५-२०) वाईट फळ उत्पन्ना करणाऱ्या आणि त्यामुळे नाशास सामोरे जाणाऱ्या धर्मापासून पळ काढण्यास देवाचे वचन आपल्याला आर्जवते.—प्राकटीकरण १८:४.
खरा धर्म अपयशी ठरलेला नाही
खरा धर्म, “चांगले फळ,” विशेषतः प्रोम उत्पन्ना करतो. (मत्तय ७:१७; योहान १३:३४, ३५) ख्रिश्चनांच्या एकजूटीचे कोणते आंतरराष्ट्रीय बंधुत्व अशा प्रोमाचे आचरण करते? आपल्या स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना ठार मारण्यासाठी कोण नकार देतात?—१ योहान ३:१०-१२.
“चांगले फळ” उत्पन्ना करण्याचा तो नावलौकिक यहोवाच्या साक्षीदारांचा आहे. संपूर्ण विश्वाभरात, २३० पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहे.’ (यशया २:४) लोकांबद्दलचे त्यांचे प्रोम देवाच्या राज्याची “सुवार्ता” जगभरात प्राचार करण्याची ख्रिस्ताची आज्ञा पाळण्याद्वारे देखील प्रादर्शित होते. (मत्तय २४:१४) ते बायबलमध्ये शिकवल्या जाणाऱ्या उच्च नैतिक मूल्यांचे आचरण आणि समर्थनही करतात.—१ करिंथकर ६:९-११.
खरा धर्म अपयशी ठरलेला नाही. मानवजातीच्या समस्या सोडवण्यास जी व्यक्ती समर्थ आहे तिच्याकडे तो धर्म लोकांना निर्देशित करतो. लवकरच ती व्यक्ती एक संपूर्ण नवीन जग स्थापन करील. ती व्यक्ती कोण आहे? (कृपया मागील पान पाहा.)
त्रास-मुक्त नंदनवन निश्चित आहे
तुम्हाला शक्य असते, तर मानवजातीला पीडित करणाऱ्या सर्व समस्या तुम्ही सोडवल्या नसत्या का? निश्चितच, तुम्ही तसे केले असते! तर मग, आपला प्रोमळ निर्माणकर्ता ज्या एकट्याजवळच मानवजातीच्या समस्या सोडवण्याचे सामर्थ्य आणि सुज्ञता आहे, तो तसे करण्यामध्ये काही कसर ठेवील का?
बायबल प्राकट करते की देव, येशू ख्रिस्ताच्या हातांमधील स्वर्गीय राज्याद्वारे मानवांच्या कारभारात हस्तक्षेप करील. ते राज्य पृथ्वीवरील भ्रष्ट सरकारांचे “चूर्ण” करील. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) आणि का बरे? देवाला उद्देशून स्तोत्रकर्ता उत्तरतो: “म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वार ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.”—स्तोत्र ८३:१८.
या जगाचा अंत होईल तेव्हा, बचावणारे लोक असतील का? बायबल म्हणते, ‘जग नाहिसे होत आहे; पण देवाच्या इच्छेप्रामाणे करणारा सर्वकाळ राहतो.’ (१ योहान २:१७) हे बचावलेले लोक सर्वकाळासाठी कोठे राहतील? “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील,” असे बायबल उत्तर देते.—स्तोत्र ३७:९-११, २९; नीतीसूत्रे २:२१, २२.
देवाच्या नवीन जगात, “ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्राकटीकरण २१:४) यापुढे गुन्हेगारी, गरिबी, भूक, आजारपण, दुःख किंवा मृत्यू नसेल! एवढेच नव्हे, तर मेलेले लोकही पुन्हा जिवंत होतील! “पुनरुत्थान होईल.” (प्रोषितांची कृत्ये २४:१५) तसेच पृथ्वीचे एका प्रात्यक्ष नंदनवनात रुपांतर होईल.—यशया ३५:१, २; लूक २३:४३.
देवाच्या नवीन जगात जीवनाचा आनंद उपभोगण्याकरता आपण काय केले पाहिजे? येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) सबंध जगभरात लाखो प्रामाणिक लोक ते ज्ञान घेत आहेत. ते त्यांना त्यांच्या पुष्कळ समस्यांना तोंड देण्यास आता मदत करते, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ज्या समस्या, त्यांच्या सोडवण्याच्या क्षमतेपलीकडील आहेत त्या देवाच्या नवीन जगात पूर्णपणे सोडवल्या जातील हा आत्मविश्वास त्यांना देते.
[२ पानांवरील चित्रं]
WHO photo by P. Almasy
[३ पानांवरील चित्रं]
Jerden Bouman/Sipa Press