तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का?
तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का?
बायबल का वाचले पाहिजे?
बायबल हे इतर सर्व पुस्तकांपासून वेगळे आहे. त्यात देवाकडील प्रेमळ सूचना आहेत. (१ थेस्सलनीकाकर २:१३) बायबलच्या शिकवणुकी तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला खूप फायदा होईल. “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्या देवावरील तुमचे प्रेम वाढेल, तुम्ही त्याच्या समीप जाल. (याकोब १:१७) प्रार्थनेद्वारे देवाशी कसे बोलायचे हे तुम्हाला माहीत होईल. संकटात असताना तुम्हाला देवाची मदत अनुभवता येईल. बायबलमधील दर्जांनुरूप तुम्ही आपले जीवन व्यतीत केल्यास देव तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल.—रोमकर ६:२३.
बायबलमधील सत्ये, ज्ञानाचा प्रकाश देतात. आज कोट्यवधी लोकांच्या जीवनावर चुकीच्या कल्पनांचा, शिकवणुकींचा पगडा बसला आहे, पण बायबलचे ज्ञान घेणाऱ्यांना त्यांपासून सुटका मिळते. उदाहरणार्थ, मृत्यूनंतर आपले काय होते याबाबतचे सत्य समजल्यावर, मृत लोक आपल्याला काही अपाय करतील किंवा आपले मृत नातलग व मित्र यातना भोगत आहेत, ही भीती आपल्या मनातून निघून जाते. (उपदेशक ९:५, १०) ज्यांचे प्रिय जन मरण पावले आहेत अशांना, बायबलमधील पुनरुत्थानाच्या शिकवणीमुळे सांत्वन मिळते. (योहान ११:२५) दुष्ट देवदूतांविषयीचे सत्य जाणून घेतल्यामुळे आपण भूतविद्येच्या धोक्यापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. शिवाय, पृथ्वीवर इतके दुःख का आहे हेही समजण्यास आपल्याला मदत मिळते.
देवाने दिलेली बायबलमधील तत्त्वे आपल्याला शारीरिक दृष्टीने श्रेयस्कर जीवनशैली अवलंबण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, “सवयींमध्ये नेमस्त” राहिल्याने आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते. (१ तीमथ्य ३:२) ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध’ करण्याद्वारे आपल्या आरोग्याची हानी होण्याचे आपण टाळतो. (२ करिंथकर ७:१) बायबलमध्ये असलेल्या देवाच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते आणि त्यामुळे आपण आपला स्वाभिमान देखील टिकवून ठेवू शकतो.—१ करिंथकर ६:१८.
तुम्ही देवाच्या वचनानुसार जीवन व्यतीत केले तर एक आनंदी व्यक्ती व्हाल. बायबलमधील ज्ञान आपल्याला आंतरिक शांती व समाधान मिळवण्यास मदत करते आणि आपल्याला आशाही देते. हे ज्ञान करुणा, प्रीती, आनंद, शांती, दया आणि विश्वास यांसारखे गुण आपल्यामध्ये निर्माण करण्यास मदत करते. (गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ४:२४, ३२) या गुणांमुळे आपल्याला, चांगला पती किंवा पत्नी, पिता किंवा माता, मुलगा किंवा मुलगी होण्यास मदत मिळते.
भवितव्याचा तुम्ही कधी विचार केलात का? बायबलमधील भविष्यवाण्या आपल्याला हे दाखवून देतात, की काळाच्या ओघात आपण कोठे आहोत. या भविष्यवाण्या जगाच्या सद्य परिस्थितीचे वर्णन करतातच शिवाय, देव लवकरच या पृथ्वीचे एका परादीसमध्ये रूपांतर करणार आहे हेही दाखवून देतात.—बायबल समजण्यास साहाय्य
तुम्ही कदाचित बायबल वाचण्याचा प्रयत्न केला असेल परंतु तुम्हाला ते समजायला कठीण वाटले असेल. तुमच्या प्रश्नांची उत्तरे बायबलमध्ये कोठे शोधावीत हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. तुमच्याप्रमाणे अनेकांना असे वाटते. देवाचे वचन समजायला आपल्या सर्वांना मदतीची गरज आहे. सुमारे २३५ राष्ट्रांमध्ये यहोवाचे साक्षीदार कोट्यवधी लोकांना विनामूल्य बायबल शिक्षण देत आहेत. तुम्हालाही साहाय्य करायला त्यांना आनंद वाटेल.
बायबलच्या मूलभूत शिकवणींनी सुरवात करून टप्प्या-टप्प्याने अभ्यास केल्यास फायदा होतो. (इब्री लोकांस ६:१) तुम्ही जसजसा अभ्यास कराल तसतसे तुम्ही “जड अन्न” घेऊ शकाल अर्थात गहन सत्ये तुम्हाला समजू लागतील. (इब्री लोकांस ५:१४) बायबलमधील माहिती भरवसा ठेवण्यालायक आहे. देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकासारखी बायबलवर आधारित प्रकाशने तुम्हाला विविध विषयांवर शास्त्रवचनांचा संदर्भ समजण्यास मदत करतील.
बायबलची समज मिळण्यासाठी दर आठवडी तुम्ही वेळ काढणार का?
तुमच्या वेळेनुसार आणि सोयीच्या ठिकाणी बायबल अभ्यासाची व्यवस्था करता येऊ शकते. पुष्कळजण स्वतःच्या घरीच बायबलचा अभ्यास करू इच्छितात. काही जण तर टेलिफोनवर देखील अभ्यास करतात. हा अभ्यास, अनेकांना एकत्र शिकवल्या जाणाऱ्या वर्गाप्रमाणे नाही; तुमची वैयक्तिक परिस्थिती, ज्ञान व शैक्षणिक पात्रता या गोष्टींनुसार जुळवून घेता येण्याजोगी एक खासगी योजना आहे. तुम्हाला कोणत्याही परीक्षेला बसावे लागणार नाही. तुम्ही निसंकोचपणे हा अभ्यास करू शकता. या अभ्यासात बायबलवर आधारित असलेल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील व तुम्ही देवाच्या समीप कसे जाऊ शकाल हेही तुम्हाला शिकायला मिळेल.
या बायबल अभ्यासासाठी तुम्हाला फी द्यावी लागणार नाही. (मत्तय १०:८) देवाच्या वचनाचे ज्ञान वाढवू इच्छिणाऱ्या सर्वधर्मीय लोकांसाठी आणि कोणत्याही धर्माचे अनुसरण करत नसलेल्यां पण प्रांजळ मनाच्या लोकांसाठी देखील हा अभ्यास विनामूल्य आहे.
या चर्चेत कोणकोण भाग घेऊ शकतील? तुमचे सबंध कुटुंब यात सहभाग घेऊ शकते. तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवू इच्छित असाल तर तेही यात सहभाग घेऊ शकतात. किंवा, तुमची इच्छा असेल तर तुमच्या एकट्याबरोबरसुद्धा चर्चा केली जाऊ शकते.
पुष्कळ जण, आठवड्यातून एक तास आवर्जून बायबलचा अभ्यास करतात. तुम्ही आठवड्यातून तासभरापेक्षा अधिक वेळ किंवा कमी वेळ जरी खर्च करू शकत असाल तरी साक्षीदार तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहेत.
शिकण्याचे निमंत्रण
यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधण्यास आम्ही तुम्हाला निमंत्रण देत आहोत. खाली दिलेल्या पत्त्यांपैकी एकावर तुम्ही लिहू शकता. मग, तुमच्याबरोबर मोफत गृह बायबल अभ्यास करण्यासाठी कोणाची तरी व्यवस्था करण्यात येईल.
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाविषयी अधिक माहिती मला पाठवावी.
□ विनामूल्य गृह बायबल अभ्यासाकरता कृपया मला भेटावे.
अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.