देवाचं राज्य काय आहे?
तुम्ही म्हणाल . . .
-
ते आपल्या मनात आहे.
-
ते स्वर्गातलं एक ठिकाण आहे.
-
ते एक स्वर्गीय सरकार आहे.
पवित्र शास्त्र असं शिकवतं
“स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल ज्याचा कधीही नाश होणार नाही.”—दानीएल २:४४, नवे जग भाषांतर.
“आम्हाला एक मुलगा देण्यात आला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील.”—यशया ९:६.
या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?
-
या नीतिमान सरकारामुळे तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल.—यशया ४८:१७, १८.
-
येणाऱ्या नवीन जगात निरोगी आणि परिपूर्ण जीवन, तसंच आनंद मिळेल.—प्रकटीकरण २१:३, ४.
पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्वास ठेवू शकतो का?
नक्कीच, याची कमीतकमी दोन कारणं आहेत:
-
देवाचं राज्य काय करेल हे येशूने दाखवून दिलं. येशूने त्याच्या अनुयायांना, देवाचं राज्य येण्यासाठी आणि पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायला शिकवलं. (मत्तय ६:९, १०) त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं जाईल हे येशूने दाखवून दिलं.
पृथ्वीवर असताना येशूने उपाशी असलेल्यांना जेवू घातलं, आजाऱ्यांना बरं केलं आणि मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं. (मत्तय १५:२९-३८; योहान ११:३८-४४) देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू आपल्या लोकांसाठी काय करेल याची सुंदर झलक त्याने दाखवली.—प्रकटीकरण ११:१५.
-
जगाच्या परिस्थितीवरून कळतं की देवाचं राज्य जणू काय दाराच्या उंबरठ्यावर, म्हणजे अगदी जवळ आलं आहे. येशूने आधीच सांगितलं होतं की देवाचं राज्य पृथ्वीवर शांती आणण्याआधी जगात युद्ध, दुष्काळ आणि भूकंप यांचं प्रमाण खूप वाढेल.—मत्तय २४:३, ७.
आणि आज आपण अशा घटना पाहत आहोत. म्हणून आपण भरवसा ठेवू शकतो की लवकरच देवाचं राज्य या गोष्टींचा अंत करेल.
थोडा विचार करा
देवाच्या राज्यात जीवन कसं असेल?
याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या स्तोत्र ३७:२९ आणि यशया ६५:२१-२३ या वचनांत मिळतं.