नंदनवन आणविणारे सरकार
नंदनवन आणविणारे सरकार
येशू पृथ्वीवर असताना त्याने आपल्या अनुयायांना, देवाच्या राज्याबद्दल याप्रकारे प्रार्थना करण्यास सांगितले: “तुझे राज्य येवो, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” (मत्तय ६:९, १०)
मानवी इतिहासाच्या आरंभाला देवाने परिपूर्ण असा मानव निर्माण करुन त्याला एका नंदनवनात ठेवले. त्या वेळी राज्याची गरज नव्हती.
तरीपण, आदाम व हव्वा या आमच्या प्राथम पालकांनी, सैतान या एका बंडखोर दूताचे म्हणणे ऐकले. त्याने देवाबद्दलच्या लबाड्या त्यांना करुन यांनाही देवाविरुद्ध बंड करण्यास चिथावले. यामुळे त्यांना मरणे भाग होते, कारण “पापाचे वेतन मरण आहे.”—रोमकरांस पत्र ६:२३.
अपूर्ण व पापी मानवाला परिपूर्ण मुले होऊच शकत नाही. या कारणामुळे आदामाची सर्व मुले अपूर्ण, पापी आणि मर्त्य अशी जन्मली.—रोमकरांस पत्र ५:१२.
या पाप व मरणाच्या शापापासून मुक्त होण्यास मानवाला त्या काळापासून देवाच्या राज्याची गरज लागली. हे राज्य, सैतानाने देवाच्या नावाविरुद्ध ज्या लबाड्या केल्या त्यांनाही काढून टाकील.
उत्पत्ती ३:१५) हे “संतान” देवाच्या राज्याचा राजा असेल.
मानवजातीची पापापासून मुक्तता करण्यासाठी एका खास ‘संतती’चा (वा संतानाचा) जन्म होईल असे यहोवा देवाने भाकित केले.(तो कोण असणार होता?
आदामाने पाप केल्यानंतर सुमारे २,००० वर्षांनी अब्राहाम हा एक अत्यंत विश्वासू माणूस जन्माला आला. देवाने अब्राहामाला त्याच्या स्वतःचे नगर सोडण्यास आणि पॅलेस्टाईन देशात डेऱ्यात वस्ती करायला सांगितले.
यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी अब्राहामाने तंतोतंत पाळल्या. यामध्ये एक मोठी कठीण गोष्टही समाविष्ट होती. यहोवाने त्याला त्याच्या पुत्राचे, इसहाकाचे एका वेदीवर अर्पण करण्यास सांगितले.
यहोवाला खरे पाहता मानवी यज्ञार्पण नको होते. पण अब्राहामाची त्याच्यावर केवढी प्रीती आहे हे तो याकरवी जाणू इच्छित होता. अब्राहाम इसहाकास ठार करण्याच्या बेतात असताना यहोवाने त्याला थांबविले.
अब्राहामाच्या या मोठ्या विश्वासामुळे यहोवाने पॅलेस्टाईन देश त्याच्या संतानाला देण्याचे त्याला अभिवचन दिले आणि म्हटले की वचनयुक्त संतान हे त्याच्याकरवी, त्याचा पुत्र इसहाक याच्या मालिकेतून येणार.—उत्पत्ती २२:१७, १८; २६:४, ५.
इसहाकाला एसाव व याकोब ही दोन जुळी मुले झाली. यहोवाने म्हटले की, वचनयुक्त संतान याकोबाद्वारे येणार.—याकोब, ज्याचे यहोवाने इस्राएल असे नाव ठेवले, त्याला १२ मुले झाली व नंतर या बारा जणांनाही मुले झाली. अशाप्राकारे अब्राहामाची मुले बहुसंख्य होण्यास सुरुवात झाली.—उत्पत्ती ४६:८–२७.
देशात भयंकर दुष्काळ पडला तेव्हा याकोब व त्याचे कुटुंब मिसराचा अधिपति फारो याच्या निमंत्रणानुसार मिसर देशात वास्तव्यास गेले.—उत्पत्ती ४५:१६–२०.
मिसरामध्ये हे प्राकट झाले की वचनयुक्त संतान याकोबाचा पुत्र यहुदा याच्या वशांतून येणार.—उत्पत्ती ४९:१०.
याकोबास मृत्यू आला, पण त्याची संतान वाढत राहिली व त्यांचे एक मोठे राष्ट्रच तयार होऊ लागले. यामुळे मिसऱ्यांना त्यांची भीती वाटू लागली म्हणून त्यांनी त्यांना आपले दास बनविले.—निर्गम १:७–१४.
सरतेशेवटी यहोवाने मोशे या अत्यंत विश्वासू माणसाला त्या काळच्या फारोकडे पाठवून इस्राएल पुत्रांना दास्यत्वातून मोकळे करण्याची मागणी केली.—फारोने नकार दर्शविला त्यामुळे यहोवाने मिसऱ्यांवर दहा पीडा आणल्या. शेवटल्या पीडेच्या वेळी त्याने एका विनाशकारी दूताला पाठवून मिसरातील सर्व ज्येष्ठपुत्रांचा संहार केला.—निर्गम अध्याय ७ ते १२.
देवाने इस्राएलांना म्हटले की त्यांनी सायंकाळच्या भोजनासाठी एक कोकरा वधिला व त्याचे काही रक्त घराच्या दाराच्या कपाळपट्टीवर लावले तर तो विनाशकारी दूत त्यांची घरे ओलांडून जाईल. त्यामुळेच इस्राएलांच्या ज्येष्ठ पुत्रांचा बचाव झाला.—निर्गम १२:१–३५.
फारोने लगेच इस्राएलांना मिसराबाहेर जाण्याची आज्ञा केली. पण नंतर त्याने आपले मन बदलले व त्यांना परत आणावे म्हणून त्यांचा पाठलाग केला.
इस्राएलांना बचाव मिळावा म्हणून यहोवाने तांबड्या समुद्रातून मार्ग उघडा केला; आणि जेव्हा फारो व त्याच्या सैन्याने त्यांच्या मागे येण्याचा प्रायत्न केला तेव्हा त्यांचा त्या पाण्यात बुडून नाश झाला.—निर्गम १५:५–२१.
यहोवाने इस्राएल पुत्राना वाळवंटातील सीनाय नावाच्या डोंगराकडे निरविले. तेथे त्याने त्यांना नियमशास्त्र दिले व म्हटले की ते त्यांनी पाळल्यास ते एक याजक राज्य व पवित्र राष्ट्र बनतील. अशाप्राकारे काही काळातच देवाच्या राज्याचा एक महत्वपूर्ण भाग बनण्याची संधि इस्राएलांना प्राप्त झाली.—सीनाय डोंगराच्या परिसरात सुमारे एक वर्षभर राहिल्यानंतर, यहोवाने इस्राएलांना पॅलेस्टाईनकडे, त्यांचा पूर्वज अब्राहाम याला वचन दिलेल्या प्रादेशी निरविले
पलेस्टाईन मध्ये देवाने नंतर इस्राएलांना राजांची राजवट स्थापू दिली. तेव्हा देवाचे पृथ्वीवर एक राज्य होते.
इस्राएलाचा दुसरा राजा दावीद हा यहुदा वंशातला होता. दावीदाने इस्राएलाच्या सर्व शत्रूंचा विमोड केला व त्याने यरुशलेम ही राष्ट्राची राजधानी केली.
दावीदाच्या राज्यकीर्दीतील घटना दाखवितात की जेव्हा यहोवा कोणा राजाला पाठबळ देतो तेव्हा त्याला पृथ्वीवरील कोणताही अधिपति जिंकू शकत नाही.
यहोवाने म्हटले की वचनयुक्त संतान दावीदाच्या वंशातून असेल.—१ इतिहास १७:७, ११, १४.
दावीदानंतर त्याचा पुत्र शलमोन याने आधिपत्य गाजविले. तो सूज्ञ राजा होता. त्याच्या कारकीर्दीत इस्राएलांना भरभराट मिळाली.
शलमोनाने यरूशलेमामध्ये यहोवासाठी एक सुंदर मंदीर देखील उभारले. शलमोनाच्या राज्यकीर्दीत इस्राएलांना प्राप्त झालेली स्थिति देवाच्या भावी राज्यामध्ये मानवजातीला जे आशीर्वाद मिळतील त्यापैकी काहींची माहिती देते.—१ राजे ४:२४, २५.
तथापि, शलमोनानंतरचे कित्येक राजे अविश्वासू असल्याचे सिद्ध झाले.
दाविदाचे वंशज यरूशलेमात अद्याप राज्य करीत होते त्यावेळीच यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे सांगितले की दावीदाचा एक भावी पुत्र सबंध पृथ्वीवर विश्वासूपणे आधिपत्य करील. हेच ते वचनयुक्त संतान असेल.—यशया ९:६, ७.
यशया संदेष्ट्याने या राजपुत्राची राजवट शलमोनापेक्षाही वैभवी असेल असे भाकीत केले.—यशया, अध्याय ११ व ६५.
आता मात्र देवाच्या सेवकांना ते संतान कोण असणार याविषयीची उत्सुकता वाटली.
तरीपण, ते संतान येण्याआधी इस्राएलात राज्य करणारे राजे इतके दुष्ट झाले की इ.स.पू. ६०७ मध्ये यहोवाने ते राष्ट्र बाबेलोन्यांना जिंकू देण्याची परवानगी दिली. त्यामध्ये बहुतेक लोक बाबेलोनमध्ये कैदी म्हणून गेले. पण देव आपले अभिवचन विसरला नाही. संतान हे दावीदाच्याच मालिकेतून येणार होते.—इस्राएलांच्या बाबतीत घडलेला अनुभव दाखवितो की, सूज्ञ व विश्वासू राजांनी आपल्या राज्यकीर्दीद्वारे जे लाभ मिळविले होते ते मर्यादित स्वरूपाचे होते. विश्वासू माणसे मरतात व त्यांचे वारस त्यांच्या जागी येतात पण ते बहुधा विश्वासू निघत नाहीत. मग यासाठी कोणता तोडगा होता? वचनयुक्त संतान.
ओघाओघाने काही हजार वर्षांनी ते वचनयुक्त संतान शेवटी दिसले. ते काण होते?
देवाकडिल एका दूताने मरीया नावाच्या अविवाहीत इस्राएली मुलीला एक निरोप कळविला. त्याने म्हटले की तिला एक मुलगा होईल ज्याचे नाव येशू असेल. त्या दिव्यदूताने असे म्हटले:
“तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि यहोवा देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल आणि तो राजा म्हणून . . . राज्य करील.”—लूक १:३२, ३३.
अशाप्राकारे येशू हा वचनयुक्त संतान व ओघाओघाने देवाच्या राज्याचा राजा होणार होता. पण येशू हा त्याच्या पूर्वी जगलेल्या विश्वासू मनुष्यांपेक्षा वेगळा असा का होता?
येशूचा जन्म एका अद्र्भित चमत्काराद्वारे झाला होता. त्याची आई कुमारी होती व त्याचा कोणी मानवी पिता नव्हता. येशू आधी स्वर्गात वस्तीस होता आणि देवाच्या पवित्र आत्म्याने वा कार्यकारी शक्तीने येशूचे जीवन स्वर्गातून मरीयेच्या उदरी स्थलांतरीत केले. त्यामुळेच त्याला आदामाच्या पापाचा वारसा मिळाला नाही. आपल्या सबंध आयुष्यभर येशूने पाप केले नाही.—१ पेत्र २:२२.
येशूचा बाप्तिस्मा वयाच्या तिसाव्या वर्षी झाला.
त्याने लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली व त्या राज्याचा राजा अशी ओघाओघाने स्वतःची ओळख करुन दिली.—मत्तय ४:२३; २१:४–११.
त्याने पुष्कळ चमत्कारही केले.
त्याने आजाऱ्यांना बरे केले.—मत्तय ९:३५.
त्याने उपाशी लोकांना अद्र्भितरित्या भरविले.—मत्तय १४:१४–२२.
त्याने मृतांनाही उठविले.—मत्तय ९:१८, २३–२६.
हे सर्व चमत्कार प्रादर्शित करतात की देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू मानवजातीसाठी काय करील.
योहान १८:३६) याकरताच राज्याला “स्वर्गीय यरुशलेम” असे म्हटले आहे.—इत्त्वीयांस पत्र १२:२२, २८.
दाविद राजाने यरूशलेमास आपल्या राज्याची राजधानी कशी केली, ते तुम्हास आठवते का? येशूने स्पष्ट केले की देवाचे राज्य हे पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गातील असेल. (राज्याची प्राजा असणाऱ्यांनी ज्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे ते कायदे येशूने विवेचीत केले. हे कायदे आताही पवित्र शास्त्रात उपलब्ध आहेत. यापैकी अत्यंत महत्वपूर्ण असणारे कायदे म्हणजे लोकांनी देवावर व एकमेकांवर प्रीती करावी.—मत्तय २२:३७–३९.
आपल्या राज्यात राज्य करणारे आपण एकटे नाहीत हे सुद्धा येशूने प्राकट केले. पृथ्वीवरुन स्वर्गास जाणाऱ्या व तेथे त्याच्या सोबत राज्य करण्यासाठी लोक निवडलेले असतील हे त्याने म्हटले. (लूक १२:३२; योहान १४:३) असे कितीजण तेथे असतील? प्राकटीकरण १४:१ म्हणते: १,४४,०००.
येशूसोबत राज्य करण्यासाठी जर फक्त १,४४,००० जण स्वर्गास जाणार आहेत तर मग बाकीच्या मानवजातीसाठी काय आशा आहे?
पवित्र शास्त्र म्हणते की, “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील. तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.
जे पृथ्वीवर सर्वदा राहतील अशांना “दुसरी मेंढरे” असे म्हणण्यात आले आहे.—योहान १०:१६.
अशाप्राकारे, दोन प्राकारातील आशा आहेत. यहोवा देवाने १,४४,००० लोकांना स्वर्गास जाण्याचे व तेथे येशू ख्रिस्तासोबत राज्य करण्याचे आमंत्रण दिले आहे. पण याच राज्याची प्राजा म्हणून या पृथ्वीवर सदासर्वदा जगण्याची खात्रीलायक आशा इतर लाखोंना आहे.—प्राकटीकरण ५:१०.
सैतानाने येशूचा द्वेष करुन त्याचा विरोध केला. येशूने साडेतीन वर्षे प्राचार केल्यावर सैतानाने त्याला धरावयास लाविले आणि वधस्तंभावर खिळे ठोकवून ठार मारले. पण देवाने याकरता अनुज्ञा का दिली?
आदामाचे वंशज असल्यामुळे आम्ही सर्व पाप करतो व त्यामुळे मरणाधीन आहोत हे लक्षात घ्या.—रोमकरांस पत्र ६:२३.
शिवाय हेही लक्षात आणा की, येशूचा अद्र्भितरित्या जन्म झाल्यामुळे तो परिपूर्ण होता व या कारणास्तव त्याला मरणाची गरज नव्हती. तरीपण, सैतानाने ‘येशूची टाच फोडावी’ वा ठार मारावे अशी देवाने अनुज्ञा दिली. पण देवाने येशूला अमर असा आत्मा या अर्थी उठविले. येशूपाशी अद्याप परिपूर्ण मानवी जीवनाचा हक्क होता, त्याचा वापर तो आम्हा मानवांची पापापासून मुक्तता करण्यासाठी खंडणी असा करु शकत होता.—उत्पत्ती ३:१५; रोमकरांस पत्र ५:१२, २१; मत्तय २०:२८.
येशूच्या यज्ञार्पणाचा काय अर्थ होतो हे आम्हास समजून देण्यासाठी पवित्र शास्त्र भविष्यवादीत नमुन्या आधारे त्याचे भाष्य करते.
उदाहरणार्थ, यहोवाने अब्राहामाला त्याच्या प्रीतीची परीक्षा या अर्थी त्याच्या पुत्राचे यज्ञार्पण करण्यास कसे सांगितले होते ते आठवते ना?
हा येशूच्या यज्ञार्पणाचा भविष्यवादीत नमुना होता. याद्वारे यहोवाची मानवजातीसाठी असणारी प्रीती केवढी थोर आहे ते दिसले. ते असे की त्याने आपला पुत्र येशू याला, आम्हाला जीवनाची प्राप्ती व्हावी याकरता मरण्यास सोडले.—योहान ३:१६.
यहोवाने इस्राएलांना मिसरातून कसे सोडविले आणि आपल्या दूताला त्यांची घरे ओलांडून जाऊ देऊन त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांचा कसा बचाव केला ते आठवते ना?—निर्गम १२:१२, १३.
हा सुद्धा एक भविष्यवादीत नमुना होता. वधलेल्या कोकऱ्याचे रक्त इस्राएलांच्या ज्येष्ठांसाठी जसे जीवन या अर्थी ठरले त्याप्रामाणेच येशूचे ओतण्यात आलेले रक्त हे, त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जीवन या अर्थी आहे. त्या रात्रीच्या घटना इस्राएलांसाठी मुक्तता अशा ठरल्या तसेच येशूचे मरण मानवजातीला पाप व मरणापासून मुक्तता देते.
या कारणास्तव येशूला “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” असे म्हटले आहे.—योहान १:२९.
तरीसुद्धा आपल्या मृत्युनंतर आपल्या शिष्यांनी राज्याच्या सुवार्तेचा प्राचार करावा म्हणून आधीच, येशूने पृथ्वीवर असताना त्यांना एकत्रित केले व प्राचाराची तालीम दिली.—हे, देवाने, येशूसोबत त्याच्या राज्यामध्ये राज्य करण्यासाठी निवडलेली पहिली माणसे होत.—लूक १२:३२.
यहुद्यांनी नियमशास्त्र पाळले तर ते “याजक राज्य” होतील असे देवाने त्यांना अभिवचन दिले होते हे तुम्हास आठवते ना? आता त्यांनी येशूचा स्वीकार केल्यास त्यांना देवाच्या राज्याचा भाग बनून स्वर्गीय याजक या अर्थी सेवा करण्याची संधि उपलब्ध होती. पण बहुतेकांनी येशूला नाकारले.
यामुळेच त्या काळापासून पुढे यहुदी लोक देवाचे निवडलेले राष्ट्र असे राहिले नाही; पॅलेस्टाईन वचनयुक्त देश राहिला नाही.—मत्तय २१:४३; २३:३७, ३८.
येशूच्या काळापासून आतापर्यंत यहोवा, येशूबरोबर जे स्वर्गात राज्य करणार अशांना गोळा करीत आला आहे. यांच्यापैकीचे काही हजार जण आज पृथ्वीवर जिवंत आहेत. आम्ही त्यांना अभिषिक्त शेष असे म्हणतो.—प्राकटीकरण १२:१७.
आता तुम्हाला देवाचे राज्य काय आहे ते दिसायला लागले आहे. ते स्वर्गातील सरकार आहे, त्याचा राजा येशू ख्रिस्त आहे व त्याला पृथ्वीतून १,४४,००० लोक येऊन मिळतात. ते राज्य पृथ्वीवरील विश्वासू मानवजातीवर राज्य करील. त्याच्या ठायी पृथ्वीवर शांती आणण्याचे सामर्थ्य असेल.
येशूवर मृत्यु गुदरल्यावर त्याचे पुनरुत्थान करण्यात आले व तो स्वर्गात गेला. तेथे तो देवाजवळ बसुन, देव त्याला देवाच्या राज्याचा राजा या नात्याने अधिकार गाजविण्यास केव्हा सांगतो ते ऐकण्याची वाट बघत राहिला. (स्तोत्रसंहिता ११०:१) हे केव्हा घडेल?
कधी कधी यहोवाने आपल्या राज्याविषयीची माहिती लोकांना कळविण्यासाठी त्यांना स्वप्ने पडू दिली.
दानीएलाच्या काळात यहोवाने असे एक स्वप्न बाबेलोनचा राजा नबुखद्नेस्सर याला पडू दिले. ते एका प्राचंड वृक्षाचे स्वप्न होते.—दानीएल ४:१०–३७.
ते झाड तोडून टाकले गेले व त्याचा बुंधा सात वर्षे बांधून टाकला गेला.
तो वृक्ष नबुखद्नेस्सराचे प्रातीक ठरला. वृक्षाचे बुंध जसे सात वर्षे बांधून ठेवले गेले त्याप्रामाणे नबुखद्नेस्सराने आपली बुद्धी सात वर्षें गमावली. नंतर ती त्याला परत आली.
हा सर्व भविष्यवादीत नमुना होता. नबुखद्नेस्सर यहोवाच्या जागतिक अधिपत्याचे चित्र होता. हे अधिपत्य सुरुवातीला यरुशलेमात दावीद राजाच्या वंशजामार्फत चालविले जात होते. इ.स.पूर्वी ६०७ मध्ये बाबेलोन्यांनी यरुशलेम जिंकल्यावर त्या राजांची मालिका खंडीत झाली. “ज्याचा हक्क आहे तो येईपर्यंत” दावीदाच्या वंशाचा कोणी दुसरा राजा राहणार नव्हता. (यहेज्केल २१:२७) तो येशू ख्रिस्त होता.
इ.स.पू. ६०७ पासून ते येशू आपला राज्याधिकार सुरु करीपर्यंत किती काळ लागणार होता? सात भविष्यवादित वर्षे, म्हणजेच २,५२० वर्षे. (प्राकटीकरण १२:६, १४) इ.स.पू. ६०७ पासून ही २,५२० वर्षे इ.स. १९१४ पर्यंत आम्हास आणतात.
अशाप्राकारे येशूने १९१४ पासून स्वर्गात आधिपत्य गाजविण्यास सुरुवात केली. याचा काय अर्थ झाला?
याविषयीची माहिती पवित्र शास्त्र, प्रोषित योहानाने जो दृष्टांत पाहिला त्याद्वारे कळवते.
त्याने एक स्त्री स्वर्गात एका मुलाला जन्म देत आहे असे पाहिले.—प्राकटीकरण १२:१–१२.
ही स्त्री, देवाची स्वर्गीय स्त्री संस्था, जी स्वर्गातील सर्व दूत सेवकांनी मिळून बनली आहे तिला चित्रित करते. तो मुलगा देवाच्या राज्याला सूचित करतो. हा “जन्म” १९१४ मध्ये घडला.
यानंतर काय घडले? पहिली गोष्ट राजा या नात्याने येशूने सैतान व त्याच्या सोबत बंड केलेल्या सर्व दूतांना स्वर्गातून पृथ्वीवर हाकलून दिले, ही केली.—प्राकटीकरण १२:७.
याचा परिणाम सांगताना पवित्र शास्त्र म्हणते: “स्वर्गानो व त्यात वसणाऱ्यांनो, उल्लास करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्राकटीकरण १२:१२.
यास्तव, येशूने स्वर्गात राज्याधिकार आरंभिला तेव्हा त्याचे शत्रू पृथ्वीवर खूप खळबळ माजवू लागले. पवित्र शास्त्र भाकीत करते की येशूने त्याच्या शत्रूंमध्ये आधिपत्य सुरु केले.—स्तोत्रसंहिता ११०:१, २.
याचा मानवजातीसाठी काय अर्थ होणार होता?
येशूने आम्हास सांगितले: युद्धे, अन्ना टंचाई, रोग आणि भूकंप.
—मत्तय २४:७, ८; लूक २१:१०, ११.
हे सर्व काही आम्ही १९१४ पासून घडत असलेले पाहिले आहे. नेमके याच वेळी राज्याचा अधिकार का सुरु झाला ते आम्हास माहीत असण्याचे हे कारण होय.
याशिवाय, “राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील . . . माणसे मरणोन्मुख होतील.” (लूक २१:२५, २६) हे सुद्धा आम्ही १९१४ पासून पाहिले आहे.
प्रोषित पौलाने आणखी सांगितले की, माणसे “स्वार्थी, धनलोभी, . . . आईबापाची आज्ञा न मानणारी, . . . कोणत्याही बाबतीत मोकळ्या मानाची नसणारी, चहाडखोर, संयम नसणारी” होतील.—२ तिमथ्यी ३:१–५.
यामुळे तुम्हाला कळू शकेल की जीवन इतके कठीण का बनले आहे. सैतान खूपच क्रियाशील बनला आहे, पण देवाचे राज्यही अत्यंत क्रियाशील आहे.
१९१४ नंतर, देवाचे राज्य स्थापित झाले आहे ही सुवार्ता, येशूसोबत स्वर्गात आधिपत्य गाजविण्याची आशा राखणाऱ्या शेषांनी सांगायाला सुरुवात केली. हे कार्य, येशूने म्हटले त्याप्रामाणे सबंध पृथ्वीभर आता पसरले आहे.—या प्राचार कार्याचा उद्देश काय आहे?
पहिला, लोकांना देवाच्या राज्याची माहिती कळविणे हा आहे.
दुसरा, देवराज्याची प्राजा होण्याची इच्छा आहे का ते लोकांना ठरविण्यास मदत देणे.
येशूने म्हटले की आमच्या काळात सबंध मानवजातीचे मेंढरा व शेरडासमान वृत्तीच्या लोकात विभाजन होईल.—मत्तय २५:३१–४६.
“मेंढरे” येशूवर व त्याच्या बंधूंवर प्रोम दाखवतील. पण “शेरडे” ते दाखणार नाहीत.
‘मेंढरां’ना सार्वकालिक जीवन मिळेल, पण ‘शेरडां’ना मिळणार नाही.
विभाजनाचे हे कार्य राज्याच्या सुवार्तेच्या प्राचाराद्वारा पूर्ण केले जात आहे.
यशया संदेष्ट्याकरवीचा हा एक भविष्यवाद पहा:
“शेवटल्या दिवसात असे होईल की, यहोवाच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल, त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील.”—यशया २:२.
मानवजात आता “शेवटल्या दिवसात” राहात आहे.
यहोवाच्या उपासनेचे “मंदिर” सर्व खोटया धर्माच्या वर ‘उंचावले’ आहे.
“देशोदेशातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला आपण यहोवाच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाउ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू’”—यशया २:३.
अशाप्राकारे सर्व राष्ट्रातील पुष्कळ लोक यहोवाची उपासना करण्यासाठी येत आहेत आणि ते इतरांना आपणासोबत येण्याचे आमंत्रण देतात. यहोवा इच्छितो त्या मार्गाने कृति करण्याचे ते शिकून घेत आहेत.
“ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.
यहोवाची भक्ती करणारे लोक ऐक्य व शांतीने राहतात.
देवराज्याच्या कार्यहालचालीचा परिणाम असा झाला की आता जवळजवळ तीस लाख लोक जागतिकपणे देवाच्या राज्याची प्राजा बनले आहेत.
यांचे एकत्रीकरण, स्वर्गास जाण्याची व ख्रिस्ताबरोबर आधिपत्य गाजविण्याची आशा राखणाऱ्या लोकांच्या शेषांसभोवती झाले आहे
यांना देवाच्या संस्थेमार्फत आध्यत्मिक अन्ना दिले जाते. —मत्तय २४:४५–४७.
यांचे, ख्रिश्चनांचे आंतरराष्ट्रीय बंधुत्व असून ते एकमेकांवर खरी प्रीती दाखवतात.—योहान १३:३५.
त्यांना मनाची शांती आहे व भवितव्यासाठी आशा आहे. —फिलिप्पैकर ४:७.
लवकरच, सुवार्तेचा प्राचार उरकला जाईल. ‘मेंढरां’चे एकत्रीकरण पूर्ण होईल. त्यावेळी देवाचे राज्य काय करील?
विश्वासू दावीद राजाने देवाच्या लोकांच्या सर्व शत्रूंचा विमोड केला होता हे आपणास ज्ञात आहे ना? तर मग, राजा येशूही तेच करील.
नबुखद्नेस्सर राजाला एकदा एका भव्य पुतळयाचे स्वप्न पडले होते. तो पुतळा त्याच्या काळापासून ते आमच्या काळापर्यंतच्या सर्व जागतिक साम्राज्याचे प्रातीक होता.
त्यानंतर त्याने पाहिले की पर्वतातून खोदलेला एक पाषाण बाहेर पडला व तो त्या पुतळ्यावर आदळून त्याने त्याचे तुकडे केले. हा पाषाण देवाच्या राज्याचे प्रातीक आहे.
याचा अर्थ सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होणार.—दानिएल २:४४.
देवाचे राज्य ज्या गोष्टींना उलटवून टाकील त्यापैकी काही या आहेत:
एक मोठया जात्याचा दगड समुद्रात पडतो त्याप्रामाणे खोटा धर्म नाहीसा होईल.—प्राकटीकरण १८:२१.
याच कारणास्तव देवावर प्रीती करणाऱ्या सर्वांना आत्ताच खोट्या धर्मातून बाहेर पडण्याचे उत्तेजन दिले जात आहे.—प्राकटीकरण १८:४.
यानंतर राजा येशू ‘राष्ट्रांवर प्राहार करील’ व “त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील.”—प्राकटीकरण १९:१५.
याच अनुषंगाने, यहोवाचे साक्षीदार त्यांना कर देतात व देशाच्या कायद्याचे पालन करतात तरी ते राजकारणात पडत नाहीत.
शेवटी सैतान, मोठा “अजगर” याला अगाधकुपात टाकण्यात येते.—प्राकटीकरण २०:२, ३.
येशूला राजा म्हणून मानणाऱ्या व त्याच्या अधीन राहणाऱ्या ‘मेंढरां’चाच या संकटातून बचाव होईल.—मत्तय २५:३१–३४,४१,४६.
संकटातून बचाव मिळविणारी “मेंढरे” यांचा दृष्टांत प्रोषित योहानाने पाहिला.
“मी पाहिले, तो पहा! सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळया भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय.”—प्राकटीकरण ७:९.
हा “मोठा लोकसमुदाय” सुवार्तेच्या प्राचारास प्रातिसाद देणाऱ्या सर्वांचा मिळून बनतो.
हे “मोठया संकटातून येतात.”—प्राकटीकरण ७:१४.
हातातील “झावळ्या.” ते येशू याचे त्यांचा राजा म्हणून स्वागत करीत आहेत.
त्यांचे “शुभ्र झगे” परिधान करणे त्यांचा येशूच्या यज्ञार्पणावर विश्वास आहे हे चित्रित करते.
“कोकरा” हा येशू ख्रिस्त आहे.
त्यांना कोणत्या आशीर्वादांचा आनंद मिळतो? विश्वासू शलमोन राजा राज्य करीत होता त्या वेळी इस्राएलात जो आनंद नांदत होता तो तुम्हाला आठवतो का? याने राजा येशू याच्या वर्चस्वारवाली पृथ्वीभरात जो आनंद राहील त्याची चुणूक दिली.
मानवजातीमध्ये खरी शांती असेल. त्याचप्रामाणे मानव व पशू यांच्या मध्ये यशयाने भाकित केल्याप्रामाणे शांती वसेल.—स्तोत्रसंहिता ४६:९; यशया ११:६–९.
येशूने पृथ्वीवर असताना आजाऱ्यांना बरे केले त्याप्रामाणेच तो सबंध पृथ्वीतील आजार काढून टाकील.—यशया ३३:२४.
त्याने हजारोंना भरविले त्याप्रामाणे तो सबंध मानवजातीतून अन्ना टंचाई नाहीशी करील.—स्तोत्रसंहिता ७२:१६.
त्याने मृतांचे पुनरुत्थान केले त्याप्रामाणेच ज्यांना स्वतःला देवाच्या राज्यास अधीन होण्याची पूर्ण संधि मिळू शकली नाही अशा मृतांचे तो पुनरुत्थान करील.—योहान ५:२८, २९.
अशाप्राकारे, जे पूर्णत्व आदामाने गमाविले ते हळुवारपणे तो मानवजातीला परत प्रादान करुन देईल.
हे खरेच अद्र्भित भवितव्य नाही का? ते तुम्हाला बघण्यास आवडेल का? जर होय, तर आत्ताच स्वतःला देवाच्या राज्याला अधीन करण्याच्या आणि ‘मेंढरां’पैकी एक बनण्याच्या कामाला लागा.
पवित्र शास्त्राचा अभ्यास करून यहोवा देव व येशू ख्रिस्त यांची ओळख प्राप्त करुन घ्या.—योहान १७:३.
देवाच्या राज्याची प्राजा असणाऱ्यांसोबत आपला सहवास राखा.—इत्त्वीयांस १०:२५.
राज्याचे कायदे शिका व त्यांचे पालन करा.—यशया २:३, ४.
यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःच्या जीवनाचे समर्पण करा व बाप्तिस्मा घ्या.—मत्तय २८:१९,२०.
चोरी, खोटे बोलणे, अनैतिकता व सक्त मद्यप्राशन या यहोवा देवास असंतुष्ट करणाऱ्या वाईट गोष्टी टाळा.—१ करिंथकर ६:९–११.
राज्याच्या सुवार्तेच्या प्राचारात सहभागी व्हा.—मत्तय २४:१४.
यानंतर, जे नंदनवन आदामाने आपल्या संततीसाठी गमाविले होते ते पुनर्स्थापित होत असल्याचे देवाच्या मदतीनेच तुम्हाला पहायला मिळेल. शिवाय या अभिवचनाची परिपूर्तीही तुम्हाला पहायला मिळेल: “मी राजसनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील व देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्या पुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’”—[२० पानांवरील तक्ता]
(For fully formatted text, see publication)
६०७ इ.स.पू. १९१४ इ.स.
इ.स.पू. | इ.स.
५०० १,००० १,५०० २,००० २,५२०
[११ पानांवरील चित्रं]
अब्राहाम
इसहाक
याकोब
यहुदा
दावीद
[१४ पानांवरील चित्रं]
१,४४,०००
[१६ पानांवरील चित्रं]
आदाम
येशू