व्हिडिओ पाहण्यासाठी

नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?

नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?

राज्य वार्ता क्र. ३६

नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?

नवे सहस्त्रक नव्या युगाची पहाट?

डिसेंबर ३१, १९९९ रोजी रात्री बाराच्या ठोक्याला विसाव्या शतकाने निरोप घेतला. * अत्यंत उलथापालथीचे हे शतक होते. पण याच शतकात अनेक नव्या तंत्रांचा शोध लागला; वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली; माहितीची देवाणघेवाण अभूतपूर्व प्रमाणात शक्य झाली; आणि सबंध जगात आर्थिक प्रगती झाली. त्यामुळे बऱ्‍याच जणांनी नव्या सहस्त्रकाचे मोठ्या आशेने व उमेदीने स्वागत केले आहे. नवे सहस्त्रक म्हणजे एक नवे युग असे त्यांचे मानणे आहे. पण खरच या नव्या सहस्त्रकात युद्ध, गरिबी, प्रदूषण आणि आजार नाहीसे होतील का?

बऱ्‍याच जणांना असे वाटते. पण या नव्या सहस्त्रकात जग बदलेल, तुमचे आणि तुमच्या जवळच्या माणसांचे जीवन बदलेल, पूर्वीपेक्षा जास्त सौख्यपूर्ण व सुरक्षित होईल असे मानायला खरोखरच आधार आहे का? आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्या किती व्यापक आहेत याची केवळ दोन-तीन उदाहरणे पाहा.

प्रदूषण

औद्योगिक प्रगती केलेल्या देशांतील कारखान्यांमुळे “जागतिक प्रमाणावर पर्यावरणाला धोका आहे; प्रदूषण पसरत चालले आहे आणि नैसर्गिक संपत्तीचा नाश केला जात आहे.” हेच पुढेही चालत राहिले तर “नैसर्गिक वातावरणावरील दबाव वाढतच जाईल.”—“जागतिक पर्यावरणावर एक नजर—२०००,” युनायटेड नेशन्स एनव्हायरनमेंन्ट प्रोग्रॅम.

रोगराई

“आजच्या परिस्थितीकडे पाहता, २०२० सालापर्यंत विकसनशील भागांत दगावणाऱ्‍या दर दहा जणांपैकी सात जण असंसर्गजन्य रोगांमुळे मरतील, म्हणजे आजच्या तुलनेत दुप्पट.”—“जागतिक रोगराई,” हावर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९६.

काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की ‘२०१० सालापर्यंत एड्‌सचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या २३ देशांत ६.६ कोटी लोक या रोगाने दगावतील.’—“एड्‌स नावाचा शत्रू: विकसनशील राष्ट्रातील दाहक सत्य,” युरोपियन कमिशन व वर्ल्ड बँकने तयार केलेले वृत्त.

गरिबी

“जवळजवळ १०० कोटी ३० लाख लोक दिवसाला पन्‍नास रूपयांपेक्षा कमी उत्त्पन्‍नात गुजराण करतात, आणि जवळजवळ १०० कोटी असे आहेत की ज्यांना धड दोनवेळचे जेवणही मिळत नाही.”—“मानवी विकासाचा आढावा १९९९,” युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम.

युद्ध

“[बऱ्‍याच देशांतील] अंतर्गत संघर्ष टोकाला जातील. जातीभेद, वंशभेद आणि धर्मभेद ही . . . पुढच्या शतकातील सुरवातीच्या २५ वर्षांत होणाऱ्‍या संघर्षांची सर्वसामान्य कारणे असतील. . . . या संघर्षांत दर वर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागेल.”—“नव्या जगाचे आगमन: एकविसाव्या शतकात अमेरिकन समाजातील सुरक्षा” अमेरिकन यु.एस. कमिशन ऑन नॅशनल सेक्युरिटी/ट्‌वेंटिफर्स्ट सेन्च्युरी.

नव्या सहस्त्रकाच्या आगमनानिमित्त मोठ्या धामधुमीत केल्या जाणाऱ्‍या उत्सवांच्या गोंगाटात एका वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे; ती म्हणजे प्रदूषण, रोगराई, गरिबी आणि युद्ध यांसारख्या समस्यांनी कधी नव्हे इतके रौद्र रूप धारण केले आहे. या समस्यांना कारणीभूत ठरते मनुष्याची हाव, इतरांवर भरवसा न ठेवण्याची वृत्ती आणि त्याचा स्वार्थ. विज्ञान किंवा तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली किंवा कितीही राजकीय बदल घडवून आणले तरीसुद्धा मनुष्याचे हे दुर्गुण काढून टाकता येणार नाहीत.

मानवांना आशीर्वादित करणारे नवे युग

एका प्राचीन ग्रंथाच्या लेखकाने असे लिहिले: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) या पृथ्वीवर राज्य करण्याची ताकद मनुष्यात नाही, किंबहुना असे करण्याचा अधिकारही त्याला नाही. केवळ मनुष्याचा निर्माणकर्ता यहोवा देव यालाच या पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार आहे; मानवजातीपुढे असणाऱ्‍या समस्या देखील केवळ तोच सोडवू शकतो.—रोमकर ११:३३-३६; प्रकटीकरण ४:११.

पण तो असे केव्हा आणि कसे करेल? आज आपण “शेवटल्या काळी” जगत आहोत. हे सिद्ध करण्यासाठी असंख्य पुरावे आहेत. तुमचे बायबल उघडून, २ तीमथ्य ३:१-५ ही वचने वाचा. शेवटल्या काळी “कठीण दिवस” येतील तेव्हा लोकांची वृत्ती कशाप्रकारची असेल हे यांत अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे. मत्तय २४:३-१४ आणि लूक २१:१०, ११ या वचनांतही ‘शेवटल्या काळाचे’ वर्णन केलेले आहे. यांत खासकरून वेगवेगळ्या घटनांविषयी सांगितले आहे. या घटना, उदाहरणार्थ लढाया, प्राणघातक आजारांच्या साथी, आणि दुष्काळ १९१४ सालापासून जागतिक स्तरावर होऊ लागल्या आहेत.

लवकरच हा ‘शेवटला काळ’ संपुष्टात येईल. दानीएल २:४४ यात सांगितल्याप्रमाणे: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” देव या पृथ्वीवर शासन करण्याकरता एक राज्य किंवा सरकार स्थापन करेल हे आधीच भाकीत करण्यात आले होते. प्रकटीकरण २०:४ मध्ये सांगितलेल्या या सरकारचा कालावधी असेल एक हजार वर्षे, अर्थात एक सहस्त्रक! हे खऱ्‍या अर्थाने एक नवे सहस्त्रक असेल. मानवजातीला या वैभवी सहस्त्रकात उदंड आशीर्वाद लाभतील; त्यांपैकी काहींचा उल्लेख येथे केला आहे:

समृद्धी. “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

आरोग्य. “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.” “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३५:५, ६; ३३:२४.

शुद्ध व स्वच्छ पर्यावरण. परमेश्‍वर “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करेल.—प्रकटीकरण ११:१८.

शांती. “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण . . . परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.

बायबलमध्ये देवाने दिलेल्या या वचनांवर लाखो लोकांचा विश्‍वास आहे; आता त्यांना भविष्याची भीती वाटत नाही, उलट भविष्याकरता त्यांना एक उज्ज्वल आशा मिळाली आहे. त्यामुळे, आज सहन कराव्या लागणाऱ्‍या दबावांना व समस्यांना ते आशावादी दृष्टिकोनाने तोंड देतात. बायबलच्या पवित्र वचनांनी तुमच्याही जीवनात असा बदल घडवून आणावा असे तुम्हाला वाटते का?

जीवनदायक ज्ञान!

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांत झालेली प्रगती विस्मित करणारी आहे. पण, इतके ज्ञान मिळवूनही जगातल्या बहुतेक लोकांचे जीवन आनंदी व सुरक्षित बनवण्यात मनुष्याला यश आले नाही. असे जीवन मनुष्याला केवळ एका प्रकारच्या ज्ञानामुळे मिळू शकते. त्याविषयी बायबलमध्ये योहान १७:३ (NW) या वचनात सांगितले आहे: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.”

हे ज्ञान तुम्हाला बायबलमध्ये सापडेल. बऱ्‍याच जणांना या पवित्र ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत, अनेक जण त्याची टीकाही करतात. पण यांपैकी बहुतेक जणांनी स्वतः कधी बायबलचे परीक्षण करून पाहिलेले नाही. तुम्ही केले आहे का? बायबल एक मोठे पुस्तक असल्यामुळे त्याचे वाचन करणे साधेसोपे काम नाही, हे कबूल आहे. पण तुम्ही प्रयत्न केला, तर तो सार्थक ठरेल. कारण बायबल हा एकच ग्रंथ “परमेश्‍वरप्रेरित” असून, “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

बायबलचे ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? यहोवाच्या साक्षीदारांची मदत घ्या. ते लाखो लोकांच्या घरी जाऊन काहीही मोबदला न घेता त्यांना बायबलचे ज्ञान देतात. तुम्हाला हे ज्ञान घेणे सोपे जावे म्हणून ते निरनिराळ्या पुस्तकांचा, पत्रिकांचा उपयोग करतात. यांपैकी एक, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? ही पत्रिका. या पत्रिकेत बायबलच्या संबंधात असलेल्या तुमच्या बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. जसे, देव कोण आहे? या पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे? देवाचे राज्य म्हणजे नेमके काय? बायबलच्या ज्ञानाने कौटुंबिक जीवनात आनंद येऊ शकतो का?

यहोवाच्या साक्षीदारांनी तुमच्या घरी येऊन तुमची भेट घ्यावी अशी इच्छा असल्यास खालील कूपन भरून आम्हाला पाठवावे. देवाच्या राज्याच्या वैभवी सहस्त्रकाबद्दल तुम्हाला आणखी माहिती देण्यात आम्हाला आनंद वाटेल!

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या पत्रिकेविषयी कृपया मला अधिक माहिती पाठवावी

◻ मला बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, कृपया माझी भेट घ्यावी

[तळटीप]

^ परि. 4 पाश्‍चात्त्य जगातल्या सर्वसामान्य लोकांच्या विचारानुसार आम्ही हे लिहिले आहे. खरे पाहिल्यास, नव्या सहस्त्रकाची सुरवात जानेवारी १, २००१ रोजी होईल.