व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?

बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?

तुम्हाला काय वाटतं . . .

  • ते माणसांनी लिहिलेलं पुस्तक आहे?

  • तो पुराणकथांचा, दंतकथांचा ग्रंथ आहे?

  • की, ते देवाने दिलेलं पुस्तक आहे?

बायबल असं शिकवतं

“संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं” आहे.​—२ तीमथ्य ३:१६, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळतील.​—नीतिवचनं २:१-५.

रोजच्या जीवनासाठी भरवशालायक मार्गदर्शन मिळेल.​—स्तोत्र ११९:१०५.

भविष्यासाठी खरी आशा मिळेल.​—रोमकर १५:४.

बायबलमध्ये जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी तीन कारणं आहेत:

  • सुरेख ताळमेळ. बायबल हे सुमारे ४० लोकांनी लिहिलं आणि ते लिहिण्यासाठी जवळजवळ १,६०० वर्षं लागली. या लोकांपैकी बरेच जण एकमेकांना कधीच भेटले नव्हते. तरीसुद्धा, बायबलमधल्या सगळ्या पुस्तकांमध्ये सुरेख ताळमेळ दिसून येतो. ही सर्व पुस्तकं देवाच्या नावाचा आणि त्याच्या राज्याचा गौरव करतात.

  • प्रामाणिक लेखक. सहसा लेखक आपल्या लोकांच्या अपयशांवर पांघरूण घालतात. पण याच्या अगदी उलट बायबलच्या लेखकांनी स्वतःच्या आणि आपल्या देशातल्या लोकांच्या चुकांबद्दल व अपयशांबद्दल प्रामाणिकपणे लिहिलं.—२ इतिहास ३६:१५, १६; स्तोत्र ५१:१-४.

  • भरवशालायक भविष्यवाण्या. बायबलमध्ये तब्बल २०० वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं, की बॅबिलोन या प्राचीन शहराचा नाश केला जाईल. (यशया १३:१७-२२) तो कशा पद्धतीने केला जाईल इतकंच नाही, तर त्यावर विजय मिळवणाऱ्‍या विजेत्याचं नाव काय असेल हेसुद्धा बायबलमध्ये सांगण्यात आलं होतं!—यशया ४५:१-३.

    याशिवाय, बायबलमधल्या आणखी कितीतरी भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या. यावरूनच, बायबल हे देवाचं वचन आहे हे सिद्ध होत नाही का?—२ पेत्र १:२१.

थोडा विचार करा

बायबलमुळे तुमच्या जीवनाला योग्य दिशा कशी मिळू शकते?

याचं उत्तर बायबलमधल्या यशया ४८:१७, १८ आणि २ तीमथ्य ३:१६, १७ या वचनांत मिळतं.