व्हिडिओ पाहण्यासाठी

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

तुम्ही म्हणाल . . .

  • हो.

  • नाही.

  • माहीत नाही.

पवित्र शास्त्र असं शिकवतं

“लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.”​—प्रेषितांची कार्यं २४:१५, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

सांत्वन मिळेल.​—२ करिंथकर १:३, ४.

मृत्यूच्या भीतीपासून सुटका होईल.​—इब्री लोकांना २:१५.

मृत्यूमध्ये गमावलेल्या प्रिय व्यक्‍तींना पुन्हा भेटण्याची तुम्हाला आशा मिळेल.​—योहान ५:२८, २९.

पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी तीन कारणं आहेत:

  • यहोवा देवानेच जीवन दिलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये त्याला “जीवनाचा उगम” म्हटलं आहे. (स्तोत्र ३६:९; प्रेषितांची कार्यं १७:२४, २५) त्यानेच सगळ्या मानवजातीला जीवन दिल्यामुळे मेलेल्या लोकांना तो परत जिवंत करू शकतो.

  • यहोवाने जुन्या काळात मानवांना पुन्हा जिवंत केलं होतं. पवित्र शास्त्रात अशा आठ जणांबद्दल सांगितलं आहे ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं. यांमध्ये तरुण, म्हातारे, पुरुष आणि स्त्रिया होत्या. काही जणांना मरून थोडाच वेळ झाला होता आणि एक जण तर चार दिवस कबरेत होता.—योहान ११:३९-४४.

  • यहोवा पुन्हा असं करायला उत्सुक आहे. यहोवा देवाला मृत्यूचा वीट आहे; तो त्याला शत्रू समजतो. (१ करिंथकर १५:२६) लोकांना पुन्हा जिवंत करून आणि मृत्यूचा कायमचा नाश करून या शत्रूचा पराभव करण्यासाठी यहोवा “आतुर” आहे. त्याच्या आठवणीतल्या लोकांना परत उठवण्याची आणि त्यांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत पाहण्याची त्याची तीव्र इच्छा आहे.—ईयोब १४:१४, १५.

थोडा विचार करा

आपण का म्हातारे होतो आणि मरतो?

याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या उत्पत्ती ३:१७-१९ आणि रोमकर ५:१२ या वचनांत मिळेल.