यहोवा—कोण आहे?
यहोवा—कोण आहे?
कंबोडियाच्या जंगलांतून कशीबशी वाट काढताना, हेन्री मुओ हा १९ व्या शतकातला फ्रेंच शोधक एका मंदिराभोवती असलेल्या रुंद खंदकापाशी येऊन पोचला. ते मंदिर म्हणजे अंकोर वात. जगातले सर्वात भव्य मंदिर. शेवाळाने आच्छादलेले ते मंदिर पाहता क्षणीच मुओने ओळखले की ही कोणा मनुष्याची हस्तकृती आहे. या मंदिराविषयी तो लिहितो, “कोणा आदिम काळातील मायकलँजेलोने आकार दिलेल्या या विशाल इमारतीशी ग्रीस किंवा रोम यांच्याही इतिहासातल्या कोणत्या इमारतीची तुलना करता येणार नाही.” शतकानुशतके वाळीत पडलेल्या आणि दुर्लक्षित असलेल्या या भव्यदिव्य इमारतीला घडविणारा कोणी न कोणी असलाच पाहिजे याची त्याला खात्री होती.
एक लक्षवेधक बाब अशी, ती इमारत पाहून हेन्री मुओ याच्या मनात आलेल्या विचाराशी मिळताजुळता विचार कितीतरी शतकांपूर्वी लिहिण्यात आलेल्या एका ज्ञानग्रंथात आढळतो: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) सर्व काही बांधणारा किंवा घडविणारा हा देव कोण आहे?
घडविणारा कोण?
याआधी उल्लेख करण्यात आलेल्या प्राचीन ग्रंथातच या प्रश्नाचे उत्तर सापडते. तो ग्रंथ म्हणजे बायबल. सर्व वस्तू घडविणारा कोण, या प्रश्नाचे अगदी सरळसोपे उत्तर बायबलच्या पहिल्याच वचनात सापडते; या शब्दांत: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.”—उत्पत्ति १:१.
देव म्हणवल्या जाणाऱ्या इतरांपासून स्वतःला वेगळे दाखवण्यासाठी निर्माणकर्ता देव आपल्या नावाने स्वतःची ओळख करून देतो: “ज्याने आकाशे अस्तित्वात आणली . . . ज्याने पृथ्वीला तिच्या उपजासहित विस्तारले, जो तिच्यावरल्या लोकांना श्वास . . . देतो तो देव यहोवा असे म्हणतो.” (तिरपे वळण आमचे.) (यशया ४२:५, ८, पं.र.भा.) सबंध विश्वाला ज्याने घडविले आणि ज्याने पृथ्वीवर स्त्रीपुरुषांना निर्माण केले त्या देवाचे नाव यहोवा आहे. पण यहोवा कोण आहे? कशाप्रकारचा देव आहे? आणि तुम्ही त्याचे का ऐकले पाहिजे?
त्याच्या नावाची अर्थसूचकता
सर्वप्रथम, निर्माणकर्त्या देवाच्या यहोवा या नावाचा काय अर्थ होतो? देवाचे नाव म्हणजे चार वर्णांचा एक हिब्रू शब्द (יהוה) असून, बायबलच्या हिब्रू भाषेत लिहिलेल्या भागात हे नाव जवळजवळ ७,००० वेळा आढळते. हे नाव हवा (“बनणे”) या हिब्रू क्रियापदाच्या कारक रूपात आहे आणि त्याचा अर्थ “तो बनवतो” असा होतो. म्हणजेच, आपले उद्देश पूर्ण करण्याकरता जे काही बनावे लागेल ते बुद्धिमानपणे यहोवा स्वतःला बनवतो; जी कोणती भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका तो घेतो. आपल्या उद्देशांच्या पूर्णतेकरता तो निर्माणकर्ता, न्यायाधीश, तारणकर्ता, जीवनदाता अशा अनेक भूमिका निभावतो. शिवाय, व्याकरणाच्या दृष्टीने हवा या हिब्रू क्रियापदातून क्रिया अद्याप सुरू असल्याचा बोध होतो. त्यावरून असे सूचित होते की आपल्या अभिवचनांचा पूर्तिकर्ता बनण्याकरता यहोवा अद्यापही कार्य करत आहे. हो, तो एक जिवंत देव आहे!
यहोवाचे प्रमुख गुण
बायबल दाखवते की सृष्टिकर्ता आणि आपल्या अभिवचनांचा पूर्तिकर्ता यहोवा याच्याठायी अद्भुत गुण आहेत. आपल्या अद्वितीय गुणांविषयी सांगताना यहोवा स्वतः म्हणतो: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध आणि प्रेमदया व सत्य यांत उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे.” (निर्गम ३४:६, ७, पं.र.भा.) प्रेमदयेचा देव असे यहोवाचे वर्णन करण्यात आले आहे. याठिकाणी वापरण्यात आलेल्या हिब्रू शब्दाचे भाषांतर “एकनिष्ठ प्रेम” असेही करता येईल. आपला सर्वकाळचा उद्देश साध्य करत असताना, यहोवा एकनिष्ठपणे मनुष्यप्राण्यांवर आपले प्रेम व्यक्त करत आहे. हे त्याचे प्रेम तुम्हाला हवेहवेसे वाटत नाही का?
यहोवा मंदक्रोध आहे आणि आपल्याकडून होणाऱ्या चुकांची क्षमा करायला तो तयार असतो. सतत चुका शोधण्याऐवजी जी व्यक्ती क्षमा करायला तयार असते अशी व्यक्ती कोणाला आवडणार नाही? अर्थात, यहोवा पापी प्रवृत्ती खपवून घेतो असा याचा मुळीच अर्थ होत नाही. त्याने बजावले आहे: “मला, परमेश्वराला [“यहोवाला,” NW] न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे.” (यशया ६१:८) न्यायप्रिय देव असल्यामुळे पश्चात्ताप न करू इच्छिणाऱ्यांची दुष्कृत्ये तो फार काळ खपवून घेणार नाही. आपण खात्री बाळगू शकतो, की यहोवा त्याच्या ठरवलेल्या वेळी आपल्या सभोवतालच्या या जगात चाललेला अन्याय संपुष्टात आणेल.
प्रीती आणि न्याय या गुणांमध्ये अचूक संतुलन साधण्याकरता सुबुद्धी लागते. यहोवा आपल्याशी व्यवहार करताना या दोन गुणांची अतिशय सुरेख सांगड घालतो. (रोमकर ११:३३-३६) त्याची बुद्धी आपल्याला चहुकडे दिसून येते. अद्भुत निसर्ग देवाच्या बुद्धीची ग्वाही देतो.—स्तोत्र १०४:२४; नीतिसूत्रे ३:१९.
पण फक्त बुद्धी असून चालत नाही. आपल्या मनातले संकल्प पूर्ण करण्यासाठी निर्माणकर्त्याजवळ प्रचंड सामर्थ्यही असले पाहिजे. बायबल दाखवते की यहोवा असाच सामर्थ्यशाली परमेश्वर आहे: “आपले यशया ४०:२६) खरे आहे, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवाकडे ‘महान सामर्थ्य’ आहे. अशा या गुणांमुळे तुम्ही यहोवाकडे आकर्षित होत नाही का?
डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो . . . तो महासमर्थ . . . आहे, म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.” (यहोवाला ओळखल्याने मिळणारे आशीर्वाद
यहोवाने “[पृथ्वी] निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही,” तर जे लोक त्याच्यासोबत निकटचा नातेसंबंध ठेवू इच्छितात अशा लोकांची ‘तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली.’ (यशया ४५:१८; उत्पत्ति १:२८) पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यांबद्दल त्याला काळजी आहे. पहिल्या मानवाला त्याने राहण्याकरता बागेसारखा एक सुंदर परिसर देऊ केला होता; अशाप्रकारे त्यांच्या जीवनाला त्याने परिपूर्ण सुरवात करून दिली होती. पण मनुष्य मात्र या पृथ्वीची नासाडी करत आहेत आणि असे करणाऱ्यांना यहोवा जरूर शिक्षा देईल. आपल्या नावाच्या अर्थसूचकतेप्रमाणे, तो मानवजातीकरता आणि पृथ्वीकरता असलेला आपला मूळ उद्देश पूर्णतेस नेईल. (स्तोत्र ११५:१६; प्रकटीकरण ११:१८) त्याला पिता मानून त्याच्या आज्ञेत राहणाऱ्यांसाठी तो पृथ्वीवर पुन्हा एकदा सौख्यानंदाची सुंदर परिस्थिती आणेल.—नीतिसूत्रे ८:१७; मत्तय ५:५.
त्या नव्या जगात किती सुखद जीवन तुम्हाला लाभेल याचे बायबलच्या शेवटल्या पुस्तकात वर्णन केले आहे: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) हेच खरे जीवन आहे आणि हे जीवन तुम्हाला लाभावे अशी यहोवाची इच्छा आहे. किती दयावान पिता आहे तो! तेव्हा, त्याच्याबद्दल आणि येणाऱ्या नव्या जगात राहण्याकरता यहोवा तुमच्याकडून करत असलेल्या अपेक्षांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?
अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.