व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धार्मिक वैविध्याचे आव्हान

धार्मिक वैविध्याचे आव्हान

शिक्षक या नात्याने, गत शतकातील शिक्षकांनी क्वचितच तोंड दिले असावे असे एक आव्हान—धार्मिक वैविध्यता—तुमच्यासमोर आहे.

संपूर्ण मध्ययुगादरम्यान, एका देशातील नागरिक सामान्यपणे एकाच धर्माचे पालन करत असत. अलीकडील १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत, युरोपला केवळ काही प्रमुख धर्मांचाच परिचय होता: पश्‍चिमेकडे कॅथलिकवाद आणि प्रॉटेस्टंटवाद, पूर्वेकडे कर्मठवाद आणि इस्लाम व यहुदीवाद. युरोपमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आज धार्मिक वैविध्य अगदी सामान्य झाले आहे, यात कोणतीही शंका नाही. नवनवीन धर्म स्थापन झाले असून, काही मूळ रहिवाशांनी या धर्मांचा स्वीकार केला आहे किंवा आप्रवाशांनी आणि शरणार्थ्यांनी त्या धर्मांचा परिचय करून दिला आहे.

अशाप्रकारे, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि संयुक्‍त संस्थाने यांसारख्या देशांत आपल्याला अनेक मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू लोक आढळतात. त्याचवेळी, ख्रिस्ती या नात्याने यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा अधिक देशांत सक्रियपणे सेवा करत आहेत; इटली आणि स्पेनमध्ये त्यांच्या धर्माचा दुसरा क्रमांक लागतो. १३ असे देश आहेत, ज्यात क्रियाशील सदस्यांची संख्या १,००,००० पेक्षा अधिक आहे— पृष्ठ १५ वरील रकाना पाहा.

स्थानिक धार्मिक चालीरितींच्या परिपाठांच्या वैविध्यामुळे शिक्षकांसमोर आव्हान उभे राहू शकते. उदाहरणार्थ, लोकप्रिय प्रथांच्या संबंधाने काही महत्त्वाचे प्रश्‍न उभे राहू शकतात: सर्व विधी प्रत्येक विद्यार्थ्यावर लादण्यात यावेत का—मग त्याचा किंवा तिचा धर्म कोणताही असो? बहुसंख्य लोकांना अशा प्रथांबद्दल कदाचित काही वावगे वाटणार नाही. तथापि, अल्पसंख्यांक गटाच्या कुटुंबांच्या दृष्टिकोनाचाही आदर करण्यात येऊ नये का? विचारात घेण्याजोगा आणखी एक मुद्दा आहे: ज्या देशात कायदा धर्माला राष्ट्रापासून अलिप्त ठेवतो आणि धार्मिक शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करत नाही अशा ठिकाणी अशाप्रकारच्या प्रथा शाळेत बंधनकारक करणे काही लोकांना विसंगत वाटणार नाही का?

वाढदिवस

कोणताही धार्मिक संबंध नसल्याचे किंवा थोडाफार संबंध असल्याचे भासणाऱ्‍या प्रथांबद्दलही गैरसमज निर्माण होऊ शकतात. अनेक शाळेत साजरा करण्यात येणाऱ्‍या वाढदिवसाच्या बाबतीत हे खरे आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या इतरांच्या अधिकाराचा यहोवाचे साक्षीदार आदर करत असले तरी ते अशाप्रकारच्या प्रथांमध्ये सहभागी होत नाहीत, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहेच. या प्रथांमध्ये त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी सहभागी न होण्याचा जो निर्णय घेतला त्याचे कारण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

फ्रान्समध्ये सर्वदूर वितरित झालेला ल लिवरा डा रलिझॉन (धर्मांचे पुस्तक) नामक विश्‍वकोश या रूढीला कर्मकांड म्हणतो आणि तिचा उल्लेख “प्रापंचिक विधींसोबत” करतो. आज या रूढीला निर्धोक प्रापंचिक रूढी मानले जात असले तरी वाढदिवसाच्या प्रथांची सुरवात विधर्मी धर्मांतून झाली आहे.

दि एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना (१९९१ आवृत्ती) म्हणते: “प्राचीन काळी इजिप्त, ग्रीस, रोम आणि पर्शियामध्ये दैवतांचे, राजांचे, उमरावांचे वाढदिवस साजरे केले जात.” रॉल्फ आणि एडिलिन लिन्टन हे लेखक याचे मूळ कारण सांगतात. द लोर ऑफ बर्थडेज नामक आपल्या पुस्तकात ते लिहितात: “संस्कृतींचे उगमस्थान असलेले मेसोपोटामिया आणि इजिप्त हे असे पहिले देश होते ज्या देशांतील लोक वाढदिवसांचे स्मरण करत आणि त्यांचा आदरही करत. प्राचीन काळी वाढदिवसाच्या तारखा नोंदणे महत्त्वाचे होते त्याचे प्रमुख कारण म्हणजे जन्मकुंडली बनविण्यासाठी जन्मदिवसाची तारीख आवश्‍यक होती.” ज्योतिषशास्त्रासोबत वाढदिवसाचा असा थेट संबंध असल्यामुळे त्यापासून अलिप्त राहणाऱ्‍यांकरता ही मोठ्या चिंतेची बाब आहे.—यशया ४७:१३-१५.

त्यामुळे द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया येथे आपण जे वाचतो त्यात अचंबा करण्यासारखे काही नाही: “आरंभीचे ख्रिस्ती लोक त्याचा [ख्रिस्ताचा] वाढदिवस साजरा करत नव्हते कारण कोणत्याही व्यक्‍तीचा वाढदिवस साजरा करणे ही विधर्मी प्रथा आहे, असे ते मानत असत.”—खंड ३, पृष्ठ ४१६.

साक्षीदार, एकत्र येऊन मौजमजेत वेळ घालवतात

वरील माहिती लक्षात ठेवून, यहोवाचे साक्षीदार वाढदिवसाच्या प्रथांमध्ये सहभागी होत नाहीत. घरात मूल जन्मते तेव्हा तो निश्‍चितच अत्यानंदाचा प्रसंग असतो. प्रत्येक वर्षी आपली मुले मोठी होतात हे पाहून सर्व पालकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. कुटुंबांना आणि मित्रपरिवारांना भेटवस्तू देऊन तसेच त्यांच्यासोबत मौजमजेत आपला वेळ घालून त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्‍त करण्यात यहोवाच्या साक्षीदारांनाही खूप आनंद वाटतो. तथापि, वाढदिवसाच्या प्रथांचा उगम लक्षात ठेवून वाढदिवसांऐवजी वर्षभरातील इतर कोणत्याही वेळी हे सर्व करण्याचे साक्षीदार पसंत करतात.—लूक १५:२२-२५; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

नाताळ

नाताळ जगभरात, अनेक गैर-ख्रिस्ती देशांतही साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मजगताच्या बहुसंख्य धर्मांनी या सणाचा स्वीकार केला असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार जेव्हा हा सण साजरा करत नाहीत तेव्हा थोडे विचित्र वाटते. असे का आहे?

अनेक विश्‍वकोश स्पष्टपणे सांगतात, की येशूचा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने डिसेंबर २५ ही तारीख रोमन विधर्मी सणासोबत जुळू शकेल अशाप्रकारे केवळ सोयीसाठी ठरविण्यात आली होती. वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकातून घेतलेल्या खालील विधानांकडे लक्ष द्या:

“ख्रिस्ताच्या जन्माच्या तारखेची कोणतीही निश्‍चितता नाही. शुभवर्तमानांत त्या संदर्भात कोणत्याही दिवसाचा किंवा कोणत्याही महिन्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपीडिया, खंड २, पृष्ठ ६५६.

“रोममधील सॅटरनेलियाने नाताळाच्या काळातील मौजमजेच्या बहुतेक रूढींसाठी नमुना तयार केला.”​—एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स

“आज युरोपमधील प्रचलित असलेल्या नाताळाच्या बहुतेक रूढी किंवा नमूद केलेल्या प्राचीन काळातील प्रथा खऱ्‍या ख्रिस्ती प्रथा नाहीत, तर त्या विधर्मी रूढी आहेत; या रूढी चर्चने आपल्यात सामावून घेतल्या आहेत किंवा चालू दिल्या आहेत. . . . नाताळाच्या मौजमजेच्या बहुतेक रूढी रोममधील सॅटरनेलियापासून आल्या आहेत.”—एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स (एडिनबर्ग, १९१०), जेम्स हेस्टिंग्सद्वारे संपादित, खंड ३, पृष्ठे ६०८-९.

“चौथ्या शतकापासून सर्व ख्रिस्ती चर्चेसमध्ये नाताळ डिसेंबर २५ या तारखेला साजरा करण्यात आला आहे. ‘सूर्याचा जन्म’ (लॅटिन, नाताला) नामक विधर्मी अयनान्तावरून सण पाळला जात असे. कारण तेव्हापासून दिवस मोठा होण्यास सुरवात होत असल्यामुळे सूर्याचा जणू पुन्हा जन्म झाला आहे अशी त्यामागची कल्पना होती. रोममध्ये, चर्चने या अतिशय लोकप्रिय रूढीला . . . एक नवीन अर्थ देऊन स्वीकारले आहे.”—एन्सायक्लोपीडिया युनिव्हर्सालिस, १९६८, (फ्रेंच) खंड १९, पृष्ठ १३७५.

“नाताळाच्या विकासाच्या दृष्टीने सोल इंविकटस (मिथ्रा) याच्या विधर्मी सणांचा उलटाच प्रभाव पडला. दुसऱ्‍या बाजूला पाहता, डिसेंबर २५ अयनान्त सणाचा काळ असल्यामुळे त्याची ओळख मशीहाद्वारे जगात चमकण्यात आलेल्या प्रकाशाशी तुलना करण्यात आली आणि अशाप्रकारे सोल इंविकटसची प्रतिकात्मकता ख्रिस्ताला लागू करण्यात आली.”—ब्रोकहाऊस ऐन्टस्युक्लोपेडी (जर्मन) खंड २०, पृष्ठ १२५.

नाताळाबद्दलच्या वास्तविकता कळल्यानंतर काही लोकांनी कशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली? दि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणतो: “[नाताळ] विधर्मी सण आहे या आधारावर, १६४४ मध्ये इंग्रज प्युरिटन पंथीयांनी संसदेच्या कायद्यांना सरकारजमा करून मौजमजा किंवा विधर्मी प्रथा बंद पाडल्या आणि उपवास करण्याचा आदेश दिला. चार्ल्स दुसरे, यांनी या प्रथांची पुन्हा एकवार सुरवात केली, पण स्कॉट लोक प्युरिटन विचारांना जडून राहिले.” आरंभीचे ख्रिस्ती नाताळ मानत नव्हते; आणि आज यहोवाचे साक्षीदारही नाताळ साजरा करत नाहीत आणि त्याजशी संबंधित असलेल्या विधींतही सहभागी होत नाहीत.

तथापि, बायबल इतर प्रसंगी भेटवस्तू देण्याशी किंवा नातेवाईकांना आणि मित्रांना आनंदाने खाण्यापिण्याकरता आमंत्रित करण्याशी सहमत आहे. बायबल पालकांना उत्तेजन देते, की सामाजिक दृष्टीने अपेक्षित असते तेव्हाच केवळ भेटवस्तू देण्याऐवजी त्यांनी त्यांच्या मुलांना मनापासून उदार होण्याचे शिकवावे. (मत्तय ६:२, ३) सहनशील आणि विनयशील होण्याचे यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना शिकवले जाते आणि नाताळ साजरा करण्याच्या इतरांच्या अधिकारास ओळखणे हेही यात समाविष्ट आहे. त्याअर्थी, नाताळाच्या सणात सहभाग न घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा आदर केला जातो तेव्हा ते त्याची फार कदर करतात.

इतर उत्सव

यहोवाचे साक्षीदार इतर धार्मिक किंवा काही प्रमाणात धार्मिक असलेल्या सणाच्या बाबतीतही हीच भूमिका घेतात; अशाप्रकारचे सण जे शालेय वर्षादरम्यान वेगवेगळ्या देशांत साजरे केले जातात, जसे ब्राझीलमधील जून सण, फ्रान्समधील इपिफनी, जर्मनीमधील कार्निव्हल, जपानमधील सेट्‌सुबन आणि संयुक्‍त संस्थानांतील हॅलोवीन. याविषयी किंवा येथे उल्लेख न केलेल्या इतर खास उत्सवांविषयी यहोवाचे साक्षीदार किंवा त्यांची मुले मोठ्या आनंदाने तुमच्या कोणत्याही प्रश्‍नाचे निश्‍चितच उत्तर देतील.