१ इतिहास २४:१-३१

  • दावीद याजकांची २४ गटांमध्ये विभागणी करतो (१-१९)

  • इतर लेवी (२०-३१)

२४  अहरोनच्या वंशजांची वेगवेगळ्या गटांत विभागणी करण्यात आली. अहरोनची मुलं ही: नादाब, अबीहू,+ एलाजार आणि इथामार.+ २  पण, नादाब आणि अबीहू हे दोघं आपल्या वडिलांच्या आधी मेले.+ त्यांना एकही मुलगा नव्हता. एलाजार+ आणि इथामार हे दोघं मात्र याजक म्हणून सेवा करत राहिले. ३  दावीदने एलाजारच्या मुलांपैकी सादोक+ आणि इथामारच्या मुलांपैकी अहीमलेख यांच्यासोबत मिळून अहरोनच्या वंशजांची, सेवेच्या वेगवेगळ्या गटांत विभागणी केली. ४  इथामारच्या वंशजांच्या तुलनेत एलाजारच्या वंशजांमध्ये जास्त प्रमुख होते. म्हणून त्यांनी त्यांची अशी विभागणी केली: एलाजारच्या वंशजांमध्ये त्यांच्या घराण्यांचे १६ प्रमुख, आणि इथामारच्या वंशजांमध्ये त्यांच्या घराण्यांचे ८ प्रमुख. ५  पवित्र स्थानातले अधिकारी आणि खऱ्‍या देवाची सेवा करणारे अधिकारी हे या दोन्ही वंशजांमधले होते. म्हणून त्यांच्या सेवेचा क्रम ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्यांची विभागणी केली.+ ६  त्यासाठी लेव्यांचा सचिव, म्हणजे नथनेलचा मुलगा शमाया याने त्यांची नावं लिहिली. त्याने ती नावं राजा, अधिकारी, सादोक+ याजक, अब्याथारचा+ मुलगा अहीमलेख+ आणि याजकांच्या व लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांसमोर लिहिली. आणि एलाजारच्या वंशजांमधलं एक घराणं, तर इथामारच्या वंशजांमधलं एक घराणं अशी आळीपाळीने सगळ्या घराण्यांची निवड करण्यात आली. ७  पहिली चिठ्ठी यहोयारीबच्या नावाची निघाली. दुसरी यदायाच्या, ८  तिसरी हारीमच्या, चौथी सोरीमच्या, ९  पाचवी मल्कीयाच्या, सहावी मियामीनच्या, १०  सातवी हक्कोसच्या, आठवी अबीयाच्या,+ ११  नववी येशूवाच्या, दहावी शखन्याहच्या, १२  ११ वी एल्याशीबच्या, १२ वी याकीमच्या, १३  १३ वी हुप्पाच्या, १४ वी येशेबाबच्या, १४  १५ वी बिल्गाच्या, १६ वी इम्मेरच्या, १५  १७ वी हेजीरच्या, १८ वी हप्पिसेसच्या, १६  १९ वी पथायाहच्या, २० वी यहेजकेलच्या, १७  २१ वी याखीनच्या, २२ वी गामूलच्या, १८  २३ वी दलायाच्या, तर २४ वी चिठ्ठी माज्याच्या नावाची निघाली. १९  ते याच क्रमाने यहोवाच्या मंदिरात सेवा करायला यायचे.+ त्यांच्या पूर्वजाने, म्हणजे अहरोनने इस्राएलचा देव यहोवा याच्या आज्ञेनुसार लावून दिलेल्या पद्धतीप्रमाणे ते सेवा करायचे. २०  लेवीचे इतर वंशज हे: अम्रामच्या+ मुलांपैकी शूबाएल;+ शूबाएलच्या मुलांपैकी येहद्या. २१  रहब्याहच्या+ मुलांपैकी प्रमुख असलेला इश्‍शीया; २२  इसहारच्या वंशजांपैकी शलोमोथ;+ शलोमोथच्या मुलांपैकी यहथ; २३  हेब्रोनच्या मुलांपैकी प्रमुख असलेला यरीया,+ दुसरा अमऱ्‍या, तिसरा यहजिएल आणि चौथा यकमाम; २४  उज्जियेलच्या मुलांपैकी मीखा; मीखाच्या मुलांपैकी शामीर. २५  मीखाचा भाऊ इश्‍शीया होता; इश्‍शीयाच्या मुलांपैकी जखऱ्‍या. २६  मरारीची+ मुलं महली आणि मूशी; याजीयाच्या मुलांपैकी बनो. २७  मरारीचे वंशज हे: याजीयाची मुलं बनो, शोहम, जक्कूर आणि इब्री; २८  महलीचा मुलगा एलाजार; एलाजारला मुलं नव्हती.+ २९  कीशच्या वंशजांपैकी यरहमेल; ३०  आणि मूशीची मुलं महली, एदर आणि यरीमोथ. हे सर्व आपापल्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे लेवीचे वंशज होते. ३१  यांनीसुद्धा आपल्या भाऊबंदांप्रमाणेच, म्हणजे अहरोनच्या मुलांप्रमाणेच दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांसमोर चिठ्ठ्या टाकल्या.+ मोठ्या मुलाच्या घराण्याला आणि छोट्या मुलाच्या घराण्याला सारखंच मानलं गेलं.

तळटीपा