व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-क

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याआधी घडलेल्या घटना

आनंदाच्या संदेशाची चार पुस्तकं कालक्रमानुसार

खाली दिलेल्या तक्त्यांसोबत, येशूने केलेला प्रवास आणि प्रचार केलेली ठिकाणं दाखवणारे नकाशे देण्यात आले आहेत. या नकाशांत दिलेले बाण अचूक मार्ग दाखवण्यासाठी नाहीत, तर फक्‍त दिशा दाखवण्यासाठी आहेत. “सु.” याचा अर्थ “सुमारे” किंवा “जवळजवळ” असा होतो.

येशूच्या सेवाकार्याआधी घडलेल्या घटना

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स.पू. ३

यरुशलेमचं मंदिर

गब्रीएल स्वर्गदूत जखऱ्‍याला बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या जन्माबद्दलची भविष्यवाणी सांगतो

   

१:५-२५

 

सुमारे इ.स.पू. २

नासरेथ; यहूदीया

गब्रीएल स्वर्गदूत मरीयाला येशूच्या जन्माबद्दलची भविष्यवाणी सांगतो; ती तिची नातेवाईक अलीशिबा हिला भेटायला जाते

   

१:२६-५६

 

इ.स.पू. २

यहूदीयाचा डोंगराळ प्रदेश

बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचा जन्म होतो आणि त्याचं नाव ठेवण्यात येतं; जखऱ्‍या भविष्यवाणी करतो; योहान रानात राहतो

   

१:५७-८०

 

इ.स.पू. २, सु. १ ऑक्टो.

बेथलेहेम

येशूचा जन्म; “शब्द मानव झाला”

१:१-२५

 

२:१-७

१:१४

बेथलेहेमजवळ; बेथलेहेम

स्वर्गदूत मेंढपाळांना आनंदाची बातमी सांगतो; स्वर्गदूत देवाची स्तुती करतात; मेंढपाळ बाळाला भेटायला जातात

   

२:८-२०

 

बेथलेहेम; यरुशलेम

येशूची सुंता करण्यात येते (८ व्या दिवशी); त्याचे आई-वडील त्याला मंदिरात घेऊन जातात (४० व्या दिवसानंतर)

   

२:२१-३८

 

इ.स.पू. १ किंवा इ.स. १

यरुशलेम; बेथलेहेम; इजिप्त; नासरेथ

ज्योतिषी भेटायला येतात; कुटुंब इजिप्तला पळून जातं; हेरोद लहान मुलांना मारून टाकतो; कुटुंब इजिप्तमधून परत येतं आणि नासरेथमध्ये राहू लागतं

२:१-२३

 

२:३९, ४०

 

इ.स. १२, वल्हांडण

यरुशलेम

बारा वर्षांचा येशू मंदिरातल्या गुरुजनांना प्रश्‍न विचारतो

   

२:४१-५०

 
 

नासरेथ

नासरेथला परत येतो; आई-वडिलांच्या आज्ञेत राहतो; सुतारकाम शिकतो; मरीया तिच्या चार मुलांचं, तसंच मुलींचंही संगोपन करते (मत्त १३:५५, ५६; मार्क ६:३)

   

२:५१, ५२

 

इ.स. २९, एप्रिलच्या सुमारास

ओसाड रान, यार्देन नदी

बाप्तिस्मा देणारा योहान आपली सेवा सुरू करतो

३:१-१२

१:१-८

३:१-१८

१:६-८