व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाबद्दल थोडी माहिती

बायबलमध्ये देवाचा संदेश आहे. तो आपल्यासाठी आहे. आपण जीवनात यशस्वी कसं होऊ शकतो आणि देवाचं मन आनंदित कसं करू शकतो हे त्यात सांगितलं आहे. बायबल आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरही देतं:

  1. देव कोण आहे?

  2. तुम्ही देवाबद्दल कसं शिकून घेऊ शकता?

  3. बायबल कोणी लिहिलं?

  4. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बायबल अचूक आहे का?

  5. बायबलचा मुख्य संदेश काय आहे?

  6. मसीहाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

  7. आपल्या काळाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

  8. आपल्या दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?

  9. आपल्या जीवनात दुःख का येतं?

  10. १० भविष्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

  11. ११ मृत्यू झाल्यावर माणसाचं काय होतं?

  12. १२ ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी कोणती आशा आहे?

  13. १३ कामाबद्दल बायबल काय सांगतं?

  14. १४ पैशांचा योग्य वापर कसा करावा?

  15. १५ तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

  16. १६ तुम्ही चिंतांचा सामना कसा करू शकता?

  17. १७ बायबलमुळे तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

  18. १८ तुम्ही देवासोबत जवळचं नातं कसं जोडू शकता?

  19. १९ बायबलमधल्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कोणती माहिती आहे?

  20. २० बायबल वाचताना पुरेपूर फायदा होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबलमध्ये वचनं कशी शोधायची?

बायबल हे ६६ पुस्तकांनी मिळून बनलं आहे. त्याचे दोन भाग आहेत: हिब्रू-ॲरामेईक शास्त्र (“जुना करार”) आणि ग्रीक शास्त्र (“नवा करार”). बायबलच्या प्रत्येक पुस्तकात अध्याय आणि अध्यायांत वचनं आहेत. एखाद्या वचनाचा उल्लेख केला जातो, तेव्हा पुस्तकाच्या नावानंतरची पहिली संख्या अध्यायाला सूचित करते आणि त्यानंतरची संख्या वचनाला किंवा वचनांना सूचित करते. जसं की, उत्पत्ती १:१ म्हणजे उत्पत्ती पुस्तकातल्या १ ल्या अध्यायातलं १ लं वचन.