व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ६

मसीहाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

भविष्यवाणी

“तू, हे बेथलेहेम एफ्राथा, . . . तुझ्यातून माझ्यासाठी असा एक जण येईल, जो इस्राएलचा शासक बनेल.”

मीखा ५:२

पूर्णता

“हेरोद राजाच्या काळात यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले.”

मत्तय २:१

भविष्यवाणी

“ते माझी वस्त्रं आपसात वाटून घेतात, आणि माझ्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकतात.”

स्तोत्र २२:१८

पूर्णता

“मग येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर शिपायांनी त्याचे कपडे घेतले आणि त्यांचे चार भाग करून . . . आपसात वाटून घेतले . . . पण आतला झगा शिवलेला नव्हता, तर वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले: ‘हा झगा फाडण्याऐवजी, तो कोणाला मिळावा हे ठरवायला आपण चिठ्ठ्या टाकू या.’”

योहान १९:२३, २४

भविष्यवाणी

“त्याच्या सगळ्या हाडांचं तो रक्षण करतो; त्यांतलं एकही मोडण्यात आलं नाही.”

स्तोत्र ३४:२०

पूर्णता

“ते येशूच्या जवळ आले, तेव्हा तो आधीच मेला आहे असं त्यांना दिसलं. म्हणून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत.”

योहान १९:३३

भविष्यवाणी

“आमच्या अपराधांसाठी त्याला भोसकलं गेलं.”

यशया ५३:५

पूर्णता

“एका शिपायाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्‍त आणि पाणी बाहेर आलं.”

योहान १९:३४

भविष्यवाणी

“त्यांनी मला माझी मजुरी म्हणून चांदीचे ३० तुकडे दिले.”

जखऱ्‍या ११:१२, १३

पूर्णता

“मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला आणि म्हणाला: ‘जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?’ ते त्याला चांदीची ३० नाणी द्यायला तयार झाले.”

मत्तय २६:१४, १५; २७:५