प्रश्न १५
तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?
“जिथे द्वेष आहे तिथे मेजवानी करण्यापेक्षा, प्रेम असलेल्या घरातलं साधं जेवण बरं.”
“मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.”
“ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.”
“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.”
“लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.”
“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”
“एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी ती त्याला जीवन देऊ शकत नाही.”
“त्यामुळे, आपल्याजवळ खायला अन्न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”
“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”