व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सदासर्वदाचा आनंद

सदासर्वदाचा आनंद

(स्तोत्र १६:११)

  1. १. चितारली आकाशी तू

    ताऱ्‍यांची नक्षी.

    दिनरातीचे वैभव तुझ्या

    हातांची कृती.

    तू सारे काही निर्मिले,

    पाहून ते आनंदले,

    तुझे मन याहा.

    (कोरस)

    ही आनंददायी सृष्टी,

    तारणाचा संदेश, आणि

    आशा नंदनवनाची.

    पण अमूल्य सर्वांहूनी,

    आहे प्रेम तुझे नि मैत्री,

    हे यहोवा तूच आमचा

    आनंद सर्वदा!

  2. २. आनंदी राहण्या आम्हा,

    सारे तू दिले.

    सर्वत्र मायेचा तुझ्या,

    पुरावा मिळे.

    देऊन वचन अनंताचे,

    जीवन सजवले आमचे

    आनंदाने तू.

    (कोरस)

    ही आनंददायी सृष्टी,

    तारणाचा संदेश, आणि

    आशा नंदनवनाची.

    पण अमूल्य सर्वांहूनी,

    आहे प्रेम तुझे नि मैत्री,

    हे यहोवा तूच आमचा

    आनंद सर्वदा!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    आशेविना होतो

    जेव्हा, दिले तू मुला.

    की मानवांना लाभावा,

    आनंद सदा सर्वदा!

    (कोरस)

    ही आनंददायी सृष्टी,

    तारणाचा संदेश, आणि

    आशा नंदनवनाची.

    पण अमूल्य सर्वांहूनी,

    आहे प्रेम तुझे नि मैत्री,

    हे यहोवा तूच आमचा

    आनंद सर्वदा!

    (कोरस)

    ही आनंददायी सृष्टी,

    तारणाचा संदेश, आणि

    आशा नंदनवनाची.

    पण अमूल्य सर्वांहूनी,

    आहे प्रेम तुझे नि मैत्री,

    हे यहोवा तूच आमचा

    आनंद सर्वदा!