व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जपेन मना

जपेन मना
  1. १. सेवा तुझी आनंदाने,

    वाटे करण्या, मनी भीती.

    हुरहुर ही मनी असे,

    कुठे पडते मी कमी?

    करते तेव्हा मी प्रार्थना,

    तू म्हणतोस ना, सांग मनातलं मला.

    घेरे चिंतांचं वादळ,

    बोल तुझे मग देतात बळ.

    (कोरस)

    तू सांभाळ मना, मना जप तुझ्या,

    चांगलं त्याला धरून राहा.

    चिंतेचा मी, करेन सामना,

    विसावा मिळेल, मी जपेन मना.

  2. २. सेवा करते मनापासून,

    पण दमते मी, जाते थकून.

    जीवन हे कठीण किती,

    प्रेमा लायक का तुझी?

    तरी जाते मी सांगण्या,

    नवीन जगाची तू दिली आशा.

    हरेन दुःखाशी ना मी,

    यहोवा माझा तू सोबती.

    (कोरस)

    तू सांभाळ मना, मना जप तुझ्या,

    चांगलं त्याला धरून राहा.

    चिंतेचा मी, करेन सामना,

    विसावा मिळेल, मी जपेन मना.

    मी जपेन मना.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    होई हे मन निराश जेव्हा,

    लढेन मी त्या भावना.

    नाही मला कशाची चिंता,

    यहोवा मला दाखवली दिशा तू,

    दाखवली दिशा तू.

    (कोरस)

    तू सांभाळ मना, मना जप तुझ्या,

    चांगलं त्याला धरून राहा.

    चिंतेचा मी, करेन सामना,

    विसावा मिळेल, मी जपेन मना.

    मी जपेन मना.