व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ये पुन्हा मागे फिर

ये पुन्हा मागे फिर
  1. १. असा आहे का कुणी,

    जो ना चुकला कधी?

    आहेत इथे,

    वळणे वेडी वाकडी.

    हरवली वाट तुझी,

    पण का याहाशी दूरी?

    सोडे ना तो हात तुझा,

    आणेल तो मार्गावरी खऱ्‍या.

    (कोरस)

    जीवन हे धाव अशी,

    अडथळे ना कमी.

    ऊठ जरा दे लढा,

    झाले जे घे धडा.

    लक्ष दे याहकडे,

    मग मार्ग तो दाखवेल.

    घेशील भरारी तू,

    जाशील ओलांडून दरी.

    ये पुन्हा मागे फिर.

  2. २. बिघडले चित्र काल,

    रंगांची घालमेल.

    कोरे पान घे नवे

    दे रंग जे खरे.

    वचनाच्या आरशात,

    निरखूनी घे स्वतःला.

    होईल खशू यहोवा,

    घेईल तो जवळ कुशीत तुला.

    (कोरस)

    जीवन हे धाव अशी,

    अडथळे ना कमी.

    ऊठ जरा दे लढा,

    झाले जे घे धडा.

    लक्ष दे याहकडे,

    मग मार्ग तो दाखवेल.

    घेशील भरारी तू,

    जाशील ओलांडून दरी.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    तुला ठरवी मन ते दोषी,

    म्हणे नाही तुला माफी.

    पण ‘केले मी तुला क्षमा’ म्हणे याहा,

    कोर हे मनी.

    (कोरस)

    जीवन हे धाव अशी,

    अडथळे ना कमी.

    ऊठ जरा दे लढा,

    झाले जे घे धडा.

    लक्ष दे याहकडे,

    मग मार्ग तो दाखवेल.

    घेशील भरारी तू,

    जाशील ओलांडून दरी.

    ये पुन्हा मागे फिर.

    ये पुन्हा मागे फिर.