व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आजारी पालक “तरुणांचे प्रश्‍न . . . आईला हे आजारपण का यावं?” (ऑगस्ट ८, १९९९) हा लेख मला खूप आवडला. आपल्या प्रिय व्यक्‍तीची त्यांच्या आजारपणात सेवा करणारे माझ्यासारखे इतर तरुणही आहेत हे मला माहीत नव्हते. माझी आजी आमच्याकडे राहते. ती चार महिन्यांपासून बिछान्यावरच आहे. मला तिची काळजी घ्यायचा खरं तर आजकाल कंटाळा येऊ लागला होता. पण या लेखाने मला बरीच मानसिक शक्‍ती मिळाली. तुमच्या या लेखाने मला आठवण करून दिली की यहोवा सदैव आपल्या पाठीशी आहे.

जे. पी., फिलिपाईन्स

हा लेख वाचून मला खूप सांत्वन मिळालं. माझ्या आईला डिप्रेशनचा (मानसिक तणावाचा) त्रास होतो. हा लेख वाचल्यावर तिला धैर्य द्यायची शक्‍ती मला मिळाली. अशा परिस्थितीत आपण इतरांना कसे समजून घेऊ शकतो, त्यांच्या भावना कशा जाणू शकतो व त्यांच्यासोबत सहानुभूतीने कसे वागू शकतो हे मला या लेखांतील सूचना वाचल्यावर समजले.

जी. एल. इटली.

हा लेख अगदी वेळेवर आला आहे. मला कॅन्सर आहे आणि माझा मुलगा माझ्याबरोबर राहतो. माझ्या मुलाला माझ्या आजारपणाचं खूप दुःख होतं, पण मी त्याला कसा धीर देऊ हेच मला समजतं नव्हतं. पण या लेखानं मला त्याच्या भावना समजण्यास मदत केली. तुमचे लेख तरुणांना उद्देशून असले तरी, ते जीवनाचे वास्तव चित्र रेखाटतात.

आर. झेड., जर्मनी

आध्यात्मिक गोष्टीत स्वतःला व्यस्त ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे मला या लेखावरून समजले. देवाच्या राज्याची आशा सतत डोळ्यापुढे ठेवली तरच तुम्ही एखाद्या आजारी व्यक्‍तीची चांगली काळजी घेऊ शकता हे मला या लेखावरून कळाले.

पी. ई., ऑस्ट्रिया

शिडी जपून वापरा “शिडी वापरा—पण जरा जपून!” (सप्टेंबर ८, १९९९) अलिकडेच मी शिडीवरून खाली पडलो. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं. या लेखात तुम्ही सुचवलेल्या दहा गोष्टी मला आवडल्या. पुढच्या वेळी मी शिडी वापरताना त्या लक्षात ठेवेन.

डी. एन., मेक्सिको

छळांतून वाचणे “मृत्यू समोर उभा असतानाही देवाची सेवा” हा लेख मी नुकताच वाचून काढला. (सप्टेंबर ८, १९९९) अंगोला येथील बांधवांच्या १७ पेक्षा अधिक वर्षांच्या धीरामुळे आध्यात्मिकरीत्या एकेकाळी नापीक वाटणारा हा देश आज सुपीक झाला आहे!

आर. वाय., जपान