व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वनस्पती औषधांचा महत्त्वाचा स्रोत

वनस्पती औषधांचा महत्त्वाचा स्रोत

वनस्पती औषधांचा महत्त्वाचा स्रोत

आधुनिक काळातील एक-चतुर्थांश वैद्यकीय औषधांची सुरवात—पूर्णपणे किंवा काही अंशी—वनस्पतींमधील रसायनांपासून झाली असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वनौषधींचा विविध उपचारासाठी वापर करणारे तज्ज्ञ या गोष्टीचे समर्थन करतात.

वनौषधींवरील संशोधनात मुख्यतः औषधी घटक वेगळे करण्यावर जोर दिला जातो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ॲस्प्रिन हा घटक; हा घटक, व्हाईट विलो झाडाच्या सालीत असणाऱ्‍या सॅलिसीनमध्ये असतो.

वनस्पतींमधील औषधी घटक वेगळे केल्यावर त्यांचा योग्य आणि अचूक प्रमाणात वापर करता येतो. एका पुस्तकात म्हटले आहे: “विलोच्या सालीतून ॲस्प्रिनचा फायदा मिळवण्यासाठी किंवा तिलपुष्पीतून प्राण वाचवणाऱ्‍या डिजीटलीस घटकाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी नैसर्गिक पदार्थ खाण्यापेक्षा गोळी घेणे अधिक उत्तम आहे.”

परंतु, वनस्पतीमधील औषधी घटक वेगळे करण्याचे तोटेही आहेत. एक गोष्ट म्हणजे, वनस्पतीमधील उरलेल्या पदार्थांद्वारे मिळणारे पोषण आणि संभावनीय औषधी फायदे यामुळे गमावले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, काही औषधे देखील रोगाला कारणीभूत असलेल्या काही जिवाणुंवर निकामी ठरतात.

वनौषधींमधील औषधी घटक वेगळे केल्याने काय गैरफायदा होतो याचे एक उदाहरण म्हणजे सिनचोना झाडाच्या सालीतून प्राप्त होणारा क्वीनाईन हा पदार्थ. क्वीनाईनमुळे मलेरियाला कारणीभूत असलेले परजीवी मोठ्या मात्रेत ठार होतात परंतु जे परजीवी जिवंत राहतात त्यांची वाढ, इतर परजीवी मरत असताना फार झपाट्याने होते. एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे: “अशाप्रकारची ही प्रतिकारकता औषधशास्त्रात एक चिंतेचा विषय बनली आहे.” (g०३ १२/२२)

[१९ पानांवरील चित्रे]

या व्हाईट विलो झाडापासून ॲस्प्रिन मिळवले जाते

[चित्राचे श्रेय]

USDA-NRCS PLANTS Database/Herman, D.E. et al. १९९६. North Dakota tree handbook

[१९ पानांवरील चित्रे]

क्वीनाईन ज्यातून प्राप्त होते ते सिनचोना झाड

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Satoru Yoshimoto