व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

अश्‍लील साहित्य “अश्‍लील साहित्य—अनपायकारक की अपायकारक?” (ऑक्टोबर-डिसेंबर २००३) या लेखमालिकांबद्दल आभारी आहे. मला अशा सडेतोड सल्ल्याची गरज होती. ख्रिस्ती होण्याआधी मी अनेक वर्षांपासून अश्‍लील साहित्य पाहत होतो. असे साहित्य किती हानीकारक आहे हे ओळखण्यास व या शक्‍तिशाली व तीव्र आकर्षणापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी कोणती निर्णायक पावले उचलली पाहिजेत हे पाहण्यास या लेखांनी माझे डोळे उघडले.

ई. पी., संयुक्‍त संस्थाने (g०४ ३/२२)

दोन वर्षांपूर्वी माझ्या २२ वर्षांच्या सुखी संसाराचा घटस्फोटात अंत झाला. अश्‍लील साहित्याने अक्षरशः एक चांगला पती आणि प्रेमळ पिता आमच्यापासून हिरावून घेतला. या भयंकर व्यसनामुळे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व पार बदलले; पूर्वी ते दयाळू, कोमल होते. हे व्यसन लागल्यापासून ते चिडखोर बनले, खोटं बोलू लागले, पाशवी वृत्तीचे झाले. मला वाटायचं, की अश्‍लील साहित्याचे परिणाम मीच एकटी भोगतीय, पण आता मला समजलं की ही अशी एक पीडा आहे जिचा अनेकांवर परिणाम होतो. या उत्तम प्रकारे लिहिलेल्या मालिकेबद्दल मी तुमचे आभार मानते.

एल. टी., संयुक्‍त संस्थाने (g०४ ३/२२)

बायबलचा अभ्यास करण्यापूर्वी, जवळजवळ दहा वर्षांपासून मला अश्‍लील साहित्य पाहण्याची सवय होती. अश्‍लील साहित्याचे समर्थन करणारे काहीही दावा करत असले तरी त्यात चांगलं असं काहीच नाही. यहोवाचा साक्षीदार होण्याआधी, मला प्रत्येक निषिद्ध अंमली पदार्थाचे व्यसन होते. माझ्या सर्व व्यसनांपैकी अश्‍लील साहित्य पाहण्याचे व्यसन सोडायला मला सर्वात जास्त कठीण गेलं. कृपया अशाप्रकारचे लेख प्रकाशित करीत राहा.

जे. ए., संयुक्‍त संस्थाने (g०४ ३/२२)

मधुमेह “मधुमेह आटोक्यात कसा ठेवाल?” या मालिकांबद्दल खूप खूप आभारी आहे. (जानेवारी-मार्च २००४) गेल्या १२ वर्षांपासून मला टाईप १ मधुमेह आहे आणि सतत इन्सुलिन इंजेक्शन्स घेऊन मी उपचार घेत आहे. माझी बायको माझ्या पाठीशी दृढ उभी आहे. आम्ही दोघं या आजाराविषयी शिकत आहोत, डॉक्टरकडे एकत्र जातो आणि मी आता सकारात्मक मनोवृत्ती विकसित करायचा प्रयत्न करत आहे. मी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करत असल्यामुळे सहख्रिश्‍चनांमध्ये, आजारी व्यक्‍तीला जीवनातील संघर्षांचा सामना करण्यास मदत मिळेल म्हणून तिच्याशी दयाळूपणे व धीराने वागण्याची गरज असल्याची जाणीव माझ्यात जागृत झाल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. अशा मनोवृत्तीमुळे मला मंडळ्यांची सेवा करीत राहायला मदत मिळते. ही लेखमालिका अगदी वेळेवर आली. पुन्हा एकदा मी तुमचा आभारी आहे.

डब्ल्यू. बी., पोलंड (g०४ ३/८)

गेल्या २८ वर्षांपासून मला मधुमेह आहे. माझ्या कुटुंबातील दहा सदस्यांना हा आजार आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या माहितींमध्ये, तुमच्या मालिकांमधली माहिती बहुसमावेशक आहे. या लेखांमध्ये आपल्या निर्माणकर्त्याचे प्रेम दिसून येते—ही गोष्ट बाहेरच्या लेखांमध्ये दिसून येत नाही. मला माझ्या कुटुंबावर अवलंबून राहायचे नव्हते त्यामुळे मला बरं वाटतं नाही हे मी इतरांना दाखवत नव्हतो. इतरांची काळजी घेण्यात मला सुख मिळायचे. परंतु या लेखाने माझे डोळे उघडले; मी स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे जेणेकरून मला इतरांची काळजी घेता येईल.

एल. पी., फ्रान्स (g०४ ३/८)

तरुण लोक विचारतात मी १६ वर्षांची आहे आणि उच्च माध्यमिक शाळेतलं माझं पहिलं वर्ष आहे. मला अशा अनेक आव्हानांचा व दबावांचा सामना करावा लागत आहे ज्यांना मला पूर्वी कधी तोंड द्यावं लागलं नव्हतं. मला साथीदारांच्या दबावाचे परिणाम जाणवू लागले आहेत. “तरुण लोक विचारतात” लेखांनी मला बायबल वाचन आणि अभ्यास यांचे महत्त्व पटवून दिले आहे. तुम्ही किशोरवयीनांची काळजी घेता याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे; पुष्कळदा मला, जणू हा लेख माझ्यासाठीच लिहिला आहे असं वाटलं आहे!

एस. आर., संयुक्‍त संस्थाने (g०४ १/२२)