व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावर एक नजर

जगावर एक नजर

अमेरिका

संशयास्पद गुन्हेगारांच्या गाड्यांचा पाठलाग करणं नेहमीच धोक्याचं असतं; हा धोका कमी करण्यासाठी काही पोलीस तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकेबल डिवाइस असतं; हे उपकरण शूट करताच ते गुन्हेगाराच्या गाडीला जाऊन चिकटतं. यामुळं गुन्हेगाराला पकडणं सोपं जातं.

भारत

हुंड्याच्या प्रश्‍नावरून तासाला अंदाजे एका स्त्रीचा बळी जातो. खरंतर, हुंडा देणं किंवा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. असं असलं, तरी मुलाच्या किंवा त्याच्या घरच्यांच्या मते मुलीकडून मिळालेला हुंडा कमी असल्यामुळं २०१२ मध्ये ८,२०० पेक्षा जास्त स्त्रियांचा खून करण्यात आला.

स्वित्झर्लंड

अल्पाइन स्विफ्ट नावाच्या तीन पक्ष्यांना सूक्ष्म सेन्सर्स बसवण्यात आले होते. पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यासाठी बसवलेल्या या यंत्रावरून दिसून आलं की आफ्रिकेला स्थलांतर करताना हे पक्षी कुठंही न थांबता २०० पेक्षा जास्त दिवस सतत उडत राहिले. न थांबता केलेलं अशा प्रकारचं स्थलांतरण यापूर्वी फक्त जलचर प्राण्यांमध्येच दिसून आलं होतं.

हॉर्न ऑफ आफ्रिका

एप्रिल २००५ ते डिसेंबर २०१२ यादरम्यान समुद्रावरील लुटारूंनी हॉर्न ऑफ आफ्रिका (आफ्रिकेचं शिंग) म्हटलेल्या प्रदेशाच्या किनारपट्टीवरील १७९ जहाजं लुटली. यातून लुटारूंनी जवळजवळ ४१३ दशलक्ष यू.एस डॉलर म्हणजे २,४७८ कोटी रुपये कमवले असा अंदाज वर्ल्ड बँकेच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला. (g14-E 10)