व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावर एक नजर

नातेसंबंध

नातेसंबंध

नातेसंबंध मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर बायबल याविषयी काय म्हणते ते तुम्ही सर्वातआधी पाहता की शेवटी? नातेसंबंधांबाबतीत, बायबलमधील प्राचीन सल्ल्याला आधुनिक संशोधन कसं दुजोरा देतं ते पाहा.

भारत

सन २०१४ मध्ये केलेल्या सर्व्हेत आढळलं की, १८-२५ वयोगटातील ६१ टक्के तरुणांना लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं, “आता भारतामध्ये गैर मानलं जात नाही,” असं वाटतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरनं हिंदूस्थान टाईम्स या वृत्तपत्राला सांगितलं: “आज तरुण-तरुणी जेव्हा म्हणतात, की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, तर याचा अर्थ ते लग्न करणार आहेत असं नाही. त्यांनी फक्त जरी एकदाच शरीर संबंध ठेवले असले, किंवा ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (लग्न न करता एकत्र राहत) असले, तरी लग्नाचा विचार त्यांच्या मनामध्ये नसतोच.”

विचार करा: लैंगिक आजार आणि मानसिक त्रास यांचा संबंध जास्तकरून, लग्नाआधीच्या सेक्सशी आहे की लग्नानंतरच्या सेक्सशी आहे?—१ करिंथकर ६:१८.

डेन्मार्क

कुटुंबाच्या सदस्यांसोबत सतत वाद होत असल्यास, मध्यम वयात मृत्यूची संभावना दुप्पट असते. कोपनहेगनच्या विश्वविद्यालयातील संशोधकांनी ११ वर्षांच्या काळात, जवळजवळ १०,००० मध्यमवर्गीय व्यक्तींचा अभ्यास केला. आणि त्यांना असं दिसून आलं की, कुटुंबाच्या सदस्यांशी सतत भांडणं करणाऱ्यांचा, अकाली मृत्यू होण्याची संभावना जास्त होती. या अभ्यासावर लिखाण करणाऱ्या लेखिकेच्या मते, “अकाली मृत्यूची संभावना कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग” म्हणजे जीवनातील समस्या, वाढत्या गरजा व चिंता यांना व्यवस्थित रीत्या हाताळणे.

बायबल काय म्हणतं? “जो आपले शब्द आवरतो तो ज्ञानवान आहे, आणि जो नम्र आत्म्याचा आहे तो बुद्धिमान मनुष्य आहे.”—नीतिसूत्रे १७:२७, पंडिता रमाबाई भाषांतर.

अमेरिका

लुइझिअॅना येथील ५६४ नवविवाहित जोडप्यांवर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, लग्नाआधीच्या गाठीभेटीदरम्यान जे तरुण-तरुणी एकमेकांशी अनेक वेळा भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात ते, लग्नाच्या सुरुवातीच्या पाच वर्षातच, वाद होत असल्यामुळे वेगळं राहण्याचं ठरवतात. अशा जोडप्यांमध्ये सतत वाद होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात ते समाधानी नसतात.

बायबल काय म्हणतं? “देवाने [विवाहात] जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६. (g16-E No. 2)