व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?

१ आपली क्षमता ओळखा

१ आपली क्षमता ओळखा

तुम्हाला एकाच वेळी जीवनात सर्व गोष्टींमध्ये बदल करावेसे वाटतील. तुम्ही विचार कराल: ‘या आठवड्यापासून मी सिगरेट पिणं, खोटं बोलणं, रात्री उशिरापर्यंत जागं राहणं हे सर्व बंद करणार. आणि व्यायाम करणं, पौष्टिक आहार घेणं, आजी-आजोबांना आठवणीने फोन करणं हे सर्व सुरू करणार!’ पण जर सर्व ध्येयं तुम्ही एकाच वेळी गाठण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यांपैकी एकही गाठता येणार नाही.

बायबल तत्त्व: “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.”नीतिसूत्रे ११:२.

एका नम्र व्यक्तीला आपल्याला क्षमतेची जाणीव असते. तिच्याजवळ असलेला वेळ, शक्ती आणि साधनं मर्यादित आहेत याची तिला कल्पना असते. त्यामुळे एकाच वेळी सर्वकाही बदलण्यापेक्षा ती व्यक्ती हळू-हळू स्वतःत सुधारणा करते.

तुम्ही जर सर्व ध्येयं एकाच वेळी गाठण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यांपैकी एकही गाठता येणार नाही

तुम्ही हे कसं करू शकता

तुम्ही एका वेळी फक्त एक किंवा दोन सवयी निवडू शकता, ज्यांमध्ये तुम्हाला फेरबदल करायचे आहेत. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  1. १. दोन लिस्ट बनवा. एक चांगल्या सवयींची ज्या तुम्हाला जीवनात जोपासायच्या आहेत. दुसरी वाईट सवयींची ज्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. लिस्ट लहान ठेवू नका. प्रत्येक लिस्टमध्ये हव्या तितक्या सवयी लिहू शकता.

  2. २. तुम्हाला ज्या गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण वाटतात त्यांना लिस्टमध्ये प्रथम स्थान द्या.

  3. ३. प्रत्येक लिस्टमधून एका वेळी एक किंवा दोन सवयीच निवडा आणि त्यांवरच लक्ष केंद्रित करा. त्यानंतर लिस्टमधून पुढील एक किंवा दोन सवयी निवडू शकता.

एक वाईट सवय सोडण्यासाठी एक चांगली सवय जोपासण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही चांगल्या सवयी लागू करण्याचा वेग वाढवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या वाईट सवयींच्या लिस्टमध्ये ‘जास्त वेळ टीव्ही बघणं’ ही सवय आहे आणि चांगल्या सवयींच्या लिस्टमध्ये, ‘मित्रांशी-नातेवाईकांशी संपर्कात राहणं’ ही सवय आहे तर तुम्ही असा निर्धार करू शकता: ‘रोज कामावरून घरी आल्यावर लगेच टिव्हीसमोर बसण्याऐवजी मी आपल्या मित्राला किंवा नातेवाइकाला फोन करेन किंवा त्याला भेटेन.’ (g16-E No. 4)