व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणाव कसा कमी कराल?

तुम्ही तणावात आहात का?

तुम्ही तणावात आहात का?

जेनिफर a म्हणते: “सर्वांनाच काही प्रमाणात तणाव असतो पण मला इतका आहे की मी तो आता सहन करू शकत नाही. माझ्या जीवनात फक्‍त एकच नाही तर बऱ्‍याच समस्या आहेत. जीवनात बरेच चढउतार आले आणि मला आताही खूप संघर्ष करावा लागतोय. त्यासोबतच माझ्या पतीला शारीरिक आणि मानसिक आजार आहे; मी त्यांची खूप वर्षांपासून काळजी घेतेय. खरंच या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप ताण येतो.”

बेन म्हणतो: “माझी पत्नी मला सोडून गेली आणि मला एकट्यालाच माझ्या दोन्ही मुलांना मोठं करावं लागलं. एकट्याने मुलांना सांभाळणं खूप कठीण होतं. यात भर म्हणजे माझी नोकरी गेली आणि गाडी दुरुस्त करण्यासाठी माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते. अशा परिस्थितीत काय करावं हे मला सुचतच नव्हतं. हा तणाव माझ्या सहनशक्‍तीच्या पलीकडे होता. माझं मन मला सांगत होतं की आत्महत्या करणं चुकीचं आहे, म्हणून मी देवाकडे हात पसरले की मला मरण येऊ दे.”

जेनिफर आणि बेन यांच्यासारखंच तुम्हालाही कधीकधी तणावाच्या ओझ्याखाली दबून गेल्यासारखं वाटतं का? असं असेल तर पुढच्या लेखांमुळे तुम्हाला सांत्वन आणि मदत मिळेल. त्यांत सांगितलं आहे की कोणत्या काही कारणांमुळे तणाव येतो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि काही प्रमाणात आपण त्यावर कशी मात करू शकतो.

a नावं बदलण्यात आली आहेत.