व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला

आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला

राणी * नावाची एक स्त्री म्हणते: “जगाची परिस्थिती खूपच खराब झालीए. बऱ्‍याच ठिकाणी युद्धं, गरिबी आणि आजारपण पाहायला मिळतं. तसंच, लहानलहान मुलांवर अत्याचार होताएत. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. पण मला माहितीए, की ही परिस्थिती अशीच राहणार नाही, ती लवकरच बदलेल.”

राणी असं इतकं खातरीने का म्हणू शकली? कारण तिला माहीत झालं, की आपल्याला बनवणारा देव लवकरच ही वाईट परिस्थिती बदलणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी देवाने पवित्र शास्त्रात काय लिहून ठेवलं आहे हेही तिला कळलं. तुम्हीसुद्धा निर्माणकर्त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या, तर आनंदी राहू शकता. यासाठी आपण या मासिकात काही प्रश्‍नांवर चर्चा करू. जसं की:

  • कुटुंब आनंदी कसं राहू शकतं?

  • नाती कशी जपायची?

  • समाधानी जीवन कसं जगायचं?

  • जीवनात इतकं दुःख, इतका त्रास का आहे? आपण का मरतो?

  • चांगली परिस्थिती येणार आहे हे आपण कसं म्हणू शकतो?

  • आपल्याला ज्याने बनवलं आहे त्या देवाला तुम्ही कसं आळखू शकता? आणि त्याच्याशी मैत्री कशी करू शकता?

या गोष्टींबद्दल निर्माणकर्त्याने जे सांगितलं आहे ते फक्‍त काही विशिष्ट समूहाच्या लोकांसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे.

^ परि. 2 या मासिकात नावं बदलण्यात आली आहेत.