व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समाधानी जीवन कसं जगायचं?

समाधानी जीवन कसं जगायचं?

आपण तरुण असो किंवा वयस्कर, आपलं लग्न झालेलं असो किंवा नसो, आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहायचं असतं. मुळात देवाचीसुद्धा आपल्यासाठी हीच इच्छा आहे. म्हणून त्याने आपल्याला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

मेहनत करा

त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्‍तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.”—इफिसकर ४:२८.

देवाला वाटतं की आपण कामाचा कंटाळा करू नये, तर मेहनत करावी. का बरं? कारण मेहनत करणाऱ्‍याला आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवता येतात. तसंच, तो इतरांनाही गरज पडेल तेव्हा मदत करू शकतो. याशिवाय, कामाच्या ठिकाणी मेहनत केल्यामुळे त्याचा बॉस त्याची कदर करेल. त्यामुळे त्याची नोकरी टिकून राहू शकते. अशा प्रकारे मेहनत करण्याच्या बाबतीत देवाने दिलेला सल्ला आपण पाळतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याला पवित्र शास्त्रात “देवाची देणगी” असं म्हटलं आहे.—उपदेशक ३:१३.

प्रामाणिकपणे वागा

आमचा विवेक प्रामाणिक आहे असा भरवसा आम्हाला आहे आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.”—इब्री लोकांना १३:१८.

एक प्रामाणिक माणूस स्वाभिमानाने जीवन जगतो. त्याला कशाचीही भीती नसते. मन शांत असल्यामुळे त्याला रात्रीची चांगली झोप येते. इतकंच नाही, तर लोक त्याच्यावर भरवसा ठेवतात आणि त्याचा आदर करतात. पण तेच, अप्रामाणिकपणे वागणाऱ्‍या माणसाला यातलं काहीच अनुभवता येत नाही. त्याचं मन त्याला सतत खात असतं. तसंच, चुकीची कामं केल्यामुळे आपण पकडले जाऊ याची त्याला सतत भीती असते.

पैशाच्या मागे लागू नका

आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा.”—इब्री लोकांना १३:५.

रोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसा लागतो. पण पैशाचा लोभ घातक आहे. कारण भरपूर पैसा कमावण्यासाठी एखाद्याला आपला बराच वेळ आणि शक्‍ती खर्च करावी लागू शकते. त्यामुळे त्याच्या विवाह जोडीदारासोबतचं त्याचं नातं कमजोर होऊ शकतं. तो आपल्या मुलाबाळांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आणि याचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. (१ तीमथ्य ६:९, १०) याशिवाय, पैशाच्या मागे लागणाऱ्‍याला बेइमानीने पैसा कमवायचाही मोह होऊ शकतो. एका बुद्धिमान माणसाने म्हटलं आहे: “विश्‍वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील, पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.”—नीतिवचनं २८:२०.

सगळ्यात चांगलं शिक्षण घ्या

व्यावहारिक बुद्धीचं आणि विचारशक्‍तीचं रक्षण कर.”—नीतिवचनं ३:२१.

शाळा-कॉलेजातलं शिक्षण घेतल्यामुळे आपण एक जबाबदार व्यक्‍ती बनू शकतो आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकतो. पण या शिक्षणामुळे आपलं जीवन सुरक्षित आणि आनंदी राहीलच याची गॅरेन्टी नाही. म्हणून जर आपल्याला खऱ्‍या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल आणि समाधानी राहायचं असेल, तर आपण देवाकडून मिळणारं शिक्षण घेतलं पाहिजे. असं शिक्षण घेणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल पवित्र शास्त्रात म्हटलं आहे: “तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.”—स्तोत्र १:१-३.