व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाशी जवळची मैत्री करण्यासाठी त्याला ओळखा

देवाशी जवळची मैत्री करण्यासाठी त्याला ओळखा

आपल्याला निर्माण करणारा देव फक्‍त एक शक्‍ती नाही, तर एक व्यक्‍ती आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच सुंदर गुण आहेत. आपण त्याच्याबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्याशी मैत्री करावी असं त्याला वाटतं. (योहान १७:३; याकोब ४:८) म्हणून पवित्र शास्त्रात त्याने स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं आहे.

देवाला एक नाव आहे

“लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तूच सर्वोच्च देव आहेस.”—स्तोत्र ८३:१८.

बायबलमध्ये सांगितलं आहे, की निर्माणकर्ता एकच आहे. त्याचं नाव यहोवा आहे. आणि त्यानेच सगळं काही बनवलं आहे. त्यामुळे आपण फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे असं बायबल म्हणतं.—प्रकटीकरण ४:११.

यहोवा एक प्रेमळ देव आहे

“देव प्रेम आहे.”—१ योहान ४:८.

यहोवा देवामध्ये अनेक सुंदर गुण आहेत. त्याच्या या गुणांबद्दल आपल्याला बायबलमधून शिकायला मिळतं. शिवाय, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींतूनही त्याचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण प्रेम आहे. तो जे काही करतो ते प्रेमापोटीच करतो. त्यामुळे आपण जितकं जास्त यहोवा देवाला ओळखू तितकं जास्त त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढेल.

यहोवा क्षमा करणारा देव आहे

‘तू क्षमाशील आहेस.’—नहेम्या ९:१७.

यहोवाला माहीत आहे, की आपण शेवटी माणसंच आहोत; माणसांमध्ये कमतरता आहेत आणि त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे तो आपल्याला माफ करायला नेहमी तयार असतो. आपण जर त्याच्याकडे माफी मागितली आणि चुकीची कामं करायचं सोडून दिलं, तर तो आपल्या चुका लक्षात ठेवणार नाही; तो मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करेल. —स्तोत्र १०३:१२, १३.

यहोवा देवाला वाटतं, की आपण प्रार्थनेत त्याच्याशी बोलावं

‘यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे; तो त्यांची मदतीची याचना ऐकतो.’—स्तोत्र १४५:१८, १९.

यहोवा मुळीच अशी अपेक्षा करत नाही, की त्याची उपासना करण्यासाठी आपण विशिष्ट विधी पाळाव्यात, किंवा मग प्रतिमांचा किंवा काही वस्तूंचा उपयोग करावा. तर प्रार्थनेत आपण त्याच्याशी बोलावं असं त्याला वाटतं. आईवडील जसं प्रेमाने आपल्या मुलांचं ऐकतात, अगदी तसंच यहोवाही आपल्या प्रार्थना ऐकतो.