व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो

देवाने दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो

“संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं” आहे. (२ तीमथ्य ३:१६) याचा अर्थ, सर्वशक्‍तिशाली देवाने स्वतःचे विचार बायबलचं लिखाण करणाऱ्‍यांच्या मनात टाकले आणि मग त्यांनी ते लिहून काढले.

देवाच्या सल्ल्याचा आपल्याला फायदा व्हावा असं त्याला वाटतं

“मी यहोवा . . . तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो. तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल! मग तुझी शांती नदीसारखी, आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.”—यशया ४८:१७, १८.

यावरून दिसून येतं, की आपल्याला मनाची शांती मिळावी आणि आपण कायम सुखी असावं असं देवाला वाटतं. आणि त्यासाठी तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार आहे.

देवाने दिलेल्या सल्ल्याचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो

“सगळ्या राष्ट्रांत . . . राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.”—मार्क १३:१०.

‘आनंदाचा संदेश’ हा आहे, की लवकरच यहोवा सगळ्या दुःखांचा अंत करेल, या पृथ्वीला सुंदर बागेसारखं बनवेल आणि आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा जिवंत करेल. आज जगभरात यहोवाचे साक्षीदार हा आनंदाचा संदेश लोकांना सांगत आहेत.