व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १

निर्मिती ते जलप्रलय

निर्मिती ते जलप्रलय

आकाश आणि पृथ्वी कोठून आले? सूर्य, चंद्र आणि तारे, तसंच पृथ्वीवरल्या अनेक गोष्टी, कोठून अस्तित्वात आल्या? त्या सर्वांना देवानं निर्माण केलं असं म्हणताना, बायबल खरं उत्तर देतं आणि म्हणूनच, निर्मितीबद्दलच्या बायबलच्या कथांनी आपल्या पुस्तकाची सुरवात होते आहे.

देवानं सुरवातीला निर्माण केलेल्या गोष्टी म्हणजे, काहीशा त्याच्यासारख्याच असलेल्या आत्मिक व्यक्‍ती होत्या, असं आपल्याला कळून येतं. ते देवदूत होते. परंतु पृथ्वी आपल्यासारख्या लोकांसाठी बनवली गेली. तेव्हा देवानं आदाम आणि हव्वा नावाच्या पुरुष आणि स्त्रीला बनवलं; आणि त्यांना एका सुंदर बागेत ठेवलं. पण त्यांनी देवाची अवज्ञा केली; आणि जगण्याचा हक्क गमावला.

आदामाच्या निर्मितीपासून जलप्रलयापर्यंत, एकूण १,६५६ वर्षं झाली. या काळाच्या दरम्यान अनेक वाईट लोक होऊन गेले. स्वर्गात सैतान व त्याचे दुष्ट दूत होते. तर पृथ्वीवर, काईन आणि इतर अनेक वाईट लोक होते. त्यातले काही विलक्षण ताकदीचे होते. परंतु पृथ्वीवर हाबेल, हनोख आणि नोहा असे चांगले लोकही होते. पहिल्या भागात आपण या सर्व लोकांबद्दल व घटनांबद्दल वाचू.

 

या विभागात

कथा १

देव वस्तू घडवू लागतो

उत्पत्ती पुस्तकातली निर्मितीची गोष्ट अद्‌भूत आणि समजायला सोपी आहे​—अगदी लहान मुलंसाठीसुद्धा.

कथा २

एक सुंदर बाग

उत्पत्तीमध्ये सांगितलं आहे, की देवाने एका खास जागी एदेन बाग बनवली होती. सर्व पृथ्वी, या सुंदर बागेसारखी व्हावी अशी देवाची इच्छा होती.

कथा ३

पहिले स्त्री-पुरुष

देवाने आदाम आणि हव्वाला बनवलं आणि एदेनच्या बागेत ठेवलं. हे पहिलं विवाहित जोडपं होतं.

कथा ४

त्यांनी आपलं घर का गमावलं

मानवांनी मूळ परादीस कसं गमावलं हे उत्पत्ती या बायबलच्या पुस्तकात वाचायला मिळते.

कथा  ५

खडतर जीवनाची सुरुवात होते

एदेन बागेच्या बाहेर आदाम आणि हव्वाला खूप समस्यांचा सामना करावा लागला. जर त्यांनी देवाचा आज्ञा मानली असती तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जीवन आनंदी झालं असतं.

कथा ६

एक चांगला आणि एक वाईट मुलगा

उत्पत्तीमधली काईन आणि हाबेलची गोष्ट आपण कशा प्रकारची व्यक्‍ती असणं गरजेचं आहे आणि उशीर होण्याआधी आपण कोणती मनोवृत्ती बदलली पाहिजे हे शिकवते.

कथा ७

एक धाडसी माणूस

हनोखचं उदाहरण हे दाखवून देतं की तुमच्या सभोवती असलेली माणसं जरी वाईट वागत असली तरी तुम्ही योग्य ते करू शकता.

कथा ८

पृथ्वीवरचे राक्षस

उत्पत्तीच्या ६ व्या अध्यायात सांगितलं आहे की लोकांना त्रास देणारे राक्षस पृथ्वीवर होते. त्यांना नेफिलीम म्हटलं जायचं. ते स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव बनून राहायला आलेल्या देवदूतांची मुलं होते.

कथा  ९

नोहा तारु बांधतो

जरी इतरांनी ऐकलं नाही तरी नोहा आणि त्याच्या कुटुंबानं देवाच्या आज्ञांचं पालन केलं आणि म्हणून जलप्रलयातून ते बचावले.

कथा १०

जलप्रलय

नोहा देत असलेला इशारा ऐकून लोक हसले. पण स्वर्गातून जलप्रलयाचं पाणी पडायला लागलं तेव्हा त्यांचं हसू पळालं! नोहाच्या तारूमुळे नोहाचा, त्याच्या कुटुंबाचा आणि अनेक प्राण्यांचा जीव कसा वाचला ते पाहा.