व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २

एक सुंदर बाग

एक सुंदर बाग

या पृथ्वीकडे पाहा! प्रत्येक गोष्ट किती सुंदर आहे! गवत आणि वृक्ष, फुलं नि सर्व प्राणी पाहा. हत्ती आणि सिंह तुम्हाला ओळखू येतात का?

ही सुंदर बाग कशी अस्तित्वात आली? चला, देवानं ही पृथ्वी आपल्यासाठी कशी तयार केली, ते पाहू या.

प्रथम, देवानं जमिनीला झाकण्यासाठी हिरवंगार गवत बनवलं. त्यानं हरतऱ्‍हेची छोटी झाडं, झुडुपं आणि वृक्ष बनवले. या वाढ होणाऱ्‍या गोष्टी पृथ्वीला सुंदर करायला मदत करतात. किंवा, त्याहूनही अधिक करतात. त्यातल्या अनेक, आपल्याला अत्यंत चविष्ट अन्‍नही देतात.

त्यानंतर देवानं पाण्यात पोहण्यासाठी मासे आणि आकाशात उडण्यासाठी पक्षी बनवले. त्यानं कुत्री, मांजरं आणि घोडे, लहान-मोठे प्राणी बनवले. तुमच्या घराजवळ कोणते प्राणी राहतात? देवानं आपल्यासाठी या सर्व गोष्टी बनवल्याचा आपल्याला आनंद होऊ नये का?

शेवटी, देवानं पृथ्वीच्या एका भागाला एक खास जागा केली. त्या जागेला त्यानं एदेनची बाग म्हटलं. ती अगदी परिपूर्ण होती. ती सर्वतोपरी सुंदर होती. आणि सर्व पृथ्वी, अगदी त्यानं बनवलेल्या या सुंदर बागेसारखी व्हावी, अशी देवाची इच्छा होती.

पण या बागेच्या चित्राकडे पुन्हा पाहा. तिथे कोणत्या गोष्टीची उणीव देवाला दिसली, ते तुम्हाला माहीत आहे का? चला पाहू या.