व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४

त्यांनी आपलं घर का गमावलं

त्यांनी आपलं घर का गमावलं

आता काय घडतं आहे पाहा. आदाम आणि हव्वेला एदेनच्या सुंदर बागेतून बाहेर काढून टाकलं जात आहे. कशासाठी, ते तुम्हाला माहीत आहे का?

कारण त्यांनी खूप वाईट असं काहीतरी केलं. आणि म्हणून यहोवा त्यांना शिक्षा देतो आहे. आदाम आणि हव्वेनं कोणती वाईट गोष्ट केली, ती तुम्हाला ठाऊक आहे का?

जी गोष्ट करू नका, असं देवानं त्यांना सांगितलं होतं, ती त्यांनी केली. बागेतल्या वृक्षांपासून अन्‍न खाण्याची मुभा असल्याचं देवानं त्यांना सांगितलं. परंतु एका झाडापासून खाऊ नये, खाल्ल्यास ते मरतील, असं देव म्हणाला. त्यानं तो वृक्ष स्वतःकडे ठेवला. दुसऱ्‍या कोणाची वस्तू घेणं चूकीचं असतं, हे आपल्याला ठाऊक आहे. होय की नाही? मग काय झालं?

एका दिवशी हव्वा बागेत एकटी असताना, एक साप तिच्याशी बोलला. आणि काय आश्‍चर्य! देवानं ज्या वृक्षापासून खाऊ नका असं सांगितलं होतं, त्याचं फळ खायला त्यानं तिला सांगितलं. यहोवानं साप बनवले तेव्हा, ते बोलणारे बनवले नव्हते. दुसरा कोणी तरी त्या सापाला बोलायला लावत होता, असाच याचा अर्थ होतो. तो कोण होता?

तो आदाम नव्हता. तेव्हा, तो, पृथ्वी बनवण्याच्या खूप आधी यहोवानं बनवलेल्या व्यक्‍तींपैकी एक असला पाहिजे. त्या व्यक्‍ती देवदूत होत, आणि आपण त्यांना पाहू शकत नाही. हा देवदूत अत्यंत गर्विष्ठ झाला होता. देवाप्रमाणे आपणही राजा असावं, असं त्याला वाटायला लागलं होतं. आणि यहोवा ऐवजी लोकांनी आपली आज्ञा पाळावी, अशी त्याची इच्छा होती. सापाला बोलायला लावणारा देवदूत तोच होता.

तो देवदूत हव्वेला फसवू शकला. ते फळ खाल्ल्यास ती देवासारखी होईल, असं त्यानं तिला सांगितलं तेव्हा, तिला ते खरं वाटलं. त्यामुळे तिनं ते फळ खाल्लं, आणि आदामानंही तसंच केलं. आदाम आणि हव्वेनं देवाची अवज्ञा केली; व त्या कारणामुळे, सुंदर बागेतलं आपलं घर त्यांनी गमावलं.

परंतु पुढे कधी तरी, देव खात्रीनं सर्व पृथ्वी एदेन बागेसारखी सुंदर करील. तिला तशी करण्यात तुम्हाला भाग कसा घेता येईल, ते आपण पुढे शिकू. पण आता, आदाम आणि हव्वेचं काय झालं ते पाहू या.