व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २

जलप्रलय ते इजिप्तहून सुटका

जलप्रलय ते इजिप्तहून सुटका

जलप्रलयातून फक्‍त आठ जण वाचले. पण कालांतरानं त्यांची संख्या हजारोंवर गेली. मग, जलप्रलयानंतर ३५२ वर्षांनी अब्राहामाचा जन्म झाला. अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा देऊन देवानं आपलं वचन कसं पाळलं, ते आपल्याला कळतं. मग, इसहाकाच्या दोन मुलांपैकी याकोबाला देवानं निवडलं.

याकोबाचं, १२ मुलगे आणि काही मुलींचं मोठं कुटुंब होतं. याकोबाच्या १० मुलांनी, योसेफ नावाच्या त्यांच्या धाकट्या भावाचा द्वेष केला. त्यांनी त्याला इजिप्तमध्ये दास म्हणून विकलं. पुढे योसेफ तिथे मोठा अधिकारी झाला. एक भयंकर दुष्काळ आला असताना, आपल्या भावांचं मन बदललं आहे की नाही, ते पाहण्यासाठी योसेफानं त्यांची परीक्षा घेतली. शेवटी याकोबाचं सर्व कुटुंब, इस्राएल लोक, इजिप्तला गेलं. अब्राहामाच्या जन्मानंतर २९० वर्षांनी ही घटना घडली.

त्यापुढची २१५ वर्ष इस्राएल इजिप्तमध्ये राहिले. योसेफाच्या मृत्यूनंतर तिथे ते गुलाम झाले. कालांतरानं मोशेचा जन्म झाला; आणि इजिप्तमधून इस्राएलांना सोडवण्यासाठी देवानं त्याचा उपयोग केला. दुसऱ्‍या भागात एकूण ८५७ वर्षांचा इतिहास आहे.

 

या विभागात

कथा ११

पहिलं मेघधनुष्य

तुम्ही जेव्हा मेघधनुष्य पाहाल तेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट आठवेल?

कथा १२

माणसं एक मोठा बुरुज बांधतात

देवाला माणवांनी केलेली गोष्ट आवडली नाही म्हणून त्याने शिक्षा दिली आणि तिचा परिणाम आजही लोकांवर आहे.

कथा १३

अब्राहाम​—देवाचा मित्र

अब्राहाम आपलं चांगलं आणि आरामदायक घर सोडून तंबूमध्ये कायमचं राहायला का गेला?

कथा १४

देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो

देवाने अब्राहामला इसहाकचा बळी द्यायला का सांगितलं?

कथा १५

लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं

तिने जे केलं त्यापासून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो.

कथा १६

इसहाकाला चांगली बायको मिळते

रिबेका एक चांगली पत्नी कशामुळे बनली? तिच्या सुंदरतेमुळे की इतर कोणत्या गोष्टीमुळे?

कथा १७

भिन्‍न असलेले जुळे भाऊ

त्यांचा वडील इसहाक याचं एसाववर खूप प्रेम होतं पण आईला म्हणजे रिबकेला मात्र याकोब आवडायचा.

कथा १८

याकोब हारानला जातो

याकोबचं राहेलवर प्रेम असतं पण तरी तो पहिल्यांदा लेआसोबत लग्न करतो.

कथा १९

याकोबाचं मोठं कुटुंब

इस्राएलच्या १२ वंशाची नावं याकोबच्या १२ मुलांच्या नावावरून पडली आहेत का?

कथा २०

दीना संकटात पडते

चुकीचे मित्र निवडल्यामुळे हे सगळं झालं.

कथा २१

योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात

आपल्या भावाला ठार मारण्याची इच्छा त्यांच्यापैकी काहींना का झाली असावी?

कथा २२

योसेफाला तुरुंगात टाकलं जातं

योसेफने नियम मोडला म्हणून नाही तर त्याने योग्य ते केलं म्हणून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं.

कथा २३

फारोची स्वप्नं

सात गाई आणि सात कणसं यात समानता होती.

कथा २४

योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो

योसेफच्या भावांनी त्याला विकलं होतं. पण त्याचे भाऊ आता बदललेत हे त्याला कसं कळणार होतं?

कथा २५

कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं

याकोबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना याकोबी लोक म्हणण्याऐवजी इस्राएली लोक का म्हटलं जातं?

कथा २६

ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो

ईयोब त्याची संपत्ती, मुलं, आरोग्य गमावतो. पण देव त्याला खरंच शिक्षा देत होता का?

कथा २७

एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो

फारोने त्याच्या लोकांना सर्व इस्राएली तान्ह्या मुलांना मारून टाकायला का सांगितलं?

कथा २८

तान्हा मोशे कसा वाचला

इस्राएली मुलांना ठार मारण्याची आज्ञा देण्यात आली होती पण मोशेच्या आईने त्याला जिवंत ठेवायचा मार्ग शोधून काढला.

कथा २९

मोशे का पळून गेला

४० वर्षांच्या मोशेला वाटलं, की आपण इस्राएली लोकांना वाचवण्यासाठी तयार आहोत. पण तो तयार नव्हता.

कथा ३०

जळणारं झुडूप

एका नंतर एक चमत्कार करून देव मोशेला सांगतो की इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्याची वेळ आता झाली आहे.

कथा ३१

मोशे व अहरोन फारोला भेटतात

फारो मोशेचं ऐकून इस्राएली लोकांना का जाऊ देत नाही?

कथा ३२

दहा पीडा

इजिप्तचा राजा फारो हट्टीपणे इस्राएली लोकांना जाऊ द्यायला नकार देतो म्हणून देव इजिप्तवर दहा पीडा आणतो.

कथा ३३

तांबडा समुद्र ओलांडणं

देवाकडून मिळालेल्या शक्‍तीमुळे मोशे तांबड्या समुद्राचे दोन भाग करतो. इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र ओलांडतात.