व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २०

दीना संकटात पडते

दीना संकटात पडते

दीना कोणाला भेटायला जात आहे, ते तुम्हाला दिसतं का? कनान देशात राहणाऱ्‍या काही मुलींना भेटायला ती चालली आहे. ही गोष्ट तिचे वडील याकोब यांना आवडेल का? या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्यासाठी, अब्राहाम आणि इसहाक यांचं कनान मधल्या स्त्रियांबद्दलचं मत आठवण्याचा प्रयत्न करा.

कनान मधल्या एखाद्या मुलीशी इसहाकानं लग्न करावं, अशी अब्राहामाची इच्छा होती का? नाही. आपला मुलगा याकोब यानं एखाद्या कनानी मुलीशी लग्न करावं, अशी इसहाक आणि रिबकेची इच्छा होती का? मुळीच नाही. का, ते तुम्हाला ठाऊक आहे का?

कनान मधले हे लोक खोट्या देवांची भक्‍ती करायचे. पती, पत्नी अथवा जिवलग मित्र करावे, असे ते चांगले लोक नव्हते. त्यामुळे, त्याच्या मुलीनं या कनानी मुलींशी मैत्री करावी, हे याकोबाला पसंत पडलं नसतं, याची आपण खात्री बाळगू शकतो.

आणि तेच झालं. दीना संकटात पडली. दीनाकडे पाहणारा, चित्रातला तो कनानी माणूस तुम्हाला दिसतो का? त्याचं नाव शखेम आहे. एका दिवशी, दीना भेटीला आलेली असताना, शखेमानं दीनाला नेलं, आणि आपल्यापाशी निजण्याची तिच्यावर बळजबरी केली. हे चूक होतं. कारण, फक्‍त लग्न झालेले स्त्री-पुरुष एकत्र झोपू शकतात. शखेमानं दीनाशी केलेल्या या वाईट गोष्टीमुळे पुढे खूप त्रास झाला.

घडलेली गोष्ट दीनाच्या भावांच्या कानी गेल्यावर ते अतिशय चिडले. त्यातले दोघे, शिमोन आणि लेवी तर इतके संतापले की, ते तरवारी घेऊन शहरात गेले, आणि त्यांनी लोकांना बेसावध गाठलं. त्यांनी नि त्यांच्या भावांनी शखेम आणि इतर सर्व पुरुषांना जिवे मारलं. त्याच्या मुलांनी ही वाईट गोष्ट केल्यामुळे याकोब फार रागावला.

या सर्व अनर्थाची सुरवात कशी झाली? दीनानं, देवाचे नियम न पाळणाऱ्‍या लोकांशी मैत्री केल्यानं. आपण असे मित्र करणार नाही, होय ना?