व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४५

जॉर्डन नदी ओलांडणं

जॉर्डन नदी ओलांडणं

पाहा! इस्राएल लोक जॉर्डन नदी ओलांडत आहेत! पण पाणी कोठे आहे? वर्षाच्या या सुमाराला खूप पाऊस पडत असल्यानं काही मिनिटांपूर्वीच नदी दुथडी भरुन वाहात होती. पण आता पाणी नाहीसं झालं आहे! आणि तांबड्या समुद्राप्रमाणे इथेही, इस्राएल कोरड्या जमिनीवरुन पलीकडे जाताहेत! सगळं पाणी गेलं कुठं? चला पाहू या.

इस्राएल लोकांनी जॉर्डन नदी ओलांडण्याची वेळ आल्यावर, यहोवानं यहोशवाला इस्राएल लोकांना असं सांगायला लावलं: ‘याजकांनी कराराचा कोश घेऊन आपल्या पुढे जावं. त्यांनी यार्देन (जॉर्डन) नदीत पाय ठेवले की, पाणी थांबेल.’

तेव्हा, याजक कराराचा कोश उचलतात अन्‌ लोकांच्या पुढे चालतात. जॉर्डनपाशी आल्यावर याजक सरळ पाण्यात उतरतात. पाण्याचा प्रवाह खोल आणि जोरदार आहे. पण त्यांचे पाय पाण्याला लागल्याबरोबर पाणी वाहायचं थांबतं! चमत्कार होतो! नदीच्या वरच्या अंगाला यहोवानं पाण्याला बांध घातला आहे. त्यामुळे थोड्या वेळानं नदीत पाणीच राहात नाही!

कराराचा कोश वाहणारे याजक कोरड्या नदीच्या मध्यभागी जातात. चित्रात तुम्हाला ते दिसतात का? ते तिथे थांबलेले असताना, सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून जॉर्डन नदी पार करतात!

सगळे जण पलीकडे गेल्यावर, यहोवा यहोशवाला १२ बळकट पुरुषांना सांगायला लावतो: ‘कराराचा कोश घेऊन याजक नदीत जिथे उभे आहेत, तिथे जा. तिथून १२ धोंडे उचला, आणि आज रात्री तुम्ही सर्व राहाल तिथे त्यांची रास करा. म्हणजे मग, पुढे जेव्हा तुमची मुलं या धोंड्यांचा अर्थ विचारतील तेव्हा, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की, यहोवाच्या कराराच्या कोशानं यार्देन (जॉर्डन) ओलांडली तेव्हा पाणी वाहायचं थांबलं. हे धोंडे तुम्हाला या चमत्काराची आठवण करुन देतील!’ नदीच्या पात्रात याजक जिथे उभे राहिले होते तिथेही यहोशवा १२ धोंडे उभारतो.

शेवटी कराराचा कोश वाहणाऱ्‍या याजकांना यहोशवा सांगतो: ‘यार्देनमधून (जॉर्डन) बाहेर जा.’ आणि ते गेल्याबरोबर, नदी पुन्हा वाहायला लागते.