व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ४

इस्राएलचा पहिला राजा ते बॅबिलोनमधला बंदिवास

इस्राएलचा पहिला राजा ते बॅबिलोनमधला बंदिवास

शौल इस्राएलाचा पहिला राजा झाला. परंतु यहोवानं त्याचा अव्हेर केला, आणि त्याच्या जागी राजा होण्यासाठी दाविदाला निवडलं: आपल्याला दाविदाबद्दल अनेक गोष्टी कळतात. तरुणपणी तो बलवान गल्याथाशी लढला. त्यानंतर, मत्सरी राजा शौलापासून तो पळाला. मग रूपवती अबीगईलेनं, एक मूर्खपणाची गोष्ट करण्यापासून त्याला रोखलं.

त्यापुढे, इस्राएलाचा राजा म्हणून दाविदाच्या जागी आलेला त्याचा मुलगा शलमोन, याच्याबद्दल आपण खूपशा गोष्टी शिकतो. इस्राएलच्या पहिल्या तीन राजांनी प्रत्येकी ४० वर्षं राज्य केलं. शलमोनाच्या मृत्यूनंतर, इस्राएल दोन राज्यांत विभागलं गेलं, एक उत्तरेचं आणि एक दक्षिणेचं.

अश्‍शुऱ्‍यांच्या हातून नाश होण्यापूर्वी, १० वंशांचं उत्तरेकडचं राज्य २५७ वर्षं टिकलं. मग १३३ वर्षांनी, दक्षिणेच्या दोन वंशांच्या राज्याचाही नाश झाला. या वेळी इस्राएलांना कैद करून बॅबिलोनला नेलं गेलं. तेव्हा, चौथ्या भागात ५१० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतो. त्यात अनेक रोमांचकारी घटना आपल्या नजरेसमोरून सरकतात.

 

या विभागात

कथा ५६

शौल​—इस्राएलचा पहिला राजा

शौलला आधी देवाने निवडलं पण नंतर देवानेच त्याला सोडून दिलं. यावरून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो.

कथा ५७

देव दावीदची निवड करतो

यहोवाने दावीदमध्ये असं काय पाहिलं, जे शमुवेल संदेष्ट्याने पाहिलं नव्हतं?

कथा ५८

दावीद आणि गल्याथ

दावीद गल्याथाशी फक्‍त आपल्या गोफणीच्या जोरावर नाही तर त्याहून कितीतरी पटीने शक्‍तिशाली हत्यारासोबत लढला.

कथा ५९

दावीदला का निसटलं पाहिजे

शौल आधी दावीदवर खूप खूश असतो. पण असं काय झालं की ज्यामुळे नंतर त्याला त्याचा इतका हेवा वाटतो की तो त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो?

कथा ६०

अबीगईल आणि दावीद

अबीगईल आपला नवरा मूर्ख असल्याचं सांगते आणि त्यामुळे तात्पुरतं का असेना पण तिच्या नवऱ्‍याचा जीव वाचतो.

कथा ६१

दाविदला राजा करतात

दावीदने ज्या गोष्टी केल्या आणि ज्या गोष्टी करण्यापासून त्याने स्वतःला आवरलं, त्यावरून त्याने दाखवून दिलं की इस्राएलचा राजा बनण्यासाठी तो योग्य आहे.

कथा ६२

दाविदाच्या घराण्यात संकटं

दावीदच्या फक्‍त एका चुकीमुळे त्याला आणि त्याच्या घराण्याला बरीच वर्षं संकटं सोसावी लागतात.

कथा ६३

बद्धिमान राजा शलमोन

तो खरंच मुलाचे तलवारीने दोन भाग करणार आहे का?

कथा ६४

शलमोन मंदिर बांधतो

अतिशय बुद्धिमान असूनही, शलमोनला मूर्खपणाचं आणि चुकीचं काम करण्यासाठी भाग पाडलं जातं.

कथा ६५

राज्य विभागलं जातं

यराबाम राज्य करायला सुरवात करताच लोकांना देवाचे नियम मोडायला प्रवृत्त करतो.

कथा ६६

ईजबेल​—एक दुष्ट राणी

तिला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे

कथा ६७

यहोशाफाट यहोवावर भरवसा ठेवतो

एक सैन्य आपल्या पुढे कोणतंही हत्यार सोबत न घेतलेल्या गायकांना घेऊन लढाईला का जाईल बरं?

कथा ६८

पुन्हा जिवंत झालेले दोन मुलगे

मेलेल्या एका व्यक्‍तीला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं का? हो असं घडलंय आधी!

कथा ६९

मुलगी बलवान माणसाला मदत करते

ती बोलायचं धाडस करते आणि त्यामुळे एक चमत्कार घडतो.

कथा ७०

योना व मोठा मासा

यहोवा जे सांगतो ते करण्याबद्दल योनाला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो.

कथा ७१

देव परादीसाचं वचन देतो

पहिलं परादीस खूप लहान होतं. पण हे संपूर्ण पृथ्वीवर असेल

कथा ७२

देव हिज्कीया राजाला मदत करतो

एक स्वर्गदूत फक्‍त एका रात्रीत १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना ठार मारतो.

कथा ७३

इस्राएलचा शेवटला गुणी राजा

वयानं लहान असूनही योशीया राजाने धाडस दाखवलं.

कथा ७४

एक निडर माणूस

आपण अजून संदेष्टा बनण्याइतकं मोठं झालेलो नाही, असं यिर्मयाला वाटतं. पण देवाला माहीत आहे की तो संदेष्ट्याचं काम करू शकतो.

कथा ७५

बॅबिलोनमध्ये चार मुलगे

आपल्या कुटुंबापासून वेगळं असूनही ते यशस्वी होतात.

कथा ७६

जेरूसलेमचा नाश होतो

देवाने इस्राएली लोकांचे शत्रू असणाऱ्‍या बॅबिलोनी लोकांना जेरूसलेमचा नाश का करू दिला?