व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६७

यहोशाफाट यहोवावर भरवसा ठेवतो

यहोशाफाट यहोवावर भरवसा ठेवतो

हे लोक कोण आहेत आणि ते काय करताहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ते लढाईला जाताहेत. आणि ती पुढची माणसं गाताहेत. पण तुम्ही विचाराल: ‘या गायकांच्यापाशी लढायला तरवारी आणि भाले का नाहीत?’ चला पाहू या.

यहोशाफाट हा इस्राएलच्या दोन वंशांच्या राज्याचा राजा आहे. तो, उत्तरेच्या १० वंशांचा राजा अहाब आणि ईजबेलीच्या काळीच हयात असतो. पण यहोशाफाट चांगला राजा आहे. त्याचे वडील आसा देखील चांगले होते. त्यामुळे दक्षिणेच्या दोन वंशांच्या राज्यातल्या लोकांना अनेक वर्षं सुख-समाधान मिळतं.

पण आता लोकांना भीती वाटण्यासारखं काहीतरी घडतं. जासूद यहोशाफाटाला खबर देतात: ‘मवाब, अम्मोन आणि सेईर पहाड या देशांचं एक मोठं सैन्य तुझ्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.’ यहोवाची मदत मिळवण्यासाठी अनेक इस्राएल लोक जेरूसलेममध्ये गोळा होतात. ते मंदिराला जातात आणि तिथे यहोशाफाट प्रार्थना करतो: ‘हे यहोवा, आमच्या देवा, काय करावं ते आम्हाला सुचत नाही. या मोठ्या सैन्यापुढे आम्ही हतबल आहोत. मदतीसाठी आमचं लक्ष तुझ्याकडे लागलं आहे.’

यहोवा ते ऐकतो आणि त्याच्या एका दासाकडून लोकांना सांगतो: ‘लढाई तुमची नव्हे, देवाची आहे. तुम्हाला लढण्याची गरज पडणार नाही. केवळ पाहत राहा आणि यहोवा तुम्हाला कसा वाचवतो, ते बघा.’

तेव्हा, दुसऱ्‍या दिवशी सकाळी यहोशाफाट लोकांना सांगतो: ‘यहोवावर भरवसा ठेवा!’ मग तो आपल्या सैनिकांच्या पुढे गायक ठेवतो, व कूच करताना ते यहोवाच्या स्तुतीची गाणी गातात. ते लढाईसाठी जवळ येतात तो काय होतं, माहीत आहे? यहोवा शत्रूच्या सैनिकांना आपसात लढायला लावतो. इस्राएली येतात तो, शत्रूचा एकूण एक सैनिक मेलेला असतो!

यहोवावर भरवसा ठेवण्यात यहोशाफाट शहाणा नव्हता का? देवावर भरवसा ठेवला तर आपणही शहाणे ठरू.