व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७२

देव हिज्कीया राजाला मदत करतो

देव हिज्कीया राजाला मदत करतो

हा माणूस यहोवाला प्रार्थना का करत आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? त्यानं यहोवाच्या वेदीसमोर ही पत्रं का ठेवली आहेत? हा माणूस आहे हिज्कीया. तो इस्राएलच्या दक्षिणेच्या दोन वंशांचा राजा आहे. आणि तो मोठ्या संकटात आहे. का बरं?

कारण अश्‍शूरी सैन्यानं या पूर्वीच उत्तरेच्या १० वंशांचा नाश केला आहे. ते लोक अतिशय दुष्ट झाल्यानं यहोवानं असं होऊ दिलं. नि आता, अश्‍शूरी सैन्य दोन वंशांच्या राज्याशी लढायला आलं आहे.

अश्‍शूरच्या राजानं हिज्कीया राजाला नुकतीच पत्रं पाठवली आहेत. तीच ही पत्रं हिज्कीयानं देवापुढे ठेवली आहेत. त्या पत्रात यहोवाचा उपहास केला आहे आणि हिज्कीयाला शरण यायला सांगितलं आहे. त्याच कारणानं हिज्कीया प्रार्थना करतो: ‘हे यहोवा, आम्हाला अश्‍शूरच्या राजापासून वाचव. म्हणजे मग सर्व राष्ट्रांना कळेल की, एकटा तूच देव आहेस.’ यहोवा हिज्कीयाची प्रार्थना ऐकेल का?

हिज्कीया चांगला राजा आहे. तो, इस्राएलच्या १० वंशांच्या राज्याचे दुष्ट राजे किंवा त्याचे दुष्ट वडील अहाज यांच्यासारखा नाही. यहोवाचे सगळे नियम पाळण्याची खबरदारी हिज्कीयानं घेतली असल्यामुळे, हिज्कीयाची प्रार्थना संपल्यावर यशया संदेष्टा त्याला यहोवाचा असा निरोप पाठवतो: ‘अश्‍शूरचा राजा जेरूसलेममध्ये येणार नाही. त्याचा कोणी सैनिक त्याच्या जवळपास फिरकणारही नाही. ते या शहराकडे एकही बाण मारणार नाहीत.’

या पानावरच्या चित्राकडे पहा. हे सर्व मेलेले सैनिक कोण आहेत, ते तुम्हाला माहीत आहे का? ते अश्‍शूरी आहेत. यहोवानं त्याचा स्वर्गदूत पाठवला आणि त्यानं एका रात्रीत १,८५,००० सैनिक मारले. त्यामुळे हार मानून अश्‍शूरचा राजा माघारी जातो.

दोन वंशांचं राज्य वाचतं आणि लोकांना काही दिवस शांती मिळते. पण हिज्कीया मरण पावल्यावर, त्याचा मुलगा मनश्‍शे राजा होतो. मनश्‍शे आणि त्याच्या मागे त्याचा मुलगा आमोन, हे दोघे फार दुष्ट राजे आहेत. त्यामुळे देश परत गुन्हे आणि जाच-जुलुमानं भरतो. आमोन राजाचा त्याच्याच दासांनी खून केल्यावर, त्याचा मुलगा योशीया याला दोन वंशांच्या राज्याचा राजा केलं जातं.