व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६

येशूचा जन्म ते त्याचा मृत्यू

येशूचा जन्म ते त्याचा मृत्यू

गब्रीएल देवदूताला मरीया नावाच्या सुशील कुमारीकडे पाठवण्यात आलं. त्यानं तिला सांगितलं की, तिला एक मूल होईल. ते युगानुयुगं राजा म्हणून शासन करील. त्या मुलाचा, येशूचा, जन्म एका गोठ्यात झाला. तिथे मेंढपाळांनी त्याला भेट दिली. पुढे, एका ताऱ्‍यानं पूर्वेकडच्या लोकांना त्या लहानग्या मुलाकडे आणलं. तो तारा त्यांना कोणी दाखवला; आणि येशूला ठार करण्याच्या प्रयत्नातून तो कसा वाचला, हे आपल्याला कळतं.

त्यानंतर, येशू १२ वर्षांचा असताना, मंदिरात गुरुजनांशी बोलत असलेला आपल्याला आढळतो. पुढे अठरा वर्षांनी येशूचा बाप्तिस्मा झाला, आणि मग देवानं त्याला पृथ्वीवर ज्याकरता पाठवलं होतं, त्या प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामाला त्यानं सुरवात केली. या कामात त्याला मदत करण्यासाठी येशूनं १२ माणसं निवडली आणि त्यांना आपले प्रेषित केले.

येशूनं अनेक चमत्कारही केले. फक्‍त काही लहान मासे आणि थोड्याशा भाकऱ्‍यांनी त्यानं हजारो लोकांना जेवू घातलं. त्यानं आजाऱ्‍यांना बरं केलं आणि मेलेल्यांना उठवलं. अखेरीस, येशूच्या जीवनाच्या शेवटल्या दिवशी त्याच्या बाबतीत झालेल्या अनेक गोष्टी आणि त्याला कसं मारलं, हे आपल्याला कळतं. येशूनं सुमारे साडेतीन वर्षं प्रचार केला. तेव्हा, भाग ६ मध्ये, ३४ वर्षांहून थोड्या अधिक काळाचा अंतर्भाव होतो.

 

या विभागात

कथा ८४

देवदूत मरीयेला भेट देतो

तो देवाकडून एक संदेश आणतो: मरीयेला एक मुलगा होईल आणि तो सदासर्वकाळ राज्य करेल.

कथा ८५

गोठ्यात येशूचा जन्म

भविष्यात जो राजा म्हणून राज करेल, त्याचा जन्म गोठ्यात कसा होऊ शकतो?

कथा ८६

ताऱ्‍यानं वाट दाखवलेली माणसं

येशूला शोधण्यासाठी मागी लोकांना कोणी मदत केली? ऐकून कदाचित थक्क व्हाल.

कथा ८७

मंदिरात छोटा येशू

मंदिरातले शिक्षक येशूचं बोलणं ऐकून थक्क होतात. का बरं?

कथा ८८

योहान येशूला बाप्तिस्मा देतो

योहान पापी लोकांना बाप्तिस्मा द्यायचा, पण त्यांच्यासारखं येशूने कधीही पाप केलं नव्हतं. तरीही योहानने त्याला बाप्तिस्मा का दिला?

कथा ८९

येशू मंदिराची सफाई करतो

देवावर प्रेम असल्यामुळे येशूने हे पाऊल उचललं.

कथा ९०

स्त्री सोबत विहिरीपाशी

येशू देत असलेलं पाणी प्यायल्यावर तिला कधीच तहान लागणार नव्हती याचा काय अर्थ होतो?

कथा ९१

येशू डोंगरावर शिकवतो

येशूने दिलेल्या डोंगरावरच्या उपदेशातून भरपूर शिका.

कथा ९२

येशू मेलेल्यांना उठवतो

देवाच्या मदतीने येशू याईरच्या मुलीला फक्‍त ‘ऊठ!’ म्हणतो आणि तिचं पुनरूत्थान होतं.

कथा ९३

येशू अनेक लोकांना जेवू घालतो

चमत्कार करून हजारो लोकांना जेवण देऊन, येशूने कोणती महत्त्वाची गोष्ट सिद्ध केली?

कथा ९४

तो लहान मुलांवर प्रेम करतो

येशू त्याच्या प्रेषितांना सांगतो की आपण मुलांकडून बरंच काही शिकू शकतो.

कथा ९५

येशूची शिकवण्याची पद्धत

येशू सहसा उदाहरणं देऊन शिकवायचा. दयाळू शोमरोनी माणसाची गोष्ट ही येशूने वापरलेल्या बऱ्‍याच उदाहरणांपैकी एक आहे

कथा ९६

येशू आजाऱ्‍यांना बरे करतो

येशूने चमत्कार का केले?

कथा ९७

येशू राजाच्या रूपात येतो

मोठा लोकसमुदाय येशूचं स्वागत करतो, पण यावर सगळेच खूश नाहीत.

कथा ९८

जैतुनांच्या डोंगरावर

येशू आपल्या चार प्रेषितांना भविष्यात घडणाऱ्‍या अशा घटनांबद्दल सांगतो ज्या आज आपल्या दिवसात पूर्ण होत आहेत.

कथा ९९

माडीवरच्या खोलीत

येशू आपल्या शिष्यांना दर वर्षी या खास भोजनाचा विधी पाळायला का सांगतो?

कथा १००

बागेत येशू

यहूदा येशूचं चुंबन घेऊन त्याचा विश्‍वासघात का करतो?

कथा १०१

येशू मारला जातो

वधस्तंभावर खिळलेला असताना येशूने नंदनवनाचं अभिवचन दिलं.