व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९१

येशू डोंगरावर शिकवतो

येशू डोंगरावर शिकवतो

इथे बसलेला येशू पाहा. गालीलातल्या एका डोंगरावर, या सगळ्या लोकांना तो शिकवतो आहे. त्याच्या अगदी जवळ बसलेले त्याचे शिष्य आहेत. प्रेषित होण्यासाठी, त्यांच्यातल्या १२ जणांना त्यानं निवडलं आहे. हे प्रेषित, येशूचे खास शिष्य आहेत. त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत का?

शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया. मग याकोब व योहान हे भाऊही आहेत. आणखी एका प्रेषिताचं नाव याकोब आणि दुसऱ्‍या एकाचं नावही शिमोन आहे. दोघा प्रेषितांची नावं यहूदा आहेत. एक आहे यहूदा इस्कार्योत, आणि दुसऱ्‍या यहूदाला तद्दय देखील म्हणतात. त्याशिवाय फिलिप्प, नथनेल (याला बर्थलमयही म्हणतात), आणि मत्तय व थोमा हे आहेत.

शोमरोनाहून परत आल्यानंतर, येशू पहिल्यांदाच प्रचार करू लागला: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.’ ते राज्य म्हणजे काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ते देवाचं एक खरोखरचं राज्य आहे. येशू त्याचा राजा आहे. तो स्वर्गातून राज्य करील आणि पृथ्वीवर शांती आणील. देवाचं राज्य सर्व पृथ्वीला एक सुंदर परादीस करून टाकील.

इथे येशू लोकांना त्या राज्याबद्दल शिकवत आहे. तो समजावून सांगतो आहे: ‘तुम्ही अशा रितीनं प्रार्थना केली पाहिजे: आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझ्या नावाचा आदर होवो. तुझं राज्य येवो. जशी स्वर्गात, तशी पृथ्वीवर तुझी इच्छा होवो.’ अनेक लोक हिला ‘प्रभूची प्रार्थना’ म्हणतात. इतर काही ‘आमच्या पित्या’ म्हणतात. ती संपूर्ण प्रार्थना तुम्हाला म्हणता येते का?

लोकांनी एकमेकाला कसं वागवावं, हेही येशू त्यांना शिकवत आहे. तो म्हणतो: ‘इतरांनी आपल्यासाठी जे करावं असं तुम्हाला वाटतं, ते तुम्ही त्यांच्यासाठी करा.’ इतरांनी तुम्हाला प्रेमळपणानं वागवलं, तर तुम्हाला ते आवडत नाही का? म्हणून येशू म्हणत आहे की, आपण देखील इतरांना प्रेमानं वागवावं. परादीसरूपी पृथ्वीवर प्रत्येक जण असं करील तेव्हा, ते किती आनंददायक असेल!