व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९८

जैतुनांच्या डोंगरावर

जैतुनांच्या डोंगरावर

जैतूनांच्या डोंगरावर, हा येशू आहे. त्याच्या सोबतचे चार जण त्याचे प्रेषित आहेत. अंद्रिया व पेत्र हे भाऊ, तसेच याकोब आणि योहान हे दोघे भाऊ आहेत. दूरवर तुम्हाला दिसणारे, जेरूसलेममधले देवाचे मंदिर आहे.

येशूला, शिंगरावर बसून जेरूसलेममध्ये आल्याला दोन दिवस झाले आहेत. हा मंगळवार आहे. त्या दिवशी आधी येशू मंदिरात होता. तिथे, येशूला जिवे मारण्यासाठी, त्याला पकडण्याचा प्रयत्न याजकांनी केला. पण लोकांना येशू आवडत असल्यामुळे, त्याला धरायची त्यांना भीती वाटली.

येशूनं त्या धार्मिक नेत्यांना, ‘सापांनो आणि सापाच्या पिलांनो!’ म्हटलं. मग येशू म्हणाला की, त्यांच्या सर्व दुष्टपणासाठी देव त्यांना शिक्षा करील. त्यानंतर, येशू जैतूनांच्या डोंगरावर आला, आणि मग हे चार प्रेषित त्याला प्रश्‍न विचारायला लागले. ते येशूला काय विचारताहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

हे प्रेषित भविष्यातल्या गोष्टींबद्दल विचारत आहेत. येशू पृथ्वीवरच्या सर्व दुष्टपणाचा शेवट करील, हे त्यांना ठाऊक आहे. ते कधी होईल हे जाणण्याची त्यांची इच्छा आहे. राजा म्हणून राज्य करायला येशू परत कधी येईल?

येशू परत येईल तेव्हा, त्याचे अनुयायी त्याला पाहू शकणार नाहीत, हे त्याला माहीत आहे. कारण, तो स्वर्गात असेल; आणि तो तिथे असलेला त्यांना दिसू शकणार नाही. त्यामुळे, येशू स्वर्गात राजा म्हणून शासन करत असताना, पृथ्वीवर घडणाऱ्‍या गोष्टीतल्या काही, तो आपल्या प्रेषितांना सांगतो. त्यातल्या काही गोष्टी कोणत्या?

येशू म्हणतो की, मोठ्या लढाया होतील, अनेक लोक आजारी व उपाशी असतील, गुन्हे वाढतील आणि मोठे भूकंप होतील. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार सगळीकडे होईल. आपल्या काळात, या गोष्टी होत असलेल्या आपण पाहिल्या आहेत का? होय! आणि म्हणूनच, येशू आता स्वर्गात राज्य करत असल्याबद्दल आपल्याला खात्री वाटू शकते. लवकरच तो पृथ्वीवरच्या सर्व दुष्टपणाचा शेवट करील.