व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७

येशूचं पुनरुत्थान ते पौलाचा तुरुंगवास

येशूचं पुनरुत्थान ते पौलाचा तुरुंगवास

येशूच्या मृत्यूनंतर तिसऱ्‍या दिवशी, त्याला उठवलं गेलं. त्या दिवशी वेगवेगळ्या पाच वेळा, त्यानं आपल्या अनुयायांना दर्शन दिलं. ४० दिवस येशू त्यांना दर्शन देत राहिला; आणि मग, त्याच्या काही शिष्यांच्या देखत, स्वर्गाला गेला. त्यानंतर दहा दिवसांनी, जेरूसलेममध्ये वाट पाहात असलेल्या येशूच्या अनुयायांवर देवानं पवित्र आत्मा ओतला.

पुढे, देवाच्या शत्रूंनी प्रेषितांना तुरुंगात टाकवलं, पण एका देवदूतानं त्यांना मोकळं केलं. विरोधकांनी दगडमार करून स्तेफन नावाच्या अनुयायाचा वध केला. परंतु, आपला खास सेवक होण्यासाठी, या विरोधकांपैकी एकाला येशूनं कसं निवडलं, हे आपल्याला कळतं. तोच प्रेषित पौल झाला. मग येशूच्या मृत्यू नंतर साडेतीन वर्षांनी, यहूदेत्तर कर्नेल्य आणि त्याच्या परिवाराला उपदेश करण्यासाठी देवानं प्रेषित पेत्राला पाठवलं.

त्यानंतर सुमारे १३ वर्षांनी, पौलानं आपल्या पहिल्या प्रचार यात्रेची सुरुवात केली. दुसऱ्‍या यात्रेच्या वेळी तीमथ्य पौलाला येऊन मिळाला. देवाच्या सेवेत, पौल आणि त्याच्या सहयात्रींवर आलेल्या अनेक रोमांचकारी प्रसंगांबद्दल, आपण शिकतो. शेवटी, पौलाला रोममध्ये तुरुंगात टाकलं गेलं. दोन वर्षांनी तो सुटला; पण पुन्हा कैद झाला व मारला गेला. भाग ७ मधल्या घटना जवळपास ३२ वर्षांच्या काळात घडल्या.

 

या विभागात

कथा १०२

येशू जिवंत आहे

स्वर्गदूताने कबरेच्या दारावर लावलेला मोठा दगड बाजूला केला तेव्हा पहारा देणाऱ्‍या सैनिकांना जे दिसलं त्यामुळे त्यांना धक्का बसला.

कथा १०३

बंद खोलीच्या आत

येशूचं पुनरूत्थान झाल्यावर शिष्यांनी त्याला का नाही ओळखलं?

कथा १०४

येशू स्वर्गाला परत जातो

स्वर्गात जाण्याआधी येशू आपल्या शिष्यांना एक शेवटची आज्ञा देतो.

कथा १०५

जेरूसलेममध्ये वाट पाहणं

पेंटेकॉस्टच्या दिवशी येशू आपल्या शिष्यांवर देवाचा पवित्र आत्मा का ओततो?

कथा १०६

तुरुंगातून सुटका

यहुदी धार्मिक नेते प्रेषितांचं काम थांबवण्यासाठी त्यांना तुरूंगात टाकतात. देव हे घडू देतो, कारण यामागे देवाचा एक उद्देश होता.

कथा १०७

स्तेफनाला दगडमार होतो

स्तेफनला मारलं जातं तेव्हा तो प्रार्थनेत एक आश्‍चर्यकारक विनंती करतो.

कथा १०८

दमास्कसच्या वाटेवर

स्वर्गातून पडणाऱ्‍या प्रकाशामुळे आणि आवाजामुळे शौलचं जीवनच बदलून जातं.

कथा १०९

पेत्र कर्नेल्याला भेट देतो

देव कोणत्याही राष्ट्राला किंवा जातीला दुसऱ्‍या राष्ट्र किंवा जातीपेक्षा उच्च समजतो का?

कथा ११०

तीमथ्य–पौलाचा नवा मदतनीस

तीमथ्यने पौलसोबत मिळून प्रचार करण्यासाठी आपलं घर सोडलं.

कथा १११

झोपी गेलेला मुलगा

पौलने पहिलं भाषण दिलं तेव्हा युतुखला झोप लागली पण दुसऱ्‍या भाषणाला नाही. या दोन्ही भाषणांच्या मधल्या काळात जे घडलं ते चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं.

कथा ११२

जहाज फुटून बेटाला लागणं

जगण्याची कोणतीच आशा दिसत नसताना देव स्वर्गदूताद्वारे एक संदेश देतो आणि पौलला धीर मिळतो.

कथा ११३

रोममध्ये पौल

तुरूंगात असतानाही पौल, प्रेषित म्हणून त्याच्या जबाबदाऱ्‍या कशा पार पाडू शकला?