व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८

बायबलची पूर्वसूचना खरी ठरते

बायबलची पूर्वसूचना खरी ठरते

बायबल केवळ मागे काय होऊन गेलं याचंच खरं विवरण देतं असं नाही तर, भविष्यातही काय होईल ते सांगतं. मानव भविष्य सांगू शकत नाहीत. म्हणूनच, बायबल देवाकडून असल्याचं आपल्याला ठाऊक आहे. भविष्याबद्दल बायबल काय म्हणतं?

ते देवाच्या एका मोठ्या युद्धाबद्दल सांगतं. या युद्धात देव सर्व दुष्टपणा आणि दुष्ट लोकांना काढून टाकून पृथ्वीला स्वच्छ करील. पण त्याची सेवा करणाऱ्‍यांचं, तो रक्षण करील. देवाच्या सेवकांना शांती व आनंद मिळेल; आणि ते पुन्हा आजारी किंवा मृत्युमुखी पडणार नाहीत, याची काळजी देवाचा राजा, येशू ख्रिस्त, घेईल.

देव पृथ्वीवर एक नवं परादीस बनवील, या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो, नाही का? पण त्या परादीसमध्ये राहायचं असेल तर, आपल्याला काही तरी करावं लागेल. त्याची सेवा करणाऱ्‍यांसाठी, देवानं योजलेल्या अद्‌भुत गोष्टींचा आस्वाद घ्यायला आपण काय केलं पाहिजे, ते बायबलमधल्या शेवटच्या कथेत आपण शिकतो. म्हणून भाग ८ वाचा, आणि बायबल भविष्याबद्दल काय सांगतं, याचा शोध घ्या.

 

या विभागात

कथा ११४

सर्व दुष्टपणाचा शेवट

हर्मगिदोनचं युद्ध लढण्यासाठी देवाने येशूला स्वर्गातलं सैन्य घेऊन का पाठवलं?

कथा ११५

पृथ्वीवर एक नवं परादीस

एके काळी लोक पृथ्वीवरच्या परादीसमध्ये राहीले होते, आणि भविष्यातही राहतील.

कथा ११६

आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल

यहोवा आणि येशूबद्दल माहिती घेणंच पुरेसं आहे का? नाही. मग आपण आणखी काय करणं गरजेचं आहे?