व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११४

सर्व दुष्टपणाचा शेवट

सर्व दुष्टपणाचा शेवट

इथे तुम्हाला काय दिसतं? बरोबर, पांढऱ्‍या घोड्यांवरचं एक सैन्य. पण ते कोठून येताहेत, याची नोंद घ्या. ते घोडे भरधाव स्वर्गातून ढगांवर उतरताहेत! स्वर्गात खरोखरच घोडे असतात का?

छे, हे काही खरे घोडे नाहीत. आपल्याला हे माहीत आहे, कारण घोडे काही ढगावर पळू शकत नाहीत, होय ना? पण बायबल तर स्वर्गातल्या घोड्यांच्याबद्दल सांगतं. ते का, हे तुम्हाला ठाऊक आहे?

कारण एका काळी लढाईत घोड्यांचा खूप उपयोग केला जात होता. तेव्हा, देवाला पृथ्वीवरच्या लोकांशी लढाई करायची आहे, हे दाखवण्यासाठी, स्वर्गातून घोड्यांवर बसून खाली येणाऱ्‍या माणसांबद्दल बायबल सांगतं. या लढाईच्या जागेला काय म्हणतात, ते तुम्हाला माहीत आहे का? हर्मगिदोन. पृथ्वीवरच्या सर्व दुष्टपणाचा नाश करण्यासाठी ती लढाई आहे.

हर्मगिदोन नावाच्या ठिकाणी ही लढाई करण्यात, येशू पुढाकार घेईल. आपल्या शासनाचा राजा होण्यासाठी यहोवानं येशूची निवड केली होती, याची आठवण करा. त्याच कारणानं येशूनं राजाचा मुकुट घातला आहे. आणि तरवार सूचित करते की, तो देवाच्या सगळ्या शत्रूंना मारून टाकील. देव सर्व दुष्ट लोकांना मारून टाकील, या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटावं का?

पाठीमागची १० वी कथा पाहा. तिथे तुम्हाला काय दिसतं? बरोबर, दुष्ट लोकांचा नाश करणारा जलप्रलय. तो कोणी आणला? यहोवा देवानं. आता १५ वी गोष्ट पाहा. तिथे काय होत आहे? यहोवानं पाठवलेल्या आगीनं सदोम आणि गमोराचा नाश होतो आहे.

३३ व्या गोष्टीकडे वळा. इजिप्तमधल्या लोकांच्या घोड्यांचं आणि रथांचं काय होत आहे, पाहा. त्यांना जलसमाधी कोणी दिली? यहोवानं. आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी त्यानं असं केलं. ७६ व्या कथेकडे पाहा. त्यांच्या दुष्टपणामुळे, यहोवानं आपल्या लोकांचा, इस्राएलांचाही नाश होऊ दिला, असं तुम्हाला तिथे दिसेल.

तर मग, पृथ्वीवरच्या एकूण एक दुष्टपणाचा शेवट करण्यासाठी यहोवा त्याचं स्वर्गीय सैन्य पाठवील, या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. पण त्याचा अर्थ काय होईल, याचा केवळ विचार करा! चला, पान उलटा, म्हणजे आपण पाहू.