व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल कथांचं माझं पुस्तक अभ्यासासाठी प्रश्‍न

बायबल कथांचं माझं पुस्तक अभ्यासासाठी प्रश्‍न

कथा १

देव वस्तू घडवू लागतो

  1. १. सगळ्या चांगल्या वस्तू कशा बनल्या आणि तुम्ही एखादे उदाहरण देऊ शकाल का?

  2. २. देवाने सर्वप्रथम काय बनवले?

  3. ३. पहिला देवदूत अगदी खास का होता?

  4. ४. सुरुवातीला पृथ्वी कशी होती त्याचे वर्णन करा. (चित्र पाहा.)

  5. ५. प्राण्यांना व मनुष्यांना पृथ्वीवर राहता यावे म्हणून देवाने काय करायला सुरुवात केली?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यिर्मया १०:१२ वाचा.

    देवाने जी सृष्टी केली त्यातून त्याचे कोणते गुण पाहायला मिळतात? (यश. ४०:२६; रोम. ११:३३)

  2. २. कलस्सैकर १:१५-१७ वाचा.

    सृष्टी करण्यात येशूची कोणती भूमिका होती आणि यामुळे येशूबद्दल आपल्या दृष्टिकोनावर काय परिणाम झाला पाहिजे? (कलस्सै. १:१५-१७)

  3. ३. उत्पत्ति १:१-१० वाचा.

    1. (क) पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली? (उत्प. १:१)

    2. (ख) सृष्टीच्या पहिल्या दिवशी काय घडले? (उत्प. १:३-५)

    3. (ग) सृष्टीच्या दुसऱ्‍या दिवशी काय घडले त्याचे वर्णन करा. (उत्प. १:७, ८)

कथा २

एक सुंदर बाग

  1. १. देवाने आपल्यासाठी पृथ्वी कशी तयार केली?

  2. २. देवाने बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे वर्णन करा. (चित्र पाहा.)

  3. ३. एदेनची बाग खास का होती?

  4. ४. संपूर्ण पृथ्वी कशासारखी व्हावी अशी देवाची इच्छा होती?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति १:११-२५ वाचा.

    1. (क) सृष्टीच्या तिसऱ्‍या दिवशी देवाने काय बनवले? (उत्प. १:१२)

    2. (ख) सृष्टीच्या चौथ्या दिवशी काय घडले? (उत्प. १:१६)

    3. (ग) पाचव्या व सहाव्या दिवशी देवाने कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची सृष्टी केली? (उत्प. १:२०, २१, २५)

  2. २. उत्पत्ति २:८, ९ वाचा.

    कोणती दोन विशिष्ट झाडे देवाने बागेत लावली होती आणि ती कशाला सूचित करत होती?

कथा ३

पहिले स्त्री-पुरुष

  1. १. दुसऱ्‍या कथेतील चित्रापेक्षा तिसऱ्‍या कथेतील चित्र वेगळे कसे आहे?

  2. २. पहिल्या पुरुषाला कोणी बनवले आणि त्या पुरुषाचे नाव काय होते?

  3. ३. देवाने आदामाला कोणते काम दिले?

  4. ४. देवाने आदामाला गाढ झोप का आणली?

  5. ५. आदाम आणि हव्वा किती काळ जगू शकत होते आणि त्यांनी काय करावे अशी देवाची इच्छा होती?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. स्तोत्र ८३:१८ वाचा.

    देवाचे नाव काय आहे आणि पृथ्वीवर त्याचा कोणता एकमेव अधिकार आहे? (यिर्म. १६:२१; दानी. ४:१७)

  2. २. उत्पत्ति १:२६-३१ वाचा.

    1. (क) सहाव्या दिवसाच्या शेवटी देवाने कशाची सृष्टी केली आणि ही सृष्टी प्राण्यांपेक्षा वेगळी कशी होती? (उत्प. १:२६)

    2. (ख) यहोवाने मनुष्य व प्राण्यांसाठी कशाची व्यवस्था केली? (उत्प. १:३०)

  3. ३. उत्पत्ति २:७-२५ वाचा.

    1. (क) प्राण्यांना नाव देण्यासाठी आदामाला काय करायचे होते? (उत्प. २:१९)

    2. (ख) लग्न, विभक्‍त होणे आणि घटस्फोट यांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे ते समजण्यास उत्पत्ति २:२४ आपल्याला कशा प्रकारे मदत करते? (मत्त. १९:४-६, ९)

कथा ४

त्यांनी आपलं घर का गमावलं

  1. १. चित्रात दाखवल्याप्रमाणे आदाम आणि हव्वेला काय केले आहे?

  2. २. यहोवाने त्यांना शिक्षा का केली?

  3. ३. एका सापाने हव्वेला काय सांगितले?

  4. ४. सापास बोलायला लावणारा कोण होता?

  5. ५. आदाम आणि हव्वेने नंदनवनातील आपले सुंदर घर कसे गमावले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २:१६, १७ आणि ३:१-१३, २४ वाचा.

    1. (क) सापाने हव्वेला विचारलेल्या प्रश्‍नावरून आपल्याला कसे कळते की तो यहोवाविषयी खोटे बोलत होता? (उत्प. ३:१-५; १ योहा. ५:३)

    2. (ख) हव्वा आपल्यासाठी इशारेवजा उदाहरण कशा प्रकारे आहे? (फिलिप्पै. ४:८; याको. १:१४, १५; १ योहा. २:१६)

    3. (ग) आदाम आणि हव्वा आपल्या कार्याची जबाबदारी स्वीकारण्यास कशा प्रकारे चुकले? (उत्प. ३:१२, १३)

    4. (घ) एदेन बागेच्या पूर्वेस ठेवलेल्या करुबांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाला कशा प्रकारे आपला पाठिंबा दाखवला? (उत्प. ३:२४)

  2. २. प्रकटीकरण १२:९ वाचा.

    मानवजातीला देवाच्या शासनाच्या विरोधात करण्यात सैतानाला कितपत यश मिळाले आहे? (१ योहा. ५:१९)

कथा ५

खडतर जीवनाची सुरुवात होते

  1. १. आदाम आणि हव्वेचे एदेन बागे बाहेरील जीवन कसे होते?

  2. २. आदाम आणि हव्वेला काय होऊ लागले आणि का?

  3. ३. आदाम आणि हव्वेची मुले वृद्ध होऊन मरू का लागली?

  4. ४. आदाम व हव्वेने यहोवाची आज्ञा मानली असती तर त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे जीवन कसे झाले असते?

  5. ५. हव्वेने देवाची अवज्ञा केल्यामुळे तिला कशा प्रकारे दुःख भोगावे लागले?

  6. ६. आदाम आणि हव्वा यांच्या पहिल्या दोन मुलांची नावे काय होती?

  7. ७. चित्रात दिसणारी दुसरी मुले कोण आहेत?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ३:१६-२३ आणि ४:१, २ वाचा.

    1. (क) भूमीवर आलेल्या शापाचा आदामाच्या जीवनावर कसा प्रभाव पडला? (उत्प. ३:१७-१९; रोम. ८:२०, २२)

    2. (ख) मूळ इब्री भाषेत हव्वा या नावाचा “जिवंत” असा अर्थ योग्य का आहे? (उत्प. ३:२०)

    3. (ग) आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतरही यहोवाने त्यांच्यावर कशा प्रकारे कृपा केली? (उत्प. ३:७, २१)

  2. २. प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

    कोणत्या “पहिल्या गोष्टी,” नाहीशा होताना पाहायची तुमची इच्छा आहे?

कथा ६

एक चांगला आणि एक वाईट मुलगा

  1. १. काईन आणि हाबेल काय काम करायचे?

  2. २. काईन आणि हाबेल यहोवासाठी कोणकोणती भेट आणतात?

  3. ३. हाबेलाच्या भेटीवर यहोवा प्रसन्‍न का झाला पण काईनाच्या भेटीवर का झाला नाही?

  4. ४. काईन कशा प्रकारचा मनुष्य आहे आणि यहोवा कशा प्रकारे त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो?

  5. ५. काईन शेतात आपल्या भावासोबत एकांतात असताना काय करतो?

  6. ६. काईनाने आपल्या भावाला ठार मारल्यावर काय घडले ते समजावून सांगा.

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ४:२-२६ वाचा.

    1. (क) काईन ज्या धोकेदायक परिस्थितीत होता त्याचे वर्णन यहोवाने कशा प्रकारे केले? (उत्प. ४:७)

    2. (ख) काईन चांगल्या मनाचा नव्हता हे कशा प्रकारे दिसून आले? (उत्प. ४:९)

    3. (ग) निर्दोष लोकांचा रक्‍तपात करण्याबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे? (उत्प. ४:१०; यश. २६:३१)

  2. २. पहिले योहान ३:११, १२ वाचा.

    1. (क) काईन रागाने का संतापला आणि आज हा आपल्यासाठी एक इशारा का आहे? (उत्प. ४:४, ५; नीति. १४:३०; २८:२२)

    2. (ख) आपल्या कुटुंबातील सर्व लोक यहोवाचा विरोध करत असले, तरी आपण आपली एकनिष्ठा टिकवून ठेवू शकतो, हे बायबलमध्ये कसे दाखवण्यात आले आहे? (स्तो. २७:१०; मत्त. १०:२१, २२)

  3. ३. योहान ११:२५ वाचा.

    नीतिमान राहिल्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे अशांसाठी यहोवा काय खात्री देतो? (योहा. ५:२४)

कथा ७

एक धाडसी माणूस

  1. १. हनोख निराळा कसा होता?

  2. २. हनोखाच्या दिवसांतील लोक वाईट गोष्टी का करत होते?

  3. ३. लोक कोणत्या वाईट गोष्टी करत होते? (चित्र पाहा.)

  4. ४. हनोखाला धाडसी असण्याची गरज का होती?

  5. ५. त्या काळी लोक किती वर्ष जगायचे, पण हनोख किती वर्ष जगला?

  6. ६. हनोख मरण पावल्यानंतर काय घडले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ५:२१-२४,२७ वाचा.

    1. (क) हनोखाचा यहोवासोबत कशा प्रकारचा नातेसेबंध होता? (उत्प. ५:२४)

    2. (ख) बायबलनुसार, सर्वांपेक्षा जास्त काळ जगलेला माणूस कोण आहे आणि तो मरण पावला तेव्हा तो किती वर्षांचा होता? (उत्प. ५:२७)

  2. २. उत्पत्ति ६:५ वाचा.

    हनोखाच्या मृत्यूनंतर पृथ्वीवर परिस्थिती किती वाईट झाली होती आणि आपल्या काळातील परिस्थिती तशीच कशी आहे? (२ तीम. ३:१३)

  3. ३. इब्री लोकांस ११:५ वाचा.

    हनोखाचा कोणता गुण “देवाला संतोषवित असे” आणि त्याचा परिणाम काय झाला? (उत्प. ५:२२)

  4. ४. यहूदा १४, १५ वाचा.

    लवकरच होणाऱ्‍या हर्मगिदोनाच्या लढाईबद्दल लोकांना इशारा देण्याचे काम करताना आजच्या काळातील ख्रिस्ती कशा प्रकारे हनोखप्रमाणे साहस दाखवू शकतात? (२ तीम. ४:२; इब्री १३:६)

कथा ८

पृथ्वीवरचे राक्षस

  1. १. काही देवदूतांनी सैतानाचे ऐकले तेव्हा काय झाले?

  2. २. स्वर्गातील काम सोडून काही देवदूत पृथ्वीवर का आले?

  3. ३. देवदूतांनी पृथ्वीवर येऊन स्वतःसाठी मानवी शरीरे धारण करणे चुकीचे का होते?

  4. ४. देवदूतांना झालेली मुले इतर मुलांपेक्षा वेगळी कशी होती?

  5. ५. चित्रात दिसते त्यावरून, देवदूतांची मुले राक्षस बनली तेव्हा त्यांनी काय केले?

  6. ६. हनोखनंतर पृथ्वीवर चांगला माणूस कोण होता, तो देवाला का आवडायचा?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ६:१-८ वाचा.

    आपल्या आचरणाचा यहोवाच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो, हे उत्पत्ति ६:६ या वचनातून आपल्याला कसे कळते? (स्तो. ७८:४०, ४१; नीति. २७:११)

  2. २. यहूदा ६ वाचा.

    नोहाच्या दिवसांत ज्या देवदूतांनी “आपले अधिकारपद” राखले नाही, ते आज आपल्यासाठी उदाहरण कसे ठरले आहेत? (१ करिंथ. ३:५-९; २ पेत्र २:४, ९, १०)

कथा ९

नोहा तारू बांधतो

  1. १. नोहाच्या कुटुंबात किती जण होते आणि त्याच्या तीन मुलांची नावे काय होती?

  2. २. देवाने नोहाला कोणती विलक्षण गोष्ट करण्यास सांगितली आणि का?

  3. ३. नोहाने आपल्या शेजाऱ्‍यांना तारवाबद्दल सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

  4. ४. देवाने नोहाला प्राण्यांबद्दल काय सांगितले?

  5. ५. देवाने तारवाचे दार बंद केल्यावर नोहा आणि त्याचे कुटुंब काय करत राहिले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ६:९-२२ वाचा.

    1. (क) नोहा कशामुळे देवाचा चांगला उपासक ठरला? (उत्प. ६:९, २२)

    2. (ख) हिंसाचाराबद्दल यहोवाला कसे वाटते आणि आपण ज्या प्रकारचे मनोरंजन निवडतो त्यावर याचा प्रभाव कसा पडला पाहिजे? (उत्प. ६:११, १२; स्तो. ११:५)

    3. (ग) यहोवाच्या संघटनेकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते तेव्हा आपण नोहाचे अनुकरण कसे करू शकतो? (उत्प. ६:२२; १ योहा. ५:३)

  2. २. उत्पत्ति ७:१-९ वाचा.

    नोहा एक अपरिपूर्ण मनुष्य असूनही यहोवाने त्याला धार्मिक म्हटले, यामुळे आज आपल्याला कशा प्रकारे उत्तेजन मिळते? (उत्प. ७:१; नीति. १०:१६; यश. २६:७)

कथा १०

जलप्रलय

  1. १. पाऊस पडायला लागल्यानंतर इतर कोणालाच तारवात का जाता आले नाही?

  2. २. किती दिवस व किती रात्र यहोवाने पाऊस पाडला आणि पृथ्वीवर किती पाणी भरले?

  3. ३. पृथ्वीवर सगळीकडे पाणी भरल्यावर तारवाचे काय झाले?

  4. ४. जलप्रलयातून राक्षस वाचले का आणि त्यांच्या वडिलांचे काय झाले?

  5. ५. पाच महिन्यानंतर तारवाचे काय झाले?

  6. ६. नोहाने एका कावळ्याला तारवाच्या बाहेर का सोडले?

  7. ७. पृथ्वीवरील पाणी ओसरल्याचे नोहाला कसे समजले?

  8. ८. नोहा व त्याचे कुटुंब एक वर्षापेक्षा जास्त काळ तारवात राहिल्यानंतर देवाने नोहाला काय सांगितले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ७:१०-२४ वाचा.

    1. (क) या जलप्रलयात कोणाकोणाचा नाश झाला? (उत्प. ७:२३)

    2. (ख) पृथ्वीवरील जलप्रलयाचे पाणी ओसरण्यासाठी किती दिवस लागले? (उत्प. ७:२४)

  2. २. उत्पत्ति ८:१-१७ वाचा.

    पृथ्वीसाठी असलेला यहोवाचा मूळ उद्देश बदलला नाही, हे उत्पत्ति ८:१७ वरून आपल्याला कसे समजते? (उत्प. १:२२)

  3. ३. पहिले पेत्र ३:१९, २० वाचा.

    1. (क) विद्रोही देवदूत स्वर्गात परतले, तेव्हा त्यांना कोणता न्यायदंड मिळाला? (यहू. ६)

    2. (ख) नोहा आणि त्याच्या कुटुंबाच्या वृत्तांतामुळे, आपल्या लोकांना सोडवण्यास यहोवा समर्थ आहे यावरील आपला भरवसा मजबूत कसा होतो? (२ पेत्र २:९)

कथा ११

पहिलं मेघधनुष्य

  1. १. चित्रात दाखवल्याप्रमाणे तारवातून बाहेर आल्यावर नोहाने सर्वप्रथम काय केले?

  2. २. जलप्रलयानंतर देवाने नोहाला व त्याच्या कुटुंबाला कोणती आज्ञा दिली?

  3. ३. देवाने त्यांना कोणते वचन दिले?

  4. ४. जेव्हा आपण मेघधनुष्य पाहतो तेव्हा आपल्याला कशाची आठवण झाली पाहिजे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ८:१८-२२ वाचा.

    1. (क) आज आपण यहोवाला संतुष्ट करणारा “सुवास” कसा अर्पण करू शकतो? (उत्प. ८:२१; इब्री १३:१५, १६)

    2. (ख) मानवाच्या मनाविषयी यहोवाला काय दिसून आले आणि म्हणूनच आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? (उत्प. ८:२१; मत्त. १५:१८, १९)

  2. २. उत्पत्ति ९:९-१७ वाचा.

    1. (क) पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी यहोवाने कोणता करार केला? (उत्प. ९:१०, ११)

    2. (ख) मेघधनुष्याचा करार किती काळपर्यंत अस्तित्वात राहील? (उत्प. ९:१६)

कथा १२

माणसे एक मोठा बुरूज बांधतात

  1. १. निम्रोद कोण होता आणि देवाच्या नजरेत तो कसा होता?

  2. २. चित्रात दाखवल्याप्रमाणे, लोक विटा का बनवत होते?

  3. ३. बुरूज बांधायचे काम यहोवाला का आवडले नाही?

  4. ४. देवाने बुरूज बांधायचे काम कशा प्रकारे थांबवले?

  5. ५. त्या शहराचे नाव काय पडले आणि त्या नावाचा अर्थ काय होतो?

  6. ६. देवाने भाषेचा घोटाळा केल्यावर लोकांचे काय झाले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति १०:१, ८-१० वाचा.

    निम्रोदाचा स्वभाव कशा प्रकारचा होता आणि त्यातून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (नीति. ३:३१)

  2. २. उत्पत्ति ११:१-९ वाचा.

    बुरूज बांधण्यामागे कोणता उद्देश होता आणि या प्रकल्पाला निश्‍चितच यश का मिळणार नव्हते? (उत्प. ११:४; नीति. १६:१८; योहा. ५:४४)

कथा १३

अब्राहाम—देवाचा मित्र

  1. १. ऊर शहरात कशा प्रकारचे लोक राहत होते?

  2. २. चित्रात दिसत असलेला माणूस कोण आहे, तो केव्हा जन्मला आणि तो कोठे राहत होता?

  3. ३. देवाने अब्राहामाला काय करण्यास सांगितले?

  4. ४. अब्राहामाला देवाचा मित्र का म्हटले आहे?

  5. ५. अब्राहाम ऊर सोडून जाताना त्याच्या बरोबर कोण-कोण गेले?

  6. ६. अब्राहाम कनान देशात पोहचल्यावर देवाने त्याला काय सांगितले?

  7. ७. अब्राहाम ९९ वर्षांचा असताना देवाने त्याला कोणते वचन दिले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ११:२७-३२ वाचा.

    1. (क) अब्राहाम आणि लोट यांचे नाते काय होते? (उत्प. ११:२७)

    2. (ख) तेरहाने आपल्या कुटुंबाला कनान देशात नेले असले, तरी वास्तवात मात्र अब्राहामाने या कार्यात पुढाकार घेतला असे आपण का म्हणू शकतो आणि अब्राहामाने असे का केले? (उत्प. ११:३१; प्रे. कृत्ये ७:२-४)

  2. २. उत्पत्ति १२:१-७ वाचा.

    अब्राहाम कनान देशात पोहचल्यावर यहोवाने त्याच्याशी केलेल्या कराराचा कशा प्रकारे विस्तार केला? (उत्प. १२:७)

  3. ३. उत्पत्ति १७:१-८, १५-१७ वाचा.

    1. (क) अब्राम ९९ वर्षांचा असताना त्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आणि का? (उत्प. १७:५)

    2. (ख) भविष्यात साराला कोणते आशीर्वाद मिळतील असे यहोवाने तिला वचन दिले? (उत्प. १७:१५, १६)

  4. ४. उत्पत्ति १८:९-१९ वाचा.

    1. (क) उत्पत्ति १८:१९ मध्ये पित्याच्या कोणत्या जबाबदारींविषयी सांगितले आहे? (अनु. ६:६, ७; इफिस. ६:४)

    2. (ख) यहोवापासून आपण काहीही लपवू शकत नाही, हे साराच्या बाबतीत जे घडले त्यावरून कसे दिसते? (उत्प. १८:१२, १५; स्तो. ४४:२१)

कथा १४

देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो

  1. १. देवाने अब्राहामाला कोणते वचन दिले होते आणि देवाने आपल्या वचनाचे पालन कशा प्रकारे केले?

  2. २. चित्रात दाखवल्याप्रमाणे, देवाने अब्राहामाची परीक्षा कशी घेतली?

  3. ३. देवाने दिलेल्या आज्ञेचे कारण अब्राहामाला कळले नव्हते, तरी त्याने काय केले?

  4. ४. आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी अब्राहामाने सुरा काढला तेव्हा काय घडले?

  5. ५. अब्राहामाचा देवावर किती विश्‍वास होता?

  6. ६. अर्पण करण्याकरता देवाने अब्राहामासाठी कशाची तरतूद केली व कशी?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २१:१-७ वाचा.

    अब्राहामाने आठव्या दिवशी आपल्या मुलाची सुंता का केली? (उत्प. १७:१०-१२; २१:४)

  2. २. उत्पत्ति २२:१-१८ वाचा.

    इसहाकाने आपला पिता अब्राहामाला अधीनता कशी दाखवली आणि भविष्यातील कोणत्या एका अतिमहत्त्वाच्या घटनेचे हे प्रतिबिंब होते? (उत्प. २२:७-९; १ करिंथ. ५:७; फिलिप्पै. २:८, ९)

कथा १५

लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं

  1. १. अब्राहाम आणि लोट वेगळे का झाले?

  2. २. लोटाने सदोम शहरात राहण्याची निवड का केली?

  3. ३. सदोम शहरातील लोक कसे होते?

  4. ४. दोन देवदूतांनी लोटाला कोणता इशारा दिला?

  5. ५. लोटाची बायको मिठाचा खांब का झाली?

  6. ६. लोटाच्या बायकोला जे झाले त्याच्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति १३:५-१३ वाचा.

    आपसातील समस्या सोडवण्यासाठी आपण अब्राहामापासून कोणता धडा शिकू शकतो? (उत्प. १३:८, ९; रोम. १२:१०; फिलिप्पै. २:३, ४)

  2. २. उत्पत्ति १८:२०-३३ वाचा.

    यहोवाने अब्राहामाशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून, यहोवा आणि येशू नीतिमत्त्वाने न्याय करतील याची आपल्याला कशा प्रकारे खात्री पटते? (उत्प. १८:२५, २६; मत्त. २५:३१-३३)

  3. ३. उत्पत्ति १९:१-२९ वाचा.

    1. (क) बायबलमधील या वृत्तांतातून समलैंगिकतेच्या बाबतीत देवाच्या दृष्टिकोनाबद्दल आपल्याला काय दिसते? (उत्प. १९:५, १३; लेवी. २०:१३)

    2. (ख) लोट आणि अब्राहामाने देवाच्या मार्गदर्शनाला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यात आपल्याला कोणता फरक दिसतो आणि यातून आपण काय शिकू शकतो? (उत्प. १९:१५, १६, १९, २०; २२:३)

  4. ४. लूक १७:२८-३२ वाचा.

    भौतिक वस्तुंबद्दल लोटाच्या बायकोची मनोवृत्ती काय होती आणि आपल्यासाठी हा एक इशारा का आहे? (लूक १२:१५; १७:३१, ३२; मत्त. ६:१९-२१, २५)

  5. ५. दुसरे पेत्र २:६-८ वाचा.

    आपल्या सभोवती असलेल्या या जगातील दुष्ट लोकांबद्दल लोटाप्रमाणे आपली मनोवृत्ती देखील काय असली पाहिजे? (यहे. ९:४; १ योहा. २:१५-१७)

कथा १६

इसहाकाला चांगली बायको मिळते

  1. १. चित्रात दिसणारा माणूस व स्त्री कोण आहेत?

  2. २. आपल्या मुलासाठी बायको मिळवण्यास अब्राहामाने काय केले आणि का?

  3. ३. अब्राहामाच्या सेवकाच्या प्रार्थनेचे उत्तर त्याला कसे मिळाले?

  4. ४. इसहाकाशी लग्न करशील का, असे रिबकेला विचारल्यावर तिने काय उत्तर दिले?

  5. ५. इसहाकाला पुन्हा आनंद का झाला?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २४:१-६७ वाचा.

    1. (क) रिबका विहिरीपाशी अब्राहामाच्या सेवकाला भेटली तेव्हा तिने कोणते उत्तम गुण दाखवले? (उत्प. २४:१७-२०; नीति. ३१:१७, ३१)

    2. (ख) अब्राहामाने इसहाकाच्या लग्नासाठी केलेली व्यवस्था आजच्या ख्रिश्‍चनांसाठी कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण आहे? (उत्प. २४:३७, ३८; १ करिंथ. ७:३९; २ करिंथ. ६:१४)

    3. (ग) इसहाकाप्रमाणेच आपणही मनन करण्यासाठी वेळ का काढला पाहिजे? (उत्प. २४:६३; स्तो. ७७:१२; फिलिप्पै. ४:८)

कथा १७

भिन्‍न असलेले जुळे भाऊ

  1. १. एसाव व याकोब कोण होते आणि ते कशा प्रकारे भिन्‍न होते?

  2. २. एसाव आणि याकोब यांचा आजोबा अब्राहाम मरण पावला त्यावेळी ते दोघे किती वर्षांचे होते?

  3. ३. एसावाने काय केल्यामुळे त्याचे आई-वडील अतिशय दुःखी झाले?

  4. ४. एसाव आपला भाऊ याकोब यावर का संतापला?

  5. ५. आपला मुलगा याकोब याला इसहाकाने काय सांगितले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २५:५-११, २०-३४ वाचा.

    1. (क) यहोवाने रिबकेच्या दोन मुलांविषयी काय म्हटले होते? (उत्प. २५:२३)

    2. (ख) याकोब व एसाव यांची ज्येष्ठत्वाबद्दल कशा प्रकारे वेगवेगळी मनोवृत्ती होती? (उत्प. २५:३१-३४)

  2. २. उत्पत्ति २६:३४, ३५;२७:१-४६; आणि २८:१-५ वाचा.

    1. (क) एसावाला आध्यात्मिक गोष्टींची कदर नव्हती हे कशावरून दिसते? (उत्प. २६:३४, ३५; २७:४६)

    2. (ख) यहोवाकडून आशीर्वाद मिळण्यासाठी इसहाकाने याकोबास काय करण्यास सांगितले? (उत्प. २८:१-४)

  3. ३. इब्री लोकांस १२:१६, १७ वाचा.

    पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्‍या लोकांना जे भोगावे लागते ते एसावाच्या उदाहरणावरून कशा प्रकारे दिसते?

कथा १८

याकोब हारानला जातो

  1. १. चित्रात दिसणारी तरुण स्त्री कोण आहे आणि याकोबाने तिच्यासाठी काय केले?

  2. २. राहेलशी लग्न करण्यासाठी याकोब काय करण्यास तयार होता?

  3. ३. याकोबाची राहेलशी लग्नाची वेळ आली तेव्हा लाबानाने काय केले?

  4. ४. राहेलशी लग्न करता यावे यासाठी याकोब काय करण्यास कबूल झाला?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २९:१-३० वाचा.

    1. (क) लाबानाने याकोबाला फसवले तरीपण याकोब त्याच्याशी आदराने कसा वागला आणि यावरून आपण काय शिकू शकतो? (उत्प. २५:२७; २९:२६-२८; मत्त. ५:३७)

    2. (ख) खरे प्रेम आणि प्रेमवेड यातील फरक याकोबाच्या उदाहरणावरून कसा दिसतो? (उत्प. २९:१८, २०, ३०; गीत. ८:६)

    3. (ग) याकोबाच्या कुटुंबाचा भाग बनलेल्या आणि नंतर त्याच्या मुलांना जन्म देणाऱ्‍या चार स्त्रिया कोण होत्या? (उत्प. २९:२३, २४, २८, २९)

कथा १९

याकोबाचं मोठं कुटुंब

  1. १. याकोबाची पहिली पत्नी लेआ हिला झालेल्या सहा मुलांची नावे काय होती?

  2. २. लेआची दासी जिल्पा हिला याकोबापासून झालेल्या दोन मुलांची नावे काय होती?

  3. ३. राहेलची दासी बिल्हा हिला याकोबापासून झालेल्या दोन मुलांची नावे काय होती?

  4. ४. राहेलीला झालेल्या दोन मुलांची नावे काय होती, पण दुसऱ्‍या मुलाला जन्म देताना तिचे काय झाले?

  5. ५. चित्रात दिसते त्यानुसार, याकोबाला किती मुले होती आणि त्यांच्यापासून काय निर्माण झाले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति २९:३२-३५; ३०:१-२६; आणि ३५:१६-१९ वाचा.

    याकोबाच्या १२ मुलांच्या बाबतीत दिसते त्यावरून, प्राचीन काळात इब्री मुलांची नावे कशी ठेवली जात असत?

  2. २. उत्पत्ति ३७:३५ वाचा.

    बायबलमध्ये फक्‍त दीनाच्या नावाचा उल्लेख असला, तरी याकोबाला आणखीही मुली होत्या हे आपण कशावरून म्हणू शकतो? (उत्प. ३७:३४, ३५)

कथा २०

दीना संकटात पडते

  1. १. कनानमधील लोकांशी आपल्या मुला-मुलींनी लग्न करू नये अशी अब्राहाम व इसहाक यांची इच्छा का होती?

  2. २. याकोबाच्या मुलीने कनानमधील मुलींशी मैत्री करावी हे याकोबाला पसंत होते का?

  3. ३. दीनाकडे पाहणारा चित्रातील माणूस कोण आहे आणि त्याने कोणती वाईट गोष्ट केली?

  4. ४. दीनाच्या बाबतीत जे घडले ते शिमोन व लेवी या तिच्या भावांच्या कानी गेल्यावर त्यांनी काय केले?

  5. ५. शिमोन व लेवी यांनी जे केले ते याकोबाला आवडले का?

  6. ६. कुटुंबावर अनर्थ कशामुळे ओढवला?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ३४:१-३१ वाचा.

    1. (क) दीना कनान देशातील तिच्या मैत्रिणींना भेटायला एकदाच गेली होती का? समजावून सांगा. (उत्प. ३४:१, NW)

    2. (ख) आपले कौमार्य गमावण्यात स्वतः दीनादेखील जबाबदार होती, हे कशावरून म्हणता येते? (गलती. ६:७)

    3. (ग) दीनाचे इशारेवजा उदाहरण आजचे तरुण लोक गंभीरतेने घेत असल्याचे कसे दाखवू शकतात? (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३; १ योहा. ५:१९)

कथा २१

योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात

  1. १. योसेफाचे भाऊ त्याचा हेवा का करत होते आणि त्यांनी काय केले?

  2. २. योसेफाचे भाऊ त्याला काय करणार होते, पण रऊबेन काय म्हणतो?

  3. ३. इश्‍माएली व्यापारी तेथे येतात तेव्हा काय घडते?

  4. ४. योसेफ मेला आहे असा आपल्या वडिलांनी विचार करावा म्हणून योसेफाचे भाऊ काय करतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ३७:१-३५ वाचा.

    1. (क) मंडळीत कोणी पाप करत असेल तर त्याबाबतीत शांत राहण्याऐवजी वडिलांना कळवण्याद्वारे ख्रिस्ती लोक, योसेफाचे अनुकरण कसे करू शकतात? (उत्प. ३७:२; लेवी. ५:१; १ करिंथ. १:११)

    2. (ख) योसेफाचे भाऊ त्याच्याशी कपटाने का वागले? (उत्प. ३७:११, १८; नीति. २७:४; याको. ३:१४-१६)

    3. (ग) शोक करणे स्वाभाविक आहे, हे याकोबाच्या कोणत्या कृत्यावरून दिसते? (उत्प. ३७:३५)

कथा २२

योसेफाला तुरुंगात टाकलं जातं

  1. १. योसेफ किती वर्षांचा असताना त्याला इजिप्तला नेतात आणि तो तिथे गेल्यावर काय घडते?

  2. २. योसेफाला तुरुंगात का टाकण्यात येते?

  3. ३. तुरुंगात योसेफाला कोणती जबाबदारी दिली जाते?

  4. ४. तुरुंगात असताना, फारोचा प्यालेबरदार व आचारी यांच्यासाठी योसेफ काय करतो?

  5. ५. प्यालेबरदार तुरुंगातून सुटल्यानंतर काय घडते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ३९:१-२३ वाचा.

    योसेफाच्या दिवसांत व्यभिचार हे पाप असल्याचे सांगण्यासाठी देवाचे लिखित नियम नव्हते, तरीपण कोणत्या गोष्टीने योसेफाला पोटीफराच्या बायकोपासून दूर पळून जाण्यास प्रेरित केले? (उत्प. २:२४; २०:३; ३९:९)

  2. २. उत्पत्ति ४०:१-२३ वाचा.

    1. (क) प्यालेबरदाराने पाहिलेल्या स्वप्नाचे आणि यहोवाने योसेफाला सांगितलेल्या स्वप्नाच्या अर्थाचे थोडक्यात वर्णन करा. (उत्प. ४०:९-१३)

    2. (ख) आचाऱ्‍याला कोणते स्वप्न पडले होते आणि त्याचा अर्थ काय होता? (उत्प. ४०:१६-१९)

    3. (ग) विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाने योसेफाच्या मनोवृत्तीचे आज कशा प्रकारे अनुकरण केले आहे? (उत्प. ४०:८; स्तो. ३६:९; योहा. १७:१७; प्रे. कृत्ये १७:२, ३)

    4. (घ) वाढदिवस साजरा करण्याबद्दल ख्रिश्‍चनांच्या दृष्टिकोनावर उत्पत्ति ४०:२०, २२ ही वचने कशा प्रकारे प्रकाश टाकतात? (उप. ७:१; मार्क ६:२१-२८)

कथा २३

फारोची स्वप्नं

  1. १. एका रात्री फारोला काय झाले?

  2. २. शेवटी एकदाची प्यालेबरदाराला योसेफाची आठवण का होते?

  3. ३. चित्रात दाखवल्याप्रमाणे, फारो कोणती दोन स्वप्ने पाहतो?

  4. ४. योसेफ स्वप्नांचा काय अर्थ सांगतो?

  5. ५. योसेफ फारोच्या खालोखाल सर्वात महत्त्वाचा मनुष्य कसा बनतो?

  6. ६. योसेफाचे भाऊ इजिप्तला का येतात आणि ते त्याला का ओळखत नाहीत?

  7. ७. योसेफाला कोणत्या स्वप्नाची आठवण होते आणि त्यामुळे त्याच्या ध्यानात काय येते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ४१:१-५७ वाचा.

    1. (क) योसेफाने कशा प्रकारे सर्व श्रेय यहोवाला दिले आणि आज ख्रिस्ती त्याचे अनुकरण कसे करू शकतात? (उत्प. ४१:१६, २५, २८; मत्त. ५:१६; १ पेत्र २:१२)

    2. (ख) इजिप्तमधील सुकाळाची वर्षे आज यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक स्थितीला आणि दुष्काळाची वर्षे आज ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांच्या आध्यात्मिक स्थितीला कशा प्रकारे दर्शवतात? (उत्प. ४१:२९, ३०; आमो. ८:११, १२)

  2. २. उत्पत्ति ४२:१-८ आणि ५०:२० वाचा.

    एखाद्या देशात पदावर असलेल्या व्यक्‍तीचा आदर व सम्मान करण्यासाठी त्याला दंडवत करण्याची रीत असेल, तर यहोवाच्या उपासकांनी असे करणे चूक आहे का? (उत्प. ४२:६)

कथा २४

योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो

  1. १. योसेफ त्याच्या भावांवर हेर असल्याचा दोष का लावतो?

  2. २. याकोब आपला धाकटा मुलगा बन्यामिन याला इजिप्तला का जाऊ देतो?

  3. ३. योसेफाचा चांदीचा प्याला बन्यामिनाच्या थैलीत कसा पोहचतो?

  4. ४. बन्यामिनाला सोडवण्यासाठी यहूदा काय करण्यास तयार होतो?

  5. ५. योसेफाचे भाऊ बदलले आहेत हे कशावरून दिसते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ४२:९-३८ वाचा.

    उत्पत्ति ४२:१८ मध्ये योसेफाने जे म्हटले आहे ते, आज यहोवाच्या संघटनेत जबाबदारीच्या पदावर असलेल्यांसाठी कशा प्रकारे एक उत्तम स्मरणटिपण आहे? (नहे. ५:१५; २ करिंथ. ७:१, २)

  2. २. उत्पत्ति ४३:१-३४ वाचा.

    1. (क) रऊबेन ज्येष्ठपुत्र असला तरी यहूदा त्याच्या भावांच्या वतीने बोलला हे कशावरून कळते? (उत्प. ४३:३, ८, ९; ४४:१४, १८; १ इति. ५:२)

    2. (ख) योसेफाने आपल्या भावांची परीक्षा कशी घेतली व का? (उत्प. ४३:३३, ३४)

  3. ३. उत्पत्ति ४४:१-३४ वाचा.

    1. (क) आपल्या भावांपासून स्वतःची ओळख लपवण्यासाठी योसेफाने कोणती युक्‍ती रचली? (उत्प. ४४:५, १५; लेवी. १९:२६)

    2. (ख) योसेफाच्या भावांनी त्यांच्या मनात योसेफाबद्दल आधीसारखी द्वेष भावना नाही हे कसे दाखवले? (उत्प. ४४:१३, ३३, ३४)

कथा २५

याकोबाचं कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं

  1. १. आपण कोण आहोत हे जेव्हा योसेफ आपल्या भावांना सांगतो तेव्हा काय होते?

  2. २. योसेफ आपल्या भावांना प्रेमळपणे काय समजावून सांगतो?

  3. ३. योसेफाच्या भावांबद्दल ऐकल्यावर फारो काय म्हणतो?

  4. ४. इजिप्तला स्थलांतर करतेवेळी याकोबाचे कुटुंब किती मोठे होते?

  5. ५. याकोबाच्या कुटुंबाला काय म्हणत आणि का?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. उत्पत्ति ४५:१-२८ वाचा.

    आपल्या सेवकांना इजा पोहचवण्यासाठी करण्यात आलेल्या योजना यहोवा चांगल्यात बदलतो, हे बायबलमधील योसेफाच्या वृत्तांतातून कसे दिसते? (उत्प. ४५:५-८; यश. ८:१०; फिलिप्पै. १:१२-१४)

  2. २. उत्पत्ति ४६:१-२७ वाचा.

    याकोब इजिप्तला जात असताना यहोवाने त्याला कशाची पुन्हा खात्री दिली? (उत्प. ४६:१-४)

कथा २६

ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो

  1. १. ईयोब कोण होता?

  2. २. सैतानाने काय करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळाले का?

  3. ३. काय करण्याची परवानगी यहोवाने सैतानाला दिली आणि का?

  4. ४. ‘देवाला शाप द्या आणि मरूण जा’ असे ईयोबाची बायको त्याला का म्हणाली? (चित्र पाहा.)

  5. ५. दुसऱ्‍या चित्रात तुम्हाला दिसते त्याप्रमाणे देवाने ईयोबाला कोणते आशीर्वाद दिले आणि का?

  6. ६. ईयोबाप्रमाणे आपणही यहोवाशी प्रामाणिक राहिलो तर आपल्यालाही कोणते आशीर्वाद मिळतील?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. ईयोब १:१-२२ वाचा.

    आज ख्रिस्ती कशा रीतीने ईयोबाचे अनुकरण करू शकतात? (ईयो. १:१; फिलिप्पै. २:१५; २ पेत्र ३:१४)

  2. २. ईयोब २:१-२३ वाचा.

    सैतानाकडून आलेल्या छळाला ईयोबाने व त्याच्या पत्नीने कशा प्रकारे वेगवेगळ्या रीतीने प्रतिसाद दिला? (ईयो. २:९, १०; नीति. १९:३; मीखा ७:७; मला. ३:१४)

  3. ३. ईयोब ४२:१०-१७ वाचा.

    1. (क) विश्‍वासूपणे जीवन जगल्यामुळे ईयोबाला व येशूला मिळालेल्या आशीर्वादांमध्ये कोणती समानता आहे? (ईयो. ४२:१२; फिलिप्पै. २:९-११)

    2. (ख) देवाशी प्रामाणिक राहिल्याने ईयोबाला जे आशीर्वाद मिळाले त्यातून आपल्याला काय प्रोत्साहन मिळते? (ईयो. ४२:१०, १२; इब्री ६:१०; याको. १:२-४, १२; ५:११)

कथा २७

एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो

  1. १. चित्रात, चाबुक घेऊन असलेला माणूस कोण आहे आणि तो कोणाला मारत आहे?

  2. २. योसेफाच्या मरणानंतर, इस्राएल लोकांचे काय झाले?

  3. ३. इजिप्शियन लोक इस्राएली लोकांना का भिऊ लागले?

  4. ४. इस्राएली स्त्रियांना बाळंतपणात मदत करणाऱ्‍या बायकांना फारोनं कोणती आज्ञा दिली?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम १:६-२२ वाचा.

    1. (क) यहोवाने अब्राहामाला दिलेले वचन पूर्ण करण्यास कशी सुरुवात केली? (निर्ग. १:७; उत्प. १२:२; प्रे. कृत्ये ७:१७)

    2. (ख) इब्री सुइणींनी, जीवनाच्या पवित्रतेला आदर कसा दाखवला? (निर्ग. १:१७; उत्प. ९:६)

    3. (ग) यहोवाशी विश्‍वासू असल्यामुळे इब्री सुइणींना कोणते आशीर्वाद मिळाले? (निर्ग. १:२०, २१; नीति. १९:१७)

    4. (घ) अब्राहामाला वचन दिलेल्या वंशाविषयीचा यहोवाचा उद्देश उधळून लावण्याकरता सैतानाने कोणता प्रयत्न केला? (निर्ग. १:२२; मत्त. २:१६)

कथा २८

तान्हा मोशे कसा वाचला

  1. १. चित्रात दिसणारा तान्हा मुलगा कोण आहे आणि त्याने कोणाचे बोट धरले आहे?

  2. २. मोशे मारला जाऊ नये म्हणून त्याच्या आईने काय केले?

  3. ३. चित्रात दिसणारी लहान मुलगी कोण आहे आणि तिने काय केले?

  4. ४. जेव्हा फारोच्या मुलीला तान्हे बाळ सापडते तेव्हा मिर्याम तिला काय सुचवते?

  5. ५. मोशेच्या आईला राजकन्या काय म्हणते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम २:१-१० वाचा.

    मोशेच्या बालपणी त्याला कशाचे शिक्षण देण्याची संधी त्याच्या आईजवळ होती आणि आजचे आई-वडील यावरून काय शिकू शकतात? (निर्ग. २:९, १०; अनु. ६:६-९; नीति; २२:६; इफिस. ६:४; २ तीम. ३:१५)

कथा २९

मोशे का पळून गेला

  1. १. मोशे लहानाचा मोठा कोठे झाला पण त्याला त्याच्या आई-वडिलांबद्दल काय माहीत होते?

  2. २. मोशे ४० वर्षांचा असताना त्याने काय केले?

  3. ३. भांडत असलेल्या एका इस्राएली माणसाला मोशेने काय म्हटले आणि त्या माणसाने काय उत्तर दिले?

  4. ४. मोशे इजिप्तमधून का पळून गेला?

  5. ५. मोशे कोठे पळून गेला आणि तिथे तो कोणाला भेटला?

  6. ६. इजिप्तमधून पळून गेल्यावर ४० वर्षे मोशे काय करत होता?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम २:११-२५ वाचा.

    मोशेला कित्येक वर्षांपर्यंत इजिप्शियनांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळूनही त्याने यहोवाप्रती आणि त्याच्या लोकांप्रती प्रामाणिक असल्याचे कसे दाखवले? (निर्ग. २:११, १२; इब्री ११:२४)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ७:२२-२९ वाचा.

    इस्राएली लोकांना इजिप्शियनांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी मोशेने स्वतः जे प्रयत्न केले त्यातून आपण काय शिकू शकतो? (प्रे. कृत्ये ७:२३-२५; १ पेत्र ५:६, १०)

कथा ३०

जळणारं झुडूप

  1. १. चित्रात दिसणाऱ्‍या पर्वताचे नाव काय आहे?

  2. २. मोशे आपल्या मेंढरांना घेऊन पर्वताकडे गेला तेव्हा त्याने पाहिलेल्या अजब गोष्टीचे वर्णन करा.

  3. ३. जळणाऱ्‍या झुडपातून काय आवाज आला आणि तो आवाज कोणाचा होता?

  4. ४. माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी मी तुझा उपयोग करणार आहे, असे जेव्हा देवाने मोशेला सांगितले तेव्हा मोशेने काय उत्तर दिले?

  5. ५. तुला कोणी पाठवले, असे जर लोकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे असे देवाने मोशेला सांगितले?

  6. ६. देवानेच आपल्याला पाठवले आहे हे मोशे कसे शाबीत करून दाखवणार होता?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम ३:१-२२ वाचा.

    एखादी ईश्‍वरशासित नेमणूक पूर्ण करण्यास आपण अयोग्य आहोत असे आपल्याला वाटत असल्यास, यहोवा आपली मदत करेल, हा भरवसा आपल्याला मोशेच्या अनुभवावरून कसा मिळतो? (निर्ग. ३:११, १३; २ करिंथ. ३:५, ६)

  2. २. निर्गम ४:१-२० वाचा.

    1. (क) मोशेने मिद्यानात घालवलेल्या ४० वर्षांत त्याच्या मनोवृत्तीत कोणते बदल घडून आले आणि मंडळीतील विशेषाधिकार मिळण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत ते यातून कोणता धडा शिकू शकतात? (निर्ग. २:११, १२; ४:१०, १३; मीखा ६:८; १ तीम. ३:१, ६, १०)

    2. (ख) यहोवाकडून त्याच्या संघटनेद्वारे जरी आपल्याला ताडन मिळाले, तरी मोशेचे उदाहरण लक्षात ठेवून आपण कशाविषयी भरवसा बाळगू शकतो? (निर्ग. ४:१२-१४; स्तो. १०३:१४; इब्री १२:४-११)

कथा ३१

मोशे व अहरोन फारोला भेटतात

  1. १. मोशे व अहरोन यांनी दाखवलेल्या चमत्कारांचा इस्राएली लोकांवर काय परिणाम झाला?

  2. २. मोशे व अहरोन यांनी फारोला काय सांगितले आणि फारोने त्यांना काय उत्तर दिले?

  3. ३. चित्रात दाखवल्याप्रमाणे, अहरोनाने आपली काठी खाली टाकल्यावर काय घडले?

  4. ४. यहोवाने फारोला कशा रीतीने धडा शिकवला आणि फारोची प्रतिक्रिया काय होती?

  5. ५. दहाव्या पीडेनंतर काय घडले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम ४:२७-३१ आणि ५:१-२३ वाचा.

    फारोने म्हटले, ‘मी परमेश्‍वराला जाणत नाही,’ तेव्हा त्याचा अर्थ काय होता? (निर्ग. ५:२; १ शमु. २:१२; रोम. १:२१)

  2. २. निर्गम ६:१-१३, २६:३० वाचा.

    1. (क) यहोवा कोणत्या अर्थाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांस ज्ञात नव्हता? (निर्ग. ३:१३, १४; ६:३; उत्प. १२:८)

    2. (ख) आपल्यावर सोपवलेले काम करण्यास आपण अपात्र आहोत असे मोशेला वाटत होते तरीही यहोवाने त्याचा उपयोग करून घेतला या माहितीने आपल्याला कसे वाटते? (निर्ग. ६:१२, ३०; लूक २१:१३-१५)

  3. ३. निर्गम ७:१-१३ वाचा.

    1. (क) मोशे आणि अहरोन यांनी हिमतीने यहोवाचे न्यायदंड फारोला सुनावून देवाच्या आजच्या सेवकांपुढे कोणता आदर्श मांडला? (निर्ग. ७:२, ३, ६; प्रे. कृत्ये ४:२९-३१)

    2. (ख) यहोवाने तो इजिप्तच्या दैवतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे कसे दाखवले? (निर्ग. ७:१२; १ इति. २९:१२)

कथा ३२

दहा पीडा

  1. १. येथे दाखवलेल्या चित्रांचा उपयोग करून, यहोवाने इजिप्तवर आणलेल्या पहिल्या तीन पीडांचे वर्णन करा.

  2. २. पहिल्या तीन पीडा आणि त्यानंतरच्या पीडा यांत काय फरक होता?

  3. ३. चौथी, पाचवी व सहावी पीडा कोणती होती?

  4. ४. सातव्या, आठव्या व नवव्या पीडेचे वर्णन करा.

  5. ५. दहावी पीडा येण्याअगोदर यहोवाने इस्राएली लोकांना काय सांगितले होते?

  6. ६. दहावी पीडा कोणती होती आणि या पीडेनंतर काय घडले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम ७:१९–८:२३ वाचा.

    1. (क) यहोवाने पहिल्या दोन पीडा आणल्या तेव्हा इजिप्तच्या जादूगारांनी देखील तसेच केले, तरी तिसऱ्‍या पीडेनंतर त्यांना काय मानावे लागले? (निर्ग. ८:१८, १९; मत्त. १२:२४-२८)

    2. (ख) यहोवा आपल्या लोकांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, हे चौथ्या पीडेने कसे सिद्ध झाले आणि या जाणीवेमुळे भाकीत करण्यात आलेल्या ‘मोठ्या संकटाला’ तोंड देताना देवाच्या लोकांना कसे वाटेल? (निर्ग. ८:२२, २३; प्रकटी. ७:१३, १४; २ करिंथ. १६:९)

  2. २. निर्गम ८:२४; ९:३, ६, १०, ११, १४, १६, २३-२५ आणि १०:१३-१५, २१-२३ वाचा.

    1. (क) फारो आणि मंत्रतंत्र करणारे जादूगार यांनी कोणत्या दोन गटांना चित्रित केले तसेच आज हे दोन गट काय करण्यास असमर्थ आहेत? (निर्ग. ८:१०, १८, १९; ९:१४)

    2. (ख) यहोवाने सैतानाला आतापर्यंत का राहू दिले हे निर्गम ९:१६ या वचनावरून आपल्याला कसे समजते? (रोम. ९:२१, २२)

  3. ३. निर्गम १२:२१-३२ वाचा.

    वल्हांडणामुळे कित्येक लोकांचा बचाव कसा शक्य झाला आणि वल्हांडण काय सूचित करतो? (निर्ग. १२:२१-२३; योहा. १:२९; रोम. ५:१८, १९, २१; १ करिंथ. ५:७)

कथा ३३

तांबडा समुद्र ओलांडणं

  1. १. स्त्रिया आणि मुले यांच्याखेरीज किती इस्राएली पुरुषांनी इजिप्त सोडले आणि त्यांच्याबरोबर आणखी कोण गेले?

  2. २. इस्राएली लोकांना जाऊ दिल्यावर फारोला कसे वाटले आणि त्याने काय केले?

  3. ३. ईजिप्शियन लोकांनी यहोवाच्या लोकांवर हल्ला करू नये म्हणून यहोवाने काय केले?

  4. ४. मोशेने आपली काठी तांबड्या समुद्रावर उगारली तेव्हा काय घडले आणि इस्राएली लोकांनी काय केले?

  5. ५. ईजिप्शियन लोक इस्राएली लोकांच्या पाठोपाठ समुद्रात धावले तेव्हा काय झाले?

  6. ६. यहोवाने इस्राएली लोकांना वाचवल्याबद्दल ते आनंदी व कृतज्ञ आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम १२:३३-३६ वाचा.

    इस्त्राएल लोकांनी अनेक वर्षे ईजिप्शियन लोकांची जी गुलामगिरी केली त्याचा मोबदला देण्याची कोणती तरतूद यहोवाने केली? (निर्ग. ३:२१, २२; १२:३५, ३६)

  2. २. निर्गम १४:१-३१ वाचा.

    यहोवाच्या लोकांना निर्गम १४:१३, १४ यात नमूद असलेले मोशेचे शब्द येणाऱ्‍या हर्मगिदोनाच्या लढाईतील त्यांच्या भूमिकेविषयी काय सांगतात? (२ इति. २०:१७; स्तो. ९१:८)

  3. ३. निर्गम १५:१-८, २०, २१ वाचा.

    1. (क) यहोवाच्या सेवकांनी त्याची स्तोत्रे का गायिली पाहिजे? (निर्ग. १५:१, २; स्तो. १०५:२, ३; प्रकटी. १५:३, ४)

    2. (ख) तांबड्या समुद्राजवळ यहोवाची स्तुती करण्याच्या बाबतीत मिर्याम आणि इतर स्त्रियांनी आजच्या ख्रिस्ती स्त्रियांसाठी कोणते उदाहरण मांडले? (निर्ग. १५:२०, २१; स्तो. ६८:११)

कथा ३४

नव्या प्रकारचं अन्‍न

  1. १. चित्रात दिसत असल्याप्रमाणे, जमिनीवरून लोक काय उचलत आहेत आणि त्याला काय म्हणतात?

  2. २. मोशे लोकांना मान्‍ना गोळा करण्याबद्दल काय सांगतो?

  3. ३. यहोवा सहाव्या दिवशी लोकांना काय करण्यास सांगतो आणि का?

  4. ४. सातव्या दिवसासाठी मान्‍ना राखून ठेवला जातो तेव्हा यहोवा कोणता चमत्कार करतो?

  5. ५. यहोवा किती वर्षांपर्यंत लोकांना मान्‍ना खाऊ घालतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम १६:१-३६ आणि गणना ११:७-९ वाचा.

    1. (क) ख्रिस्ती मंडळीतील ईश्‍वरशासित नियुक्‍तींविषयी आपल्याला आदर असला पाहिजे हे निर्गम १६:८ या वचनावरून कसे दिसते? (इब्री १३:१७)

    2. (ख) इस्राएली लोक अरण्यात असताना, त्यांनी यहोवावर निर्भर असले पाहिजे याची त्यांना दररोज आठवण कशी करून दिली जात होती? (निर्ग. १६:१४-१६, ३५; अनु. ८:२, ३)

    3. (ग) येशूने मान्न्याचा कोणता लाक्षणिक अर्थ सांगितला आणि ‘स्वर्गातील या भाकरी’ पासून आपल्याला कसा फायदा होतो? (योहा. ६:३१-३५, ४०)

  2. २. यहोशवा ५:१०-१२ वाचा.

    इस्राएली लोकांनी किती वर्षांपर्यंत मान्‍ना खाल्ला, ही त्यांच्यासाठी एक परीक्षा कशी होती आणि आपण या वृत्तांतातून काय शिकू शकतो? (निर्ग. १६:३५; गण. ११:४-६; १ करिंथ. १०:१०, ११)

कथा ३५

यहोवा आपले नियम देतो

  1. १. इजिप्त सोडल्यावर दोन महिन्यांनी इस्राएली लोक कोठे तळ देतात?

  2. २. लोकांनी काय करावे असे यहोवा त्यांना सांगतो आणि ते काय उत्तर देतात?

  3. ३. यहोवा मोशेला दोन दगडी पाट्या का देतो?

  4. ४. दहा आज्ञांव्यतिरिक्‍त आणखी कोणते नियम यहोवा इस्राएली लोकांना देतो?

  5. ५. कोणते दोन नियम सर्वात महत्त्वाचे आहेत असे येशूने सांगितले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम १९:१-२५; २०:१-२१; २४:१२-१८; आणि ३१:१८ वाचा.

    निर्गम १९:८ मधील शब्द आपल्याला, ख्रिस्ती समर्पणात काय काय गोवलेले आहे हे समजण्यास कशा प्रकारे मदत करतात? (मत्त. १६:२४; १ पेत्र ४:१-३)

  2. २. अनुवाद ६:४-६; लेवीय १९:१८; आणि मत्तय २२:३६-४० वाचा.

    ख्रिस्ती लोक देवावर आणि शेजाऱ्‍यांवर आपले प्रेम कसे दाखवतात? (मार्क ६:३४; प्रे. कृत्ये ४:२०; रोम. १५:२)

कथा ३६

सोन्याचं वासरू

  1. १. चित्रात दिल्याप्रमाणे, लोक काय करत आहेत आणि का?

  2. २. यहोवा का रागावतो आणि लोक जे करत आहेत ते पाहून मोशे काय करतो?

  3. ३. मोशे काही पुरुषांना काय करण्यास सांगतो?

  4. ४. या कथेतून आपण कोणता धडा शिकला पाहिजे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम ३२:१-३५ वाचा.

    1. (क) या वृत्तांतातून खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करण्याबाबत यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे कशा प्रकारे दिसते? (निर्ग. ३२:४-६, १०; १ करिंथ. १०:७, ११)

    2. (ख) मनोरंजन, जसे की नाच-गाणे यांची निवड करताना, ख्रिश्‍चनांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? (निर्ग. ३२:१८, १९; इफिस. ५:१५, १६; १ योहा. २:१५-१७)

    3. (ग) नीतिमत्त्वाच्या पक्षाने उभे राहण्यात लेवीय गोत्राने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले? (निर्ग. ३२:२५-२८; स्तो. १८:२५)

कथा ३७

उपासनेसाठी एक मंडप

  1. १. चित्रात जो तंबू दिसतो त्याला काय म्हणतात आणि तो कशासाठी बनवलेला आहे?

  2. २. सहज दुसरीकडे नेता येईल असा तंबू बनवण्यास यहोवाने मोशेला का सांगितले?

  3. ३. तंबूच्या शेवटी असलेल्या लहान खोलीत ठेवलेली पेटी काय आहे आणि त्या पेटीत काय आहे?

  4. ४. महायाजक होण्यासाठी यहोवा कोणाला निवडतो आणि महायाजक काय काम करतो?

  5. ५. तंबूच्या मोठ्या खोलीत असलेल्या तीन वस्तूंची नावे सांगा.

  6. ६. निवासमंडपाच्या अंगणात कोणत्या दोन वस्तू आहेत आणि त्यांचा कशासाठी उपयोग केला जातो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. निर्गम २५:८-४०; २६:१-३७; २७:१-८; आणि २८:१ वाचा.

    “साक्षपटाच्या कोशावरील” करूब कशाला सूचित करतात? (निर्ग. २५:२०, २२; गण. ७:८९; २ राजे १९:१५)

  2. २. निर्गम ३०:१-१०, १७-२१; ३४:१, २; आणि इब्री ९:१-५ वाचा.

    1. (क) निवासमंडपात सेवा करणाऱ्‍या याजकांनी शारीरिक स्वच्छता राखण्याच्या महत्त्वावर यहोवाने भर का दिला आणि याचा आपल्यावर काय प्रभाव पडला पाहिजे? (निर्ग. ३०:१८-२१; ४०:३०, ३१; इब्री १०:२२)

    2. (ख) प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना, निवासमंडप व करार हे केवळ दृष्टांतरूप किंवा छाया आहेत, हे कशा प्रकारे दाखवले? (इब्री ९:१, ९; १०:१)

कथा ३८

बारा हेर

  1. १. चित्रात दिसणारा द्राक्षांचा घड तुम्हाला कसा वाटतो आणि हा घड कोठून आणला आहे?

  2. २. मोशे १२ हेरांना कनान देशात का पाठवतो?

  3. ३. परत आल्यावर दहा हेर मोशेला कोणती माहिती देतात?

  4. ४. दोन हेर यहोवावर भरोसा कसा दाखवतात आणि त्यांची नावे काय आहेत?

  5. ५. यहोवाला संताप का येतो व तो मोशेला काय म्हणतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना १३:१-३३ वाचा.

    1. (क) देश हेरण्यासाठी कोणाला निवडण्यात आले होते आणि त्यांच्यापुढे कोणती उत्तम संधी होती? (गण. १३:२, ३, १८-२०)

    2. (ख) यहोशवा आणि कालेब यांचा दृष्टिकोन इतर हेरांपेक्षा वेगळा का होता आणि आपण यातून काय शिकतो? (गण. १३:२८-३०; मत्त. १७:२०; २ करिंथ. ५:७)

  2. २. गणना १४:१-३८ वाचा.

    1. (क) यहोवाच्या पृथ्वीवरील प्रतिनिधींच्या विरुद्ध कुरकुर करण्याविषयीच्या कोणत्या इशाऱ्‍याकडे आपण लक्ष दिले पाहिजे? (गण. १४:२, ३, २७; मत्त. २५:४०, ४५; १ करिंथ. १०:१०)

    2. (ख) यहोवा त्याच्या प्रत्येक सेवकाच्या हिताकडे जातीने लक्ष देतो, हे गणना १४:२४ यातून कसे दिसते? (१ राजे १९:१८; नीति. १५:३)

कथा ३९

अहरोनाची काठी फुलांनी बहरते

  1. १. मोशे आणि अहरोनाच्या अधिकाराविरुद्ध कोण बंड करतात आणि ते मोशेला काय म्हणतात?

  2. २. कोरह आणि त्याच्या २५० साथीदारांना मोशे काय करण्यास सांगतो?

  3. ३. मोशे लोकांना काय म्हणतो, आणि त्याचे बोलणे संपल्याबरोबर काय घडते?

  4. ४. कोरह आणि त्याच्या २५० साथीदारांचे काय होते?

  5. ५. मरण पावलेल्या लोकांची धुपाटणी घेऊन अहरोनाचा मुलगा एलाजार काय करतो आणि का?

  6. ६. यहोवाने अहरोनाच्या काठीला फुले का आणली? (चित्र पाहा.)

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना १६:१-४९ वाचा.

    1. (क) कोरह आणि त्याच्या साथीदारांनी काय केले आणि असे करणे यहोवाविरुद्ध बंड का होते? (गण. १६:९, १०, १८; लेवी. १०:१, २; नीति. ११:२)

    2. (ख) कोरह आणि २५० ‘सरदारांनी’ कोणता चुकीचा दृष्टिकोन विकसित केला होता? (गण. १६:१-३; नीति. १५:३३; यश. ४९:७)

  2. २. गणना १७:१-११ आणि २६:१० वाचा.

    1. (क) अहरोनाच्या काठीला अंकुर फुटणे हे कशाला सूचित करते आणि यहोवाने ती काठी कोशात ठेवण्यास का सांगितले? (गण. १७:५, ८, १०)

    2. (ख) अहरोनाच्या काठीच्या चिन्हापासून आपण कोणता आवश्‍यक धडा शिकू शकतो? (गण. १७:१०; प्रे. कृत्ये २०:२८; फिलिप्पै. २:१४; इब्री १३:१७)

कथा ४०

मोशे खडकाला मारतो

  1. १. इस्राएली लोक अरण्यात असताना यहोवा कशा प्रकारे त्यांची काळजी घेतो?

  2. २. कादेश येथे तळ देऊन असताना इस्राएली लोक कोणती तक्रार करतात?

  3. ३. यहोवा कशा प्रकारे लोकांना व त्यांच्या जनावरांना पाणी पुरवतो?

  4. ४. चित्रात स्वतःकडे बोट दाखवणारा माणूस कोण आहे आणि तो असे का करत आहे?

  5. ५. यहोवा मोशे आणि अहरोनावर का रागावतो आणि त्यांना कोणती शिक्षा मिळते?

  6. ६. होर पर्वतावर काय होते आणि इस्राएलाचा महायाजक कोण होतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना २०:१-१३, २२-२९ आणि अनुवाद २९:५ वाचा.

    1. (क) यहोवाने अरण्यात इस्राएली लोकांची ज्या प्रकारे काळजी घेतली, त्यावरून आपण काय शिकतो? (अनु. २९:५; मत्त. ६:३१; इब्री १३:५; याको. १:१७)

    2. (ख) मोशे व अहरोन इस्राएली लोकांसमोर यहोवाचे पावित्र्य प्रगट करण्यास चुकले तेव्हा यहोवाला कसे वाटले? (गण. २०:१२; १ करिंथ. १०:१२; प्रकटी. ४:११)

    3. (ग) यहोवाकडून मिळालेल्या ताडणास मोशेने दिलेल्या प्रतिसादावरून आपण काय शिकू शकतो? (गण. १२:३; २०:१२, २७, २८; अनु. ३२:४; इब्री १२:७-११)

कथा ४१

पितळेचा साप

  1. १. चित्रात, खांबाला विळखा घातलेले काय आहे आणि ते तिथे ठेवण्यास यहोवाने मोशेला का सांगितले?

  2. २. देवाने लोकांकरता पुष्कळ काही करूनही ते कृतघ्न कशा प्रकारे बनले आहेत?

  3. ३. लोकांना शिक्षा करण्यासाठी यहोवाने विषारी साप पाठवल्यावर, लोक मोशेला काय म्हणतात?

  4. ४. यहोवाने मोशेला एक पितळेचा साप बनवण्यास का सांगितले?

  5. ५. या कथेतून आपण कोणता धडा शिकू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना २१:४-९ वाचा.

    1. (क) यहोवाने केलेल्या तरतुदींबद्दल इस्राएल लोकांच्या तक्रारीवरून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (गण. २१:५, ६; रोम. २:४)

    2. (ख) नंतरच्या शतकांत, इस्राएलांनी पितळेच्या सापाचा कशा प्रकारे वापर केला आणि हिज्कीया राजाने काय केले? (गण. २१:९; २ राजे १८:१-४)

  2. २. योहान ३:१४, १५ वाचा.

    पितळेच्या सापाला खांबावर ठेवणे, हे येशूच्या खांबावरील मरणाला कशा प्रकारे योग्य रीतीने चित्रित केले? (गलती. ३:१३; १ पेत्र २:२४)

कथा ४२

गाढवी बोलते

  1. १. बालाक कोण आहे आणि तो बलामाला का बोलावतो?

  2. २. बलामाची गाढवी रस्त्यावर का बसते?

  3. ३. गाढवी बलामाला काय म्हणते?

  4. ४. देवदूत बलामाला काय म्हणतो?

  5. ५. बलाम इस्राएलाला शाप देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना २१:२१-३५ वाचा.

    अमोऱ्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग यांना इस्राएल लोक पराभूत का करू शकले? (गण. २१:२१, २३, ३३, ३४)

  2. २. गणना २२:१-४० वाचा.

    इस्राएलांना शाप देण्यामागे बलामाचा हेतू काय होता आणि आपण यातून कोणते धडे घेऊ शकतो? (गण. २२:१६, १७; नीति. ६:१६, १८; २ पेत्र २:१५; यहू. ११)

  3. ३. गणना २३:१-३० वाचा.

    आपण यहोवाचा उपासक आहोत, असे बलाम म्हणत असला तरी त्याच्या कार्यांतून तो उपासक नसल्याचे कसे दिसून आले? (गण. २३:३, ११-१४; १ शमु. १५:२२)

  4. ४. गणना २४:१-२५ वाचा.

    बायबलमधील हा वृत्तांत, यहोवा आपला उद्देश पूर्ण करेल यावरील आपला विश्‍वास कसा वाढवतो? (गण. २४:१०; यश. ५४:१७)

कथा ४३

यहोशवा नेता होतो

  1. १. चित्रात, मोशेसोबत उभी असलेली दोन माणसे कोण आहेत?

  2. २. यहोवा यहोशवाला काय सांगतो?

  3. ३. मोशे नबो पर्वताच्या शिखरावर का चढतो आणि यहोवा त्याला काय म्हणतो?

  4. ४. मोशेचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे वय काय होते?

  5. ५. लोक दुःखी का आहेत, पण आनंद करण्यासाठी त्यांच्याजवळ कोणते कारण आहे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. गणना २७:१२-२३ वाचा.

    यहोवाकडून यहोशवाला कोणती भारी जबाबदारी मिळाली होती आणि आज यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो हे कशातून दिसते? (गण. २७:१५-१९; प्रे. कृत्ये २०:२८; इब्री १३:७)

  2. २. अनुवाद ३:२३-२९ वाचा.

    यहोवाने मोशे आणि अहरोन यांना वचनयुक्‍त देशात जाण्याची परवानगी का दिली नाही आणि यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (अनु. ३:२५-२७; गण. २०:१२, १३)

  3. ३. अनुवाद ३१:१-८, १४-२३ वाचा.

    मोशेने यहोवाकडून मिळालेले ताडण नम्रपणे स्वीकारले हे, इस्राएल लोकांसोबत त्याच्या अखेरच्या बोलण्यातून कसे दिसले? (अनु. ३१:६-८, २३)

  4. ४. अनुवाद ३२:४५-५२ वाचा.

    देवाच्या वचनाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडला पाहिजे? (अनु. ३२:४७; लेवी. १८:५; इब्री ४:१२)

  5. ५. अनुवाद ३४:१-१२ वाचा.

    मोशेने यहोवाला कधीही प्रत्यक्षात पाहिले नव्हते तरीही यहोवाबरोबर असलेल्या त्याच्या जवळीकीबद्दल अनुवाद ३४:१० काय सुचवते? (निर्ग. ३३:११, २०; गण. १२:८)

कथा ४४

राहाब हेरांना लपवते

  1. १. राहाब कोठे राहते?

  2. २. चित्रातील दोन माणसे कोण आहेत आणि ते यरीहोत कशासाठी आले आहेत?

  3. ३. यरीहोचा राजा, राहाबेला काय करण्याची आज्ञा देतो आणि ती काय उत्तर देते?

  4. ४. राहाब त्या दोन माणसांना मदत कशी करते आणि ती त्यांना काय विनंती करते?

  5. ५. ते दोन हेर राहाबेला काय वचन देतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा २:१-२४ वाचा.

    इस्राएल लोक यरीहोवर चालून गेले तेव्हा निर्गम २३:२८ मधील यहोवाने दिलेले वचन कशा प्रकारे पूर्ण झाले? (यहो. २:९-११)

  2. २. इब्री लोकांस ११:३१ वाचा.

    राहाबेच्या उदाहरणावरून, विश्‍वास असणे महत्त्वाचे आहे हे कसे दिसते? (रोम. १:१७; इब्री १०:३९; याको. २:२५)

कथा ४५

जॉर्डन नदी ओलांडणं

  1. १. इस्राएल लोकांना जॉर्डन नदी पार करता यावी म्हणून यहोवा कोणता चमत्कार करतो?

  2. २. जॉर्डन नदी पार करण्यासाठी इस्राएल लोकांनी विश्‍वासाचे कोणते कृत्य केले पाहिजे?

  3. ३. यहोवा नदीच्या पात्रातून १२ मोठे धोंडे घेण्यासाठी यहोशवाला का सांगतो?

  4. ४. याजक जॉर्डन नदीतून बाहेर येतात तेव्हा लगेच काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा ३:१-१७ वाचा.

    1. (क) या वृत्तांतानुसार, यहोवाची मदत व त्याचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काय केले पाहिजे? (यहो. ३:१३, १५; नीति. ३:५; याको. २:२२, २६)

    2. (ख) जॉर्डन नदी पार करून इस्राएल लोक वचनयुक्‍त देशात गेले त्यावेळी नदीची स्थिती कशी होती आणि यामुळे यहोवाच्या नावाचे गौरव कसे झाले? (यहो. ३:१५; ४:१८; स्तो. ६६:५-७)

  2. २. यहोशवा ४:१-१८ वाचा.

    जॉर्डन नदीतून आणलेल्या १२ धोंड्यांची गिलगाल येथे रास करण्यामागे काय उद्देश होता? (यहो. ४:४-७)

कथा ४६

यरीहोचा तट

  1. १. यहोवा लढाऊ माणसांना आणि याजकांना सहा दिवस काय करण्यास सांगतो?

  2. २. सातव्या दिवशी या माणसांना काय करायचे होते?

  3. ३. चित्रात दिसते त्याप्रमाणे यरीहोच्या तटाचे काय होते?

  4. ४. खिडकीत एक लाल दोरी का लटकत आहे?

  5. ५. यहोशवा लढाऊ माणसांना, शहर आणि शहरातील लोक, यांचे काय करायचे म्हणून सांगतो परंतु सोने, रुपे, तांबे आणि लोखंड यांचे काय करण्यास सांगतो?

  6. ६. दोन हेरांना काय करण्यास सांगण्यात येते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा ६:१-२५ वाचा.

    1. (क) इस्राएल लोकांचे सातव्या दिवशी यरीहोभोवती प्रदक्षिणा घालणे हे, या शेवटल्या दिवसांत यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या प्रचार कार्याशी समांतर कसे आहे? (यहो. ६:१५, १६; यश. ६०:२२; मत्त. २४:१४; १ करिंथ. ९:१६)

    2. (ख) यहोशवा ६:२६ मध्ये नमूद असलेली भविष्यवाणी सुमारे ५०० वर्षांनंतर कशा प्रकारे पूर्ण झाली आणि यापासून आपण यहोवाच्या वचनाविषयी काय शिकतो? (१ राजे १६:३४; यश. ५५:११)

कथा ४७

इस्राएलांमध्ये चोर

  1. १. चित्रात, यरीहोतून घेतलेल्या किमती वस्तू लपवणारा मनुष्य कोण आहे आणि त्याला मदत करणारे कोण आहेत?

  2. २. आखान व त्याच्या कुटुंबाने जे केले ते इतके गंभीर का होते?

  3. ३. आय नगराच्या लढाईत इस्राएल लोकांचा पराभव का झाला, असे यहोशवाने विचारल्यावर यहोवा काय म्हणतो?

  4. ४. आखान आणि त्याच्या कुटुंबाला यहोशवाजवळ आणल्यावर त्यांना काय होते?

  5. ५. आखानाला जो न्यायदंड मिळाला त्यावरून आपण कोणता उत्तम धडा शिकू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा ७:१-२६ वाचा.

    1. (क) यहोशवाचा आपल्या निर्माणकर्त्याशी संबंध कसा होता हे त्याच्या प्रार्थनांतून कसे दिसून येते? (यहो. ७:७-९; स्तो. ११९:१४५; १ योहा. ५:१४)

    2. (ख) आखानाच्या उदाहरणातून आपल्याला काय दिसते आणि हा आपल्यासाठी एक इशारा का आहे? (यहो. ७:११, १४, १५; नीति. १५:३; १ तीम. ५:२४; इब्री ४:१३)

  2. २. यहोशवा ८:१-२९ वाचा.

    ख्रिस्ती मंडळीकरता आपली कोणती वैयक्‍तिक जबाबदारी आहे? (यहो. ७:१३; लेवी. ५:१; नीति. २८:१३)

कथा ४८

शहाणे गिबोनकर

  1. १. जवळपासच्या शहरांत असलेल्या कनानी लोकांपेक्षा गिबोनी लोक कसे वेगळे आहेत?

  2. २. चित्रात दाखवल्याप्रमाणे, गिबोनकर काय करतात आणि का?

  3. ३. यहोशवा आणि इस्राएलातील इतर नेते गिबोनकरांना काय वचन देतात परंतु तीन दिवसांनंतर त्यांना काय कळते?

  4. ४. गिबोनकरांनी इस्राएल लोकांसोबत समेट केला आहे असे जेव्हा इतर शहरातील राजे ऐकतात तेव्हा काय घडते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा ९:१-२७ वाचा.

    1. (क) “देशातील सर्व रहिवाश्‍यांचा संहार करावा” असे यहोवाने इस्राएल राष्ट्राला सांगितले होते तरी यहोवाने गिबोनकरांना जीवदान दिले यावरून त्याचे कोणते गुण दिसतात? (यहो. ९:२२, २४ मत्त. ९:१३; प्रे. कृत्ये १०:३४, ३५; २ पेत्र ३:९)

    2. (ख) गिबोनकरांशी केलेल्या कराराला जागण्याद्वारे यहोशवाने आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी एक उत्तम उदाहरण कसे मांडले? (यहो. ९:१८, १९; मत्त. ५:३७; इफिस. ४:२५)

  2. २. यहोशवा १०:१-५ वाचा.

    आज मोठा लोकसमुदाय गिबोनकरांचे अनुकरण कसे करतो आणि त्यामुळे तो कशाचे लक्ष्य बनतो? (यहो. १०:४; जख. ८:२३; मत्त. २५:३५-४०; प्रकटी. १२:१७)

कथा ४९

सूर्य स्थिर होतो

  1. १. चित्रात, यहोशवा काय म्हणत आहे आणि का?

  2. २. यहोशवाला आणि त्याच्या लढाऊ माणसांना यहोवा कशा प्रकारे मदत करतो?

  3. ३. यहोशवा किती शत्रू राजांना हरवतो आणि त्याला या कामासाठी किती वेळ लागतो?

  4. ४. यहोशवा कनान देशाची वाटणी का करतो?

  5. ५. यहोशवा किती वर्षांचा होऊन मरण पावतो आणि त्यानंतर लोकांना काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यहोशवा १०:६-१५ वाचा.

    यहोवाने इस्राएलसाठी सूर्य आणि चंद्राला स्थिर केले या माहितीने आज आपण कोणता भरवसा बाळगू शकतो? (यहो. १०:८, १०, १२, १३; स्तो. १८:३; नीति. १८:१०)

  2. २. यहोशवा १२:७-२४ वाचा.

    खरेतर, कनानच्या ३१ राजांना हरवणारा कोण होता आणि आज हे आपल्यासाठी महत्त्वाचे का आहे? (यहो. १२:७; २४:११-१३; अनु. ३१:८; लूक २१:९, २५-२८)

  3. ३. यहोशवा १४:१-५ वाचा.

    जमिनीची वाटणी इस्राएलच्या गोत्रांमध्ये कशा प्रकारे करण्यात आली आणि यावरून नंदनवनात आपल्याला मिळणार असलेल्या वारशाबद्दल काय सूचित होते? (यहो. १४:२; यश. ६५:२१; यहे. ४७:२१-२३; १ करिंथ. १४:३३)

  4. ४. शास्ते २:८-१३ वाचा.

    इस्राएलातील यहोशवाप्रमाणे, आज धर्मत्यागाला प्रतिबंध करणारे कोण आहेत? (शास्ते २:८, १०, ११; मत्त. २४:४५-४७; २ थेस्सलनी. २:३-६; तीत १:७-९; प्रकटी. १:१; २:१, २)

कथा ५०

दोन शूर स्त्रिया

  1. १. शास्ते कोण आहेत आणि त्यांच्यापैकी काहींची नावे काय आहेत?

  2. २. दबोराला कोणता विशेष हक्क मिळाला आहे आणि त्यात कशाचा समावेश होतो?

  3. ३. राजा याबीन आणि त्याचा सेनापती सीसरा यांच्याकडून इस्राएलवर संकट ओढवते तेव्हा दबोरा, बाराक या शास्त्याला यहोवाचा संदेश काय देते आणि विजयाचे श्रेय कोणाला मिळणार म्हणून ती सांगते?

  4. ४. याएल धाडसी स्त्री असल्याचे कसे दाखवते?

  5. ५. याबीन राजाच्या मृत्यूनंतर काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. शास्ते २:१४-२२ वाचा.

    इस्राएल लोक स्वतःवर यहोवाचा रोश कसा ओढवतात आणि यावरून आपण कोणता धडा शिकतो? (शास्ते २:२०; नीति. ३:१, २; यहे. १८:२१-२३)

  2. २. शास्ते ४:१-२४ वाचा.

    दबोरा आणि याएल यांनी दाखवलेला विश्‍वास व धाडस यापासून आजच्या ख्रिस्ती स्त्रिया कोणते धडे शिकू शकतात? (शास्ते ४:४, ८, ९, १४, २१, २२; नीति. ३१:३०; १ करिंथ. १६:१३)

  3. ३. शास्ते ५:१-३१ वाचा.

    युद्धात विजय मिळाल्यानंतर बाराक आणि दबोरा यांनी गायिलेले गीत, भविष्यात होणाऱ्‍या हर्मगिदोनाच्या युद्धासंबंधात प्रार्थनेच्या रूपात कशा प्रकारे लागू करता येऊ शकते? (शास्ते ५:३, ३१; १ इति. १६:८-१०; प्रकटी. ७:९, १०; १६:१६; १९:१९-२१)

कथा ५१

रूथ आणि नामी

  1. १. नामी मवाब देशात का गेली?

  2. २. रूथ आणि अर्पा कोण आहेत?

  3. ३. आपल्या लोकांकडे परत जा असे नामी, रूथ व अर्पा यांना सांगते तेव्हा त्या काय करतात?

  4. ४. बवाज कोण आहे आणि तो रूथ आणि नामीला कशी मदत करतो?

  5. ५. बवाज व रूथ यांना झालेल्या मुलाचे नाव काय आहे आणि आपण त्याची आठवण का केली पाहिजे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. रूथ १:१-१७ वाचा.

    1. (क) रूथ एकनिष्ठ प्रेमाचे कोणते उद्‌गार काढते? (रूथ १:१६, १७)

    2. (ख) ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ मनात अभिषिक्‍त जनांबद्दल असलेले भाव, रूथच्या मनोवृत्तीतून कसे दिसून येतात? (योहा. १०:१६; जख. ८:२३)

  2. २. रूथ २:१-२३ वाचा.

    आजच्या तरुण स्त्रियांसाठी रूथने चांगले उदाहरण कसे मांडले? (रूथ २:१७, १८; नीति. २३:२२; ३१:१५)

  3. ३. रूथ ३:५-१३ वाचा.

    1. (क) तरुण माणसाशी लग्न करण्याऐवजी रूथने बवाजाशी लग्न करण्याची तयारी दाखवल्यामुळे बवाजाच्या दृष्टीत ती कशी ठरली?

    2. (ख) एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत रूथकडून आपण काय शिकतो? (रूथ ३:१०; १ करिंथ. १३:४, ५)

  4. ४. रूथ ४:७-१७ वाचा.

    आज ख्रिस्ती पुरुष बवाजासारखे कसे होऊ शकतात? (रूथ ४:९, १०; १ तीम. ३:१, १२, १३; ५:८)

कथा ५२

गिदोन आणि त्याची ३०० माणसं

  1. १. इस्राएल लोक मोठ्या संकटात कसे व का पडले आहेत?

  2. २. गिदोनाच्या सैन्यात खूप माणसे आहेत असे यहोवा त्याला का सांगतो?

  3. ३. भीती वाटणाऱ्‍या माणसांना गिदोन घरी जायला सांगतो तेव्हा किती माणसे उरतात?

  4. ४. यहोवा गिदोनाच्या सैन्यात फक्‍त ३०० माणसे ठेवण्यासाठी काय करतो, हे चित्रात पाहून सांगा.

  5. ५. गिदोन आपल्या ३०० माणसांना कशा प्रकारे संघटित करतो आणि इस्राएल लोक ती लढाई कशी जिंकतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. शास्ते ६:३६-४० वाचा.

    1. (क) यहोवाची इच्छा काय आहे याची खात्री गिदोनाने कशी केली?

    2. (ख) यहोवाची इच्छा काय आहे हे आज आपण कशा प्रकारे माहीत करून घेऊ शकतो? (नीति. २:३-६; मत्त. ७:७-११; २ तीम. ३:१६, १७)

  2. २. शास्ते ७:१-२५ वाचा.

    1. (क) बेसावध असणाऱ्‍या माणसांच्या तुलनेत सावध असणाऱ्‍या ३०० माणसांवरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (शास्ते ७:३, ६; रोम. १३:११, १२; इफिस. ५:१५-१७)

    2. (ख) जसे ३०० लोकांनी गिदोनाकडे पाहून त्याचे अनुकरण केले त्याप्रमाणे आपणही महान गिदोन असलेल्या येशू ख्रिस्ताला पाहून त्याचे अनुकरण कसे करतो? (शास्ते ७:१७; मत्त. ११:२९, ३०; २८:१९, २०; १ पेत्र २:२१)

    3. (ग) यहोवाच्या संघटनेत कोठेही सेवा करत असलो तरी त्यात समाधानी असण्यास शास्ते ७:२१ आपल्याला कसे मदत करते? (१ करिंथ. ४:२; १२:१४-१८; याको. ४:१०)

  3. ३. शास्ते ८:१-३ वाचा.

    एखाद्या बंधू अथवा बहिणीसोबत झालेला वाद सोडवण्याच्या बाबतीत, एफ्राईमच्या लोकांशी झालेला वाद गिदोनाने ज्याप्रकारे सोडवला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (नीति. १५:१; मत्त. ५:२३, २४; लूक ९:४८)

कथा ५३

इफ्ताहाचा नवस

  1. १. इफ्ताह कोण आहे आणि तो कोणत्या काळात राहत होता?

  2. २. इफ्ताह यहोवाला कोणता नवस करतो?

  3. ३. अम्मोन्यांवर विजय मिळवून घरी परत आल्यावर इफ्ताह दुःखी का होतो?

  4. ४. इफ्ताहाच्या मुलीला जेव्हा तिच्या वडिलांच्या नवसाविषयी कळते तेव्हा ती काय म्हणते?

  5. ५. इफ्ताहाच्या मुलीवर लोक माया का करतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. शास्ते १०:६-१८ वाचा.

    यहोवाप्रती इस्राएल लोकांच्या अविश्‍वासाच्या अहवालावरून आपण कोणत्या इशाऱ्‍याचे पालन केले पाहिजे? (शास्ते १०:६, १५, १६; रोम. १५:४; प्रकटी. २:१०)

  2. २. शास्ते ११:१-११, २९-४० वाचा.

    1. (क) आपल्याला हे कसे माहीत आहे की इफ्ताह आपल्या मुलीचे “हवन” करण्याबद्दल बोलत होता तेव्हा तो तिला आगीत अर्पण करण्याविषयी बोलत नव्हता? (शास्ते ११:३१; लेवी. १६:२४; अनु. १८:१०, १२)

    2. (ख) इफ्ताहाने कशा प्रकारे आपल्या मुलीला अर्पण केले?

    3. (ग) यहोवाला केलेला नवस फेडण्याच्या बाबतीत इफ्ताहाच्या दृष्टिकोनावरून आपण काय शिकू शकतो? (शास्ते ११:३५, ३९; उप. ५:४, ५; मत्त. १६:२४)

    4. (घ) पूर्ण वेळेची सेवा स्वीकारण्याबद्दल इफ्ताहाच्या मुलीने कशा प्रकारे तरुण ख्रिश्‍चनांपुढे एक उत्तम उदाहरण मांडले आहे? (शास्ते ११:३६; मत्त. ६:३३; फिलिप्पै. ३:८)

कथा ५४

सर्वात बलवान माणूस

  1. १. आतापर्यंतच्या सर्वात बलवान माणसाचे नाव काय आहे आणि त्याला शक्‍ती कोण देतो?

  2. २. चित्रात दाखवल्याप्रमाणे, एकदा शमशोन एका मोठ्या सिंहाला काय करतो?

  3. ३. चित्रात, शमशोन दलीलाला कोणते गुपित सांगत आहे आणि त्यामुळे फिलिस्टीनी लोक त्याला कसे धरतात?

  4. ४. शमशोन मरण पावला त्या दिवशी त्याने ३,००० फिलिस्टीनी शत्रूंना कसे मारून टाकले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. शास्ते १३:१-१४ वाचा.

    मुलांना वाढवण्याच्या बाबतीत मानोहाने व त्याच्या पत्नीने पालकांसाठी एक उत्तम उदाहरण कसे मांडले? (शास्ते १३:८; स्तो. १२७:३; इफिस. ६:४)

  2. २. शास्ते १४:५-९ आणि १५:९-१६ वाचा.

    1. (क) शमशोनाचे सिंहाला ठार मारणे, त्याला ज्या दोरांनी बांधून ठेवण्यात आले होते ते दोर तोडून टाकणे, गाढवाच्या जाभाडाने १,००० लोकांना मारणे या सर्व घटनांवरून, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी काय प्रकट होते?

    2. (ख) आज आपल्याला पवित्र आत्मा कशा प्रकारे मदत करतो? (शास्ते १४:६; १५:१४; जख. ४:६; प्रे. कृत्ये ४:३१)

  3. ३. शास्ते १६:१८-३१ वाचा.

    वाईट सहवासाचा शमशोनावर कसा प्रभाव पडला आणि त्यापासून आपण काय शिकू शकतो? (शास्ते १६:१८, १९; १ करिंथ. १५:३३)

कथा ५५

लहानसा मुलगा यहोवाची सेवा करतो

  1. १. चित्रात दिसणाऱ्‍या लहान मुलाचे नाव काय आहे आणि तेथील इतर जण कोण आहेत?

  2. २. हन्‍ना एकदा यहोवाच्या निवासमंडपात येते तेव्हा ती काय प्रार्थना करते व यहोवा तिच्या प्रार्थनेचे उत्तर कसे देतो?

  3. ३. यहोवाच्या मंडपात सेवा करण्यासाठी शमुवेलाला आणले जाते तेव्हा तो किती वर्षांचा असतो आणि त्याची आई दर वर्षी त्याच्यासाठी काय करते?

  4. ४. एलीच्या मुलांची नावे काय आहेत आणि ते कशा प्रकारचे मनुष्य आहेत?

  5. ५. यहोवा शमुवेलाला कशी हाक मारतो आणि तो त्याला कोणता संदेश देतो?

  6. ६. शमुवेल मोठा झाल्यावर काय काम करतो आणि तो म्हातारा झाल्यावर काय घडते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल १:१-२८ वाचा.

    1. (क) खऱ्‍या उपासनेत पुढाकार घेण्याच्या बाबतीत एलकानाने कुटुंबप्रमुखांपुढे कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे? (१ शमु. १:३, २१; मत्त. ६:३३; फिलिप्पै. १:१०)

    2. (ख) कठीण समस्येचा सामना करण्यासाठी हन्‍नाने जे उदाहरण मांडले त्यातून आपण काय शिकू शकतो? (१ शमु. १:१०, ११; स्तो. ५५:२२; रोम. १२:१२)

  2. २. पहिले शमुवेल २:११-३६ वाचा.

    एलीने कशा प्रकारे आपल्या मुलांना यहोवापेक्षा जास्त मान दिला आणि हा आपल्यासाठी एक इशारा का आहे? (१ शमु. २:२२-२४, २७, २९; अनु. २१:१८-२१; मत्त. १०:३६, ३७)

  3. ३. पहिले शमुवेल ४:१६-१८ वाचा.

    युद्धभूमीतून कोणता चारपदरी दुःखदायक संदेश येतो आणि एलीवर त्या संदेशाचा काय परिणाम झाला?

  4. ४. पहिले शमुवेल ८:४-९ वाचा.

    इस्राएलाने कशा प्रकारे यहोवाला खूप दुःखी केले आणि आज आपण त्याच्या राज्याचे निष्ठेने समर्थन कसे करू शकतो? (१ शमु. ८:५, ७; योहा. १७:१६; याको. ४:४)

कथा ५६

शौल—इस्राएलचा पहिला राजा

  1. १. चित्रात शमुवेल काय करत असल्याचे दिसत आहे आणि का?

  2. २. यहोवाला शौल का आवडला आणि शौल कशा प्रकारचा माणूस आहे?

  3. ३. शौलाच्या मुलाचे नाव काय आहे आणि तो मुलगा काय करतो?

  4. ४. होमबली अथवा भेट अर्पण करण्यासाठी शमुवेलाची वाट पाहण्याऐवजी शौल स्वतःच भेट अर्पण का करतो?

  5. ५. शौलाविषयी असलेल्या अहवालातून आपण कोणते धडे शिकू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल ९:१५-२१ आणि १०:१७-२७ वाचा.

    काही लोक शौलाविषयी अपमानास्पद बोलले तेव्हा उतावळीने त्यांच्याविरूद्ध कार्य न करण्यास त्याच्या नम्र स्वभावामुळे त्याला फायदा कसा झाला? (१ शमु. ९:२१; १०:२१, २२, २७; नीति. १७:२७)

  2. २. पहिले शमुवेल १३:५-१४ वाचा.

    गिलगाल येथे शौलाने कोणते पाप केले होते? (१ शमु. १०:८; १३:८, ९, १३)

  3. ३. पहिले शमुवेल १५:१-३५ वाचा.

    1. (क) अमालेकचा राजा अगाग याच्याबाबतीत शौलाने कोणते गंभीर पाप केले? (१ शमु. १५:२, ३, ८, ९, २२)

    2. (ख) शौलाने स्वतःच्या वागणुकीसंबंधाने सबब देण्याचा व दुसऱ्‍यावर दोष ढकलण्याचा प्रयत्न कसा केला? (१ शमु. १५:२४)

    3. (ग) आपल्याला सल्ला दिला जातो तेव्हा आपण कोणत्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले पाहिजे? (१ शमु. १५:१९-२१; स्तो. १४१:५; नीति. ९:८, ९; ११:२)

कथा ५७

देव दाविदाची निवड करतो

  1. १. चित्रातील मुलाचे नाव काय आहे आणि तो मोठा धाडसी आहे हे आपल्याला कशावरून समजते?

  2. २. दावीद कोठे राहतो आणि त्याच्या वडिलांचे व आजोबांचे नाव काय आहे?

  3. ३. यहोवा, शमुवेलाला बेथलेहेमात इशायच्या घरी जाण्यास का सांगतो?

  4. ४. इशाय आपल्या सात मुलांना शमुवेलापुढे आणतो तेव्हा काय होते?

  5. ५. दाविदाला शमुवेलापुढे आणले जाते तेव्हा यहोवा शमुवेलाला काय सांगतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल १७:३४, ३५ वाचा.

    या घटनांतून दाविदाचे धाडस व यहोवावर त्याला असलेला भरवसा ठळकपणे कसा दिसून येतो? (१ शमु. १७:३७)

  2. २. पहिले शमुवेल १६:१-१४ वाचा.

    1. (क) पहिले शमुवेल १६:७ यातील यहोवाचे शब्द आपल्याला, निष्पक्ष राहण्यास व लोकांचे बाहेरील रूप पाहून पूर्वग्रह न बाळगण्यास कसे साहाय्य करतात? (प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १ तीम. २:४)

    2. (ख) यहोवा एखाद्या व्यक्‍तीवरील आपला पवित्र आत्मा काढून घेतो तेव्हा त्या व्यक्‍तीच्या मनातील रिकामी जागा, वाईट आत्मा किंवा वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा भरून काढते हे शौलाच्या उदाहरणावरून कसे दिसून येते? (१ शमु. १६:१४; मत्त. १२:४३-४५; गल. ५:१६)

कथा ५८

दावीद आणि गल्याथ

  1. १. इस्राएलच्या सैनिकांना गल्याथ काय आव्हान करतो?

  2. २. गल्याथ किती प्रचंड आहे आणि गल्याथाला मारणाऱ्‍या मनुष्यास काय देण्याचे शौल वचन देतो?

  3. ३. दावीद गल्याथाशी लढू शकत नाही कारण तो तर कोवळा पोरगा आहे असे शौलाने म्हटल्यावर दावीद काय उत्तर देतो?

  4. ४. गल्याथाला उत्तर देताना, दावीद यहोवावरील त्याचा भरवसा कसा दाखवतो?

  5. ५. चित्रात दिसते त्यावरून, दावीद गल्याथाला कशाने मारतो आणि त्यानंतर फिलिस्टीन लोकांना काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल १७:१-५४ वाचा.

    1. (क) दावीद गल्याथाला न घाबरण्याचे कारण काय होते आणि त्याने दाखवलेल्या धाडसाचे आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो? (१ शमु. १७:३७, ४५; इफिस. ६:१०, ११)

    2. (ख) खेळताना किंवा मनोरंजन करताना, ख्रिस्ती लोकांनी गल्याथासारखी स्पर्धात्मक प्रवृत्ती का टाळली पाहिजे? (१ शमु. १७:८; गल. ५:२६; १ तीम. ४:८)

    3. (ग) देव मदत करणार यावर दाविदाचा पूर्ण भरवसा होता हे दाविदाच्या शब्दांतून कसे दिसते? (१ शमु. १७:४५-४७; २ इति. २०:१५)

    4. (घ) हा सामना एकमेकांविरुद्ध उभ्या असलेल्या दोन विरुद्ध सैन्यांमधील असल्याचे सांगण्याऐवजी, हे युद्ध खरेतर खोटी दैवते आणि खरा देव यहोवा यांच्यातील होते हे कशावरून दिसते? (१ शमु. १७:४३, ४६, ४७)

    5. (ड) अभिषिक्‍त जन दाविदाप्रमाणेच यहोवावर भरवसा असल्याचे कशा प्रकारे दाखवतात? (१ शमु. १७:३७; यिर्म. १:१७-१९; प्रकटी. १२:१७)

कथा ५९

दाविदाला का निसटलं पाहिजे

  1. १. शौलाला दाविदाचा हेवा का वाटतो, परंतु शौलाचा मुलगा योनाथान कशा प्रकारे वेगळा आहे?

  2. २. एके दिवशी दावीद शौलासाठी वीणा वाजवत असताना काय घडते?

  3. ३. शौलाची मुलगी मीखल हीच्याशी दाविदाचे लग्न होण्यापूर्वी त्याने काय करावे असे शौल म्हणतो व तो असे का म्हणतो?

  4. ४. दावीद शौलासाठी वीणा वाजवत असतो तेव्हा चित्रात दिसते त्याप्रमाणे तिसऱ्‍यांदा काय घडते?

  5. ५. दावीदाचे जीवन वाचवण्यासाठी मीखल त्याला मदत कशी करते आणि त्यानंतर सात वर्षांपर्यंत दाविदाला काय करावे लागते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल १८:१-३० वाचा.

    1. (क) योनाथानाला दाविदाप्रती असलेली अतूट प्रीती, ‘दुसरी मेंढरे’ आणि ‘लहान कळप’ यांच्यात असणाऱ्‍या प्रीतीला कशी पूर्वचित्रित करते? (१ शमु. १८:१; योहा. १०:१६; लूक १२:३२; जख. ८:२३)

    2. (ख) खरेतर, योनाथान शौलाचा वारसदार असणार होता, तरीसुद्धा राजा बनण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्‍तीला योनाथानाने दाखवलेली उल्लेखनीय अधीनता १ शमुवेल १८:४ यातून कशी दिसते?

    3. (ग) हेव्यामुळे एखादी व्यक्‍ती गंभीर पाप करू शकते हे शौलाच्या उदाहरणावरून कसे दिसते आणि यातून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (१ शमु. १८:७-९, २५; याको. ३:१४-१६)

  2. २. पहिले शमुवेल १९:१-१७ वाचा.

    शौलापुढे जाऊन योनाथानाने आपले जीवन धोक्यात कसे घातले? (१ शमु. १९:१, ४-६; नीति. १६:१४)

कथा ६०

अबीगईल आणि दावीद

  1. १. चित्रात दिल्याप्रमाणे, दाविदाला भेटायला येणाऱ्‍या स्त्रीचे नाव काय आहे आणि ती कशा प्रकारची व्यक्‍ती आहे?

  2. २. नाबाल कोण आहे?

  3. ३. नाबालकडे मदत मागण्यासाठी दावीद आपल्या काही माणसांना का पाठवतो?

  4. ४. नाबाल दाविदाच्या माणसांना काय म्हणतो आणि त्यामुळे दावीद काय करतो?

  5. ५. अबीगईल चतुराईने कशी वागते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल २२:१-४ वाचा.

    ख्रिस्ती बंधू समाजातील आपण सर्वांनी, एकमेकांना आधार दिला पाहिजे हे दाविदाच्या कुटुंबाच्या उदाहरणातून कसे दिसते? (नीति. १७:१७; १ थेस्सलनी. ५:१४)

  2. २. पहिले शमुवेल २५:१-४३ वाचा.

    1. (क) नाबाल उद्धट असल्याचे वर्णन का करण्यात आले आहे? (१ शमु. २५:२-५, १०, १४, २१, २५)

    2. (ख) अबीगईलच्या उदाहरणावरून आजच्या ख्रिस्ती पत्न्या काय शिकू शकतात? (१ शमु. २५:३२, ३३; नीति. ३१:२६; इफिस. ५:२४)

    3. (ग) दाविदाला कोणत्या दोन वाईट गोष्टी करण्यापासून अबीगईलने आवरले? (१ शमु. २५:३१, ३३; रोम. १२:१९; इफिस. ४:२६)

    4. (घ) अबीगईलच्या म्हणण्याला दाविदाने दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून, आज पुरुषांना स्त्रियांप्रती यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यास कशा प्रकारे मदत होते? (प्रे. कृत्ये २१:८, ९; रोम. २:११; १ पेत्र ३:७)

कथा ६१

दाविदाला राजा करतात

  1. १. शौल आपल्या छावणीत झोपलेला असताना दावीद आणि अबीशय यांनी काय केले?

  2. २. दावीद शौलाला कोणते प्रश्‍न विचारतो?

  3. ३. शौलाला सोडून, दावीद कोठे निघून जातो?

  4. ४. दावीद फार कष्टी होऊन एक सुंदर गीत का रचतो?

  5. ५. दावीदाला हेब्रोनमध्ये राजा करतात तेव्हा तो किती वर्षांचा असतो आणि त्याच्या मुलांपैकी काहींची नावे काय आहेत?

  6. ६. दावीद पुढे कोठे राज्य करतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले शमुवेल २६:१-२५ वाचा.

    1. (क) दाविदाने १ शमुवेल २६:११ मध्ये जे म्हटले त्यातून, देवाच्या व्यवस्थेबद्दल त्याची कोणती मनोवृत्ती दिसून येते? (स्तो. ३७:७; रोम. १३:२)

    2. (ख) प्रेम व कृपा दाखवण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करूनही, आपली कदर केली जात नाही, तेव्हाही योग्य दृष्टिकोन बाळगण्यास १ शमुवेल २६:२३ यातील दाविदाचे शब्द आपल्याला कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकतात? (१ राजे ८:३२; स्तो. १८:२०)

  2. २. दुसरे शमुवेल १:२६ वाचा.

    दावीद व योनाथान यांच्यासारखी ‘एकनिष्ठ प्रीती,’ आज ख्रिस्ती बांधव आपसात कशी वाढवू शकतात? (१ पेत्र ४:८; कलस्सै. ३:१४; १ योहा. ४:१२)

  3. ३. दुसरे शमुवेल ५:१-१० वाचा.

    1. (क) दाविदाने किती वर्ष राज्य केले आणि त्याच्या कारकिर्दीची विभागणी कशा प्रकारे करण्यात आली होती? (२ शमु. ५:४, ५)

    2. (ख) दाविदाच्या महानतेचे श्रेय कशाला जाते आणि त्यामुळे आज आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण होते? (२ शमु. ५:१०; १ शमु. १६:१३; १ करिंथ. १:३१; फिलिप्पै. ४:१३)

कथा ६२

दाविदाच्या घराण्यात संकटं

  1. १. यहोवाच्या मदतीने, कनान देशाचे शेवटी काय होते?

  2. २. दावीद एका संध्याकाळी, राजवाड्याच्या गच्चीवर असताना काय घडते?

  3. ३. यहोवा दाविदावर फार का रागावतो?

  4. ४. चित्रात दाखवल्याप्रमाणे, दाविदाने केलेल्या पापांबद्दल त्याला सांगण्यास यहोवा कोणाला पाठवतो आणि दाविदासोबत काय घडणार असल्याचे तो मनुष्य सांगतो?

  5. ५. दाविदावर कोणती संकटे येतात?

  6. ६. दाविदानंतर इस्राएलचा राजा कोण बनतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे शमुवेल ११:१-२७ वाचा.

    1. (क) यहोवाच्या सेवेत मग्न राहिल्याने आपले संरक्षण कसे होते?

    2. (ख) दावीद कशा प्रकारे पापात पडला आणि आज यहोवाच्या सेवकांना त्यातून कोणता इशारा मिळतो? (२ शमु. ११:२; मत्त. ५:२७-२९; १ करिंथ. १०:१२; याको. १:१४, १५)

  2. २. दुसरे शमुवेल १२:१-१८ वाचा.

    1. (क) दाविदाला ताडण करण्यासाठी नाथानाने जी पद्धत वापरली, त्यातून मंडळीतील वडील व पालक कोणता धडा शिकू शकतात? (२ शमु. १२:१-४; नीति. १२:१८; मत्त. १३:३४)

    2. (ख) यहोवाने दाविदावर दया का केली? (२ शमु. १२:१३; स्तो. ३२:५; २ करिंथ. ७:९, १०)

कथा ६३

बुद्धिमान राजा शलमोन

  1. १. यहोवा शलमोनाला काय विचारतो आणि शलमोन काय उत्तर देतो?

  2. २. शलमोनाने मागितलेल्या गोष्टीबद्दल प्रसन्‍न होऊन यहोवा त्याला काय देण्याचे वचन देतो?

  3. ३. दोन स्त्रिया शलमोनापाशी कोणती कठीण समस्या घेऊन येतात?

  4. ४. चित्रात दिसते त्याप्रमाणे, शलमोन ती समस्या कशा प्रकारे सोडवतो?

  5. ५. शलमोनाची कारकीर्द कशा प्रकारची आहे आणि का?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले राजे ३:३-२८ वाचा.

    1. (क) आज देवाच्या संघटनेत ज्यांना जबाबदारी मिळते ते, १ राजे ३:७ यात दिलेल्या शलमोनाच्या मनःपूर्वक उद्‌गारांतून काय शिकू शकतात? (स्तो. ११९:१०५; नीति. ३:५, ६)

    2. (ख) शलमोनाची प्रार्थना, आपण उचित गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे याचे एक उत्तम उदाहरण कसे आहे? (१ राजे ३:९, ११; नीति. ३०:८, ९; १ योहा. ५:१४)

    3. (ग) शलमोनाने दोन स्त्रियांमधील वाद सोडवला त्यावरून, महान शलमोन असलेल्या येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्‍या शासनाविषयी आपण कोणता भरवसा बाळगू शकतो? (१ राजे ३:२८; यश. ९:६, ७; ११:२-४)

  2. २. पहिले राजे ४:२९-३४ वाचा.

    1. (क) आज्ञाधारक हृदय देण्याबद्दल शलमोनाने यहोवाला केलेल्या विनंतीचे उत्तर यहोवाने कशा प्रकारे दिले? (१ राजे ४:२९)

    2. (ख) शलमोनाच्या बुद्धीच्या गोष्टी ऐकण्याकरता लोकांनी घेतलेल्या मेहनतीचा विचार करून, देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याविषयी आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे? (१ राजे ४:२९, ३४; योहा. १७:३; २ तीम. ३:१६)

कथा ६४

शलमोन मंदिर बांधतो

  1. १. यहोवाचे मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला किती वर्षे लागतात आणि मंदिर बांधण्यासाठी खूप पैसे का लागतात?

  2. २. मंदिरात मुख्य खोल्या किती आहेत आणि आतल्या खोलीत काय ठेवले आहे?

  3. ३. मंदिर पूर्ण झाल्यावर, शलमोन आपल्या प्रार्थनेत काय म्हणतो?

  4. ४. शलमोनाच्या प्रार्थनेने यहोवा प्रसन्‍न आहे हे तो कशा प्रकारे दाखवतो?

  5. ५. शलमोनाच्या बायका त्याच्याकडून काय करवून घेतात आणि शलमोनाला काय होते?

  6. ६. यहोवा शलमोनावर का संतापतो आणि त्याला काय म्हणतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले इतिहास २८:९, १० वाचा.

    पहिले इतिहास २८:९, १० यात नमूद असलेले दाविदाचे शब्द लक्षात घेऊन, आपण आपल्या रोजच्या जीवनात काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (स्तो. १९:१४; फिलिप्पै. ४:८, ९)

  2. २. दुसरे इतिहास ६:१२-२१, ३२-४२ वाचा.

    1. (क) सर्वोच्च देव कोणत्याही मानवनिर्मित इमारतीत सामावू शकत नाही हे शलमोनाने कशा प्रकारे दाखवले? (२ इति. ६:१८; प्रे. कृत्ये १७:२४, २५)

    2. (ख) दुसरे इतिहास ६:३२, ३३ यातील शलमोनाच्या शब्दांतून यहोवाबद्दल काय स्पष्ट होते? (प्रे. कृत्ये १०:३४, ३५; गलती. २:६)

  3. ३. दुसरे इतिहास ७:१-५ वाचा.

    यहोवाची महिमा पाहिल्यावर ज्या प्रकारे इस्राएल लोक त्याची स्तुती करण्यास प्रवृत्त झाले, त्याच प्रकारे आज यहोवा आपल्या लोकांना देत असलेल्या आशीर्वादांवर जेव्हा आपण मनन करतो, तेव्हा आपल्यावर देखील कोणता प्रभाव पडला पाहिजे? (२ इति. ७:३; स्तो. २२:२२; ३४:१; ९६:२)

  4. ४. पहिले राजे ११:९-१३ वाचा.

    आपण शेवटपर्यंत देवाशी विश्‍वासू राहिले पाहिजे याचे महत्त्व, शलमोनाच्या जीवनावरून कसे दिसते? (१ राजे ११:४, ९; मत्त. १०:२२; प्रकटी. २:१०)

कथा ६५

राज्य विभागलं जातं

  1. १. चित्रात दिसणाऱ्‍या दोन माणसांची नावे काय आणि ती माणसे कोण आहेत?

  2. २. अहीया आपल्या अंगावरच्या झग्याचे काय करतो आणि असे करण्याचा काय अर्थ आहे?

  3. ३. शलमोन यराबामाला काय करण्याचा प्रयत्न करतो?

  4. ४. लोक यराबामाला १० वंशांवर राजा का करतात?

  5. ५. यराबाम सोन्याची दोन वासरे का बनवतो आणि त्यानंतर लवकरच देशात काय होते?

  6. ६. दोन वंशांच्या राज्याचे व जेरूसलेममधील यहोवाच्या मंदिराचे काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले राजे ११:२६-४३ वाचा.

    यराबाम कशा प्रकारचा मनुष्य होता आणि त्याने जर आपल्या नियमांचे पालन केले तर यहोवाने त्याला काय देण्याचे वचन दिले? (१ राजे ११:२८, ३८)

  2. २. पहिले राजे १२:१-३३ वाचा.

    1. (क) अधिकाराच्या दुरुपयोगाविषयी रहबामाच्या वाईट उदाहरणावरून आईवडील आणि मंडळीतील वडील काय शिकू शकतात? (१ राजे १२:१३; उप. ७:७; १ पेत्र ५:२, ३)

    2. (ख) जीवनात गंभीर निर्णय घेताना, भरवसालायक मार्गदर्शनासाठी आज तरुण-तरुणींनी कोणावर अवलंबून असायला पाहिजे? (१ राजे १२:६, ७; नीति. १:८, ९; २ तीम. ३:१६, १७; इब्री १३:७)

    3. (ग) यराबामाने वासरांच्या उपासनेसाठी दोन ठिकाणे का उभी केली आणि यामुळे यहोवावर त्याचा जरा देखील विश्‍वास नसल्याचे कसे दिसले? (१ राजे ११:३७; १२:२६-२८)

    4. (घ) खऱ्‍या उपासनेविरुद्ध बंड करण्यास १० वंशांच्या राज्यातील लोकांना कोणी प्रवृत्त केले? (१ राजे १२:३२, ३३)

कथा ६६

ईजबेल—एक दुष्ट राणी

  1. १. ईजबेल कोण आहे?

  2. २. एके दिवशी राजा अहाब उदास का आहे?

  3. ३. ईजबेल तिच्या नवऱ्‍यासाठी म्हणजेच अहाबासाठी नाबोथाचा द्राक्षाचा मळा मिळवण्यासाठी काय करते?

  4. ४. ईजबेलीला शिक्षा करण्यासाठी यहोवा कोणाला पाठवतो?

  5. ५. चित्रात दाखवल्याप्रमाणे, येहू ईजबेलीच्या राजवाड्यात येतो तेव्हा काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले राजे १६:२९-३३ आणि १८:३, ४ वाचा.

    राजा अहाबाच्या काळात इस्राएलमधील परिस्थिती किती वाईट होती? (१ राजे १६:३३)

  2. २. पहिले राजे २१:१-१६ वाचा.

    1. (क) नाबोथाने धाडस व यहोवाशी एकनिष्ठा कशी दाखवली? (१ राजे २१:१-३; लेवी. २५:२३-२८)

    2. (ख) अहाबाच्या उदाहरणावरून, नैराश्‍याचा सामना करण्याविषयी आपण काय शिकू शकतो? (१ राजे २१:४; रोम. ५:३-५)

  3. ३. दुसरे राजे ९:३०-३७ वाचा.

    यहोवाच्या इच्छेनुसार करण्याच्या येहूच्या आवेशावरून आपण काय शिकू शकतो? (२ राजे ९:४-१०; २ करिंथ. ९:१, २; २ तीम. ४:२)

कथा ६७

यहोशाफाट यहोवावर भरवसा ठेवतो

  1. १. यहोशाफाट कोण आहे व तो कोणत्या काळात जगत आहे?

  2. २. इस्राएल लोक का घाबरले आहेत व अनेक लोक काय करतात?

  3. ३. यहोवा यहोशाफाटाच्या प्रार्थनेचे उत्तर कसे देतो?

  4. ४. युद्धाआधी यहोवा काय होऊ देतो?

  5. ५. यहोशाफाटाकडून आपण कोणता धडा शिकू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे इतिहास २०:१-३० वाचा.

    1. (क) देवाच्या विश्‍वासू सेवकांसमोर जीवघेणी परिस्थिती येते तेव्हा त्यांनी काय केले पाहिजे हे यहोशाफाटाने कसे दाखवून दिले? (२ इति. २०:१२; स्तो. २५:१५; ६२:१)

    2. (ख) यहोवाने आपल्या लोकांबरोबर दळणवळण राखण्यासाठी नेहमीच एका माध्यमाचा उपयोग केला, तेव्हा आजही तो कोणत्या माध्यमाचा उपयोग करत आहे? (२ इति. २०:१४, १५; मत्त. २४:४५-४७; योहा. १५:१५)

    3. (ग) ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ सुरू होईल तेव्हा आपल्याला देखील यहोशाफाटासारखी भूमिका कशी घ्यावी लागेल? (२ इति. २०:१५, १७; ३२:८; प्रकटी. १६:१४, १६)

    4. (घ) आजचे पायनियर व मिशनरी लेव्यांचे अनुकरण करून जगभर होणाऱ्‍या प्रचार कार्याला कशा प्रकारे हातभार लावत आहेत? (२ इति. २०:१९, २१; रोम. १०:१३-१५; २ तीम. ४:२)

कथा ६८

पुन्हा जिवंत झालेले दोन मुलगे

  1. १. चित्रात दिसणारे हे तिघे जण कोण आहेत व या लहान मुलाला काय झालेले असते?

  2. २. या मुलाबद्दल एलीया काय प्रार्थना करतो व यानंतर काय घडते?

  3. ३. एलीयाच्या मदतनीसाचे नाव काय आहे?

  4. ४. शूनेम गावातील एका स्त्रीच्या घरी अलीशाला का बोलवले जाते?

  5. ५. अलीशा काय करतो व मृत मुलाचे काय होते?

  6. ६. एलीया व अलीशा यांच्या द्वारे यहोवाने त्याच्यात कोणती शक्‍ती असल्याचे दाखवून दिले?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले राजे १७:८-२४ वाचा.

    1. (क) एलीयाच्या आज्ञाधारकपणाची व विश्‍वासाची परीक्षा कशी झाली? (१ राजे १७:९; १९:१-४, १०)

    2. (ख) सारफथच्या विधवेचा विश्‍वास वाखाणण्याजोगा का होता? (१ राजे १७:१२-१६; लूक ४:२५, २६)

    3. (ग) सारफथच्या विधवेचा अनुभव, मत्तय १०:४१, ४२ मधील येशूच्या शब्दांची सत्यता कशी पटवतो? (१ राजे १७:१०-१२, १७, २३, २४)

  2. २. दुसरे राजे ४:८-३७ वाचा.

    1. (क) पाहुणचार दाखवण्याच्या बाबतीत शूनेमच्या स्त्रीकडून आपण कोणता धडा शिकू शकतो? (२ राजे ४:८; लूक ६:३८; रोम. १२:१३; १ योहा. ३:१७)

    2. (ख) आज देवाच्या सेवकांना आपण कोणकोणत्या मार्गांनी दयाळुपणा दाखवू शकतो? (प्रे. कृत्ये २०:३५; २८:१, २; गलती. ६:९, १०; इब्री ६:१०)

कथा ६९

मुलगी बलवान माणसाला मदत करते

  1. १. चित्रातील लहान मुलगी एका स्त्रीला काय सांगत आहे?

  2. २. चित्रातील ही स्त्री कोण आहे आणि या स्त्रीच्या घरात या लहान मुलीचे काय काम आहे?

  3. ३. अलीशा आपल्या सेवकाला, नामानास काय सांगण्यास लावतो व नामानाला राग का येतो?

  4. ४. नामान आपल्या सेवकांचे ऐकतो तेव्हा काय होते?

  5. ५. अलीशा नामानाने आणलेले बक्षीस का स्वीकारत नाही पण गेहजी काय करतो?

  6. ६. गेहजीला काय होते व यावरून आपण काय शिकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे राजे ५:१-२७ वाचा.

    1. (क) इस्राएली मुलीच्या उदाहरणातून आजच्या तरुणांनी कोणते उत्तेजन मिळवले पाहिजे? (२ राजे ५:३; स्तो. ८:२; १४८:१२, १३)

    2. (ख) शास्त्रवचनांतून सल्ला मिळतो तेव्हा आपण नामानाचे उदाहरण लक्षात का ठेवले पाहिजे? (२ राजे ५:१५; इब्री १२:५, ६; याको. ४:६)

    3. (ग) अलीशा व गेहजी यांच्या उदाहरणाची तुलना केल्यास आपण कोणता धडा शिकू शकतो? (२ राजे ५:९, १०, १४-१६, २०; मत्त. १०:८; प्रे. कृत्ये ५:१-५; २ करिंथ. २:१७)

कथा ७०

योना व मोठा मासा

  1. १. योना कोण आहे आणि यहोवा त्याला काय करण्यास सांगतो?

  2. २. यहोवाने योनाला जिथे जायला सांगितलेले असते तिथे जाण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तो काय करतो?

  3. ३. समुद्रातले वादळ शांत व्हावे म्हणून योना खलाशांना काय करण्यास सांगतो?

  4. ४. चित्रात आपल्याला दाखवल्याप्रमाणे योना जेव्हा पाण्यात बुडू लागतो तेव्हा काय होते?

  5. ५. योना माशाच्या पोटात किती दिवस असतो व तिथे तो काय करतो?

  6. ६. मोठ्या माशाच्या पोटातून बाहेर आल्यावर योना कुठे जातो व यावरून आपण काय शिकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. योना १:१-१७ वाचा.

    निनवेकरांना प्रचार करण्याची योनाला मिळालेली नेमणूक त्याला कशी वाटत होती? (योना १:२, ३; नीति. ३:७; उप. ८:१२)

  2. २. योना २:१, २, १० वाचा.

    यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल, हा भरवसा आपल्याला योनाच्या अनुभवातून कसा मिळतो? (स्तो. २२:२४; ३४:६; १ योहा. ५:१४)

  3. ३. योना ३:१-१० वाचा.

    1. (क) योनाने त्याला मिळालेली नेमणूक पहिल्यांदा पूर्ण केली नसली तरीसुद्धा यहोवाने त्याचा नंतर उपयोग करून घेतला यावरून आपल्याला कोणते उत्तेजन मिळते? (स्तो. १०३:१४; १ पेत्र ५:१०)

    2. (ख) योनाने निनवेकरांविषयी जो विचार केला त्यावरून आपण आपल्या क्षेत्रातील लोकांचा आधीच न्याय करण्याविषयी काय शिकतो? (योना ३:६-९; उप. ११:६; प्रे. कृत्ये १३:४८)

कथा ७१

देव परादीसचं वचन देतो

  1. १. यशया कोण होता, तो केव्हा हयात होता, व यहोवाने त्याला काय दाखवले?

  2. २. “परादीस” या शब्दाचा काय अर्थ होतो व यावरून तुम्हाला कशाची आठवण होते?

  3. ३. यहोवाने यशयाला नवीन परादीसविषयी काय लिहिण्यास सांगितले?

  4. ४. आदाम व हव्वेने त्यांचे सुंदर घर का गमवले?

  5. ५. जे यहोवावर प्रेम करतात त्यांना तो काय वचन देतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यशया ११:६-९ वाचा.

    1. (क) नवीन जगात प्राणी व मानव यांच्यात शांती असेल याविषयी देवाच्या वचनात काय सांगितले आहे? (स्तो. १४८:१०, १३; यश. ६५:२५; यहे. ३४:२५)

    2. (ख) आज यहोवाच्या लोकांमध्ये यशयाच्या कोणत्या शब्दांची आध्यात्मिक पूर्णता होत आहे? (रोम. १२:२; इफिस. ४:२३, २४)

    3. (ग) आता आणि नवीन जगात होणार असलेल्या मनुष्याच्या व्यक्‍तमित्त्वातील बदलाचे श्रेय कोणाला दिले पाहिजे? (यश. ४८:१७, १८; गलती. ५:२२, २३; फिलिप्पै. ४:७)

  2. २. प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

    1. (क) देवाचे मानवजातीबरोबर पृथ्वीवरील वास्तव्य शारीरिक नव्हे तर लाक्षणिक असेल याविषयी शास्रवचने काय सांगतात? (लेवी. २६:११, १२; २ इति. ६:१८; यश. ६६:१; प्रकटी. २१:२, ३, २२-२४)

    2. (ख) कोणत्या प्रकारचे अश्रू आणि दुःख नसतील? (लूक ८:४९-५२; रोम. ८:२१, २२; प्रकटी. २१:४)

कथा ७२

देव हिज्कीया राजाला मदत करतो

  1. १. चित्रात दिसणारा माणूस कोण आहे व तो कोणत्या संकटात सापडला आहे?

  2. २. हिज्कीयाने देवापुढे ठेवलेली ही पत्रे काय आहेत व हिज्कीया कशासाठी प्रार्थना करत आहे?

  3. ३. हिज्कीया कसा राजा आहे व संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवा त्याला कोणता संदेश देतो?

  4. ४. चित्रात दिसत असल्याप्रमाणे यहोवाचा देवदूत अश्‍शूरी लोकांना काय करतो?

  5. ५. दोन वंशांच्या राज्यात काही काळापुरती शांती असली तरीसुद्धा हिज्कीया मरण पावल्यानंतर परिस्थिती कशी होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे राजे १८:१-३६ वाचा.

    1. (क) अश्‍शूरी लोकांचा प्रवक्‍ता रबशाके याने इस्राएली लोकांचा विश्‍वास कमकुवत करण्याचा प्रयत्न कसा केला? (२ राजे १८:१९, २१; निर्ग. ५:२; स्तो. ६४:३)

    2. (ख) यहोवाचे साक्षीदार विरोधकांशी व्यवहार करताना हिज्कीयाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करतात? (२ राजे १८:३६; स्तो. ३९:१; नीति. २६:४; २ तीम. २:२४)

  2. २. दुसरे राजे १९:१-३७ वाचा.

    1. (क) आज यहोवाच्या लोकांपुढे समस्या येतात तेव्हा ते हिज्कीयाचे अनुकरण कसे करतात? (२ राजे १९:१, २; नीति. ३:५, ६; इब्री १०:२४, २५; याको. ५:१४, १५)

    2. (ख) राजा सन्हेरीब याचा कोणत्या तीन गोष्टीत पराभव झाला व तो भविष्यसूचकपणे कोणाला चित्रित करतो? (२ राजे १९:३२, ३५, ३७; प्रकटी. २०:२, ३)

  3. ३. दुसरे राजे २१:१-६, १६ वाचा.

    मनश्‍शे हा जेरूसलेमवर राज्य केलेल्या सर्व राजांपैकी सर्वात दुष्ट राजा होता असे का म्हणता येते? (२ इति. ३३:४-६, ९)

कथा ७३

इस्राएलचा शेवटला गुणी राजा

  1. १. योशीया राजा बनतो तेव्हा तो किती वर्षांचा होता आणि राजा होऊन सात वर्षे लोटल्यावर तो काय करतो?

  2. २. पहिल्या चित्रात दिसत असल्याप्रमाणे योशीया काय करत आहे?

  3. ३. मंदिराची डागडूजी करताना महायाजकाला काय सापडते?

  4. ४. योशीया आपले वस्त्र का फाडतो?

  5. ५. संदेष्ट्री हुल्दा यहोवाकडून मिळालेला कोणता संदेश योशीयाला सांगते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे इतिहास ३४:१-२८ वाचा.

    1. (क) ज्यांचे बालपण कदाचित अतिशय दुःखद होते अशांसाठी योशीयाने कोणते उदाहरण मांडले? (२ इति. ३३:२१-२५; ३४:१, २; स्तो. २७:१०)

    2. (ख) योशीयाने त्याच्या कारकीर्दीच्या ८ व्या, १२ व्या आणि १८ व्या वर्षी शुद्ध उपासना वाढवण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली होती? (२ इति. ३४:३, ८)

    3. (ग) आपल्या उपासना स्थळांची देखरेख करण्याच्या बाबीत राजा योशीया आणि महायाजक हिल्कीया यांनी कोणते उदाहरण मांडले आहे? (२ इति. ३४:९-१३; नीति. ११:१४; १ करिंथ. १०:३१)

कथा ७४

एक निडर माणूस

  1. १. चित्रातील हा तरुण कोण आहे?

  2. २. यहोवा यिर्मयाला आपला संदेष्टा व्हायला सांगतो तेव्हा यिर्मयाला काय वाटते, पण यहोवा त्याला काय सांगतो?

  3. ३. यिर्मया लोकांना कोणता संदेश सांगत राहतो?

  4. ४. याजक यिर्मयाला धरून काय दटावतात, पण तो कोणालाही घाबरत नाही हे कसे दाखवतो?

  5. ५. इस्राएल लोक आपल्या वाईट मार्गांपासून मागे न वळल्याने काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यिर्मया १:१-८ वाचा.

    1. (क) एक व्यक्‍ती यहोवाची सेवा करण्यास केव्हा पात्र ठरते हे यिर्मयाच्या उदाहरणावरून कसे कळते? (२ करिंथ. ३:५, ६)

    2. (ख) यिर्मयाच्या उदाहरणामुळे आजच्या ख्रिस्ती तरुणांना कोणते उत्तेजन मिळते? (उप. १२:१; १ तीम. ४:१२)

  2. २. यिर्मया १०:१-५ वाचा.

    मूर्तींवर भरवसा ठेवणे किती व्यर्थ आहे हे दाखवण्यासाठी यिर्मया कोणते प्रभावशाली उदाहरण देतो? (यिर्म. १०:५; यश. ४६:७; हब. २:१९)

  3. ३. यिर्मया २६:१-१६ वाचा.

    1. (क) इशाऱ्‍याचा संदेश देताना आज अभिषिक्‍त शेष, “एकहि शब्द गाळू नको” या यहोवाने यिर्मयाला दिलेल्या आज्ञेचे पालन कसे करतो? (यिर्म. २६:२; अनु. ४:२; प्रे. कृत्ये २०:२७)

    2. (ख) यहोवाच्या इशाऱ्‍याचा संदेश राष्ट्रांतील लोकांना घोषित करण्याच्या बाबतीत यिर्मयाने आजच्या यहोवाच्या साक्षीदारांसाठी उत्तम उदाहरण कसे मांडले आहे? (यिर्म. २६:८, १२, १४, १५; २ तीम. ४:१-५)

  4. ४. दुसरे राजे २४:१-१७ वाचा.

    यहुदा राष्ट्र यहोवाशी अविश्‍वासू राहिल्यामुळे त्यांना कोणते दुःखद परिणाम भोगावे लागले? (२ राजे २४:२-४, १४)

कथा ७५

बॅबिलोनमध्ये चार मुलगे

  1. १. चित्रात दिसणारी ही चार मुले कोण आहेत व ती बॅबिलोनमध्ये का आहेत?

  2. २. या चार मुलांना काय करण्याचा नबुखदनेस्सरचा इरादा आहे व तो आपल्या सेवकांना काय आज्ञा देतो?

  3. ३. अन्‍न-पाण्याविषयी दानीएल स्वतःच्याबाबतीत व आपल्या तीन मित्रांच्या बाबतीत काय विनंती करतो?

  4. ४. दहा दिवस शाकभाजी खाल्यानंतर, दानीएल व त्याचे तीन मित्र इतर तरुणांच्या तुलनेत कसे दिसतात?

  5. ५. दानीएल व त्याच्या मित्रांना कोणत्या कारणामुळे राजवाड्यात ठेवले जाते व याजक आणि सुज्ञ लोकांपेक्षा ते वरचढ कसे ठरतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दानीएल १:१-२१ वाचा.

    1. (क) मोहांचा प्रतिकार व आपल्या उणिवांवर मात करण्यासाठी आपण कोणता प्रयत्न केला पाहिजे? (दानी. १:८; उत्प. ३९:७, १०; गलती. ६:९)

    2. (ख) काही जण ज्याला “मिष्टान्‍न” समजतात अशा कोणत्या काही गोष्टी आहेत ज्यांत भाग घेण्यास आजच्या तरुणांना मोह होऊ शकतो किंवा त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो? (दानी. १:८; नीति. २०:१; २ करिंथ. ६:१७–७:१)

    3. (ग) या चार इब्री तरुणांचा बायबलमधील अहवाल आपल्याला जगिक ज्ञान घेण्याच्या बाबतीत काय समजण्यास मदत करतो? (दानी. १:२०; यश. ५४:१३; १ करिंथ. ३:१८-२०)

कथा ७६

जेरूसलेमचा नाश होतो

  1. १. चित्रात दाखवल्याप्रमाणे, जेरूसलेमचे व इस्राएल लोकांचे काय होत आहे?

  2. २. यहेज्केल कोण आहे व यहोवा त्याला कोणत्या धक्कादायक गोष्टी दाखवतो?

  3. ३. इस्राएल लोकांना यहोवाचा आदर वाटत नसल्यामुळे यहोवा काय प्रतिज्ञा करतो?

  4. ४. इस्राएल लोकांनी राजा नबुखदनेस्सर याच्याविरुद्ध बंड केल्यानंतर तो काय करतो?

  5. ५. यहोवा इस्राएल लोकांवर हा भयंकर विनाश का येऊ देतो?

  6. ६. इस्राएल देश निर्जन कसा होतो व किती वर्षांपर्यंत तो असा राहतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दुसरे राजे २५:१-२६ वाचा.

    1. (क) सिद्‌कीया कोण होता, त्याचे काय होते आणि यामुळे बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण होते? (२ राजे २५:५-७; यहे. १२:१३-१५)

    2. (ख) इस्राएलच्या अविश्‍वासूपणाबद्दल यहोवा कोणास जबाबदार ठरवतो? (२ राजे २५:९, ११, १२, १८, १९; २ इति. ३६:१४, १७)

  2. २. यहेज्केल ८:१-१८ वाचा.

    ख्रिस्ती धर्मजगताने सूर्याची उपासना करणाऱ्‍या धर्मत्यागी इस्राएली लोकांचे अनुकरण कसे केले? (यहे. ८:१६; यश. ५:२०, २१; योहा. ३:१९-२१; २ तीम. ४:३)

कथा ७७

ते दंडवत घालीनात

  1. १. बाबेलच्या राजा नबुखदनेस्सराने लोकांना कोणती आज्ञा दिली?

  2. २. दानीएलाचे तीन मित्र सोन्याच्या मूर्तीला दंडवत का घालत नाहीत?

  3. ३. नबुखदनेस्सराने दंडवत घालण्याची दुसऱ्‍यांदा संधी दिल्यावर तीन इब्री तरुणांनी यहोवावरील त्यांचा भरवसा कसा दाखवला?

  4. ४. नबुखदनेस्सर आपल्या लोकांना शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांना काय करण्याची आज्ञा देतो?

  5. ५. भट्टीत पाहिल्यावर नबुखदनेस्सरला काय दिसले?

  6. ६. शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांच्या देवाची स्तुती राजा का करतो आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दानीएल ३:१-३० वाचा.

    1. (क) देवाच्या सेवकांवर विश्‍वासाच्या परीक्षा येतात तेव्हा त्यांनी तीन इब्री तरुणांनी दाखवलेल्या कोणत्या मनोवृत्तीचे अनुकरण केले पाहिजे? (दानी. ३:१७, १८; मत्त. १०:२८; रोम. १४:७, ८)

    2. (ख) यहोवाने नबुखदनेस्सरला कोणता महत्त्वाचा धडा शिकवला? (दानी. ३:२८, २९; ४:३४, ३५)

कथा ७८

भिंतीवरचं लिखाण

  1. १. बॅबिलोनचा राजा मेजवानी करत असताना व जेरूसलेममधल्या यहोवाच्या मंदिरातून आणलेले सोन्या-चांदीचे प्याले व भांडी वापरत असताना काय होते?

  2. २. बेलशस्सरने आपल्या ज्ञानी लोकांना काय म्हटले पण त्यांना काय करता आले नाही?

  3. ३. राजाची आई त्याला काय करण्यास सांगते?

  4. ४. दानीएल राजाला जे सांगतो त्यानुसार, भिंतीवर शब्द लिहिण्यासाठी देवाने एक हात का पाठवला?

  5. ५. भिंतीवर लिहिलेल्या शब्दांचा दानीएल काय अर्थ सांगतो?

  6. ६. दानीएल बोलत असतानाच काय होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दानीएल ५:१-३१ वाचा.

    1. (क) देवाचे भय आणि बेलशस्सरने भिंतीवर लिखाण पाहिल्यावर त्याला जी भीती वाटली यातील फरक सांगा. (दानी. ५:६, ७; स्तो. १९:९; रोम. ८:३५-३९)

    2. (ख) बेलशस्सर व त्याच्या प्रतिष्ठित पाहुण्यांसोबत बोलताना दानीएलाने अधिक धैर्य कसे दाखवले? (दानी. ५:१७, १८, २२, २६-२८; प्रे. कृत्ये ४:२९)

    3. (ग) दानीएलाचा ५ वा अध्याय यहोवाच्या सार्वभौम सत्तेचे महत्त्व कसे पटवून देतो? (दानी. ४:१७, २५; ५:२१)

कथा ७९

सिंहांच्या गुहेत दानीएल

  1. १. दारयावेश कोण होता आणि दानीएलाविषयी त्याला काय वाटत असे?

  2. २. हेवा करणारे काही लोक दारयावेशला काय करण्यास सांगतात?

  3. ३. नवीन कायद्याविषयी दानीएलाला समजते तेव्हा तो काय करतो?

  4. ४. दारयावेश इतका बेचैन का होतो की त्याला रात्री झोप येत नाही आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी तो काय करतो?

  5. ५. दानीएल दारयावेशला काय उत्तर देतो?

  6. ६. दानीएलाला ठार मारू पाहणाऱ्‍या दुष्ट माणसांचे काय होते आणि दारयावेश आपल्या साम्राज्यातल्या सर्व लोकांना काय कळवतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. दानीएल ६:१-२८ वाचा.

    1. (क) दानीएलाविरुद्ध रचलेल्या कटावरून आपल्याला, आधुनिक दिवसांत यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य थांबवण्यासाठी विरोधकांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण कशी होते? (दानी. ६:७; स्तो. ९४:२०; यश. १०:१; रोम. ८:३१)

    2. (ख) आजचे देवाचे सेवक “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन” राहून दानीएलाचे अनुकरण कसे करू शकतात? (दानी. ६:५, १०; रोम. १३:१; प्रे. कृत्ये ५:२९)

    3. (ग) यहोवाची “नित्य” सेवा करण्याच्या बाबतीत दानीएलाने मांडलेल्या उदाहरणाचे आपण अनुकरण कसे करू शकतो? (दानी. ६:१६, २०; फिलिप्पै. ३:१६; प्रकटी. ७:१५)

कथा ८०

देवाचे लोक बॅबिलोन सोडतात

  1. १. चित्रात दाखवल्याप्रमाणे इस्राएली लोक काय करत आहेत?

  2. २. यहोवाने यशयाद्वारा केलेली भविष्यवाणी कोरेश कसा पूर्ण करतो?

  3. ३. जेरूसलेमेला परतू न शकणाऱ्‍या इस्राएल लोकांना कोरेश काय सांगतो?

  4. ४. जेरूसलेममला परत घेऊन जाण्यासाठी कोरेश लोकांना काय देतो?

  5. ५. जेरूसलेमला जाण्याकरता इस्राएली लोकांना किती दिवस लागतात?

  6. ६. देश किती वर्षांपर्यंत पूर्णपणे ओसाड राहिला?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. यशया ४४:२८ आणि ४५:१-४ वाचा.

    1. (क) कोरेशविषयी करण्यात आलेली भविष्यवाणी निश्‍चित पूर्ण होईल, हे यहोवाने जोरदारपणे कसे सांगितले? (यश. ५५:१०, ११; रोम. ४:१७)

    2. (ख) कोरेशविषयी यशयाने केलेल्या भविष्यवाणीवरून, यहोवा देवाकडे भविष्य वर्तवण्याची शक्‍ती आहे हे कसे दिसून येते? (यश. ४२:९; ४५:२१; ४६:१०, ११; २ पेत्र १:२०)

  2. २. एज्रा १:१-११ वाचा.

    जेरूसलेमला परतू न शकणाऱ्‍यांचे अनुकरण करून आपण, पूर्ण वेळची सेवा करणाऱ्‍यांचे ‘हात दृढ’ कसे करू शकतो? (एज्रा १:४, ६, पं.र.भा.; रोम. १२:१३; कलस्सै. ४:१२)

कथा ८१

देवाच्या मदतीवर भिस्त ठेवणं

  1. १. बॅबिलोन ते जेरूसलेम असा लांबचा प्रवास किती लोक करतात पण पोचल्यावर ते काय पाहतात?

  2. २. इस्राएल लोक काय बांधण्यास पुन्हा सुरुवात करतात पण त्यांचे शत्रू काय करतात?

  3. ३. हाग्गय आणि जखऱ्‍या कोण आहेत व ते लोकांना काय सांगतात?

  4. ४. ततनइ बॅबिलोनला पत्र का पाठवतो व त्याला त्याच्या पत्राचे काय उत्तर मिळते?

  5. ५. देवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची गरज लक्षात आल्यावर एज्रा काय करतो?

  6. ६. चित्रात दिसते त्याप्रमाणे एज्रा कशासाठी प्रार्थना करत आहे, त्याच्या प्रार्थनेचे उत्तर कसे मिळते आणि यावरून आपण काय शिकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. एज्रा ३:१-१३ वाचा.

    आपण देवाच्या लोकांची एकही मंडळी नसलेल्या एखाद्या क्षेत्रात असलो तर आपण काय करीत राहिले पाहिजे? (एज्रा ३:३, ६; प्रे. कृत्ये १७:१६, १७; इब्री १३:१५)

  2. २. एज्रा ४:१-७ वाचा.

    मिश्र विश्‍वासांच्या बाबतीत जरूब्बाबेलने यहोवाच्या लोकांसाठी कोणते उदाहरण मांडले? (निर्ग. ३४:१२; १ करिंथ. १५:३३; २ करिंथ. ६:१४-१७)

  3. ३. एज्रा ५:१-५, १७ आणि ६:१-२२ वाचा.

    1. (क) विरोधक मंदिराचे बांधकाम का थांबवू शकले नाहीत? (एज्रा ५:५; यश. ५४:१७)

    2. (ख) यहुद्यांतील वडील लोकांनी जे कार्य केले ते, ख्रिस्ती वडिलांना विरोधकांचा सामना करते वेळी यहोवाचे मार्गदर्शन प्राप्त करण्यास कशा प्रकारे मदत करू शकते? (एज्रा ६:१४; स्तो. ३२:८; रोम. ८:३१; याको. १:५)

  4. ४. एज्रा ८:२१-२३, २८-३६ वाचा.

    कोणतेही कार्य हाती घेण्याआधी आपण एज्राच्या उदाहरणाचे अनुकरण करणे उत्तम का ठरेल? (एज्रा ८:२३; स्तो. १२७:१; नीति. १०:२२; याको. ४:१३-१५)

कथा ८२

मर्दखय आणि एस्तेर

  1. १. मर्दखय व एस्तेर कोण आहेत?

  2. २. अहश्‍वेरोश राजाला नवी बायको का हवी आहे व तो कोणाला निवडतो?

  3. ३. हामान कोण आहे व तो का चिडतो?

  4. ४. कोणता कायदा बनवला जातो व मर्दखयकडून संदेश मिळाल्यावर एस्तेर काय करते?

  5. ५. हामानचे काय होते व मर्दखयला काय होते?

  6. ६. इस्राएल लोकांना शत्रूंपासून कसे वाचवले जाते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. एस्तेर २:१२-१८ वाचा.

    “सौम्य व शांत आत्मा” विकसित करणे किती महत्त्वाचे आहे हे एस्तेरने कसे दाखवून दिले? (एस्ते. २:१५; १ पेत्र ३:१-५)

  2. २. एस्तेर ४:१-१७ वाचा.

    खऱ्‍या उपासनेच्या वतीने कार्य करण्याची एस्तेरला जशी संधी देण्यात आली होती तशी आजही आपल्याला यहोवाबद्दलची श्रद्धा व एकनिष्ठा व्यक्‍त करण्याची कोणती संधी देण्यात आली आहे? (एस्ते. ४:१३, १४; मत्त. ५:१४-१६; २४:१४)

  3. ३. एस्तेर ७:१-६ वाचा.

    एस्तेरप्रमाणेच देवाच्या अनेक सेवकांनी छळाचा धोका कसा पत्करला आहे? (एस्ते. ७:४; मत्त. १०:१६-२२; १ पेत्र २:१२)

कथा ८३

जेरूसलेमच्या वेशी

  1. १. आपल्या जेरूसलेम शहराभोवती वेस नाही म्हणून इस्राएल लोकांना कसे वाटत होते?

  2. २. नहेम्या कोण आहे?

  3. ३. नहेम्याचे काम काय आहे व हे काम महत्त्वाचे का आहे?

  4. ४. कोणती बातमी ऐकल्याने नहेम्या दुःखी होतो व तो काय करतो?

  5. ५. अर्तहशश्‍त राजा नहेम्याला दया कशी दाखवतो?

  6. ६. इस्राएल लोकांचे शत्रू बांधकाम ठप्प पाडू शकणार नाहीत म्हणून नहेम्या त्या कामाची व्यवस्था कशी करतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. नहेम्या १:४-६ आणि २:१-२० वाचा.

    नहेम्याने यहोवाचे मार्गदर्शन कसे मिळवले? (नहे. २:४, ५; रोम. १२:१२; १ पेत्र ४:७)

  2. २. नहेम्या ३:३-५ वाचा.

    तकोवाकर आणि त्यांचे ‘महाजन’ यांच्यात असलेल्या फरकातून आजचे वडील व सेवा सेवक कोणता धडा शिकू शकतात? (नहे. ३:५, २७; २ थेस्सलनी. ३:७-१०; १ पेत्र ५:५)

  3. ३. नहेम्या ४:१-२३ वाचा.

    1. (क) इस्राएल लोक कडा विरोध होत असूनही बांधकाम चालू ठेवण्यास कोणत्या गोष्टीमुळे प्रवृत्त झाले होते? (नहे. ४:६, ८, ९; स्तो. ५०:१५; यश. ६५:१३, १४)

    2. (ख) इस्राएलांचे उदाहरण आज आपल्या सर्वांना उत्तेजन कसे देते?

  4. ४. नहेम्या ६:१५ वाचा.

    दोन महिन्यात जेरूसलेमच्या भिंती बांधून झाल्या यावरून, विश्‍वासाच्या शक्‍तीविषयी आपण काय शिकतो? (स्तो. ५६:३, ४; मत्त. १७:२०; १९:२६)

कथा ८४

देवदूत मरीयेला भेट देतो

  1. १. चित्रात दिसणारी स्त्री कोण आहे?

  2. २. गब्रीएल मरीयेला काय सांगतो?

  3. ३. मरीया कोणा पुरुषाबरोबर राहिलेली नसतानाही तिला एक मूल होईल, हे गब्रीएल तिला कसे समजावून सांगतो?

  4. ४. मरीया जेव्हा तिच्या नात्यातल्या अलीशिबाला भेटायला जाते तेव्हा काय होते?

  5. ५. मरीयेला बाळ होणार आहे हे योसेफ ऐकतो तेव्हा त्याच्या मनात कोणता विचार येतो पण नंतर त्याचे मन का बदलते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. लूक १:२६-५६ वाचा.

    1. (क) देवाच्या पुत्राचे जीवन आत्मिक जगातून स्थलांतरीत करण्यात आले तेव्हा, मरीयेच्या बीजांडात आदामाकडून आलेल्या अपरिपूर्णतेविषयी लूक १:३५ मध्ये काय सूचित करण्यात आले आहे? (हाग्ग. २:११-१३; योहा. ६:६९; इब्री ७:२६; १०:५)

    2. (ख) येशूचा जन्म व्हायच्या आधीच त्याचा आदर कसा करण्यात आला? (लूक १:४१-४३)

    3. (ग) आज सेवेचे खास विशेषाधिकार मिळणाऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी मरीयेने कोणते उत्तम उदाहरण मांडले? (लूक १:३८, ४६-४९; १७:१०; नीति. ११:२)

  2. २. मत्तय १:१८-२५ वाचा.

    येशूला इम्मानुएल हे व्यक्‍तिगत नाव देण्यात आलेले नसले तरी, मानव म्हणून त्याने जी भूमिका बजावली त्यामुळे त्या नावाचा अर्थ कसा पूर्ण झाला? (मत्त. १:२२, २३; योहा. १४:८-१०; इब्री १:१-३)

कथा ८५

गोठ्यात येशूचा जन्म

  1. १. चित्रात दिसणारे तान्हे बाळ कोण आहे व मरीया त्याला कोठे ठेवत आहे?

  2. २. येशूचा जन्म गोठ्यात का झाला?

  3. ३. दुसऱ्‍या पानावरच्या चित्रात गोठ्यात शिरणारे हे लोक कोण आहेत व एका देवदूताने त्यांना काय सांगितले होते?

  4. ४. येशू इतका खास का आहे?

  5. ५. येशूला देवाचा पुत्र का म्हणता येते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. लूक २:१-२० वाचा.

    1. (क) येशूच्या जन्माविषयीच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत कैसर औगुस्त याची काय भूमिका होती? (लूक २:१-४; मीखा ५:२)

    2. (ख) ‘देवाचा प्रसाद’ पावलेल्या लोकांमध्ये आपलीही गणती व्हावी म्हणून आपण काय करू शकतो? (लूक २:१४; मत्त. १६:२४; योहा. १७:३; प्रे. कृत्ये ३:१९; इब्री ११:६)

    3. (ग) नम्र यहुदी मेंढपाळ जसे एका तारणकर्त्याच्या जन्मामुळे आनंद करू शकत होते तसेच आज देवाच्या सेवकांजवळ आनंद करण्याचे कोणते मोठे कारण आहे? (लूक २:१०, ११; इफिस. ३:८, ९; प्रकटी. ११:१५; १४:६)

कथा ८६

ताऱ्‍यानं वाट दाखवलेली माणसं

  1. १. चित्रातील ही माणसे कोण आहेत, त्यांपैकी एकजण एका चमकणाऱ्‍या ताऱ्‍याकडे बोट का दाखवत आहे?

  2. २. हेरोद राजा बेचैन का झाला आहे व तो काय करतो?

  3. ३. हा तारा त्या माणसांना कोठे घेऊन जातो व ते दुसऱ्‍या वाटेने आपल्या देशाला परत का जातात?

  4. ४. हेरोद कोणती आज्ञा देतो व का?

  5. ५. यहोवा योसेफाला काय करण्यास सांगतो?

  6. ६. हा नवीन तारा कोणी चमकायला लावला होता व का?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २:१-२३ वाचा.

    येशू किती मोठा होता आणि ज्योतिष त्याला पाहायला आले तेव्हा तो कोठे राहत होता? (मत्त. २:१, ११, १६)

कथा ८७

मंदिरात छोटा येशू

  1. १. चित्रात दाखवलेल्या येशूचे वय काय आहे व तो कोठे आहे?

  2. २. दर वर्षी योसेफ आपल्या कुटुंबाला कोठे नेतो?

  3. ३. प्रवासाचा एक दिवस सरल्यावर योसेफ व मरीया पुन्हा जेरूसलेमला का जातात?

  4. ४. योसेफ व मरीयेला येशू कोठे सापडतो व तेथील सर्व लोक थक्क का होतात?

  5. ५. येशू आपली आई मरीया हिला काय म्हणतो?

  6. ६. देवाबद्दल शिकण्याच्या बाबतीत आपण येशूसारखे कसे बनू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. लूक २:४१-५२ वाचा.

    1. (क) वार्षिक सणांना फक्‍त पुरुषांनी हजर असले पाहिजे असे नियमशास्त्रात म्हटले होते तरीपण योसेफ व मरीयेने आजच्या पालकांसाठी कोणते उदाहरण मांडले आहे? (लूक २:४१; अनु. १६:१६; ३१:१२; नीति. २२:६)

    2. (ख) आपल्या पालकांच्या अधीन राहण्याच्या बाबतीत येशूने आजच्या लहान मुलांसाठी उत्तम उदाहरण कसे मांडले आहे? (लूक २:५१; अनु. ५:१६; नीति. २३:२२; कलस्सै. ३:२०)

  2. २. मत्तय १३:५३-५६ वाचा.

    बायबलमध्ये येशूच्या कोणत्या चार भावांची नावे देण्यात आली आहेत व यांपैकी दोघांचा ख्रिस्ती मंडळीत कशा प्रकारे उपयोग करून घेण्यात आला? (मत्त. १३:५५; प्रे. कृत्ये १२:१७; १५:६, १३; २१:१८; गलती. १:१९; याको. १:१; यहु. १)

कथा ८८

योहान येशूला बाप्तिस्मा देतो

  1. १. चित्रात दिसणारी दोन माणसे कोण आहेत?

  2. २. बाप्तिस्मा कसा दिला जातो?

  3. ३. योहान सहसा कोणत्या लोकांना बाप्तिस्मा देतो?

  4. ४. कोणत्या खास कारणासाठी येशू योहानाने त्याला बाप्तिस्मा द्यावा असे सांगतो?

  5. ५. येशूने बाप्तिस्मा घेतल्याचे देवाला आवडले हे देवाने कसे दाखवले?

  6. ६. येशू जेव्हा ४० दिवस एकांत जागी निघून जातो तेव्हा काय होते?

  7. ७. येशूच्या पहिल्या अनुयायांची किंवा शिष्यांची नावे काय आहेत आणि येशूचा पहिला चमत्कार कोणता आहे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय ३:१३-१७ वाचा.

    बाप्तिस्मा कसा दिला पाहिजे याबद्दल येशू आपल्या शिष्यांसाठी कोणते उदाहरण मांडतो? (स्तो. ४०:७, ८; मत्त. २८:१९, २०; लूक ३:२१, २२)

  2. २. मत्तय ४:१-११ वाचा.

    येशू शास्त्रवचनांचा किती कुशलपणे उपयोग करतो यावरून बायबलचा नियमित अभ्यास करण्यास आपल्याला कशा प्रकारे उत्तेजन मिळते? (मत्त. ४:५-७; २ पेत्र ३:१७, १८; १ योहा. ४:१)

  3. ३. योहान १:२९-५१ वाचा.

    बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने आपल्या शिष्यांना कोणाकडे पाठवले व आज आपणही काय करू शकतो? (योहा. १:२९, ३५, ३६; ३:३०; मत्त. २३:१०)

  4. ४. योहान २:१-१२ वाचा.

    यहोवा आपल्या सेवकांना कोणतीही चांगली गोष्ट दिल्यावाचून राहात नाही, हे येशूच्या पहिल्या चमत्कारावरून कसे दिसले? (योहा. २:९, १०; स्तो. ८४:११; याको. १:१७)

कथा ८९

येशू मंदिराची सफाई करतो

  1. १. मंदिरात प्राणी का विकले जातात?

  2. २. येशूला कोणत्या गोष्टीचा राग येतो?

  3. ३. चित्रात दाखवल्याप्रमाणे, येशू काय करतो आणि कबुतरे विकणाऱ्‍या लोकांना तो कोणता हुकूम देतो?

  4. ४. येशू करत असलेल्या गोष्टी पाहिल्यावर त्याच्या शिष्यांना काय आठवते?

  5. ५. येशू गालीलला पुन्हा जाताना कोणत्या प्रांतातून जातो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. योहान २:१३-२५ वाचा.

    मंदिरामधल्या व्यापाऱ्‍यांना पाहून येशूला राग येतो त्यावरून, राज्य सभागृहात व्यापाराच्या गोष्टी करणे योग्य आहे किंवा नाही याविषयी आपण काय सांगू शकतो? (योहा. २:१५, १६; १ करिंथ. १०:२४, ३१-३३)

कथा ९०

स्त्री सोबत विहिरीपाशी

  1. १. येशू शोमरोनात एका विहिरीपाशी का थांबला आहे आणि तिथे असलेल्या स्त्रीला तो काय म्हणत आहे?

  2. २. त्या स्त्रीला या गोष्टीचे आश्‍चर्य का वाटते, येशू तिला काय म्हणतो व का?

  3. ३. येशू कोणत्या प्रकारच्या पाण्याविषयी बोलत आहे असे त्या स्त्रीला वाटते, पण तो नेमक्या कोणत्या प्रकारच्या पाण्याविषयी बोलत होता?

  4. ४. येशूला तिच्याविषयी जी माहिती असते ती ऐकून ती थक्क का होते व येशूला ही माहिती कोण देतो?

  5. ५. विहिरीपाशी असलेल्या स्त्रीबद्दलच्या अहवालावरून आपण काय शिकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. योहान ४:५-४३ वाचा.

    1. (क) येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करताना आपण, वेगळ्या वंशाच्या किंवा संस्कृतीच्या लोकांबद्दल कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे? (योहा. ४:९; १ करिंथ. ९:२२; १ तीम. २:३, ४; तीत २:११)

    2. (ख) येशूचे शिष्य बनणाऱ्‍यांना कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात? (योहा. ४:१४; यश. ५८:११; २ करिंथ. ४:१६)

    3. (ग) शोमरोनी स्त्रीने येशूकडून ऐकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यास जी उत्सुकता दाखवली तशीच आपणही कशी दाखवू शकतो? (योहा. ४:७, २८; मत्त. ६:३३; लूक १०:४०-४२)

कथा ९१

येशू डोंगरावर शिकवतो

  1. १. चित्रात येशू कोठे बसून शिकवत असलेला दिसतो आणि त्याच्या अगदी जवळ बसलेले कोण आहेत?

  2. २. येशूच्या १२ शिष्यांची नावे काय आहेत?

  3. ३. येशू ज्या राज्याचा प्रचार करत आहे ते राज्य नेमके काय आहे?

  4. ४. येशू लोकांना कशाविषयी प्रार्थना करायला शिकवतो?

  5. ५. लोकांनी एकमेकांना कसे वागवले पाहिजे याविषयी येशू काय सांगतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय ५:१-१२ वाचा.

    आपल्याला आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे हे आपण कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो? (मत्त. ५:३; रोम. १०:१३-१५; १ तीम. ४:१३, १५, १६)

  2. २. मत्तय ५:२१-२६ वाचा.

    मत्तय ५:२३, २४ हे वचन, बांधवांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाचा परिणाम यहोवाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर होतो यावर कशा प्रकारे जोर देते? (मत्त. ६:१४, १५; स्तो. १३३:१; कलस्सै. ३:१३; १ योहा. ४:२०)

  3. ३. मत्तय ६:१-८ वाचा.

    स्वतःला धार्मिक समजण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ज्यांपासून ख्रिश्‍चनांनी चार हात दूर असले पाहिजे? (लूक १८:११, १२; १ करिंथ. ४:६, ७; २ करिंथ. ९:७)

  4. ४. मत्तय ६:२५-३४ वाचा.

    आपल्या भौतिक गरजांविषयी यहोवावर भरवसा ठेवण्याबद्दल येशूने काय शिकवले? (निर्ग. १६:४; स्तो. ३७:२५; फिलिप्पै. ४:६)

  5. ५. मत्तय ७:१-१ १.

    मत्तय ७:५ मधील सचित्र दृष्टांतावरून आपण काय शिकतो? (नीति. २६:१२; रोम. २:१; १४:१०; याको. ४:११, १२)

कथा ९२

येशू मेलेल्यांना उठवतो

  1. १. चित्रात दिसणाऱ्‍या मुलीचे वडील कोण आहेत आणि या मुलीचे आईवडील काळजीत का पडले होते?

  2. २. येशूला भेटल्यावर याईर काय करतो?

  3. ३. येशू याईरच्या घरी जात असतो तेव्हा कोणती घटना घडते व याईरला त्याचा निरोप्या येऊन काय सांगतो?

  4. ४. याईरच्या घरात जमलेले लोक येशूच्या बोलण्यावर का हसतात?

  5. ५. येशू आपल्या तीन प्रेषितांना व मुलीच्या आईवडिलांना, मुलगी ज्या खोलीत आहे त्या खोलीत नेतो व त्यानंतर काय करतो?

  6. ६. येशूने आणखी कोणाला मेलेल्यातून उठवले होते व यावरून आपल्याला काय कळते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. लूक ८:४०-५६ वाचा.

    अंगावरून रक्‍त जात असलेल्या स्त्रीला येशूने कनवाळूपणा व समंजसपणा कसा दाखवला व यावरून ख्रिस्ती वडील कोणती गोष्ट शिकू शकतात? (लूक ८:४३, ४४, ४७, ४८; लेवी. १५:२५-२७; मत्त. ९:१२, १३; कलस्सै. ३:१२-१४)

  2. २. लूक ७:११-१७ वाचा.

    नाईन येथील विधवेला येशूने जी मदत केली होती त्यावरून, ज्यांच्या प्रिय जनांचा मृत्यू झाला आहे त्यांना सांत्वन का मिळू शकते? (लूक ७:१३; २ करिंथ. १:३, ४; इब्री ४:१५)

  3. ३. योहान ११:१७-४४ वाचा.

    प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपले रडणे हे साहजिक असते, हे येशूच्या उदाहरणावरून कसे कळते? (योहा. ११:३३-३६, ३८; २ शमु. १८:३३; १९:१-४)

कथा ९३

येशू अनेक लोकांना जेवू घालतो

  1. १. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाच्या बाबतीत कोणती भयंकर गोष्ट घडली आहे, आणि यामुळे येशूला कसे वाटते?

  2. २. येशू त्याच्या मागे आलेल्या जमावाच्या खाण्याची व्यवस्था कशी करतो व नंतर किती जेवण उरते?

  3. ३. शिष्य रात्रीचे का घाबरतात आणि पेत्राला काय होते?

  4. ४. येशू दुसऱ्‍यांदा हजारोंना जेवू कसे घालतो?

  5. ५. येशू जेव्हा देवाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करेल तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी करावी लागणार नाही?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय १४:१-३२ वाचा.

    1. (क) मत्तय १४:२३-३२ मधील अहवालावरून आपल्याला पेत्राच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी काय कळते?

    2. (ख) पेत्र प्रौढासारखा वागू लागला आणि त्याने आपला चंचल स्वभाव बदलला, हे शास्त्रवचनातील अहवालावरून कसे सूचित होते? (मत्त. १४:२७-३०; योहा. १८:१०; २१:७; प्रे. कृत्ये २:१४, ३७-४०; १ पेत्र ५:६, १०)

  2. २. मत्तय १५:२९-३८ वाचा.

    आपल्या पित्याकडून मिळालेल्या भौतिक गोष्टींबद्दल येशूने आदर कसा दाखवला? (मत्त. १५:३७; योहा. ६:१२; कलस्सै. ३:१५)

  3. ३. योहान ६:१-२ १.

    सरकारचा आदर करण्याच्या बाबतीत ख्रिश्‍चन आज येशूचे अनुकरण कसे करू शकतात? (योहा. ६:१५; मत्त. २२:२१; रोम. १२:२; १३:१-४)

कथा ९४

तो लहान मुलांवर प्रेम करतो

  1. १. दूरच्या प्रवासावरून परतत असताना वाटेत प्रेषितांमध्ये कोणता वाद चालला होता?

  2. २. येशू एका लहान मुलाला बोलवून त्याला प्रेषितांच्या समोर का उभे करतो?

  3. ३. कोणत्या बाबतीत प्रेषितांनी मुलांसारखे होण्यास शिकायचे होते?

  4. ४. येशूला लहान मुलांची काळजी आहे हे तो काही महिन्यांनंतर कसे दाखवून देतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न

  1. १. मत्तय १८:१-४ वाचा.

    येशूने शिकवताना दृष्टांताचा उपयोग का केला? (मत्त. १३:३४, ३६; मार्क ४:३३, ३४)

  2. २. मत्तय १९:१३-१५ वाचा.

    आपल्याला जर देवाच्या राज्यातील आशीर्वाद हवे असतील तर लहान मुलांतील कोणत्या गुणांचे आपण अनुकरण केले पाहिजे? (स्तो. २५:९; १३८:६; १ करिंथ. १४:२०)

  3. ३. मार्क ९:३३-३७ वाचा.

    मोठे पद मिळवण्याची आकांक्षा बाळगण्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना काय शिकवले? (मार्क ९:३५; मत्त. २०:२५, २६; गलती. ६:३; फिलिप्पै. २:५-८)

  4. ४. मार्क १०:१३-१६ वाचा.

    येशूजवळ कोण देखील यायला घाबरत नव्हते आणि त्याच्या उदाहरणावरून ख्रिस्ती वडील काय शिकू शकतात? (मार्क ६:३०-३४; फिलिप्पै. २:१-४; १ तीम. ४:१२)

कथा ९५

येशूची शिकवण्याची पद्धत

  1. १. एक माणूस येशूला कोणता प्रश्‍न विचारतो व का?

  2. २. कधीकधी येशू कशा प्रकारे शिकवायचा आणि यहुदी व शोमरोनी लोकांविषयी आपण आधीच काय शिकलो आहोत?

  3. ३. येशूने सांगितलेल्या गोष्टीत, यरीहोला जाणाऱ्‍या एका यहुदी माणसाला काय होते?

  4. ४. एक यहुदी याजक आणि नंतर एक लेवी त्या वाटेने येतो तेव्हा काय होते?

  5. ५. चित्रात, त्या जखमी यहुद्याला कोण मदत करत आहे?

  6. ६. गोष्ट संपल्यावर येशू कोणता प्रश्‍न विचारतो आणि तो माणूस काय उत्तर देतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. लूक १०:२५-३७ वाचा.

    1. (क) थेट उत्तर देण्याऐवजी येशूने नियमशास्त्रात पारंगत असलेल्या त्या माणसाला एखाद्या गोष्टीवर योग्यरीतीने विचार करण्यास मदत कशी केली? (लूक १०:२६; मत्त. १६:१३-१६)

    2. (ख) येशूने त्याच्या श्रोत्यांच्या मनातील पूर्वग्रहांवर मात करण्याकरता दृष्टांतांचा उपयोग कसा केला? (लूक १०:३६, ३७; १८:९-१४; तीत १:९)

कथा ९६

येशू आजाऱ्‍यांना बरे करतो

  1. १. देशभर प्रवास करताना येशू काय करतो?

  2. २. येशूचा बाप्तिस्मा होऊन सुमारे तीन वर्षांचा काळ उलटल्यावर तो आपल्या प्रेषितांना काय सांगतो?

  3. ३. चित्रात दिसणारे लोक कोण आहेत आणि येशू एका स्त्रीला बरे कसे करतो?

  4. ४. धार्मिक नेते येशूवर चिडून त्याला प्रश्‍न विचारतात तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने ते खजील का होतात?

  5. ५. येशू आणि त्याचे प्रेषित यरीहोजवळ असतात तेव्हा येशू दोन आंधळ्या भिकाऱ्‍यांना काय करतो?

  6. ६. येशू चमत्कार का करतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय १५:३०-३१ वाचा.

    येशूद्वारे यहोवाच्या शक्‍तीचे सुरेख प्रदर्शन कसे होते आणि नवीन जगाबद्दल यहोवाने जे वचन दिले आहे त्याचा आपल्या समजेवर परिणाम कसा झाला पाहिजे? (स्तो. ३७:२९; यश. ३३:२४)

  2. २. लूक १३:१०-१७ वाचा.

    शब्बाथ दिवशी येशूने केलेल्या काही उल्लेखनीय चमत्कारांवरून आपल्याला, त्याच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान तो मानवजातीची कशा प्रकारे सुटका करेल याविषयी काय समजते? (लूक १३:१०-१३; स्तो. ४६:९; मत्त. १२:८; कलस्सै. २:१६, १७; प्रकटी. २१:१-४)

  3. ३. मत्तय २०:२९-३४ वाचा.

    लोकांना मदत करण्यासाठी येशू नेहमीच तयार होता हे या अहवालावरून कसे दिसते आणि यावरून आपण काय शिकतो? (अनु. १५:७; याको. २:१५, १६; १ योहा. ३:१७)

कथा ९७

येशू राजाच्या रूपात येतो

  1. १. येशू जेरूसलेमजवळच्या एका लहान गावात येतो तेव्हा तो आपल्या शिष्यांना काय सांगतो?

  2. २. चित्रात दिसते त्याप्रमाणे येशू जेरूसलेम शहराच्या जवळ येतो तेव्हा काय होते?

  3. ३. येशू आंधळ्या व पांगळ्या लोकांना बरे करत असलेले पाहून लहान मुले काय करतात?

  4. ४. चिडलेल्या याजकांना येशू काय म्हणतो?

  5. ५. येशूची स्तुती करणाऱ्‍या मुलांसारखे आपण कसे बनू शकतो?

  6. ६. येशूच्या शिष्यांना काय माहीत करून घ्यायचे होते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २१:१-१७ वाचा.

    1. (क) येशूचे राजा बनल्यानंतर जेरूसलेमेतील त्याचे आगमन आणि रोमन काळांतील विजयी सेनापतींचे आगमन यांत कोणता फरक होता? (मत्त. २१:४, ५; जख. ९:९; फिलिप्पै. २:५-८; कलस्सै. २:१५)

    2. (ख) येशूने मंदिरात प्रवेश केल्याबरोबर स्तोत्र ११८ मधील शब्द उच्चारणाऱ्‍या इस्राएली मुलांकडून तरुण जन कोणता धडा शिकू शकतात? (मत्त. २१:९, १५; स्तो. ११८:२५, २६; २ तीम. ३:१५; २ पेत्र ३:१८)

  2. २. योहान १२:१२-१६ वाचा.

    येशूच्या स्तुतीचा गजर करणाऱ्‍यांनी हातात घेतलेल्या खजुरीच्या डहाळ्या कशास सूचित करतात? (योहा. १२:१३; फिलिप्पै. २:१०; प्रकटी. ७:९, १०)

कथा ९८

जैतुनांच्या डोंगरावर

  1. १. चित्रात दिसणाऱ्‍या लोकांपैकी येशू कोण आहे व त्याच्याबरोबर दुसरे कोण आहेत?

  2. २. येशू मंदिरात होता तेव्हा याजकांनी काय करण्याचा प्रयत्न केला व तो त्यांना काय म्हणाला?

  3. ३. येशूचे प्रेषित त्याला काय विचारतात?

  4. ४. स्वर्गात राजा म्हणून शासन करताना पृथ्वीवर घडणाऱ्‍या घटनातल्या काही घटना येशू आपल्या प्रेषितांना का सांगतो?

  5. ५. पृथ्वीवरच्या सर्व दुष्टपणाचा शेवट होण्याआधी काय होईल असे येशू म्हणतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २३:१-३९ वाचा.

    1. (क) लौकिक पदांचा वापर करणे उचित आहे हे शास्त्रवचनांतून सूचित होत असले तरीसुद्धा मत्तय २३:८-११ मधील येशूचे शब्द, ख्रिस्ती मंडळीत खुशामत करणाऱ्‍या मोठमोठ्या पदांचा वापर करण्याविषयी काय सूचित करतात? (प्रे. कृत्ये २६:२५; रोम. १३:७; १ पेत्र २:१३, १४)

    2. (ख) लोकांनी ख्रिश्‍चन बनू नये म्हणून परुशांनी कशाचा उपयोग केला आणि आधुनिक काळांत धार्मिक नेत्यांनी अशाच प्रकारच्या युक्‍त्‌यांचा उपयोग कसा केला आहे? (मत्त. २३:१३; लूक ११:५२; योहा. ९:२२; १२:४२; १ थेस्सलनी. २:१६)

  2. २. मत्तय २४:१-१४ वाचा.

    1. (क) मत्तय २४:१३ मध्ये धीर धरण्याच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर देण्यात आला आहे?

    2. (ख) मत्तय २४:१३ मधील ‘शेवट’ या शब्दाचा अर्थ काय होतो? (मत्त. २४:१३; १६:२७; रोम. १४:१०-१२; २ करिंथ. ५:१०)

  3. ३. मार्क १३:३-१० वाचा.

    मार्क १३:१० मधील कोणत्या शब्दप्रयोगांवरून, सुवार्तेचे प्रचार कार्य करणे निकडीचे असल्याचे कळते आणि येशूच्या शब्दांचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे? (रोम. १३:११, १२; १ करिंथ. ७:२९-३१; २ तीम. ४:२)

कथा ९९

माडीवरच्या खोलीत

  1. १. चित्रात दिसते त्याप्रमाणे येशू आणि त्याचे १२ प्रेषित माडीवरच्या मोठ्या खोलीत का आहेत?

  2. २. खोलीतून बाहेर चाललेला मनुष्य कोण आहे व तो कोठे चालला आहे?

  3. ३. वल्हांडणाचे भोजन संपल्यावर येशू कोणत्या खास भोजनास सुरुवात करतो?

  4. ४. वल्हांडणाच्या सणामुळे इस्राएली लोकांना कोणत्या घटनेची आठवण झाली व हे खास भोजन येशूच्या अनुयायांना कशाची आठवण करून देते?

  5. ५. प्रभूच्या सांज भोजनानंतर येशू आपल्या अनुयायांना काय सांगतो आणि ते काय करतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २६:१४-३० वाचा.

    1. (क) मत्तय २६:१५ या वचनातून, यहुदाने येशूचा मुद्दामहून विश्‍वासघात केला हे कसे कळते?

    2. (ख) येशूने वाहिलेल्या रक्‍ताने कोणते दोन उद्देश साध्य होतात? (मत्त. २६:२७, २८; यिर्म. ३१:३१-३३; इफिस. १:७; इब्री ९:१९, २०)

  2. २. लूक २२:१-३९ वाचा.

    कोणत्या अर्थाने सैतान यहुदात शिरला? (लूक २२:३; योहा. १३:२; प्रे. कृत्ये १:२४, २५)

  3. ३. योहान १३:१-२० वाचा.

    1. (क) योहान १३:२ मधील अहवालानुसार यहुदाने जे काही केले त्याबद्दल त्याला दोषी ठरवता येते का व देवाचे सेवक यावरून कोणता धडा शिकू शकतात? (उत्प. ४:७; २ करिंथ. २:११; गलती. ६:१; याको. १:१३, १४)

    2. (ख) येशूने कोणता प्रभावशाली वस्तुपाठ दिला? (योहा. १३:१५; मत्त. २३:११; १ पेत्र २:२१)

  4. ४. योहान १७:१-२६ वाचा.

    आपल्या अनुयायांनी कोणत्या अर्थाने “एक व्हावे” अशी येशूने प्रार्थना केली? (योहा. १७:११, २१-२३; रोम. १३:८; १४:१९; कलस्सै. ३:१४)

कथा १००

बागेत येशू

  1. १. माडीवरची खोली सोडल्यावर येशू आणि त्याचे प्रेषित कोठे येतात आणि येशू त्यांना काय करायला सांगतो?

  2. २. येशू त्याचे प्रेषित असतात तेथे येतो तेव्हा ते काय करत असल्याचे तो पाहतो, आणि असे कितींदा होते?

  3. ३. बागेत कोण येतात व चित्रात दाखवल्याप्रमाणे यहुदा इस्कर्योत काय करतो?

  4. ४. यहुदा येशूचा मुका का घेतो आणि पेत्र काय करतो?

  5. ५. येशू पेत्राला काय म्हणतो, पण येशू देवाला स्वर्गदूत पाठवायला का सांगत नाही?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २६:३६-५६ वाचा.

    1. (क) आपल्या शिष्यांना समजावण्याची येशूची पद्धत आजच्या ख्रिस्ती वडिलांसाठी उत्तम उदाहरण का आहे? (मत्त. २०:२५-२८; २६:४०, ४१; गलती. ५:१७; इफिस. ४:२९, ३१, ३२)

    2. (ख) सहमानवाविरुद्ध शस्त्र चालवण्याच्या बाबतीत येशूचा काय दृष्टिकोन आहे? (मत्त. २६:५२; लूक ६:२७, २८; योहा. १८:३६)

  2. २. लूक २२:३९-५३ वाचा.

    गेथशेमानेच्या बागेत एक देवदूत येऊन येशूला शक्‍ती देतो यावरून येशू विश्‍वासात डळमळत असल्याचे सूचित होते का? स्पष्टीकरण द्या. (लूक २२:४१-४३; यश. ४९:८; मत्त. ४:१०, ११; इब्री ५:७)

  3. ३. योहान १८:१-१२ वाचा.

    येशूने आपल्या शिष्यांना विरोधकांपासून कसे वाचवले आणि या उदाहरणावरून आपण कोणती गोष्ट शिकतो? (योहा. १०:११, १२; १८:१, ६-९; इब्री १३:६; याको. २:२५)

कथा १०१

येशू मारला जातो

  1. १. येशूच्या मृत्यूस प्रामुख्याने कोण जबाबदार आहे?

  2. २. धार्मिक नेते येशूला पकडून नेतात तेव्हा प्रेषित काय करतात?

  3. ३. महायाजक कयफा याच्या घरी काय होते?

  4. ४. पेत्र दूर जाऊन का रडतो?

  5. ५. येशूला पुन्हा एकदा पिलाताच्या हवाली केले जाते तेव्हा त्याला काय करावे असे महायाजक ओरडत असतात?

  6. ६. शुक्रवारी दुपारी येशूला काय केले जाते आणि त्याच्या शेजारी खांबावर टांगलेल्या अपराध्याला तो काय वचन देतो?

  7. ७. येशू ज्या परादीसविषयी बोलला होता ते कोठे असेल?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २६:५७-७५ वाचा.

    यहुदी न्यायसभेच्या सदस्यांची अंतःकरणे किती कपटी होती हे कसे दिसून आले? (मत्त. २६:५९, ६७, ६८)

  2. २. मत्तय २७:१-५० वाचा.

    यहुदाला झालेला पश्‍चात्ताप खरा नव्हता असे आपण का म्हणू शकतो? (मत्त. २७:३, ४; मार्क ३:२९; १४:२१; २ करिंथ. ७:१०, ११)

  3. ३. लूक २२:५४-७१ वाचा.

    येशूचा विश्‍वासघात झाला व त्याला अटक करण्यात आलेल्या रात्री पेत्राने त्याला नाकारले यावरून आपण कोणता धडा शिकतो? (लूक २२:६०-६२; मत्त. २६:३१-३५; १ करिंथ. १०:१२)

  4. ४. लूक २३:१-४९ वाचा.

    येशूविरुद्ध झालेल्या अन्यायांबद्दल त्याची प्रतिक्रिया कशी होती व यावरून आपण कोणता धडा शिकतो? (लूक २३:३३, ३४; रोम. १२:१७-१९; १ पेत्र २:२३)

  5. ५. योहान १८:१२-४० वाचा.

    मनुष्याच्या भीतीमुळे पेत्र काही काळासाठी गर्भगळीत झाला तरी नंतर तो एक उल्लेखनीय प्रेषित बनला यावरून काय समजते? (योहा. १८:२५-२७; १ करिंथ. ४:२; १ पेत्र ३:१४, १५; ५:८, ९)

  6. ६. योहान १९:१-३० वाचा.

    1. (क) भौतिक गोष्टींविषयी येशूने संतुलित दृष्टिकोन कसा बाळगला? (योहा. २:१, २, ९, १०; १९:२३, २४; मत्त. ६:३१, ३२; ८:२०)

    2. (ख) येशूने आपल्या जीवनाच्या शेवटच्या घटकेला उच्चारलेल्या शब्दांवरून यहोवाचे सार्वभौमत्व कसे उंचावण्यात आले? (योहा. १६:३३; १९:३०; २ पेत्र ३:१४; १ योहा. ५:४)

कथा १०२

येशू जिवंत आहे

  1. १. चित्रात दिसणारी स्त्री व ते दोन पुरुष कोण आहेत आणि हे सर्व जण कोठे आहेत?

  2. २. येशूच्या कबरेवर पहारा ठेवण्यासाठी सैनिकांना पाठवा, असे पिलात याजकांना का सांगतो?

  3. ३. येशूला मरून तीन दिवस झाल्यानंतर, तिसऱ्‍या दिवशी पहाटे एक देवदूत काय करतो, पण याजक काय करतात?

  4. ४. काही स्त्रिया येशूची कबर पाहायला येतात तेव्हा त्यांना आश्‍चर्य का वाटते?

  5. ५. पेत्र व योहान येशूच्या कबरेकडे का धावतात, पण तिथे गेल्यावर त्यांना काय दिसते?

  6. ६. येशूच्या शरीराचे काय होते, पण तो जिवंत आहे हे आपल्या शिष्यांना दाखवण्यासाठी तो काय करतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. मत्तय २७:६२-६६ आणि २८:१-१५ वाचा.

    येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळी महायाजक, परुशी आणि वडिलांनी पवित्र आत्म्याविरुद्ध पाप कसे केले? (मत्त. १२:२४, ३१, ३२; २८:११-१५)

  2. २. लूक २४:१-१२ वाचा.

    स्त्रियांना देखील यहोवा विश्‍वसनीय साक्षी समजतो, हे येशूच्या पुनरुत्थानाच्या अहवालावरून आपल्याला कसे कळते? (लूक २४:४, ९, १०; मत्त. २८:१-७)

  3. ३. योहान २०:१-१२ वाचा.

    एखाद्या बायबल भविष्यावाणीची पूर्णता आपल्याला चांगल्याप्रकारे समजली नसेल तर आपण धीर धरावा हे योहान २०:८, ९ या वचनांनुसार कसे कळते? (नीति. ४:१८; मत्त. १७:२२, २३; लूक २४:५-८; योहा. १६:१२)

कथा १०३

बंद खोलीच्या आत

  1. १. मरीया ज्याला माळी समजते त्या मनुष्याला ती काय म्हणते, पण तो मनुष्य येशूच आहे हे तिला केव्हा कळते?

  2. २. अम्माऊसच्या गावाला दोन शिष्य जात असतात तेव्हा वाटेत काय होते?

  3. ३. आपण येशूला पाहिले असे जेव्हा हे दोन शिष्य प्रेषितांना सांगतात तेव्हा कोणती आश्‍चर्याची गोष्ट घडते?

  4. ४. येशूने आपल्या अनुयायांना कितीवेळा दर्शन दिले?

  5. ५. आपण प्रभूला पाहिले असे जेव्हा शिष्य म्हणतात तेव्हा थोमा काय म्हणतो, पण आठ दिवसांनंतर काय घडते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. योहान २०:११-२९ वाचा.

    मानवांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, असे येशू योहान २०:२३ मध्ये म्हणत होता का? स्पष्टीकरण द्या. (स्तो. ४९:२, ७; यश. ५५:७; १ तीम. २:५, ६; १ योहा. २:१, २)

  2. २. लूक २४:१३-४३ वाचा.

    बायबलमधील सत्ये स्वीकारण्याकरता आपण आपले हृदय तयार कसे करू शकतो? (लूक २४:३२, ३३; एज्रा ७:१०; मत्त. ५:३; प्रे. कृत्ये १६:१४; इब्री ५:११-१४)

कथा १०४

येशू स्वर्गाला परत जातो

  1. १. एकदा किती शिष्य येशूला पाहतात आणि तो त्यांच्याशी कशाबद्दल बोलतो?

  2. २. देवाचे राज्य म्हणजे काय आणि येशू स्वर्गात राजा म्हणून हजार वर्ष शासन करील तेव्हा पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल?

  3. ३. येशू किती दिवस आपल्या शिष्यांना दर्शन देत होता व आता कोणती वेळ जवळ आली होती?

  4. ४. आपल्या शिष्यांना सोडण्यापूर्वी येशू त्यांना काय करण्यास सांगतो?

  5. ५. चित्रात आपण काय पाहतो व येशू दृष्टिआड कसा होतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. पहिले करिंथकर १५:३-८ वाचा.

    प्रेषित पौल येशूच्या पुनरुत्थानाविषयी इतक्या आत्मविश्‍वासाने कसा काय बोलत होता आणि आज ख्रिस्ती कोणत्या गोष्टींविषयी आत्मविश्‍वासाने बोलू शकतात? (१ करिंथ. १५:४, ७, ८; यश. २:२, ३; मत्त. २४:१४; २ तीम. ३:१-५)

  2. २. प्रेषितांची कृत्ये १:१-११ वाचा.

    प्रेषितांची कृत्ये १:८ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे प्रचाराचे कार्य किती दूरपर्यंत पसरले आहे? (प्रे. कृत्ये ६:७; ९:३१; ११:१९-२१; कलस्सै. १:२३)

कथा १०५

जेरूसलेममध्ये वाट पाहणं

  1. १. चित्रात दिसत असल्याप्रमाणे जेरूसलेमेत वाट पाहत राहिलेल्या येशूच्या अनुयायांना काय होते?

  2. २. जेरूसलेमेत आलेल्या पाहुण्यांना कोणते एक अद्‌भुत वरदान मिळते?

  3. ३. पेत्र लोकांना काय समजावून सांगतो?

  4. ४. पेत्राचे भाषण ऐकल्यावर लोकांना कसे वाटते व तो त्यांना काय करण्यास सांगतो?

  5. ५. सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी किती लोक बाप्तिस्मा घेतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये २:१-४७ वाचा.

    1. (क) येशूच्या मृत्यूस संपूर्ण यहुदी राष्ट्र जबाबदार होते हे प्रेषितांची कृत्ये २:२३, ३६ मधील पेत्राच्या शब्दांवरून कसे कळते? (१ थेस्सलनी. २:१४, १५)

    2. (ख) शास्त्रवचनांतून तर्क करण्याच्याबाबतीत पेत्राने उत्तम उदाहरण कसे मांडले? (प्रे. कृत्ये २:१६, १७, २९, ३१, ३६, ३९; कलस्सै. ४:६)

    3. (ग) येशूने पेत्राला “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” देण्याविषयी जे वचन दिले होते त्यापैकी पहिली किल्ली पेत्राने कशी वापरली? (प्रे. कृत्ये २:१४, २२-२४, ३७, ३८; मत्त. १६:१९)

कथा १०६

तुरुंगातून सुटका

  1. १. पेत्र आणि योहान एकदा दुपारी मंदिरात शिरत असताना काय घडते?

  2. २. पेत्र एका पांगळ्या मनुष्याला काय म्हणतो आणि पेत्र त्याला पैसे नव्हे तर पैशापेक्षा मौल्यवान काय देतो?

  3. ३. धार्मिक नेत्यांना चीड का आली आहे आणि ते पेत्र व योहानाला काय करतात?

  4. ४. पेत्र या धार्मिक नेत्यांना काय सांगतो आणि प्रेषितांना कोणती ताकीद दिली जाते?

  5. ५. धार्मिक नेत्यांचा जळफळाट का होतो पण प्रेषितांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकल्यावर काय होते?

  6. ६. प्रेषितांना सन्हेद्रीनमध्ये आणले जाते तेव्हा ते कशा प्रकारे उत्तर देतात?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये ३:१-१० वाचा.

    आज आपल्याला चमत्कार करण्याची शक्‍ती देण्यात आलेली नसली तरीसुद्धा प्रेषितांची कृत्ये ३:६ मधील पेत्राचे शब्द आपल्याला राज्य संदेशाच्या मूल्याची कदर करण्यास मदत कशी करतात? (योहा. १७:३; २ करिंथ. ५:१८-२०; फिलिप्पै. ३:८)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ४:१-३१ वाचा.

    सेवेमध्ये जेव्हा आपण विरोधाचा सामना करतो तेव्हा पहिल्या शतकातील आपल्या ख्रिस्ती बांधवांचे आपण अनुकरण कसे करू शकतो? (प्रे. कृत्ये ४:२९, ३१; इफिस. ६:१८-२०; १ थेस्सलनी. २:२)

  3. ३. प्रेषितांची कृत्ये ५:१७-४२ वाचा.

    गत व सद्य काळात, साक्षीदार नसलेल्या काही लोकांनी प्रचाराच्या कार्याबाबत समंजसपणा कसा दाखवला आहे? (प्रे. कृत्ये ५:३४-३९)

कथा १०७

स्तेफनाला दगडमार होतो

  1. १. स्तेफन कोण आहे, आणि देव त्याला काय करण्यास मदत करत आहे?

  2. २. स्तेफन असे काय म्हणतो ज्यामुळे धार्मिक नेते त्याच्यावर खूप चिडतात?

  3. ३. स्तेफनाला शहराच्या बाहेर खेचून नेल्यानंतर लोक काय करतात?

  4. ४. चित्रात, ज्याच्या पायाजवळ अंगरखे ठेवलेले आहेत तो तरुण कोण आहे?

  5. ५. स्तेफनाने शेवटला श्‍वास घेण्याआधी यहोवाला काय प्रार्थना केली?

  6. ६. कोणी आपले वाईट केले तर स्तेफनाच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपणही काय करू शकतो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये ६:८-१५ वाचा.

    यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांचे प्रचार कार्य थांबवावे म्हणून धार्मिक नेत्यांनी कोणकोणत्या फसव्या युक्‍त्‌या अवलंबिल्या आहेत? (प्रे. कृत्ये ६:९, ११, १३)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ७:१-६० वाचा.

    1. (क) कोणत्या कारणामुळे स्तेफन सन्हेद्रीनमध्ये सुवार्तेचे प्रभावकारकपणे समर्थन करू शकला व त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (प्रे. कृत्ये ७:५१-५३; रोम. १५:४; २ तीम. ३:१४-१७; १ पेत्र ३:१५)

    2. (ख) आपल्या कामाचा विरोध करणाऱ्‍यांबद्दल आपण कोणती मनोवृत्ती बाळगू शकतो? (प्रे. कृत्ये ७:५८-६०; मत्त. ५:४४; लूक २३:३३, ३४)

कथा १०८

दमास्कसच्या वाटेवर

  1. १. स्तेफनाला ठार मारल्यानंतर शौल काय करतो?

  2. २. शौल दमास्कसला जात असताना कोणती आश्‍चर्याची गोष्ट घडते?

  3. ३. येशू शौलाला काय करण्यास सांगतो?

  4. ४. येशू हनन्यास कोणत्या सूचना देतो व शौलाला त्याची दृष्टी पुन्हा कशी प्राप्त होते?

  5. ५. शौलाला कोणत्या नावाने ओळखले जाते व शौलाचा कशा प्रकारे उपयोग केला जातो?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये ८:१-४ वाचा.

    नव्याने तयार झालेल्या ख्रिस्ती मंडळीवर छळाची लाट आल्यामुळे ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसार कसा होतो व आधुनिक दिवसांतही कोणती अशीच गोष्ट घडली आहे? (प्रे. कृत्ये ८:४; यश. ५४:१७)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ९:१-२० वाचा.

    शौलाच्या बाबतीत येशूच्या मनात कोणती तीन पदरी कामगिरी होती जी त्याने प्रकट केली? (प्रे. कृत्ये ९:१५; १३:५; २६:१; २७:२४; रोम. ११:१३)

  3. ३. प्रेषितांची कृत्ये २२:६-१६ वाचा.

    आपण हनन्याप्रमाणे कसे बनू शकतो व हे महत्त्वाचे का आहे? (प्रे. कृत्ये २२:१२; १ तीम. ३:७; १ पेत्र १:१४-१६; २:१२)

  4. ४. प्रेषितांची कृत्ये २६:८-२० वाचा.

    शौलाचे ख्रिस्ती धर्म स्वीकारणे हे, आज ज्यांचे वैवाहिक सोबती सत्यात नाहीत अशांसाठी उत्तेजन कसे आहे? (प्रे. कृत्ये २६:११; १ तीम. १:१४-१६; २ तीम. ४:२; १ पेत्र ३:१-३)

कथा १०९

पेत्र कर्नेल्याला भेट देतो

  1. १. या चित्रात पाया पडत असलेला मनुष्य कोण आहे?

  2. २. एक देवदूत कर्नेल्याला काय सांगतो?

  3. ३. यापो येथे शिमोनाच्या घराच्या धाब्यावर असताना देव पेत्राला काय भासवतो?

  4. ४. कर्नेल्य जेव्हा पेत्राच्या पाया पडून त्याची उपासना करू लागतो तेव्हा पेत्र त्याला काय सांगतो?

  5. ५. पेत्राबरोबर असलेल्या यहुदी शिष्यांना आश्‍चर्य का वाटते?

  6. ६. पेत्राने कर्नेल्याला दिलेल्या भेटीवरून आपण कोणता धडा शिकला पाहिजे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये १०:१-४८ वाचा.

    प्रेषितांची कृत्ये १०:४२ मधील पेत्राचे शब्द, राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराविषयी काय सांगतात? (मत्त. २८:१९; मार्क १३:१०; प्रे. कृत्ये १:८)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ११:१-१८ वाचा.

    विदेशांविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे जेव्हा पेत्राला समजले तेव्हा त्याने कोणती मनोवृत्ती दाखवली व आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? (प्रे. कृत्ये ११:१७, १८; २ करिंथ. १०:५; इफिस. ५:१७)

कथा ११०

तीमथ्य—पौलाचा नवा मदतनीस

  1. १. चित्रात दिसणारा तरुण कोण आहे, तो कोठे राहतो आणि त्याच्या आई व आजीचे नाव काय आहे?

  2. २. पौलाने जेव्हा तीमथ्याला, दूर देशाच्या लोकांना प्रचार करण्याकरता माझ्या व सीलाबरोबर तूही येशील का, असे विचारले तेव्हा त्याने काय उत्तर दिले?

  3. ३. येशूच्या अनुयायांना प्रथमच ख्रिस्ती कोठे म्हणण्यात आले?

  4. ४. पौल, सीला आणि तीमथ्य लुस्त्र सोडल्यावर आणखी कोणकोणत्या शहरांना भेट देतात?

  5. ५. तीमथ्य पौलाला मदत कशी करतो आणि तरुणांनी आज स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये ९:१९-३० वाचा.

    सुवार्तेचा प्रचार करताना लोकांनी पौलाचा विरोध केला तेव्हा त्याने सावधगिरी कशी बाळगली? (प्रे. कृत्ये ९:२२-२५, २९, ३०; मत्त. १०:१६)

  2. २. प्रेषितांची कृत्ये ११:१९-२६ वाचा.

    यहोवाचा आत्मा प्रचारकार्याला मार्गदर्शन देतो हे प्रेषितांची कृत्ये ११:१९-२१, २६ मधील अहवालावरून कसे दिसून येते?

  3. ३. प्रेषितांची कृत्ये १३:१३-१६, ४२-५२ वाचा.

    शिष्यांचा विरोध झाला तेव्हा ते निरुत्साहित झाले नाहीत, हे प्रेषितांची कृत्ये १३:५१, ५२ या वचनांवरून कसे दिसते? (मत्त. १०:१४; प्रे. कृत्ये १८:६; १ पेत्र ४:१४)

  4. ४. प्रेषितांची कृत्ये १४:१-६, १९-२८ वाचा.

    “ज्या प्रभूवर त्यांनी विश्‍वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले” या वाक्यांशावरून आपल्याला, नवीन लोकांना सत्य शिकण्यास मदत करताना मनात कोणतीही चिंता न बाळगण्यास कशी मदत मिळते? (प्रे. कृत्ये १४:२१-२३; २०:३२; योहा. ६:४४)

  5. ५. प्रेषितांची कृत्ये १६:१-५ वाचा.

    तीमथ्याने सुंता करून घेण्याची तयारी दाखवली यावरून ‘सर्व काही सुवार्तेकरिता करण्याच्या’ महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला जातो? (प्रे. कृत्ये १६:३; १ करिंथ. ९:२३; १ थेस्सलनी. २:८)

  6. ६. प्रेषितांची कृत्ये १८:१-११, १८-२२ वाचा.

    प्रचारकार्यास मार्गदर्शन देण्यात येशू व्यक्‍तिशः भाग घेतो हे प्रेषितांची कृत्ये १८:९, १० यावरून कसे सूचित होते व यामुळे आज आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते? (मत्त. २८:२०)

कथा १११

झोपी गेलेला मुलगा

  1. १. चित्रात दिसत असल्याप्रमाणे जमिनीवर पडलेला मुलगा कोण आहे आणि त्याला काय झाले आहे?

  2. २. हा मुलगा मरण पावला आहे हे पाहिल्यावर पौल काय करतो?

  3. ३. पौल, तीमथ्य आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारे कोठे जात आहेत व ते मिलेत येथे थांबतात तेव्हा काय होते?

  4. ४. अगब संदेष्टा पौलास कोणता इशारा देतो व संदेष्ट्याने म्हटल्याप्रमाणेच काय घडते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये २०:७-३८ वाचा.

    1. (क) प्रेषितांची कृत्ये २०:२६, २७ मधील पौलाच्या शब्दांप्रमाणे आपण “सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी” कसे राहू शकतो? (यहे. ३३:८; प्रे. कृत्ये १८:६, ७)

    2. (ख) शिकवताना वडिलांनी “जे विश्‍वसनीय वचन त्याला धरून” का राहिले पाहिजे? (प्रे. कृत्ये २०:१७, २९, ३०; तीत १:७-९; २ तीम. १:१३)

  2. २. प्रेषितांची कृत्ये २६:२४-३२ वाचा.

    येशूकडून मिळालेली प्रचाराची कामगिरी पूर्ण करण्याकरता पौलाने त्याच्या रोमन नागरिकत्वाचा उपयोग कसा करून घेतला? (प्रे. कृत्ये ९:१५; १६:३७, ३८; २५:११, १२; २६:३२; लूक २१:१२, १३)

कथा ११२

जहाज फुटून बेटाला लागणं

  1. १. पौल ज्या नावेत आहे ती नाव क्रीट बेटाजवळून जात असताना काय होते?

  2. २. नावेत असलेल्यांना पौल काय म्हणतो?

  3. ३. नावेचे तुकडे का होऊ लागतात?

  4. ४. नावेतला सैन्याधिकारी कोणत्या सूचना देतो व किनाऱ्‍यावर किती लोक सुखरूप पोहंचतात?

  5. ५. ते कोणत्या बेटावर येऊन थांबतात आणि हवामान सुधारल्यावर पौलाला कोठे नेले जाते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये २७:१-४४ वाचा.

    पौलाच्या रोमच्या प्रवासाचे वर्णन वाचत असताना बायबलमधील या अचूक अहवालावरील आपला भरवसा आणखी कसा वाढतो? (प्रे. कृत्ये २७:१६-१९, २७-३२; लूक १:३; २ तीम. ३:१६, १७)

  2. २. प्रेषितांची कृत्ये २८:१-१४ वाचा.

    प्रेषित पौलाला व तुटलेल्या नावेतून वाचलेल्या पौलाच्या सोबत्यांना माल्टाच्या मूर्तीपूजक रहिवाशांनी जर “विशेष उपकार केले” तर आज ख्रिश्‍चनांनी काय करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे व कशाप्रकारे? (प्रे. कृत्ये २८:१, २; इब्री १३:१, २; १ पेत्र ४:९)

कथा ११३

रोममध्ये पौल

  1. १. रोममध्ये कैदेत असताना पौल कोणाला उपदेश देतो?

  2. २. चित्रातील टेबलापाशी असलेला पाहुणा कोण आहे व तो पौलाला कोणती मदत करत आहे?

  3. ३. एपफ्रदीत कोण आहे व तो फिलिप्पैला परत जाताना सोबत काय नेतो?

  4. ४. पौल फिलेमोन नावाच्या त्याच्या जिवलग मित्राला पत्र का लिहितो?

  5. ५. पौलाला तुरुंगातून सोडल्यानंतर तो काय करतो व नंतर पौलाचे काय होते?

  6. ६. बायबलची शेवटची पुस्तके लिहिण्याकरता यहोवा देव कोणाचा उपयोग करतो व प्रकटीकरणाचे पुस्तक कशाविषयी सांगते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रेषितांची कृत्ये २८:१६-३१ आणि फिलिप्पैकर १:१३ वाचा.

    रोममधील तुरुंगात असताना पौलाने आपल्या वेळेचा कशा प्रकारे उपयोग केला व त्याच्या अढळ विश्‍वासाचा ख्रिस्ती मंडळीवर कोणता परिणाम झाला? (प्रे. कृत्ये २८:२३, ३०; फिलिप्पै. १:१४)

  2. २. फिलिप्पैकर २:१९-३० वाचा.

    तीमथ्य व एपफ्रदीत यांच्यासंबंधाने पौलाने कोणते प्रशंसोद्‌गार काढले व याबाबतीत आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? (फिलिप्पै. २:२०, २२, २५, २९, ३०; १ करिंथ. १६:१८; १ थेस्सलनी. ५:१२, १३)

  3. ३. फिलेमोन १-२५ वाचा.

    1. (क) पौलाने कशाच्या आधारावर फिलेमोनाला जे बरोबर आहे ते करण्याचा आग्रह केला व हे आजच्या वडिलांसाठी एक उत्तम मार्गदर्शक कसे आहे? (फिले. ९; २ करिंथ. ८:८; गलती. ५:१३)

    2. (ख) पौलाने मंडळीतल्या इतरांच्या विवेकाचा आदर केला हे फिलेमोन १३, १४ मधील त्याच्या शब्दांवरून कसे दिसून येते? (१ करिंथ. ८:७, १३; १०:३१-३३)

  4. ४. दुसरे तीमथ्य ४:७-९ वाचा.

    आपण जर शेवटपर्यंत विश्‍वासू राहिलो तर यहोवा आपल्याला प्रतिफळ देईल असा प्रेषित पौलाप्रमाणे भरवसा आपण कसा बाळगू शकतो? (मत्त. २४:१३; इब्री ६:१०)

कथा ११४

सर्व दुष्टपणाचा शेवट

  1. १. बायबल स्वर्गातल्या घोड्यांबद्दल का सांगते?

  2. २. पृथ्वीवरच्या सर्व दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी असलेल्या देवाच्या लढाईचे नाव काय आहे व या युद्धाचा काय उद्देश आहे?

  3. ३. चित्रात दिसत असल्याप्रमाणे लढाईत कोण पुढाकार घेणार आहे, त्याने मुकुट का घातला आहे आणि त्याच्या हातातल्या तरवारीचा काय अर्थ होतो?

  4. ४. मागील कथा १०, १५ आणि ३३ मध्ये पाहिल्याप्रमाणे, देव दुष्ट लोकांचा नाश करील याबद्दल आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये?

  5. ५. दुष्ट लोक देवाची उपासना करत असल्याचा दावा करत असले तरीसुद्धा तो त्यांचा नाश करेल हे ३६ आणि ७६ या कथांवरून कसे दिसून येते?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रकटीकरण १९:११-१६ वाचा.

    1. (क) पांढऱ्‍या घोड्याचा स्वार येशू ख्रिस्त आहे हे शास्त्रवचनांतून कसे स्पष्ट होते? (प्रकटी. १:५; ३:१४; १९:११; यश. ११:४)

    2. (ख) येशूच्या बाह्‍य वस्त्रांवरील रक्‍त, त्याचा विजय ठरलेला व पूर्ण असल्याची पुष्टी कसे देते? (प्रकटी. १४:१८-२०; १९:१३)

    3. (ग) पांढऱ्‍या घोड्यावर स्वार असलेल्या येशूनंतर येणाऱ्‍या सैन्यांत कोणाकोणाचा समावेश होतो? (प्रकटी. १२:७; १९:१४; मत्त. २५:३१, ३२)

कथा ११५

पृथ्वीवर एक नवं परादीस

  1. १. पृथ्वीवरच्या परादीसमध्ये आपण कोणत्या परिस्थितीचा उपभोग घेणार आहोत असे बायबल सांगते?

  2. २. परादीसमध्ये राहणाऱ्‍यांसाठी बायबलमध्ये कोणते अभिवचन दिलेले आहे?

  3. ३. हा अद्‌भुत बदल केव्हा घडवून आणण्याकडे येशू ध्यान देईल?

  4. ४. येशू देवाच्या राज्याचा राजा म्हणून कोणकोणत्या गोष्टी करेल हे त्याने पृथ्वीवर असताना काय करण्याद्वारे दाखवले?

  5. ५. येशू आणि स्वर्गात त्याच्याबरोबर राज्य करणारे सहराजे स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतील?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. प्रकटीकरण ५:९, १० वाचा.

    हजार वर्षांच्या राजवटीत पृथ्वीवर राज्य करणारे राजे व याजक सहानुभूतीशील व दयाळु असतील अशी खात्री आपण का बाळगू शकतो? (इफिस. ४:२०-२४; १ पेत्र १:७; ३:८; ५:६-१०)

  2. २. प्रकटीकरण १४:१-३ वाचा.

    पित्याचे व कोकऱ्‍याचे नाव १,४४,००० यांच्या कपाळावर लिहिण्यात आले आहे, हे कशास सूचित करते? (१ करिंथ. ३:२३; २ तीम. २:१९; प्रकटी. ३:१२)

कथा ११६

आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल

  1. १. आपल्याला जर अनंतकाळ जगायचे आहे तर आपल्याला काय माहीत असणे महत्त्वाचे आहे?

  2. २. चित्रातील ही चिमुरडी आणि तिचे मित्र जे करत आहेत त्यावरून, यहोवा देव आणि येशू यांच्याबद्दल आपण कसे शिकू शकतो?

  3. ३. चित्रात तुम्हाला आणखी कोणते पुस्तक दिसत आहे व आपण हे पुस्तक वारंवार का वाचले पाहिजे?

  4. ४. यहोवा आणि येशू यांच्याबद्दल फक्‍त शिकणे पुरेसे नसून सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण आणखी काय केले पाहिजे?

  5. ५. कथा ६९ वरून आपण कोणता धडा शिकतो?

  6. ६. कथा ५५ मध्ये छोट्या शमुवेलाच्या उत्तम उदाहरणावरून आपण काय शिकतो?

  7. ७. आपण येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो आणि असे जर आपण केले तर भविष्यात आपण काय करू शकू?

अतिरिक्‍त प्रश्‍न:

  1. १. योहान १७:३ वाचा.

    यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांचे ज्ञान घेणे याचा अर्थ त्यांच्याबद्दलची माहिती तोंडपाठ करणे पुरेसे नाही, हे शास्त्रवचनांतून कसे स्पष्ट होते? (मत्त. ७:२१; याको. २:१८-२०; १ योहा. २:१७)

  2. २. स्तोत्र १४५:१-२१ वाचा.

    1. (क) यहोवाची स्तुती करण्याची काही कारणे कोणती आहेत? (स्तो. १४५:८-११; प्रकटी. ४:११)

    2. (ख) यहोवा “सगळ्यांना चांगला” कसा आहे व यामुळे आपण त्याच्या आणखी जवळ कसे आलो पाहिजे? (स्तो. १४५:९; मत्त. ५:४३-४५)

    3. (ग) यहोवावर जर आपले प्रेम असेल तर आपण काय करण्यास प्रवृत्त होऊ? (स्तो. ११९:१७१, १७२, १७५; १४५:११, १२, २१)