व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ५

तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या

तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या

१, २. पालकांनी त्यांच्या मुलांचे संगोपन करताना मदतीकरता कोणाकडे पाहण्यास हवे?

 “संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे,” असे गुणग्राहकता बाळगणाऱ्‍या एका पालकाने सुमारे ३,००० वर्षांपूर्वी म्हटले होते. (स्तोत्र १२७:३) बहुतेक वैवाहिक दांपत्यांना असलेला पालकत्वाचा आनंद, यहोवा देवाकडील एक मोलवान प्रतिफळ आहे. तथापि, मुले असलेल्यांना पालकत्वासोबत जबाबदाऱ्‍या देखील येतात हे लवकरच कळून येते.

विशेषपणे आज, मुलांचे संगोपन करणे हे कठीण कर्तव्य आहे. तरीसुद्धा, अनेकांनी हे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले आहे आणि प्रेरित स्तोत्रकर्ता या मार्गाकडे अंगुली दर्शवून सांगतो: “परमेश्‍वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत.” (स्तोत्र १२७:१) तुम्ही यहोवाच्या सूचनांचे अधिक जवळून अनुसरण कराल तसे अधिक चांगले पालक व्हाल. बायबल म्हणते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीतिसूत्रे ३:५) तुम्ही मुलाचे-संगोपन करण्याच्या २० वर्षांच्या प्रकल्पाचा आरंभ करताना, यहोवाची सूचना ऐकण्यास इच्छुक आहात का?

बायबलचा दृष्टिकोन स्वीकारणे

३. मुलांचे संगोपन करण्यात पित्यांची कोणती जबाबदारी आहे?

संपूर्ण जगभरातील अनेक घरांमध्ये, बालशिक्षण देण्याचे काम प्रामुख्याने स्रीचे आहे या दृष्टीने पुरुष त्याकडे पाहतात. हे खरे की, देवाचे वचन पित्याच्या भूमिकेला प्रमुख पोशिंदा म्हणून दर्शवते. परंतु, घरात त्याला जबाबदाऱ्‍या असल्याचे देखील ते सांगते. बायबल म्हणते: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” (नीतिसूत्रे २४:२७) देवाच्या दृष्टीत, पिता आणि माता हे दोघेही बालशिक्षण देण्यामध्ये भागीदार असतात.—नीतिसूत्रे १:८, ९.

४. मुलीपेक्षा मुलगा श्रेष्ठ आहे असा आपला दृष्टिकोन का नसावा?

तुमच्या मुलांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? अहवाल दाखवतो की आशियात “मुलगी जन्माला आल्यामुळे आनंद होत नाही.” अहवालानुसार लॅटिन अमेरिका इतकेच नव्हे तर “सुशिक्षित कुटुंबांत” देखील मुलींबद्दलचा कलुषितपणा अजूनही अस्तित्वात आहे. वस्तुत:, मुली दुय्यम-वर्गाच्या नाहीत. प्राचीन काळातील एक पिता याकोब याने त्याच्या सर्व संततीविषयीचे वर्णन करताना त्यामध्ये त्यावेळेपर्यंत जन्माला आलेल्या त्याच्या मुलींनाही समाविष्ट करून म्हटले, “देवाने [मला] कृपा करून दिलेली ही मुले होत.” (उत्पत्ति ३३:१-५; ३७:३५) त्याच प्रमाणे, येशूने त्याच्याजवळ आणलेल्या सर्व ‘बाळकांना’ (मुलांना आणि मुलींना) आशीर्वाद दिला. (मत्तय १९:१३-१५) त्याने यहोवाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित केला याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो.—अनुवाद १६:१४.

५. कुटुंब किती मोठे असावे या निर्णयाकरता कोणत्या विचारांनी जोडप्याला मार्गदर्शन केले पाहिजे?

तुमचा समाज एखाद्या स्रीने होईल तितक्या मुलांना जन्म द्यावा अशी अपेक्षा तिच्याकडून करतो का? उचितपणे, मग वैवाहिक जोडप्याला किती मुले हवीत हा त्यांचा खासगी निर्णय आहे. पालक अनेक मुलांना अन्‍न, वस्त्र आणि शिक्षण देऊ न शकल्यास मग काय? दांपत्याने स्वतःचे कुटुंब किती मोठे असावे हे ठरवताना याचा नक्कीच विचार केला पाहिजे. आपल्या सर्वच मुलांना सांभाळता येत नसलेले काही दांपत्य, त्यांच्या काही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी नातेवाईकांवर टाकतात. असा प्रघात योग्य आहे का? कदापि नाही. हा प्रघात, पालकांचे त्यांच्या मुलांबद्दल जे कर्तव्य आहे त्यापासून त्यांना मुक्‍त करत नाही. बायबल म्हणते: ‘जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.’ (१ तीमथ्य ५:८) जबाबदार जोडपी ‘आपल्या स्वकीयांची तरतूद’ करता यावी म्हणून त्यांच्या ‘घराण्यातील’ सदस्यांची संख्या मर्यादित ठेवण्याची योजना करण्याचा प्रयत्न करतात. असे करण्यासाठी ते गर्भनियंत्रणाचा वापर करू शकतात का? हा देखील वैयक्‍तिक निर्णय आहे आणि याबद्दल वैवाहिक जोडप्यांनी एखादा निर्णय घेतला असल्यास, संतती नियमनाची निवड सुद्धा एक वैयक्‍तिक बाब आहे. ‘प्रत्येक जण आपला स्वतःचा भार वाहील.’ (गलतीकर ६:५) तथापि, गर्भपाताचा कसलाही प्रकार असलेले संतती नियमन, बायबल तत्त्वांच्या विरुद्ध जाते. यहोवा देव “जीवनाचा झरा” आहे. (स्तोत्र ३६:९) या कारणास्तव, गर्भधारणा झालेल्या जीवनाचा नाश केल्याने यहोवाचा पूर्णपणे अनादर केला जाईल आणि ते खून करण्यासारखे असेल.—निर्गम २१:२२, २३; स्तोत्र १३९:१६; यिर्मया १:५.

आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करणे

६. मुलाचे शिक्षण केव्हा सुरू झाले पाहिजे?

नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे.” मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे आणखी एक मोठे कर्तव्य आहे. परंतु, हे शिक्षण देणे केव्हा सुरू केले पाहिजे? अगदी बालवयापासूनच. तीमथ्याला “बालपणापासूनच” शिक्षण मिळाले होते असे प्रेषित पौलाने निरिक्षिले. (२ तीमथ्य ३:१५) येथे वापरलेला ग्रीक शब्द लहान बाळ किंवा जन्म न झालेल्या मुलाला देखील लागू होऊ शकतो. (लूक १:४१, ४४; प्रेषितांची कृत्ये ७:१८-२०) या कारणास्तव, तीमथ्याला बालपणापासून—अगदी उचितपणे शिक्षण मिळाले. एखाद्या मुलाला शिक्षण देण्यास बालपणाचा काळ उत्कृष्ट असतो. लहान बाळाला देखील ज्ञानाची भूक असते.

७. (अ) बाळासोबत दोन्ही पालकांनी जवळचा नातेसंबंध विकसित करणे का महत्त्वपूर्ण आहे? (ब) यहोवा आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्रामध्ये कोणता नातेसंबंध होता?

एक माता म्हणते, “माझ्या बाळाला मी प्रथमच पाहिले तेव्हा मला त्याच्याबद्दल अधिक प्रेम वाटू लागले.” असेच अनेक मातांच्या बाबतीत होते. बाळाच्या जन्मानंतर माता त्याच्यासोबत वेळ घालवते तसे त्यांच्यामधील उत्तम जिव्हाळा वाढत राहतो. स्तनपान त्या सलोख्यास अधिक वाढवते. (पडताळा १ थेस्सलनीकाकर २:७.) बाळाच्या भावनात्मक गरजा भरून काढण्यासाठी मातेने आपल्या बाळाला कुरवाळणे आणि त्यासोबत बोलणे महत्त्वाचे आहे. (पडताळा यशया ६६:१२.) परंतु पित्याविषयी काय? त्याने देखील नवोदित संततीबरोबर जवळचा, नातेसंबंध निर्माण केला पाहिजे. स्वतः यहोवा याचे एक उदाहरण आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकात आपण यहोवाचा त्याच्या एकुलत्या एका पुत्रासोबत असलेल्या नातेसंबंधाबद्दल शिकतो, तेथे असे म्हणून त्याला सूचित केले: ‘यहोवाने सृष्टिक्रमाच्या आरंभी मला पैदा केले. मी त्याला नित्य आनंददायी होते.’ (नीतिसूत्रे ८:२२, ३०; योहान १:१४) अशाच रीतीने, एक चांगला पिता मुलाच्या जीवनाच्या आरंभापासूनच त्याच्यासोबत एक उबदार, प्रेमळ नातेसंबंध विकसित करतो. एक पालक म्हणतात “खूप माया करा. आलिंगन दिल्याने आणि मुके घेतल्याने आजपर्यंत कोणतेही मूल दगावले नाही.”

८. पालकांनी बाळाला लवकरात लवकर कोणते मानसिक उत्तेजन दिले पाहिजे?

परंतु, बाळांना अधिक गोष्टींची गरज असते. जन्मापासूनच त्यांचा मेंदू माहिती प्राप्त करून आठवणीत ठेवण्यास तयार असतो आणि याचा प्रमुख उगम पालक आहेत. एक उदाहरण म्हणून भाषेला विचारात घ्या. संशोधक म्हणतात की, एक मूल किती चांगल्याप्रकारे बोलण्यास आणि लिहिण्यास शिकते याचा “त्या मुलाचा आपल्या पालकांसोबतच्या सुरवातीच्या परस्परसंबंधित क्रियांच्या स्वभावाशी निकट संबंध आहे असे वाटते.” बालपणापासूनच तुमच्या मुलासोबत बोला आणि त्याच्याकरता वाचन करा. लवकरच तुमचे अनुकरण करावेसे त्याला वाटेल आणि लगेच तुम्ही त्याला वाचन करण्याचे शिकवाल. साहजिकच, शाळेत घालण्याआधीच त्याला वाचता येऊ लागेल. हे विशेषपणे, तुम्ही राहत असलेल्या देशात जेथे शिक्षक कमी असतात आणि विद्यार्थ्यांनी गच्च भरलेले वर्ग असतात अशा ठिकाणी मदतदायक असेल.

९. पालकांनी कोणते अतिमहत्त्वपूर्ण ध्येय लक्षात ठेवण्याची आवश्‍यकता आहे?

ख्रिस्ती पालकांची प्रमुख जबाबदारी, त्यांच्या मुलांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणे ही आहे. (पाहा अनुवाद ८:३.) कोणते ध्येय राखून? मुलांना ख्रिस्तासारखे व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यास खरे म्हणजे, “नवा मनुष्य” धारण करण्यास मदत करणे. (इफिसकर ४:२४) याकरता त्यांनी उचित बांधकाम साहित्य आणि उचित बांधकाम पद्धतींचा विचार केला पाहिजे.

तुमच्या मुलाच्या मनावर सत्य बिंबवा

१०. मुलांना कोणते गुण विकसित करण्याची आवश्‍यकता आहे?

१० एखाद्या इमारतीचा दर्जा, ती कोणत्या साहित्याने बांधली आहे यावर अधिक अवलंबून असतो. प्रेषित पौलाने म्हटले की, ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्वासाठी “सोने, रुपे, मोलवान पाषाण” हे बांधकामाचे उत्तम साहित्य आहे. (१ करिंथकर ३:१०-१२) हे साहित्य विश्‍वास, सुज्ञता, समजबुद्धी, निष्ठा, आदर आणि यहोवा व त्याच्या नियमांची प्रेमळ गुणग्राहकता या गुणांना सूचित करतात. (स्तोत्र १९:७-११; नीतिसूत्रे २:१-६; ३:१३, १४) मुलांमध्ये लहानपणापासूनच हे गुण विकसित करण्यासाठी पालक त्यांना कशी मदत करू शकतात? बऱ्‍याच काळाआधी दिलेल्या रुपरेषेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्याद्वारे.

११. इस्राएली पालकांनी त्यांच्या मुलांना ईश्‍वरी व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यासाठी कशी मदत केली?

११ इस्राएल राष्ट्र वाग्दत्त देशात प्रवेश करण्याच्या थोडे आधी, यहोवाने इस्राएली पालकांना असे सांगितले: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) होय, पालकांनी उदाहरणशील, सहकारी, दळणवळण राखणारे आणि शिक्षक असावयास हवे.

१२. पालकांनी चांगले उदाहरण असणे का महत्त्वपूर्ण आहे?

१२ उदाहरणशील असा. यहोवाने म्हटले, प्रथम: ‘या गोष्टी तुझ्या हृदयात ठसव.’ मग त्याने म्हटले: “त्या तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव.” यास्तव, ईश्‍वरी गुण प्रथम पालकाच्या हृदयात असले पाहिजेत. पालकाला सत्य आवडले पाहिजे व त्यानुसार त्याने राहिले पाहिजे. असे केल्यानेच तो मुलाच्या हृदयाप्रत पोहंचू शकतो. (नीतिसूत्रे २०:७) का बरे? कारण मुलांवर ते जे ऐकतात त्याऐवजी जे पाहतात त्याचा अधिक प्रभाव होत असतो.—लूक ६:४०; १ करिंथकर ११:१.

१३. ख्रिस्ती पालक आपल्या मुलांकडे लक्ष देताना येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतात?

१३ सहकारी असा. यहोवाने इस्राएलातील पालकांना सांगितले: ‘घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, तुमच्या मुलासोबत बोला.’ याचा अर्थ, पालकांनी कितीही व्यग्र असले तरी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. आपला वेळ मुलांना द्यावा असे येशूला स्पष्टपणे वाटत होते. त्याच्या सेवकपणाच्या अंतिम दिवसात, “त्याने बाळकांस स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणिले.” येशूची प्रतिक्रिया काय होती? त्याने “मुलांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१३, १६) येशूच्या जीवनाची शेवटली घटिका जलदपणे जवळ येत होती, याची कल्पना करा. तरीसुद्धा, त्याने या मुलांना आपला वेळ आणि आपले लक्ष दिले. किती उत्तम धडा!

१४. पालकांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवणे का लाभदायक आहे?

१४ दळणवळण राखणारे असा. तुमच्या मुलासोबत वेळ घालवल्याने दळणवळण राखण्यास मदत होईल. जितके अधिक तुम्ही दळणवळण राखाल तितके त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात कशी वाढ होत आहे हे अधिक चांगल्याप्रकारे तुम्ही जाणाल. तथापि, दळणवळण करणे हे बोलण्यापेक्षा अधिक आहे हे लक्षात ठेवा. ब्राझीलमधील एका मातेने म्हटले, “मला ऐकण्याची, मनापासून ऐकण्याची कला विकसित करावी लागली.” तिच्या मुलाने त्याच्या भावना तिला सांगण्यास सुरू केले तेव्हा तिने दाखवलेल्या धीराचे फळ मिळाले.

१५. मनोरंजनाबद्दल कोणत्या गरजा लक्षात ठेवल्या पाहिजेत?

१५ मुलांना “हसण्याचा समय . . . व नृत्य करण्याचा समय” म्हणजेच मनोरंजनाकरता समय हवा असतो. (उपदेशक ३:१, ४; जखऱ्‍या ८:५) मनोरंजन पालक आणि मुलांनी एकत्र मिळून केले तर ते अधिक फलदायक ठरते. अनेक घरांमध्ये मनोरंजन म्हणजे दूरचित्रवाणी पाहणे, ही दुःखाची गोष्ट आहे. दूरचित्रवाणीवरील काही कार्यक्रम मनोरंजक असले तरी, अनेक कार्यक्रम चांगल्या मूल्यांची पायमल्ली करतात आणि दूरचित्रवाणी पाहत राहिल्याने कुटुंबातील दळणवळणाला खीळ बसते. यास्तव, तुमच्या मुलांसोबत काहीतरी सर्जनशील कार्य का करू नये? गाणी गा, खेळ खेळा, मित्रांसोबत सहवास राखा, आनंददायक स्थळांना भेटी द्या. अशा कार्यहालचाली दळणवळण करण्यास उत्तेजन देतात.

१६. पालकांनी त्यांच्या मुलांना यहोवाबद्दल काय शिकवले पाहिजे आणि हे त्यांनी कसे केले पाहिजे?

१६ शिक्षक असा. यहोवाने म्हटले, “[या गोष्टी] तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव.” काय आणि कसे शिकवावे हे संदर्भ दाखवतो. प्रथम, “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” मग, ‘या गोष्टी मनावर बिंबव.’ (अनुवाद ६:५) यहोवा आणि त्याच्या नियमांबद्दल मनापासून प्रेम विकसित करणारा हेतू बाळगून बोध द्या. (पडताळा इब्री लोकांस ८:१०.) “बिंबव” या शब्दाचा अर्थ पुनरुच्चाराने शिकवणे. यास्तव, यहोवा सांगतो की, मुलांनी ईश्‍वरी व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यासाठी त्यांना मदत करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे यहोवाविषयी त्यांच्यासोबत कायम बोलत राहणे हा आहे. यामध्ये त्यांच्यासोबत नियमित बायबल अभ्यास करण्याचा समावेश होतो.

१७. पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये काय विकसित करण्याची गरज असेल? का बरे?

१७ मुलाच्या अंतःकरणाप्रत माहिती नेणे सोपे नसते, हे अनेक पालकांना माहीत आहे. प्रेषित पेत्राने सह ख्रिश्‍चनांना आर्जविले: “नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, पंडिता रमाबाई भाषांतर) “इच्छा धरा” हा वाक्प्रचार, अनेक लोक आध्यात्मिक अन्‍नासाठी स्वाभाविकपणे भुकेलेले नसतात असे सुचवतो. पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये ती इच्छा विकसित करण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे.

१८. येशूच्या शिकवण्याच्या काही पद्धती कोणत्या आहेत ज्यांचे अनुकरण करण्यास पालकांनी उत्तेजित झाले पाहिजे?

१८ दाखल्यांचा वापर करून येशू अंतःकरणाप्रत पोहंचत असे. (मार्क १३:३४; लूक १०:२९-३७) मुलांच्या बाबतीत ही पद्धत विशेषपणे अधिक प्रभावकारी आहे. कदाचित बायबल कथांचं माझं पुस्तक * (इंग्रजी) या प्रकाशनात दिलेल्या आकर्षक, मनोरंजक गोष्टींचा उपयोग करून बायबल तत्त्वे शिकवा. मुलांना समाविष्ट करा. बायबल घटना बनवून त्याप्रमाणे त्यांना अभिनय करू द्या. येशूने प्रश्‍नांचा देखील वापर केला. (मत्तय १७:२४-२७) तुमच्या कौटुंबिक अभ्यासात त्याच्या पद्धतीचे अनुकरण करा. केवळ देवाचा नियम सांगण्यापेक्षा, अशाप्रकारे प्रश्‍न विचारा की, यहोवाने आपल्याला हा नियम का दिला? त्याचे पालन केल्यास काय होईल? त्याचे पालन न केल्यास काय होईल? असे प्रश्‍न, मुलाला तर्क करण्यास आणि देवाचे नियम व्यावहारिक आणि चांगले आहेत हे पाहण्यास मदत करतील.—अनुवाद १०:१३.

१९. पालकांनी मुलांबरोबर वागताना बायबलच्या तत्त्वांचे अनुकरण केल्यास, मुले कोणत्या अधिक लाभांचा आनंद घेतील?

१९ उदाहरणशील, सहकारी, दळणवळण राखणारे आणि शिक्षक असण्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाला यहोवा देवासोबत अगदी बालपणापासून जवळचा वैयक्‍तिक नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करू शकता. हा नातेसंबंध तुमच्या मुलाला एक ख्रिश्‍चन या नात्याने आनंदी राहण्यास उत्तेजन देईल. तो समवयस्कांकडून येणारा दबाव आणि मोहात पडण्याचा सामना करीत असताना देखील त्याच्या विश्‍वासानुसार जगण्याचा प्रयत्न करील. या मोलवान नातेसंबंधाची गुणग्राहकता बाळगण्यास नेहमीच त्याला मदत करा.—नीतिसूत्रे २७:११.

शिस्त लावण्याची महत्त्वपूर्ण गरज

२०. शिस्त म्हणजे काय आणि ती कशी लावावी?

२० शिस्त लावणे, हे मन आणि हृदयाला सुधारण्याचे शिक्षण आहे. मुलांना याची नेहमीच आवश्‍यकता असते. पौल पित्यांना सल्ला देतो की त्यांनी ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांच्या मुलांना वाढवावे.’ (इफिसकर ६:४) यहोवाप्रमाणेच पालकांनी त्यांच्या मुलांना प्रेमाने शिस्त लावली पाहिजे. (इब्री लोकांस १२:४-११) प्रेमावर आधारित असलेली शिस्त तर्क करण्याद्वारे दिली जाऊ शकते. या कारणास्तव, ‘शिस्त ऐका’ असे आपल्याला सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे ८:३३) शिस्त कशाप्रकारे दिली जाण्यास हवी?

२१. पालकांनी त्यांच्या मुलांना शिस्त लावताना कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत?

२१ काही पालकांना वाटते की मुलांना शिस्त लावण्यात केवळ धमकी देणाऱ्‍या आवाजात बोलणे, रागावणे किंवा त्यांचा अपमान करणे हे समाविष्ट आहे. तथापि, याच विषयाबद्दल पौल इशारा देतो: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका.” (इफिसकर ६:४) सर्व ख्रिश्‍चनांना “सर्वांबरोबर सौम्य . . . विरोध करणाऱ्‍यांना सौम्यतेने शिक्षण” देणारे असावे असे आर्जवले आहे. (२ तीमथ्य २:२४, २५) ख्रिस्ती पालकांनी खंबीरपणाची गरज ओळखून त्यांच्या मुलांना शिस्त लावताना हे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथापि, काही वेळा तर्क अपुरा असतो आणि काही तरी शिक्षा देण्याची गरज भासू शकेल.—नीतिसूत्रे २२:१५.

२२. मुलाला शिक्षा द्यावयाची असल्यास, काय समजण्यास त्याची मदत केली पाहिजे?

२२ वेगवेगळ्या मुलांना विविध प्रकारची शिस्त लावण्याची गरज असते. काही जण केवळ “शब्दांनी सुधारत” नाहीत. आज्ञापालन न करणाऱ्‍यांना अधूनमधून दिली जाणारी शिक्षा त्यांच्याकरता जीवन वाचवणारी असू शकेल. (नीतिसूत्रे १७:१०; २३:१३, १४; २९:१९) तथापि, शिक्षा का दिली जात आहे हे मुलाला समजले पाहिजे. “छडी वाग्दंड ज्ञान देतात.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे २९:१५; ईयोब ६:२४) याशिवाय, शिक्षा देण्याला काही मर्यादा आहेत. “मी तुझे योग्य शासन करील,” असे यहोवाने त्याच्या लोकांना म्हटले. (तिरपे वळण आमचे.) (यिर्मया ४६:२८ब) क्रोधाने फटके मारणे किंवा बेदम मारणे ज्यामुळे मुलाला मुक्का मार बसू शकतो अथवा त्याला इजा होऊ शकते, यास बायबल मुळीच मान्यता देत नाही.—नीतिसूत्रे १६:३२.

२३. मुलाला पालकांकडून शिक्षा मिळते तेव्हा त्याला काय जाणता आले पाहिजे?

२३ यहोवा आपल्या लोकांना शिस्त लावील असा इशारा दिला तेव्हा प्रथम त्याने म्हटले: “भिऊ नको; कारण मी तुजबरोबर आहे.” (यिर्मया ४६:२८अ) अशा रीतीने, पालकीय शिस्त कोणत्याही योग्य प्रकारे दिल्याने मुलामध्ये त्यागल्याची भावना कधीही राहू देऊ नये. (कलस्सैकर ३:२१) उलटपक्षी, मुलाला याची जाणीव झाली पाहिजे की, पालक ‘त्याच्यासोबत,’ त्याच्या बाजूला आहेत म्हणून शिस्त लावली जाते.

अपाय होण्यापासून तुमच्या मुलाचे संरक्षण करा

२४, २५. या दिवसांत मुलांना कोणत्या कुरूप धोक्यापासून संरक्षणाची गरज आहे?

२४ अनेक प्रौढ त्यांच्या बालपणाकडे आनंदाचा काळ या दृष्टीने पाहतात. सुरक्षिततेच्या उबदार भावना त्यांना आठवतात, काही झाले तरी पालक त्यांना सांभाळतील अशी खातरी त्यांना वाटते. मुलांना तसे वाटावे अशी पालकांची इच्छा असते, पण लयास जात असलेल्या आजच्या जगात, मुलांना सुरक्षित ठेवणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण आहे.

२५ अलीकडील वर्षांमध्ये, मुलांशी लैंगिक गैरव्यवहार करण्याच्या कुरूप धोक्यात वाढ झाली आहे. मलेशियात, दहा वर्षांच्या काळात मुलांशी गैरव्यवहार करणाऱ्‍या अहवालात चौपट वाढ झाली आहे. जर्मनीत प्रत्येक वर्षी सुमारे ३,००,००० मुलांबरोबर लैंगिकरित्या दुर्व्यवहार केला जातो, तर दक्षिण अमेरिकेतील एका देशात अहवालानुसार अंदाज केलेली वार्षिक संख्या, चकित करणारी म्हणजे ९०,००,००० इतकी आहे! दुःखाची गोष्ट म्हणजे, यातील बहुसंख्य मुलांशी ते ज्यांना ओळखतात आणि ज्यांवर भरवसा ठेवतात अशा त्यांच्याच घरातील लोकांनी गैरव्यवहार केला आहे. परंतु, मुलांचे मजबूत संरक्षण त्यांचे पालक असले पाहिजेत. पालक संरक्षक कसे असू शकतात?

२६. मुलांना सुरक्षित ठेवले जाण्याचे काही मार्ग कोणते आहेत आणि ज्ञान मुलाला कशी मदत करू शकते?

२६ लैंगिकतेबद्दल कमी माहिती असणारी मुले गैरव्यवहार करणाऱ्‍यांकरता विशेषपणे भेद्य असतात असे अनुभव दाखवत असल्यामुळे मूल लहान असले, तरीही त्यास शिक्षण देणे हे मोठे संरक्षणात्मक पाऊल आहे. ज्ञान, “कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून” संरक्षण देऊ शकते. (नीतिसूत्रे २:१०-१२) कशाचे ज्ञान? नैतिकरित्या काय बरोबर आणि काय चूक याबद्दल बायबल तत्त्वांचे ज्ञान. तसेच काही प्रौढ ज्या वाईट गोष्टी करतात त्याबद्दल आणि एखाद्या तरुणाला अनुचित कार्य करण्याचे लोक सुचवतात तेव्हा त्या तरुणाने त्याप्रमाणे करण्याची जरूरी नाही याबद्दलचेही ज्ञान. (पडताळा दानीएल १:४, ८; ३:१६-१८.) अशा प्रकारचे मार्गदर्शन कोणत्याही एकाच प्रसंगापुरतेच मर्यादित ठेवू नये. चांगल्या प्रकारे आठवणीत राहण्यासाठी अनेक मुलांना बऱ्‍याचवेळा हे शिकवण्याची गरज असते. मुले मोठी होतात तसे, एक पिता त्याच्या मुलीच्या आणि एक माता तिच्या मुलाच्या एकान्तपणाच्या हक्काचा प्रेमळपणे आदर करील—याप्रकारे उचित असण्याच्या मुलाच्या भावनेला मजबूत केले जाईल. अर्थातच, दुर्व्यवहाराविरुद्ध एक उत्तम संरक्षण म्हणजे पालक या नात्याने केलेली एक सूक्ष्म देखरेख होय.

ईश्‍वरी मार्गदर्शन मिळवा

२७, २८. मुलाचे संगोपन करण्याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागते तेव्हा पालकांकरता मदतीचा महान उगम कोण आहे?

२७ मुलाला बालपणापासून शिक्षण देणे एक आव्हान आहे हे खरे, पण विश्‍वासू पालकांना या आव्हानाला एकट्यानेच तोंड द्यावे लागत नाही. शास्त्यांच्या काळात, मानोहा या मनुष्याला तो पिता होणार असल्याचे कळले तेव्हा त्याने मुलाच्या पालनपोषणाच्या मार्गदर्शनाबद्दल यहोवाकडे विचारणा केली. यहोवाने त्याच्या प्रार्थनांना उत्तर दिले.—शास्ते १३:८, १२, २४.

२८ अशाच रीतीने, आज विश्‍वासू पालक त्यांच्या मुलांचे संगोपन करतात तेव्हा ते देखील प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलू शकतात. पालक असणे एक कठीण कार्य आहे पण त्याची प्रतिफळे मोठी आहेत. हवाईमधील एक ख्रिस्ती दांपत्य सांगते: “किशोरावस्थेच्या त्या कठीण वर्षांआधी कार्य करण्यासाठी तुम्हाकडे १२ वर्षे आहेत. परंतु, बायबल तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम घेतल्यास, ते अंतःकरणापासून यहोवाची सेवा करण्याचे ठरवतात तेव्हा तो समय तुमच्याकरता आनंदाचा आणि शांतीचा असतो.” (नीतिसूत्रे २३:१५, १६) तुमचे मूल हा निर्णय घेते तेव्हा तुम्ही देखील असे म्हणण्यास प्रवृत्त व्हाल: ‘मुलगे [आणि मुली] यहोवाने दिलेले धन आहेत.’

^ परि. 18 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारा प्रकाशित.