व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १०

कौटुंबिक सदस्य आजारी असतो तेव्हा

कौटुंबिक सदस्य आजारी असतो तेव्हा

१, २. सैतानाने ईयोबाच्या सचोटीला तोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी दुर्घटना आणि आजारपणाचा कसा वापर केला?

 आनंदी कौटुंबिक जीवनाचा आस्वाद घेतलेल्यांमध्ये ईयोब या पुरुषाला नक्कीच गणले जाण्यास हवे. बायबल त्याला “पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर” असे संबोधते. त्याला तीन कन्या आणि सात पुत्र असे एकूण दहा मुले होती. कुटुंबाचे उत्तम पालनपोषण करण्यासाठी त्याच्याकडे संपत्ती देखील होती. अधिक महत्त्वाचे म्हणजे, त्याने आध्यात्मिक कार्यहालचालींमध्ये पुढाकार घेतला तसेच मुलांची यहोवासमोरील भूमिका याबद्दल त्याला काळजी वाटत होती. या सर्वांचा परिणाम निकटच्या आणि आनंदी कौटुंबिक बंधनांमध्ये झाला.—ईयोब १:१-५.

ईयोबाची परिस्थिती यहोवा देवाचा आद्यशत्रू, सैतान याच्या दृष्टिआड झाली नाही. देवाच्या सेवकांच्या सचोटीला तोडण्यासाठी सतत मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या सैतानाने ईयोबाच्या आनंदी कौटुंबिक जीवनाचा नाश करण्याद्वारे त्याच्यावर घाला घातला. मग त्याने “ईयोबास मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पीडिले.” अशा रीतीने, ईयोबाची सचोटी तोडण्यासाठी सैतानाने दुर्घटना आणि आजारपणाचा वापर करण्याचा विचार केला.—ईयोब २:६, ७.

३. ईयोबाच्या आजारपणाची काही लक्षणे कोणती होती?

बायबल ईयोबाच्या पीडेचे वैद्यकीय नाव देत नाही. तरीपण ते त्याच्या लक्षणांबद्दल सांगते. त्याचे शरीर किड्यांनी भरले आणि त्याची त्वचा बरी होते तो ती परत चिडचिडते. ईयोबाच्या श्‍वासाची दुर्गंधी येत होती आणि त्याच्या शरीराचा किळसवाणा वास येत होता. तो वेदनेने पीडित होता. (ईयोब ७:५; १९:१७; ३०:१७, ३०) असह्‍य वेदनांमुळे ईयोब राखेत बसला आणि खापरीने आपले अंग खाजवू लागला. (ईयोब २:८) खरोखर एक दयनीय दृश्‍य!

४. प्रत्येक कुटुंबाला वेळोवेळी कोणता अनुभव येतो?

अशा गंभीर रोगाने तुम्ही पीडित असता तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवाल? आज सैतान, ईयोबाला पीडित केले त्याप्रमाणे देवाच्या सेवकांवर हल्ला करत नाही. तरीही, मानवी अपरिपूर्णता, दैनंदिन जीवनातील तणाव आणि ज्यामध्ये आपण राहतो असे ऱ्‍हास होत चाललेले वातावरण यांमुळे कौटुंबिक सदस्य अधूनमधून आजारी पडतील अशीच अपेक्षा केली जाऊ शकते. आपण खबरदारी घेतली असताना देखील ईयोबाप्रमाणे थोडकेच जण त्रास सहन करत असले, तरी सर्वच जण आजारपणाच्या विकारी जातात. आजारपण आपल्या घरावर घाला घालते तेव्हा ते खरोखरच एक आव्हान ठरते. या कारणास्तव, नेहमीच मानवजातीच्या मागे असलेल्या या शत्रूला तोंड देण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करते हे आपण पाहू या.—उपदेशक ९:११; २ तीमथ्य ३:१६.

याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

५. तात्कालिक आजाराच्या बाबतीत कौटुंबिक सदस्य सामान्यपणे कशी प्रतिक्रिया दाखवतात?

कोणतेही कारण असले तरी जीवनाच्या सामान्य नित्यक्रमातील व्यत्यय नेहमीच कठीण असतो आणि हा व्यत्यय दीर्घकालीन आजारामुळे असल्यास हे विशेषपणे खरे असते. इतकेच नव्हे तर अल्पकालीन आजारामुळे देखील तडजोड, सवलत आणि त्याग करावे लागतात. आजारी व्यक्‍तीला आराम करू देण्यासाठी कुटुंबातील निरोगी सदस्यांना शांतता राखावी लागेल. कदाचित त्यांना विशिष्ट कार्ये सोडून द्यावी लागतील. तरीसुद्धा, अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना विचारी असण्याची आठवण अधूनमधून करून द्यावी लागत असली, तरी त्यांना आपल्या आजारी भावंडाची किंवा पालकाची दया येते. (कलस्सैकर ३:१२) तात्कालिक आजारपण असताना, सामान्यपणे, कुटुंब आवश्‍यक असलेले सर्व काही करण्यास तयार असते. याशिवाय, तो किंवा ती आजारी पडते तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य अशाच रीतीच्या वागणुकीची आशा करील.—मत्तय ७:१२.

६. कुटुंबातील एखादा सदस्य गंभीर व दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असतो तेव्हा कोणत्या प्रतिक्रिया काहीवेळा दिसून येतात?

आजार गंभीर असल्यास आणि व्यत्यय पूर्ण स्वरूपाचे आणि दीर्घकालीन असल्यास काय? उदाहरणार्थ, कुटुंबातील कोणाची रोगाच्या झटक्यामुळे चेताशुन्य अवस्था झाल्यास, अल्झिमेर रोग अथवा इतर कोणा रोगामुळे तो कमजोर झाल्यास काय? किंवा कुटुंबातील कोणी सीजोफ्रेनियासारख्या मानसिक आजाराने पीडित असल्यास काय? प्रथमतः, सामान्य प्रतिक्रिया दया दाखवणे ही असते—प्रिय व्यक्‍तीला अधिक त्रास होत असल्याबद्दल दुःख वाटणे होय. तथापि, दया दाखवल्यानंतर प्रतिक्रिया दाखवल्या जाऊ शकतील. आजारी व्यक्‍तीमुळे कौटुंबिक सदस्यांवर अधिक परिणाम होत असल्याचे आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येत असल्याचे आढळल्यास त्यांना चीड वाटू लागेल. ते विचारतील: “हे माझ्यावरच का बेतत आहे?”

७. ईयोबाच्या बायकोने त्याच्या आजारपणाबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली आणि ती स्पष्टपणे काय विसरली?

कदाचित अशाच प्रकारचा विचार ईयोबाच्या पत्नीच्या मनाला चाटून गेला असावा. तिने तिच्या मुलांना गमावले हे लक्षात ठेवा. त्या दुःखद घटना वाढत गेल्या तसे ती बरीच अस्वस्थ झाली असेल यात काही संशय नाही. क्रियाशील आणि जोमदार पतीला शेवटी, दुःखदायक, किळसवाण्या रोगाने पीडित झाल्याचे पाहते तेव्हा या सर्व विपत्तींपेक्षा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे—देवासोबत तिचा व तिच्या पतीचा जो नातेसंबंध होता त्याला ती विसरून गेल्यासारखी दिसते. बायबल म्हणते: “[ईयोबाची] स्त्री त्याला म्हणाली: ‘तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहां काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा!’”—ईयोब २:९.

८. कौटुंबिक सदस्य गंभीररित्या आजारी असतो तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांना योग्य दृष्टिकोन बाळगण्यासाठी कोणते शास्त्रवचन मदत करील?

एखाद्या व्यक्‍तीच्या आजारामुळे अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो तेव्हा ते निराश होतात, इतकेच नव्हे तर त्यांना संताप देखील येतो. तरीसुद्धा, परिस्थितीवर तर्क करणाऱ्‍या एखाद्या ख्रिश्‍चनाने, ही परिस्थिती त्याच्या प्रीतीचा खरेपणा प्रदर्शित करण्याची संधी देते, अशी जाणीव सरतेशेवटी बाळगली पाहिजे. खरी प्रीती “सहनशील आहे, परोपकारी आहे. . . . [आणि] स्वार्थ पाहत नाही . . . ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” (१ करिंथकर १३:४-७) यास्तव, नकारात्मक भावनांना आपल्यावर प्रभुत्व करण्याची अनुमती देण्याऐवजी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा आपल्यापरीने होता होईल तितका प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.—नीतिसूत्रे ३:२१.

९. एखादा सदस्य गंभीर आजारी असतो तेव्हा कुटुंबाला आध्यात्मिक आणि भावनात्मकरित्या मदत करण्यासाठी कोणत्या खातरीलायक विधानांमुळे मदत मिळू शकते?

कुटुंबातील एखादा सदस्य गंभीररित्या आजारी असल्यास, कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि भावनात्मक हिताचे रक्षण करण्यासाठी काय केले जाऊ शकते? अर्थातच, प्रत्येक आजाराची खास काळजी आणि त्यावर उपचार असतात म्हणून या प्रकाशनात कोणत्याही वैद्यकीय अथवा घरगुती उपायाची शिफारस करणे उचित ठरणार नाही. तरीसुद्धा, यहोवा आध्यात्मिक अर्थाने “वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तोत्र १४५:१४) दावीद राजाने लिहिले: “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य; संकटसमयी परमेश्‍वर त्याला मुक्‍त करील. परमेश्‍वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचवील. . . . तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्‍वर त्याला संभाळील.” (स्तोत्र ४१:१-३) यहोवा आपल्या सेवकांची त्यांच्या शक्‍तीच्या पलीकडे भावनात्मकरित्या परीक्षा घेतली जात असताना देखील आध्यात्मिकरित्या त्यांना जिवंत ठेवतो. (२ करिंथकर ४:७) घरात, गंभीर आजाराला तोंड देत असलेल्या अनेक कौटुंबिक सदस्यांनी स्तोत्रकर्त्याच्या शब्दांचा पुनरूच्चार केला आहे: “मी फार पीडलो आहे; हे परमेश्‍वरा तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.”—स्तोत्र ११९:१०७.

बरे करणारा आत्मा

१०, ११. (अ) कुटुंबाने आजारपणाला यशस्वीपणे तोंड देण्याकरता काय महत्त्वपूर्ण आहे? (ब) एका स्त्रीने तिच्या पतीच्या आजारपणाला कसे तोंड दिले?

१० बायबलचे नीतिसूत्र म्हणते की, “मनुष्याचे चित्त आपली व्याधि सहन करिते; पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्‍न करवेल?” (नीतिसूत्रे १८:१४) मानसिक आघात, कुटुंबाच्या मनोवृत्तीला तसेच ‘मनुष्याच्या चित्ताला’ पीडित करू शकतो. तरीही, “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतिसूत्रे १४:३०) कुटुंबाचे गंभीर आजाराला यशस्वीपणे तोंड देणे किंवा न देणे हे कौटुंबिक सदस्यांची प्रवृत्ती किंवा चित्त यावर बव्हंशी अवलंबून असते.—पडताळा नीतिसूत्रे १७:२२.

११ एका ख्रिस्ती स्त्रीला तिच्या विवाहानंतर केवळ सहा वर्षांनी रोगाच्या झटक्यामुळे पती दुर्बल झाल्याचे दुःख सहन करावे लागले. तिला आठवते, “माझ्या पतीच्या आवाजावर अतिशय वाईट परिणाम झाला होता आणि त्यांच्यासोबत संभाषण करणे जवळजवळ अशक्यच झाले होते. ते काय सांगण्याची धडपड करीत आहेत, हे समजण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या प्रयत्नांचा मानसिक ताण अतिशय कठीण होता.” तसेच पतीने अनुभवलेल्या यातना आणि निराशा यांचीही कल्पना करा. या जोडप्याने काय केले? ते ख्रिस्ती मंडळीपासून बऱ्‍याच दूरवर राहत होते तरी त्या बहिणीने संघटनेच्या आधुनिक माहितीशी अद्ययावत राहून तसेच टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांतील निरंतर आध्यात्मिक पुरवठ्यामुळे दृढ राहण्यासाठी आपल्या परीने उत्तम ते केले. यामुळे तिच्या प्रिय पतीचा चार वर्षांनी मृत्यू होईपर्यंत, त्यांची काळजी घेण्यासाठी तिला आध्यात्मिक शक्‍ती मिळाली.

१२. ईयोबाच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे, आजारी व्यक्‍ती काही वेळा कोणता हातभार लावू शकते?

१२ ईयोबाच्या बाबतीत, पीडित असलेला असा तो स्वतःच दृढ राहिला. त्याने आपल्या पत्नीला म्हटले, “देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब २:१०) यामुळेच, ईयोबाने धीर आणि संयमाचे उल्लेखनीय उदाहरण मांडले असा उल्लेख शिष्य याकोबाने नंतर केला यात काही आश्‍चर्य नाही! याकोब ५:११ मध्ये आपण वाचतो: “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्‍यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हास दिसून आले.” अशा रीतीने अनेक बाबतीत आज, आजारी कौटुंबिक सदस्याच्या धीट मनोवृत्तीमुळे घरातील इतरांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत मिळाली आहे.

१३. गंभीर आजारपण अनुभवत असलेल्या कुटुंबाने कोणती तुलना करू नये?

१३ कुटुंबातील आजारपणाला तोंड दिलेले अनेक जण, कौटुंबिक सदस्यांकरता सुरवातीला वस्तुस्थितीच्या कठीण समयाचा सामना करणे असामान्य नाही, याजशी सहमत आहेत. एखादी व्यक्‍ती परिस्थितीकडे कोणत्या रीतीने पाहते ते खूप महत्त्वाचे आहे, याकडेही ते अंगुली दर्शवतात. घरकामाच्या नित्यक्रमातील बदल आणि फेरफार सुरवातीस कठीण असू शकतील. परंतु, एखादी व्यक्‍ती खरोखर प्रयत्न करते तेव्हा ती नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. असे करत असताना, आजारपण नसलेल्या इतर कुटुंबातील परिस्थितींची तुलना, त्यांचे जीवन सुखावह आहे व ‘आपल्यावर हा उघड अन्याय आहे’ असा विचार बाळगून आपल्या परिस्थितीशी न करणे महत्त्वाचे आहे! खरे तर, इतरांना कोणते ओझे वाहवे लागत आहे हे कोणालाही माहीत नसते. सर्व ख्रिश्‍चनांना येशूच्या शब्दांमुळे सांत्वन मिळते: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.

प्राथमिकता मांडणे

१४. उचित प्राथमिकता कशा देता येऊ शकतात?

१४ गंभीर आजाराला तोंड देत असताना कुटुंबाने, “मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात,” या प्रेरित शब्दांची आठवण ठेवल्यास बरे होईल. (नीतिसूत्रे १५:२२) आजारामुळे आलेल्या परिस्थितीबद्दल कौटुंबिक सदस्य एकत्र येऊन त्याची चर्चा करू शकतात का? असे प्रार्थनापूर्वक केल्यास आणि मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनाकडे पाहिल्यास निश्‍चितच उचित ठरेल. (स्तोत्र २५:४) अशा चर्चेत कशाचा विचार केला पाहिजे? वैद्यकीय, आर्थिक आणि कौटुंबिक निर्णय घ्यावयाचे असतात. प्राथमिक काळजी कोण घेईल? त्या काळजी घेण्याला कुटुंब कसे सहकार्य करू शकते? केलेल्या योजनांचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर कसा होईल? प्राथमिक काळजी घेणाऱ्‍याच्या आध्यात्मिक आणि इतर गरजा कशा पुरवल्या जातील?

१५. गंभीर आजाराला तोंड देत असलेल्या कुटुंबांकरता यहोवा कोणता आधार पुरवतो?

१५ यहोवाच्या निर्देशनासाठी मनःपूर्वक प्रार्थना, त्याच्या वचनावर मनन आणि बायबलमध्ये दिलेल्या मार्गाचे धैर्याने अनुसरण केल्याने अनेकदा आपल्या अपेक्षांपेक्षाही अधिक आशीर्वाद मिळतात. कुटुंबातील आजारी सदस्याची आजारापासून नेहमीच सुटका होणार नाही. परंतु, यहोवावर अवलंबून राहिल्याने कोणत्याही परिस्थितीत त्याचा परिणाम चांगला होत असतो. (स्तोत्र ५५:२२) स्तोत्रकर्त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१८, १९; तसेच स्तोत्र ६३:६-८ देखील पाहा.

मुलांची मदत करणे

कुटुंब एकत्र मिळून कार्य करते तेव्हा समस्या सोडवल्या जाऊ शकतात

१६, १७. तुमच्या लहान मुलांसोबत एखाद्या भावंडाच्या आजारपणाची चर्चा करताना कोणते मुद्दे मांडले जाऊ शकतात?

१६ गंभीर आजारामुळे कुटुंबातील मुलांना समस्या येऊ शकतात. म्हणून पालकांनी मुलांना, उद्‌भवलेल्या गरजा आणि मदत करण्यासाठी त्यांना काय करता येईल हे समजण्यास मदत केली पाहिजे. एखादे मूल आजारी पडले असल्यास, त्याच्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे व त्याची काळजी घेतली जात आहे याचा अर्थ इतर मुलांवर कमी प्रेम करण्यात येत आहे असा होत नाही, हे समजण्यास त्याच्या भावंडाना मदत केली पाहिजे. चीड अथवा प्रतिस्पर्धा विकसित होऊ देण्याऐवजी, पालक, आजारपणामुळे आलेल्या परिस्थितीला सहकार्याने हाताळत असताना इतर मुलांना एकमेकांसोबत जवळचे बंधन आणि खरी आपुलकी वाढवण्यासाठी मदत करू शकतात.

१७ तरुण मुले, पालकांनी त्यांना वैद्यकीय परिस्थितींबद्दल लांबलचक किंवा किचकट स्पष्टीकरणांऐवजी त्यांच्या भावनांना अपीलकारक अशी माहिती दिल्यास सामान्यपणे ते लगेच प्रतिसाद देतील. यास्तव, त्यांना कुटुंबातील आजारी सदस्य कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची कल्पना काही अंशी दिली जाऊ शकते. निरोगी मुले, ज्या गोष्टींना अगदी क्षुल्लक समजतात अशा बऱ्‍याच गोष्टी करण्यापासून आजारपण एखाद्या व्यक्‍तीला कसे वंचित ठेवते हे पाहतात, तेव्हा ते अधिक “बंधूप्रेम करणारे” आणि “कनवाळू” होतील.—१ पेत्र ३:८.

१८. आजारपणामुळे उद्‌भवलेल्या समस्या समजण्यासाठी मोठ्या मुलांना कशी मदत केली जाऊ शकते आणि याचा लाभ त्यांना कसा होऊ शकतो?

१८ मोठ्या मुलांना, कठीण परिस्थिती अस्तित्वात असल्याची आणि त्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाकडून त्यागाची अपेक्षा केली जात असल्याची जाणीव करून देण्यासाठी मदत केली पाहिजे. डॉक्टरांचे बील आणि दवाखान्याचा खर्च यामुळे इतर मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरवणे पालकांना शक्य नसेल. मुलांना याची चीड येऊन त्यांना वंचित ठेवले जात आहे असे वाटते काय? अथवा ते परिस्थिती समजतील आणि आवश्‍यक असलेले त्याग पत्करण्यास इच्छुक असतील का? ही गोष्ट, ज्या रीतीने या बाबीची चर्चा होते आणि कुटुंबात जो आत्मा कारणीभूत होतो यावर अधिक अवलंबून असते. वस्तुतः, अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक सदस्याच्या आजारपणामुळे, पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करण्यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्यात मदत मिळाली आहे: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍यांचेहि पाहा.”—फिलिप्पैकर २:३, ४.

वैद्यकीय उपचाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे

१९, २०. (अ) कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असतो तेव्हा कुटुंब प्रमुखावर कोणत्या जबाबदाऱ्‍या येतात? (ब) बायबल एक वैद्यकीय पाठ्यपुस्तक नसले तरी आजारपणाविषयी कोणत्या प्रकारे ते मार्गदर्शन पुरवते?

१९ वैद्यकीय उपचार जोवर देवाच्या नियमाच्या विरुद्ध जात नाही तोवर संतुलित ख्रिश्‍चन कोणताही आक्षेप घेत नाहीत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडतो तेव्हा दुःख सोसणाऱ्‍या पीडिताला त्यापासून आराम मिळावा म्हणून ते मदत मिळवण्यास उत्कट असतात. तरीसुद्धा, कदाचित परस्पर विरोधी वैद्यकीय मतांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. या व्यतिरिक्‍त, अलीकडील वर्षांमध्ये नवीन आजार आणि प्रकृतीबिघाड अचानक उद्‌भवत आहेत आणि यांपैकी अनेकांवर सर्वसाधारण मान्यताप्राप्त उपचार पद्धत नाही. इतकेच नव्हे तर काही वेळा अचूक निदान करून घेणे देखील कठीण असते. तर मग, एखाद्या ख्रिश्‍चनाने काय करावे?

२० एक वैद्य बायबलचा लेखक होता आणि प्रेषित पौलाने आपला मित्र, तीमथ्य याला मदतदायक वैद्यकीय सल्ला दिला असला, तरी शास्रवचने एक वैद्यकीय पाठ्यपुस्तक नसून, ते नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. (कलस्सैकर ४:१४; १ तीमथ्य ५:२३) या कारणास्तव, वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत, ख्रिस्ती कुटुंब प्रमुखांनी स्वतःच संतुलित निर्णय घेण्यास हवेत. कदाचित त्यांना एकापेक्षा अधिक वैद्यकीय मत मिळवण्याची गरज भासेल. (पडताळा नीतिसूत्रे १८:१७.) कुटुंबातील त्यांच्या आजारी सदस्याला, उपलब्ध असलेली उत्तम मदत मिळावी अशी त्यांची निश्‍चितच इच्छा असेल आणि अनेक जण ही मदत नेहमीच्या वैद्यकीय डॉक्टरांकडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहींना पर्यायी रोगनिवारण उपचारपद्धती अधिक बऱ्‍या वाटतील. हा देखील एक वैयक्‍तिक निर्णय आहे. तरीसुद्धा, आरोग्य समस्या हाताळताना, ‘देवाचे वचन पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाशासारखे’ असावे म्हणून त्याला ख्रिश्‍चन सोडत नाहीत. (स्तोत्र ११९:१०५) त्यांनी बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचे सतत अनुकरण केले पाहिजे. (यशया ५५:८, ९) यास्तव, भूतविद्येचे मागमूस असलेल्या उपचारपद्धतींपासून ते दूर राहतात आणि बायबल तत्त्वांचे उल्लंघन करणारे उपचार ते टाळतात.—स्तोत्र ३६:९; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; प्रकटीकरण २१:८.

२१, २२. बायबल तत्त्वाबद्दल आशियातील एका स्त्रीने काय तर्क केला आणि तिने घेतलेला निर्णय तिच्या परिस्थितीत कसा योग्य ठरला?

२१ आशियातील एका तरुण स्त्रीच्या प्रकरणाचा विचार करा. ती यहोवाच्या एका साक्षीदारासोबत बायबलचा अभ्यास करण्याद्वारे बायबलविषयी शिकू लागल्यानंतर लगेच तिने केवळ सव्वा तीन पौण्ड वजनाच्या एका अपरिपक्व बालिकेला जन्म दिला. बालिका पूर्णपणे मतिमंद असेल आणि तिला कधीही चालता येऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा त्या स्त्रीला अतिशय दुःख झाले. बालिकेला अपंगालयात द्यावे असा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला. या गोष्टीबद्दल काय करावे हे तिच्या पतीला कळत नव्हते. मग तिने कोणाकडे जावे?

२२ ती म्हणते: “‘संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे,’ हे बायबलमधून शिकल्याचे मला आठवते.” (स्तोत्र १२७:३) तिने हे “धन” घरी घेऊन जाण्याचे आणि त्याची काळजी घेण्याचे ठरवले. सुरवातीला हे कठीण होते पण यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीतील ख्रिस्ती मित्रांच्या मदतीमुळे त्या स्त्रीला ते मूल सांभाळता आले आणि आवश्‍यक असलेले खास साह्‍य पुरवता आले. बारा वर्षांनंतर, ते मूल राज्य सभागृहात सभांना जाऊ लागले आणि तेथील तरुणांच्या संगतीचा आनंद घेऊ लागले. ती माता म्हणते: “बायबल तत्त्वांनी योग्य ते करण्याची मदत मला केल्याबद्दल मी फार ऋणी आहे. बायबलने मला यहोवा देवासमोर शुद्ध विवेक राखण्यास आणि मला आयुष्यभर खेद वाटला असता अशा गोष्टी न करण्याची मदत केली.”

२३. आजाऱ्‍यांसाठी आणि जे त्यांची काळजी घेतात अशांकरता बायबल कोणते सांत्वन देते?

२३ आपल्याला आजारपण सदासर्वदापर्यंत नसेल. “मी रोगी आहे, असे एकहि रहिवाशी म्हणणार नाही” या काळाकडे यशया संदेष्ट्याने अंगुली दर्शवली. (यशया ३३:२४) त्या अभिवचनाची पूर्णता वेगाने जवळ येत असलेल्या नवीन जगात होईल. तरीही, तोवर आपल्याला आजारपण आणि मृत्यूसोबत झगडावे लागेल. देवाचे वचन आपल्याला मार्गदर्शन आणि मदत पुरवते हे आनंदाचे आहे. बायबल पुरवत असलेले वर्तनाचे मूलभूत नियम चिरकालिक आहेत आणि ते अपरिपूर्ण मानवांच्या सतत बदलत राहणाऱ्‍या मतांच्या वरचढ आहेत. या कारणास्तव, स्तोत्रकर्त्याने जे लिहिले त्याजशी सुज्ञ व्यक्‍ती सहमत होते: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते. परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. . . . परमेश्‍वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. . . . ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते.”—स्तोत्र १९:७, ९, ११.